सामग्री पर जाएँ
सर्वकोश
संग्रह पर लौटें

अमृतानुभव एवं चांगदेव पासष्टी (सन्त ज्ञानेश्वर - चिद्विलासवाद एवं अद्वैत अनुभूति सटीक)

Amritanubhava and Changdev Pasashti of Sant Jnanadev

सन्त ज्ञानेश्वर / ज्ञानदेव महाराज द्वारा

DevanagariHindipublished138 पृष्ठ

प्रकरण पहिलें ५
ओव्या
ऐशीं हीं निरुपाधिकें । जगाचीं जियें जनकें ॥ तियें वंदिली
मिया मूळिकें । देवोदेवी ॥ १ ॥ जो प्रीयूचि प्राणेश्वरी । उलथे
आवडीचिये सरोभरी ॥ चारुस्थळीं एकाहारी । एका आंगाची ॥
॥ २ ॥ आवडीचेनि वेगें । एकएकातें गिळिती आंगें । कीं
द्वैताचेनि पांगें । उगाळिते आहाति ॥ ३ ॥ जी एकचि नव्हे
एकसरे । दोघां दोपण नाहीं पुरें ॥ काय नेणों साकारें । स्वरूपें
जिये ॥ ४ ॥ कैसी स्वसुखाची अळंकी । जे दोनीपण मिळोनि
एकी ॥ नेदेतीच कवतकी । एकपण फुटों ॥ ५ ॥ हा ठावोवरी
वियोगभेडे । जे बाळ जगायेवढें ॥ वियाली परी न मोडे ।
दोघुलेपण ॥ ६ ॥
शिवशक्ति ( देवो-देवी ) जगाचें मूळ कारण असून त्याला उपाधि
नाहीं. अशा प्रकारच्या शिवशक्तीला मी नमस्कार केला. १. आपलें
एकपण न मोडतां, स्वतःच्या स्वरूपावर प्रेमाच्या एका लहरींत अर्धनारी-
नटेश्वराच्या सारखा, हा ईश्वरच शक्तिरूप होतो. २. हीं दोघें एकमेकांचीं
रूपें प्रेमभरानें आत्मसात् करतात. मग द्वैत शिल्लक राहत नाहीं. पुनः
क्रीडेसाठीं वेगळीं होतात. ३. प्रकृति आणि पुरुष सर्वशः एक आहेत
असें म्हणणें खरें नव्हे, तसेंच तीं दोन आहेत म्हणूं तर दोन म्हणण्याइतकीं
दोन नाहींत. दोघेहि रूपानें-आकारानें कशी काय आहेत कांहीं उलगडत
नाहीं. ४. स्वतःच्या सुखांत रममाण होण्याची यांना इतकी गोडी आहे कीं,
विलासासाठीं आपल्याच अधिष्ठानावर स्थिर राहून कौतुकानेंहि आपलें एकपण
भंग होऊं देत नाहींत. ५. एकमेकांपासून दूर होण्यास हे नाखूष असतात.
जगाएवढें थोर बाळ झाले ते दोघे प्रेम बिघडू देत नाहींत. वियोगाचें त्यांना
भय वाटतें. ६.

६ सार्थ अमृतानुभव
आपुलिये आंगीं संसारा । देखिलिया चराचरा ॥ परी
नेदितीच तिसरा । झोक लागों ॥७॥ जया एके सत्तेचें बैसणें ।
दोघां एका प्रकाशाचें लेणें ॥ जे अनादि एकपणें । नांदती दोघें
॥ ८ ॥ भेदु लाजोनि आवडी । एकरसीं देत बुडी । जो भोग-
णया थाव काढो । द्वैताचा जेथें ॥ ९ ॥ जेणें देवें संपूर्ण देवी ।
जियेवीण कांहींना तो गोसावी ॥ किंबहुना एकोपजीवी । एक-
एकाची ॥ १० ॥ कैसा मेळु आला गोडिये । दोघे न माती
जगीं इये । कीं परमाणूहि माजी उवाये । मांडीली आहाती ॥ ११ ॥
जिहीं एकएकावीण । न कीजे तृणाचेंही निर्माण ॥ जिये दोघे
जीवप्राण । जिया दोघां ॥ १२ ॥
चराचर सृष्टि आपल्यापासून झाल्याचें पाहूनहि प्रकृतिपुरुष हे जग हा
आपल्याशिवाय अन्य पदार्थ आहे असा विचार अंगाला लागूं देत
नाहींत. ७. तीं दोघेहि एकाच प्रकाशानें प्रकाशतात, एकाच अधिष्ठाना-
वर राहतात. अनादिकालापासून एकपणानें राहत आहेत. ८. प्रकृति-
पुरुषांमध्यें, आपल्याला भोग व्हावा या इच्छेनें स्वतः भेद द्वैत शोधण्या-
करिता गेला; पण त्याला द्वैत तर सांपडलें नाहींच, उलट आपल्या
अपकीर्तीला लाजून, त्यांच्या ऐक्यरसामध्यें तो बुडी देतो, म्हणजे भेदच
अभेद होऊन जातो. ९. ज्या देवाच्या योगानें देवीला पूर्णपणा आला
व जिच्याशिवाय ज्याला गोसावीपणा नाहीं ! काय आश्चर्य सांगावें !
हीं प्रकृतिपुरुषें परस्परांचीं उपजीव आहेत. १०. या दोघांच्या गोडींतील
ऐक्याचें वर्णन काय करावें ? हीं दोघेहि त्रैलोक्यांत ओतप्रोत भरलेलीं
असून, परमाणूमध्येंही मोठ्या आनंदानें नांदत आहेत. ११. जीं परस्परां-
वांचून गवताच्या काडीचीही उत्पत्ति करीत नाहींत. हीं दोघें एकमेकांना
जीव कीं प्राण आहेत. १२

प्रकरण पहिलें ७
घरवातें मोटकीं दोघें । जैं गोसावी सेजे रिघे ॥ तैं दंपत्यपणें
जागे । स्वामिणी जे ॥ १३ ॥ जया दोघांमाजी एकादे । विपाये
उमजले होय निदे ॥ तरी घरवात गिळुनी नुसधें । कांहींना
करी ॥ १४ ॥ दोन्ही अंगाची आटणी । गिंवसित आहाती एक-
पणीं । जालीं भेदाचिया वाहणी । आर्धार्धी जियें ॥ १५ ॥ विषो
एकमेकांचीं जिये । जिये एकमेकांची विषयीं इये ॥ जिहीं दोघीं
सुखिये । जिये दोघे ॥ १६ ॥ स्त्रीपुरुष नामभेदे । शिवपण एकलें
नांदे ॥ जग सगळे अधाधे- । पणें जिहीं ॥ १७ ॥ दो दांडी एक
श्रुती । दोहीं फुलीं एक द्यति । दोहों दीवीं दीप्ती । एकीची जेवीं
॥ १८ ॥ दो ओंठीं एकी गोष्टी । दो डोळां एकी सृष्टी ॥ तेवीं
दोघीं जिहीं सृष्टी । एकीचि जें ॥ १९ ॥
घरादारांत मोजकीं दोघेंच आहेत. म्हणजे सर्व जगत् प्रकृतिपुरुषांनीं
व्यापिलेलें आहे. त्यांत जेव्हां पति बिछान्यावर जातो तेव्हां प्रकृति
कुटुंबपणानें जागी असते. १३. या दोघांपैकीं एखादें कदाचित् निद्रेंतून
जागें झालें तर संसार नाहींसा होतो, व केवळ स्वरूपमात्र शिल्लक राहतें,
दुसरें कांहीं नाहीं. १४. येथें प्रकृतिपुरुष आपल्या स्वरूपाचा लय शुद्ध
ब्रह्मस्वरूपांत करतात व तींच व्यवहाराकरितां अर्धी अर्धी होऊन भेद
दाखवितात. १५. जीं परस्पर एकमेकांस विषयविषयीभावानें आहेत, तसेंच
जी दोघें एकमेकांमुळे आनंदी आहेत. १६. सर्व जगतांत, स्त्रीपुरुष या नाम-
भेदानें एक शिवच नांदत आहे. त्रैलोक्य यांच्या अर्ध्या भागानें भरलेलें
आहे. १७. टिपऱ्या दोन, पण नाद एक; फुलें (सजातीय) दोन, पण
सुगंध एक; दिवे दोन, पण प्रकाश एक; ओठ दोन, पण गोष्ट जशी एक;
डोळे दोन, पण दृष्टि जशी एक; तसें सृष्टीमध्यें प्रकृति-पुरुषांची व्याप्ति
आहे, असें म्हणावें मात्र; पण तत्त्वतः विचार केला असतां एक शिवच
व्याप्त आहे. १८-१९.

८ सार्थ अमृतानुभव
दाऊनि दोनीपण । एकरसाचें आरोगण । करीत आहे मेहूण ।
अनादि जे ॥ २० ॥ जे स्वामीचिया सत्ता । वीण असो नेणें
पतिव्रता ॥ जियेविण सर्वकर्ता । कांहीं ना जो ॥ २१ ॥ जे
कीं भाताराचें दिसणें । भातारूचि जियेचें असणें ॥ नेणिजती
दोघेजनें । निवडूं जिये ॥ २२ ॥ गोडी आणि गुळ । कापूर
आणि परिमळू ॥ निवडूं जातां पांगळु । निवाडू होय ॥ २३ ॥
समग्र दीसी घेतां । जेवी दीपचि ये हाता ॥ तेवीं जियेचिया
तत्त्वतां । शिवूचि लाभे ॥ २४ ॥ जैसी सूर्य मिरवे प्रभा । प्रभे
सूर्यत्वचि गाभा ॥ तैशी भेद गिळित शोभा । एकाचि जे ॥ २५ ॥
कां बिंब प्रतिबिंबा द्योतक । प्रतिबिंब बिंबा अनुमापक ॥ तैसें
द्वैतमिसेँ एक । बरवत असे ॥ २६ ॥
आपल्या अनादि स्थितींत द्वैताभास दाखवून ( प्रकृति—पुरुषरूपीं
मेहूण ) आपल्या वास्तव स्वरूपाचा अनुभव घेत आहे. २०. शिवाच्या
सत्तेशिवाय ज्या शक्तीला पतिव्रतापण नाहीं आणि जिच्यावांचून शिवाला
सर्वकर्तेपणा नाहीं. २१. पुरुषाच्या ठिकाणीं जें ज्ञान आणि जी सत्ता आहे,
तेंच ज्ञान आणि तीच सत्ता प्रकृतीमध्यें आहे. कोणती याचा निवाडा करतां
येत नाही. २२. गूळ आणि त्यांतील गोडी, कापूर आणि त्यांतील सुगंध,
यांचा निवाडा करावयास गेलें असतां निवाडाच पांगळा होतो-निवाडा
स्वरूपेंकरून उरत-राहत नाहीं. दिव्याचा सर्व प्रकाश ग्रहण करूं गेलें
असतां दिवाच हातीं येतो; त्याप्रमाणें शक्तिस्वरूपाचा विचार करूं गेलें
असतां शिवाचीच प्राप्ति होते. २३-२४. सूर्याच्या ठिकाणीं प्रभा शोभते;
आणि प्रभेला अधिष्ठान सूर्यच आहे, तसा भेद नाहींसा होऊन एक
प्रभाच शोभते; किंवा ज्याप्रमाणें बिंब, प्रतिबिंबाचें द्योतक म्हणजे दाखवि-
णारे आहे व प्रतिबिंब बिंबाएवढेंच असतें. प्रकृतिपुरुष अशा द्व

प्रकरण पहिलें ९
सर्व शून्याचा निष्कर्षु । जिया वाइला केला पुरुषु ॥ जेंणें
दादुलेन सत्ता विशेषु । शक्ति जाली ॥ २७॥ जिये प्राणेश्वरी-
वीण । शीवींहि शीवपण । थारौं न शके ते आपण । शीवें घडली
॥२८॥ ऐश्वर्येसी ईश्वर । जियेचें अंग संसारा । आपण होउनि
उभारा । आपणचि जें ॥ २९॥ पतीचेनि अरुपपणें । लाजोनि
अंगाचें मिरवणें ॥ केलें जगायेवढें लेणें । नामरूपाचें ॥ ३० ॥
ऐक्याचाहि दुकाळा । बहुपणाचा सोहळा ॥ जिये सदैवेचिया लीळा ।
दाखविला ॥ ३१ ॥ आंगाचिया आटाणिया । कांतु उवाया
आणिला जिया । स्वसंकोचें प्रिया । रुढविली जेणें ॥ ३२ ॥
सर्व शून्याचा म्हणजे सर्व दृश्य पदार्थांचा निषेध करून ज्या परमा-
त्म्याचा निषेध सांगितला नाहीं, असा जो परमात्मा, तो सर्व शून्याचा
निष्कर्ष म्हणजे परमावधि होय. त्या परमात्म्याला ज्या बाईनें पुरुषत्वाला
आणलें, त्याच नवऱ्याच्या सत्ताविशेषाला घेऊनच तिला शक्तिपणा आला.
२७. ज्या प्रकृतीवांचून शिवाच्या ठिकाणीं शिवपणा नाहीं अशा त्या
प्रकृतीला शिवानें निर्माण केली, म्हणजे आपल्या ठिकाणीं धारण केली.
२८. ज्या प्रकृतीनें आपल्यापासून आकाशादि सर्व संसाराची उत्पत्ति केली,
आणि आपल्याच कर्तृत्वानें ईश्वराला ऐश्वर्याला आणून आपली स्वतःची
सिद्धि आपणच केली. २९. नामरूपशून्य परमात्मा आपला पति आहे हें
पाहून प्रकृतीला लाज वाटली, आणि मग तिने नामरूपात्मक जगत् हाच
कोणी एक मोठा अलंकार आपल्या स्वतःच्या ऐश्वर्यानें बनविला. ३०. ज्या
परमात्म्याच्या ठिकाणीं ऐक्याचा सुद्धां दुष्काळ आहे, त्या ठिकाणीं त्या
भाग्यवान् बायकोनें आपल्या सहज लीलेनें बहुपणाचा सोहळा दाखविला.
३१. या प्रकृतीनें आपल्या अंगाची आठणी करून परमात्म्याला उत्कर्षाला
आणलें खरें, पण आपल्या स्वरूपाचा संकोच करून घेतला आहे, म्हणूनच
ती जगांत नांदत आहे. ३२.

१० सार्थ अमृतानुभव
जियेतें पहावयाचिया लोभा । चढे दृष्टत्वाचिया क्षोभा ॥
जियेतें न देखतुचि उभा । आंगचि सांडी ॥ ३३ ॥ कांतेचिया
भिड । अबला होये जगायेवढा ॥ अंगविला उघडा । जियेवीण
॥३४॥ जो हा ठाव मंदरूपें । उवाइलेपणें हारपे ॥ तो जाला
जियेचेनि पडपें । विश्वरूप ॥३५॥ जिया चेवविला शीवु । वेद्याचें
बोणें बहु ॥ वाढितेणेशी जेउ । धाला जो ॥ ३६ ॥ निदेलेनि
भातारें । जे विये चराचरें ॥ जियेचा विसावला नुरे । आंबुले-
पणही ॥ ३७॥ जंव कांत लपों बैंसे । तंव नेणिजे जियोद्देशें ॥
जिये दोघे आरिसे । जिया दोघा ॥ ३८ ॥
प्रकृतीला पाहण्याच्या इच्छेनें पुरुष द्रष्टा बनतो म्हणजे द्रष्टत्वदशेला
येतो आणि ती दिसली नाहीं तर उभ्या उभ्या अंग टाकतो ! ३३. पत्नीच्या
भिडेने पति जगाएवढी मोठी उपाधि आवरणारा होतो आणि तिच्यावांचून
उघडा दिसतो. माया नाहींशीं झाल्याबरोबर जीवेश्वरादि सर्व जगत् नष्ट
होते व परमात्माच शिल्लक राहतो. ३४. आपल्या स्वरूपानंदाने परमात्मा
इतक्या सूक्ष्म भावाला येतोसा दिसतो म्हणजे सामान्यरूपानें सर्वव्यापक
होऊन प्रकृतीच्या शोभेनें विश्वरूप बनतो ३५. ज्या प्रकृतीनें, वेदरूपी
पक्वान्नाच्या भोजनाकरितां पुरुषाला जागा केला, पण तो जागा झाल्याबरोबर
वाढणारीणीसुद्धां विश्वरूपीं सर्व पक्वान्नें खाऊन टाकून तृप्त झाला म्हणजे शुद्ध
अब्रह्मच स्वरूपानें शिल्लक राहतें. ३६. पुरुष निजला असतां प्रकृति चराचर
जगताला प्रसवते आणि ती लयाला गेली म्हणजे त्याचा पुरुषपणा राहत
नाहीं. ३७. पुरुष हिच्याकरितां विशेष रूपाचें निरोधन घेतो, तेव्हा तो
विशेषरूपानें कळून येत नाहीं. परस्परांना प्रकाशित करणारे हे दोन
आरसेच आहेत. सारांश, पुरुषाचें ज्ञानस्वरूप प्रकृतीच्या सत्त्वगुणामुळें
प्रतीत होते, आणि प्रकृतीचें अस्तित्व पुरुषाच्या सत्तेनें उपलब्ध होतें.३८.

प्रकरण पहिलें ११
जियेचोनि अंगलगें । आनंद आपणा आरोगूं लागे ॥ सर्व-
भोक्तृत्वही नेघे । जियेवीण कांहीं ॥३९॥ जया प्रियेचें जें अंग ।
जो प्रियु जियेचें चांग ॥ कालवूनि दोन्ही भाग । जेविते आहाति
॥ ४० ॥ जैसी कां समीरेंसकट गती । कां सोनियासकट कांती
॥ तैशी शीवेशीं शक्ति । अघवीच जे ॥ ४१ ॥ कां कस्तूरीसकट
परिमळु । कां उष्मेसकट अनळु ॥ तैसा शक्तीशी केवळु । श्री-
शीवूचि जो ॥४२॥ राती आणि दीवो । पातली सूर्याचा ठावो ॥
तैसी आपुलिया साचीं वावो । दोघे जिये ॥ ४३ ॥ किंबहुना
तिये । प्रणवाक्षरी विरुढतिये ॥ दशेचीही वैरिये । शीवशक्ती
॥ ४४ ॥ हें असो नामरूपाचा भेदशिरा । गिळित एकार्थाचा
उजिरा ॥ नमो तया शीववोहरा । ज्ञानदेवो म्हणें ॥ ४५ ॥
हिच्या संबंधानेंच शिव आपला आनंद आपण भोगतो आणि ती नसेल
तर त्याला आपला आनंद भोगतां येत नाहीं. ३९. पुरुषाला शोभविण्याला
प्रकृतीचें स्वरूप कारण आहे. प्रकृतीला शोभा आणतो परमात्माच. शिव
व शिवा एकत्र होऊन द्वैताचा विलास करतात. ४० वायूंसह त्याच्या
गतीचें ग्रहण होतें, अथवा सोन्यासह त्याच्या कांतीचें ग्रहण होतें किंवा
कस्तुरीसह गंध, किंवा उष्णतेसह अग्नि याचें ग्रहण होतें, तसें प्रकृतीसह-
वर्तमान केवळ शिवच असतो. ४१-४२. सूर्याच्या घरीं दिवस व रात्र
गेलीं असता नाहींशीं होतात, तशीच प्रकृति व पुरुष हीं दोघेहि अधिष्ठानाच्या
ठिकाणीं नाहींतच. ४३. प्रणव म्हणजे ओंकार, त्यांतून निघणाऱ्या जगताचीं
हीं दोघेंहि वैरी आहेत. यांच्या वास्तव स्वरूपाच्या विचारापुढें जगाचें
अस्तित्व टिकत नाहीं. यापेक्षां अधिक काय सांगावें ? ४४. नामरूपात्मक
जगत् हाच कोणीएक द्वैतरूपी शिरा तो खाऊन टाकून अवशेष परमात्मतत्त्व
प्रकट करणाऱ्या या शिवशक्ति दांपत्याला माझा नमस्कार, असें श्रीज्ञानदेव
महाराज म्हणतात. ४५.

, त:
Wait, after रू: is it पां or प?
It is "स्वरूपांत )" with an anusvara! Let's zoom in:
"अधिष्ठानस्वरूपांत )" - yes, there's a kana on प, and a dot/anusvara above it!
Wait, look at line 12:
"प्रकृतिपुरुषाच्या आलिंगनामध्ये ( अधिष्ठानस्वरूपांत ) दोघेहि विरून"
"दोघेहि" - द ला काना एक मात्रा, घ ला एक मात्रा, ह ला ऱ्हस्व इकार: दोघेहि.
"विरून" - वि ला ऱ्हस्व इकार, र ला दीर्घ ऊकार, न.

Line 13:
जातात. मग सर्व अज्ञान निवृत्त होतें. केवळ स्वरूपेंकरून ज्ञानच म्हणजे
Wait:
"जातात. मग सर्व अज्ञान निवृत्त होतें. केवळ स्वरूपेंकरून ज्ञानच म्हणजे"
Check "स्वरूपेंकरून": स्व, रू, पें, क, रू, न. Yes!

Line 14:
परमात्मा उरतो. ४६. प्रकृतिस्वरूपाचा विचार करूं गेलें असतां, गंगा
Wait:
"परमात्मा उरतो. ४६. प्रकृतिस्वरूपाचा विचार करूं गेलें असतां, गंगा"
"उरतो." - full stop.
"४६." - 46, period.
"प्रकृतिस्वरू

प्रकरण पहिलें १३
सांगता वाचेतें वाचा । ठावो वाच्यवाचकाचा ॥ पडतां
काय भेदाचा । विटाळु होये॥५३॥सिंधु आणि गंगेची मिळणी ।
स्त्रीपुरुष नामाची मिरवणी ॥ दिसतसे तरी काय पाणी । द्वैत
होईल ॥५४॥ पाहे पा भास्य भासकथा । आपुलां ठाई दाविता ॥
एकपण काय सविता । मोडीतसे ॥५५॥ चांदाचिया दोंदावरी ।
होता चांदणियाची विखुरी ॥ काय उणें दीप्तीवरी । गिंवसो पा
दीपु ॥ ५६ ॥ मोतियाची कीळ । होय मोतियावरी पांगुळ ॥
अगळे निर्मळ । रूपा ये कीं ॥ ५७ ॥ मात्राचिया त्रिपुटिया ।
प्रणवू काय केला चिरटिया ॥ कीं णकार ती रेघटिया । भेदवला
काई ॥५८॥ अहो ऐक्याचें मुद्दल न ढळे । आणि साजिरेपणाचा
लाभ मिळे ॥ तरी खतरंगाचीं मुकुळें । तुरंबु कां पाणी ॥ ५९ ॥
वाणीनें वाणी असा शब्द उच्चारा. शब्द दोन दिसले तरी, वाणीला
भेदाचा स्पर्श होत नाहीं. ५३. गंगा समुद्राला मिळाली, या वाक्यानें
स्त्री-पुरुष नामाचा भेद दिसला, तरी पाण्याच्या ठिकाणीं भेदाचा स्पर्श
तरी होतो का ? नाहीं. ५४. प्रकाश व प्रकाश्य हीं दोन्ही सूर्याच्या
ठिकाणीं दिसलीं तरी सूर्याच्या एकत्वाची बाधा होत नाहीं. ५५. चंद्र-
बिंबावर चांदण्याचा प्रकाश पडला तरी तो चंद्राहून निराळा आहे का ?
अथवा आम्हांस फक्त दिवा हवा, प्रकाश नको, तर असें म्हणणाराला
प्रकाशाहून दिवा भिन्नपणानें शोधितां येईल काय? नाहीं. ५६. मोत्यावरील
तेज जसें त्याच्यावरच राहतें; उलट तें त्याला अधिक शोभा मात्र आणतें.
५७. अकार, उकार व मकार या तीन मात्रांनी प्रणवाच्या चिरफळ्या
केल्या असें म्हणावें का अथवा देवनागरी भाषेंत ' ण ' असा 'ए ' लिहितात
त्यामुळें ' ण ' अक्षर सिद्ध होतें असें म्हणावयाचें कीं त्याचा भेद होतो
असें म्हणावयाचें ? ५८. आपल्या एकत्वाला धक्का न लागतां जर शोभेचा
लाभ होत असेल तर पाण्यानें आपणांवर उठणारे तरंग हींच पुष्पें, त्यांचा
वास का न घ्यावा ? ५९.

१४ सार्थ अमृतानुभव
म्हणोनि भूतेशु भवानी । वंदिलीं न करोनि सिनानीं ॥ मी निघालों
नमनीं । तें हें ऐसें ॥ ६० ॥ दर्पणाचेनि त्यागें । प्रतिबिंब बिंबीं
रिगे ॥ कां बुडी दीजे तरंगें । वायूचा ठेला ॥ ६१ ॥ नातरी
नीदजात खेवो । पावे आपुला ठावो ॥ तैशी बुद्धित्यागें देवीदेवो ।
वंदिलीं मिया ॥ ६२ ॥ सांडूनि मीठपणाचा लोभु । मिठे सिंधु-
त्वाचा घेतला लाभु ॥ तेवीं अहं देउनि मी शंभु । शांभवी जालों
॥ ६३ ॥ शिवशक्ति समावेशें । नमन केलें म्यां ऐसें ॥ रंभागर्भे
आकाशे । रिघाला जैसा ॥ ६४ ॥
इति श्रीसिद्धानुवादे श्रीमदनुभवामृते शिवशक्ति-
समावेशनमनंनाम प्रथमं प्रकरणं संपूर्णम्
पुरुषाहून प्रकृति निराळी न होतां मीं त्यांना वंदन केलें.
असा हा माझा वंदन करण्याचा सोहळा आहे. ६०. मुखाचें प्रतिबिंब
आरशाच्या त्यागानें मूळ बिंबाशीं म्हणजे मुखाशीं ऐक्य पावतें, किंवा
वायु वाहण्याचा थांबल्याबरोबर तरंग पाण्यांत बुडी मारतात, पाणीरूप
होतात. ६१. झोंप संपताच लगेच आपल्याला आपलेपणाची प्राप्ति होते,
त्याचप्रमाणें जीवपणाच्या उपाधीचा त्याग करून मीं प्रकृतिपुरुषांना वंदन
केलें. ६२. मिठानें मीठपणाचा लोभ सोडल्यावर तें समुद्राएवढें होतें, त्याच-
प्रमाणें अहंपणा सोडून मीं प्रकृपुरुषरूप झालों. ६३. केळीचें सोपट काढलें
कीं, त्यांतील आकाश म्हणजे वायु आकाशरूप होतो, त्याचप्रमाणें प्रकृति-
पुरुषांशीं मीं अभिन्न असून त्याना अशाप्रकारें वंदन केलें. ६४.
याप्रमाणें श्रीमत् अमृतानुभव ग्रंथांतील शिवशक्तिसमावेशनमन नामक
पहिलें प्रकरण समाप्त झालें.
प्रकरण पहिलें समाप्त

प्रकरण दुसरें
आतां उपायवनवसंतू । जो आज्ञेचा आहेवतंतु । अमूर्तचि
परी मूर्तु ॥ कारुण्याचा ॥ १ ॥ मोडोनी मायाकुंजरु । मुक्त-
मोतियाचा वोगरु ॥ जेवविता सद्गुरु । निवृत्ति वंदूं ॥ २ ॥
अविद्येचे आडवे । सुंजीत जीवपणाचे भवे ॥ तया चैतन्याचे धांवे ।
कारुण्यें जो कीं ॥ ३ ॥ जयाचेनि आपांगपातें । बद्ध मोक्षपर्णी
आते ॥ भेटे जाणतया जाणतें । जयापाशीं ॥ ४ ॥ कैवल्या
कनकाचिया दाना । जो न कडसी थोरसाना ॥ द्रष्टयाचिया
दर्शना । पाढाउ जो ॥ ५ ॥ सामर्थ्यांचोनि बिकें । जो
शिवाचेंही गुरुत्व जिंकें ॥ आत्मा आत्ममुख देखे । आरसा
जिये ॥ ६ ॥
नाना प्रकारचीं साधनें हींच जणूं कांहीं अरण्यें. त्यांत वसंतऋतूसारखी
बहरलेली ब्रह्मविद्या. ती जाणून घेण्याची किल्ली म्हणजे श्रीसद्गुरु. हे सद्-
गुरु शरीर धारण करण्याचा त्यांचा स्वभाव नसतांहि केवळ भक्तांचा उद्धार
करण्यासाठीं देह धारण करतात. १. पुनःपुन्हा जन्ममरण घडणें या फेऱ्यांत
सांपडलेल्या जीवांकडे पाहण्यासाठीं धांवून येते. २. सद्गुरु हे मायारूप
हत्तीचा नाश करून त्याच्या जवळच्या मुक्तीची अवस्था हेंच मोतीं त्यांचें
पक्वान्न जीवांना आग्रहानें वाढतात. ३. अशा गुरुरायांना माझें वंदन असो.
जीवाचें अज्ञान सद्गुरूच्या ज्ञानमय कृपाकटाक्षानें नाहींसें होतें, आत्म-
स्वरूपाची प्राप्ति होते. शब्दपंडितांना पूर्ण पंडित भेटतो. ४. सद्गुरु
मोक्षरूपी सोनें दान देतात. लहान, मोठा असा फरक त्यांच्यांजवळ
नसतो. जीवाचें देवपण ते घालवितात, द्वैताचा पराभव करतात. ५.
ज्ञानरूपी सामर्थ्यामुळे त्रैगुण्योपाधीन सृष्टि घडविणाऱ्या देवतांचें कर्तृत्व
त्यांना सहज आकलन झालेलें असतें. सद्गुरुमूर्ति जीवांचे आत्म-
रूपदर्शक आरसेच होत. ६.

१६ सार्थ अमृतानुभव
बोधचंद्राचिया कळा । विखुरल्या एकवळा ॥ कृपापुनीव
लीळा । करी जयाची ॥ ७ ॥ जो भेटलियाचिसवे । पुरति
उपायाचे धांवे ॥ प्रवृत्तिगंगा स्थिरावे । सागरीं जिये ॥ ८ ॥
जयाचेनि अनवसरें । द्रष्टा ले दृश्याचें मोहिरेँ । जो भेटतखेव सरे ।
बहुरुपाचि हें ॥ ९ ॥ अविद्येचे काळवखें । कीं स्वबोधसुदिनीं
फांके ॥ सीतले प्रसादकें । जयाचेनि ॥ १० ॥ जयाचेनि
कृपासलिलें । जीवू हा ठाववरी पाखाळे ॥ जे शिवपणही
वोविळें । अंगीं न लवी ॥ ११ ॥ राखों जातां शिष्यातें ।
गुरुपणही धाडिलें थितें ॥ तरी गुरुगौरव जयातें । सांडीचिना
॥ १२ ॥ एकपण नव्हे सुसास । म्हणोनि गुरुशिष्याचें करुनि
मिस ॥ पाहणेंचि आपली वास । पाहतचि असे ॥ १३ ॥
जयाचेनि कृपातुषारें । परतलें अविद्येचें मोहिरें ॥ परिणमे
आपारें । बोधामृतें ॥ १४ ॥
बोधरूपी चंद्राला अनेक कला पसरल्या असल्या तरी त्या गुरुपादुका-
रूपीं पौर्णिमेला एकत्र होतात. ७. आपण अनेक साधनांसाठी केलेली
धांवाधांव सद्गुरुदर्शनानें संपते. प्रवृत्तीरूपी आपली गंगा सद्गुरुरूपी
समुद्राला मिळते. ८. गुरुमूर्तीचें दर्शन झालें नाहीं, तोपर्यंतच जगाच्या
व्यवहाराची महति. सद्गुरुदर्शनानें जगाचें मिथ्यापण कळतें. ९. सद्गुरु-
बोधरूपी प्रकाश फांकताच अज्ञानरूपी निशा संपते. आत्मसंतुष्ट करणारा
गुरुप्रसाद सर्वत्र पसरतो. १०. गुरुकृपारूपी शुद्धोदकानें हा जीवात्मा
इतका पवित्र होतो कीं, ब्रह्मत्व जरी त्याच्याकडे गेलें, तरी आपल्या
अंगाला तें तो चिकटू देत नाहीं. ११. शिष्यास ज्ञानी करावयाचें
झाल्यानें ते आपला मोठेपणा सोडतात. यांत त्यांचें अद्वितीयत्व कमी
होत नाहीं. १२. दुःखाशिवाय सुखाची किंमत समजत नाहीं; त्याच-
प्रमाणें सद्गुरु आपल्या शिष्याला सांगण्याच्या मिषानें आपले आपणालाच
पाहतात. १३. गुरुकृपेच्या जलकणांनीं अज्ञानाचे हल्ले परतवले जातात.
अपार बोधामृत लाभतें. १४.

प्रकरण दुसरें १७
वेद्या देतां मिठी। वेदकूही सुये पोटीं ॥ तन्ही नव्हेचि उशिटी ।
दिठी जयाची ॥१५॥ जयाचेनि सावायें । जीवू ब्रह्मउपर लाहे ॥
ब्रह्म तृणातळीं जाये । उदासें जेणें ॥ १६ ॥ उपास्तीवरी राब-
तिया । उपायफळीं येती मोडूनियां ॥ वरिवंडिलें जयाचिया ।
अनुज्ञा का ॥ १७॥ जयाचा दिठिवा बसंतु । जंव न रिघे निगम-
वनाआंतु ॥ तंव आपुलिये फळीं हातु । न घेपती ही ॥१८॥ पुढें
दृष्टीचेनि अलगें । खोची कीं निवटे मागें ॥ येवढया जैता नेघे ।
आपणपें जो ॥ १९ ॥ लघुत्वाचेनि मुदलें । बैसला गुरुत्वाचे
सेले ॥ नासूनि नाथिलें । सदैव जो ॥२०॥ नाहीं तें जळीं
बुडिजे । तैं घनवटें जेणें तरिजे ॥ जेणें तरिलियाहि नुरिजे ।
कवर्णी ठायीं ॥ २१ ॥
अशा त्या परमेश्वरस्वरूपी श्रीगुरूला मिठी देतांच, हा शिष्य त्यांशीं
लीन होतो. सद्गुरूची कृपादृष्टि मलिन होत नाहींच. १५. सद्गुरूच्या
आश्रयानेंच 'शिष्य अहं ब्रह्मास्मि' च्या पलीकडे जातो. गुरूंच्या उदासीनते-
मुळें अज्ञानातून तृणापेक्षाहि हलक्या अवदशेला जातो. १६. उपासनेसाठीं
राबल्यावर, त्या साधनेचीं फळें सद्गुरूच्या आज्ञेनें परिपूर्ण होतात. १७.
वेदांतशास्त्र हेंच एक वन. त्यांत सद्गुरूची कृपादृष्टि हाच कोणी वसंत
ऋतु जोपर्यंत अस्तित्वाला येत नाहीं, तोपर्यंत हीं मोक्षरूपी फळें हातीं
येणें शक्य नसतें. १८. सद्गुरूंनीं ज्ञानाचें अंजन आपल्या डोळ्यांत
घातलें कीं, सारें सारें अज्ञान तें नाहींसें करतें. आपण अशी फार मोठी
कर्तबगारी गाजवीत आहोंत, अशी सद्गुरूंच्या ठिकाणीं जाणीवहि नसतें.
१९. श्रीगुरूंचा मोठेपणा शिष्यरूपीं भांडवलावर आहे. तें भांडवल म्हणजे
शिष्यपणा सद्गुरूच घालवितात. २० आपल्याशीं शिष्याला समरस करून
घेतात. कल्पनेनें निर्मिलेल्या मायारूपी पाण्यांत त्यांना कृपाघन श्रीगुरूची
कृपाच तारते. त्यानंतर त्यांचें अस्तित्वहि शिल्लक राहात नाहीं. २१.
सा. अ....२

१८ सार्थ अमृतानुभव
आकाश हें सावेव । न बंधे आकाशाची हाव ॥ ऐसें कोणी-
एक भरीव । आकाश जो ॥ २२ ॥ चंद्रादि सुशीतळें । घडली
जयाचेनि मेळें । सूर्य जयाचेनि उजाळे कवडसेनी ॥ २३ ॥
जीवपणाचेनि त्रासें । यावया आपुलिये दशे । शिवही मुहूर्त पुसे ।
जया जोशयातें ॥ २४ ॥ चांदिणें स्वप्रकाशाचें । लेइला द्वैत-
दुगीचें ॥ तन्ही उघडेपण नवचे । चांदाचें जया ॥ २५ ॥ जो
उघड कीं न दिसे । प्रकाश कीं न प्रकाशे ॥ असतेपणेंचि नसे ।
कव्हणीकडे ॥ २६ ॥ आतां जो तो इहीं शब्दां । के। मिळवूं अनु-
मानाची मांदी ॥ हा प्रमाणाही वो नेदी । कोणाही मा ॥२७॥
आपल्या दृष्टीला दिसणारें हें पंचमहाभूतांनीं युक्त असें जड आकाश
आहे. सद्गुरूच्या ज्ञानरूप चिदाकाशाची बरोबरी त्या जड आकाशाकडून
होणें कठीण आहे. परमात्मा सद्गुरु हा ज्ञानरूप चिदाकारच होय. २२.
चंद्र वगैरे सर्व शांत वस्तुजात याच्यामुळे आकाराला आलें. याच्याच कव-
डशानें सूर्याला प्रकाश मिळाला. २३. अनंत ब्रह्मांडाची घडामोड करणारा
शिव देखील या उपाधीमुळे त्रासून जावा आणि मूळ स्वरूपाला केव्हां
मिळेल, असा त्यानें प्रश्न करावा यांत नवल नाहीं. मग आपण तर मर्त्य
पामर, आपण कोठें बसूं ? २४. चांदण्यांचा प्रकाश चंद्रानें पांघरला
म्हणजे दोन्ही वेगळीं वाटतात. पण प्रकाश चंद्रापासून मिळत असल्यानें
तो चंद्र एकच्या एकच उघड ठरतो. २५. त्याचप्रमाणें तो परमात्मा उघड
असूनहि दिसत नाहीं, स्वयंप्रकाशित असूनहि भासत नाहीं. आणि सर्व-
व्यापक असून जाणवत नाहीं. २६. अनेक शब्दांच्या रूपानें मिळवूं म्हटलें
तरी, तो कोणत्याहि रीतीनें त्यांच्या तडाख्यांत सांपडतच नाहीं. २७.

प्रकरण दुसरें १९
जेथें शब्दाची लिही पुसे । तेणेंसीं चावळों बैसे ॥ दुजयाच्या
रागीं रुसे । एकपणा जो ॥ २८ ॥ प्रमाणाची परी सरे । तैं
प्रमेयेचि अविष्करे ॥ नवल मेचु ये घुरे । नाहींपणाची ॥२९॥
कांहींबाही अळुमाळु । देखे येखादे वेळू ॥ तरी देखे तेंही
विटाळू । जया गांवीं ॥ ३० ॥ तेथें नमनें कां बोलें । केउती
सुये पाउले ॥ आंगीं लावूनि नाडिले । नांवचि येणें ॥ ३१ ॥
नव्हे आत्मया आत्मप्रवृत्ति । वाढवितां के निवृत्ति ॥ या नामाची
वाय बुंथी । सांडीचिना ॥ ३२ ॥ निवर्त्ये तंव नाहीं । मा
निवर्तवी हा काई ॥ तरी कैशी बैसे ठाईं । निवृत्तिनामाच्या
॥३३॥ परी सूर्यासी अंधकारु । कै जाहला होता गोचरु ॥ तरी
तमारी हा डगरु । आलाचि कीं ॥३४॥ तैसें लटिकें येणें रूढ ।
जड येणें उजिवडें ॥ न घडे तेंही घडे । याचिया मावा ॥३५॥
शाब्दिक वर्णनें जेथें कुचकामी तेथें तीं करून तरी काय उपयोग ?
वर्णन करणारा दुसरा असा द्वैतभाव त्यांना खपत नाहीं. ते एकरूप असतात.
२८. सर्व प्रकारचीं उदाहरणें बरोबर ठरत नाहींत, तेव्हांच मूळ स्वरूप
प्रकट होतें. तें निराकारी असूनहि साकार होतें, हें नवल होय. २९.
‘ थोडेसें पाहूं या ,’ असें म्हटलें तरी त्याचा तेथें स्पर्श चालत नाहीं. ३०.
माझ्या या नयनरूपी बोलांचा तेथें कसा प्रवेश होईल ? अनंत रूपांनीं
नटलेल्या परमात्म्यानें सर्व नामें व्यर्थ केलीं. या दृष्टीनें निवृत्ति हें नांव
सार्थच आहे. ३१. जर सद्गुरूच्या ठिकाणीं आत्मप्रवृत्ति नाहीं, मग
‘ निवृत्ति ’ हें नांव तरी कोठें टिकतें ? ३२. ते निवारण करणार म्हणजे
तरी काय करणार ? कारण निवारण करण्यासारखें कांहीं नाहींच. मग
निवृत्ति यांत असा काय मोठेपणा आहे ? ३३. सूर्यानें अंधार पाहिला
आहे तरी कधीं ? ‘ अंधाराचा शत्रु ’ असेंच सूर्याला म्हणतात ना ? ३४.
आणि सत्तेनें खोट्याला खरेपणा मिळतो. अचेतन, मिथ्या जगाला चेतना
मिळते आणि याच्या मायेनें न घडणारेंहि घडतें. ३५.

२० सार्थ अमृतानुभव
हांगा मायावशें दाविशी । तें माइक म्हणूनी वाळिशी ॥
अमाइक तव नव्हशी । कवणाही विषयो ॥ ३६ ॥ शिव शिवा
सद्गुरु । तुजला गूढा काय करूं ॥ एकाही निर्धार धरूं देतासी
कां ॥ ३७ ॥ नामें रूपें बहुवसें । उभारूनि पाडिलीं वोसें ॥
सत्तेचेनि आवेशें । तोषलासी ना ॥ ३८ ॥ जीवू घेतलिया उणें ।
चालों नेदिसी साजणें ॥ मृत्यु उरे स्वामीपणें । तेंही नव्हे
॥ ३९ ॥ विशेषाचेनि नांवें । आत्मत्वही न साहवे ॥ किंबहुना
नव्हे । कोण्हीच यया ॥ ४० ॥ राती नुरेचि सूर्या । नातरी
लवण पाणिया ॥ नुरे जेवि चेइलिया । नीद जैशी ॥ ४१ ॥
हे सद्गुरो ! आपण मायेच्या प्रकाशरूपीं ज्वालेने जगाचें दर्शन घडवितां
तें न टिकणारें आहे. निषिद्ध आहे असें सांगतां आणि आपण स्वतः तर
मायेच्या पैलतीराला असलेले आहांत ना ? ३६. छे छे, हे गुरुमाउली, हें तुझें
सारेंच गूढ आहे. ते उकलून समजून घ्यायचें ठरवून म्हटलें तरी तूं होऊं देत
नाहींस. ३७. केवढा तुझा व्याप ! किती तुझीं नांवें, अगणित तुझीं रूपें !
पण तूं सारींच पार जमीनदोस्त करतोस. पण या सत्तेचा तुम्हांला संतोष
वाटतो थोडाच ? ३८. छे, तिचा तुम्हांला गर्वहि नाहीं. शिष्यावर कृपा
करण्याआधीं हे गुरो, तुम्ही त्याच्या अहंपणाचा, जीवाभावनेचा बळी घेतां,
त्याला त्याशिवाय सामर्थ्यवान् करीत नाहीं. आपल्याशीं समरस झाल्यावर
तरी तो गुरुरूपानें शिल्लक राहतो म्हणावें तर तसें मुळींच नाहीं. ३९. त्यांतहि
विशेष म्हणजे जीवाला ' आत्मत्व ' हि सहन होत नाहीं. एवढेंच नव्हे,
कांहींच व्हावयाचें नसतें. ४०. सूर्योदयानंतर रात्र नसते. पाण्यांत पडल्यावर
मीठ शिल्लक राहात नाहीं आणि जागे झाल्यावर झोंप नाहीं. ४१.

प्रकरण दुसरें २१
कापुराचे थळीव । नुरेचि आगीची बरव । नुरेचि रूप नांव ।
तैसें यया ॥ ४२ ॥ याच्या हातां पायां पडे । तंव वंद्यत्वें पुढें
न मंडे ॥ न पडेचि हा भिडे । भेदाचिये ॥ ४३ ॥ आपणा-
प्रति रवि । उदो न करी जेवि ॥ हा वंद्य नव्हे तेवी । वंदनासी
॥ ४४ ॥ कां समोरपण आपुलें । न लाहिजे कांहीं केलें ॥ तैसें
वंद्यत्व घातलें । हिरोनी येणें ॥ ४५ ॥ आकाशाचा अरिसा ।
नुठी प्रतिबिंबाचा ठसा ॥ हा वंद्य नव्हे तैसा । नमस्कारासी
॥ ४६ ॥ परी नव्हे तरी न हो । हे वेखासि कां घेवो ॥ परी
वंदितयाही ठावो । उरों नेदी ॥ ४७ ॥ आंगौनि एकुणा झोलु ।
फेडितांचि तरि तो बाहेरीलु ॥ कडु फिटे आंतुलु । न फेडितांचि
॥ ४८ ॥
कापुराचे उत्तमोत्तम अलंकार अग्नीच्या सहवासांत आपलें नांव, रूप
जसें सोडतात, त्याप्रमाणें शिष्याचा गुरूपुढें भेद मावळतो. ४२. श्रीसद्-
गुरूची कितीही विनवणी केली तरी द्वैताचा पसारा मांडीत नाहींत.
भेदाच्या या भिडेला ते लाथाडून देतात. ४३. सूर्य हा स्वतःसाठीं उगवत
नाहीं, त्याप्रमाणें सद्गुरुमूर्ति स्वतःस वंद्य नाहीं. ४४. आपण आपणांस
समोर पाहूं शकत नाहीं; त्याप्रमाणें श्रीगुरूंनीं वंदन स्वतःपुरतें नष्ट केलें
आहे. ४५. आभाळांत प्रतिबिंब पडत नाहीं ना ? तसेंच वेगळेपणा
नसल्यामुळे, सर्वत्र सद्गुरूच भरल्यामुळे त्यांनीं नमस्कार दुसऱ्या कुणाचा
घ्यायचा तरी कसा ? म्हणूनच सद्गुरु हें वंद्यत्वाचे द्योतकहि नाहींत.
आणि नमस्कार करणारेहि नाहींत. ४६. बरे, नसतील सद्गुरु वंद्य तर
नसेनात का, मी कशाला त्यांना हीन लेखूं ? पण हा सद्गुरुराय नमस्कार
करणाराची सुद्धां नांवनिशी शिल्लक ठेवीत नाहीं. ४७. धोतराचें एक टोक
जोरांत ओढलें कीं, सर्व धोतर निसटायला वेळ लागत नाहीं. ४८.

२२ सार्थ अमृतानुभव
नाना बिंबपणासरिसे । घेऊनि प्रतिबिंब नासे ॥ नेलें
वंद्यत्व येणें तैसें । वंदतेनसी ॥ ४९ ॥ नाहीं रूपाची जेथें सोये ।
तेथें दृष्टिचें कांहींच नव्हे ॥ आम्हां फळले हे पाये । ऐशिया दशा
॥ ५० ॥ गुणातैलाचिया सोइरिका । निर्वाहिली दीपकाळिका ॥
ते कां होईल पुळिका । कापुराचिया ॥ ५१ ॥ तया दोहों
परस्परें । होय ना जंव मैल्हेरे ॥ तंव दोहींचेंही सरे । मरिसोंचि
॥ ५२ ॥ तेवि देखेना मी ययातें । तंव गेले वंद्य वंदिते ॥ चेइलिया
कांते । स्वप्नींचि जेवि ॥ ५३ ॥ किंबहुना इया भाषा । द्वैताचा
जेथें उपखा ॥ फेडूनियां स्वसखा । श्रीगुरु वंदिला ॥ ५४ ॥
याच्या सख्याची नवाई । आंगीं एकपणा रूप नाहीं ॥ आणि
गुरुशिष्य दुवाळीही । पवाडु केला ॥ ५५ ॥
बिंबासकट प्रतिबिंब नाहींसें होतें तसें वंदन करणाऱ्याच्या सह
सद्गुरू वंद्य नाहींसे करतात. म्हणजे दुजाभाव घालवितात. ४९. हें सारें
रूप आणि आकार ज्ञानाच्या पलीकडचें आहे तेथें त्या ज्ञानाचा कांहीं
उपयोग नाहीं हें समजायला मात्र सद्गुरूच्या चरणांचा आश्रय घ्यावा
लागतो.हा लाभ आम्हांस झाला आहे. ५०. कापूर ह्या वस्तूची ज्योति वेगळ्या
प्रकारची असते. तेल आणि त्यांत ठेवायची वात यांच्या सहवासानें उपज-
लेली ज्योत ही पण आणखी वेगळ्या प्रकारची असते. ५१. कापुराला
अग्नि लावल्याबरोबर कापूर जळतो, अग्नि नष्ट होतो. ते दोघेहि एकदमच
नाश पावतात. ५२. जागे झालेल्याला स्वप्नांतलें दांपत्यसुख कुचकामी.
श्रीगुरूंना पाहिल्याबरोबर वंदकत्व आणि वंद्यत्व नाहींसें झालें. ५३.
द्वैताचे हें शाब्दिक वर्णनहि निरर्थक म्हणून स्वात्मसखा श्रीगुरूंना मीं
नमस्कार केला. ५४. हें या स्वात्मसखा श्रीगुरूचें आश्चर्य आहे कीं याला
एकटेपणा नाही, रूप नाहीं आणि तरीसुद्धां गुरुशिष्याच्या द्वैतरूपानें
जगभर ज्ञान फैलावले आहे. ५५.

प्रकरण दुसरें २३
कैसा आपणा आपण । दोंवीण सोयरेपण ॥ या याहूनि
विलक्षण । नाहीं ना नोहे ॥ ५६ ॥ जग अवघें पोटीं माये ।
गगनायेवढें होऊनि ठाये ॥ कीं तेचि निसी साहे । नाहींपणाची
॥ ५७ ॥ कां पूर्णते तरी आधारू । सिंधू जैसा दुर्भरू ॥ तैसा
विरुद्धा पाहुणेरू । याच्या घरीं ॥ ५८ ॥ तेजा तमातें कांहीं ।
परस्परें निकें नाहीं ॥ परी सूर्याच्या ठाईं । सूर्यचि असे ॥ ५९ ॥
एक म्हणता भेदें । ते कीं नानात्वें नांदे ॥ विरुद्धे आपणया विरुद्धे ।
होतील काई ॥ ६० ॥ म्हणोनि शिष्य आणि गुरुनाथु । या
दोही शब्दांचा अर्थु ॥ श्रीगुरुचि परी होतु । दोहों ठाईं ॥ ६१ ॥
कां सुवर्ण आणि लेणें ॥ वसतें एके सुवर्णे । बसतें चंद्र चांदिणें ।
चंद्रींचि जेवी ॥ ६२ ॥
उत्पत्ति ही दांपत्याशिवाय होत नसते, यानें आपणालाच आपला
जोडीदार केला आहे. जन्ममरणातीतत्व असें याचें सारेंच विलक्षण आहे.
५६. हें अगडबंब जग याच्या पोटांत सामावलें आहे. उजेडामुळे दिवसा
खूप विस्तृत दिसणारें हें जग काळोखांत रात्रीं जेव्हां बुडतें तेव्हां तें तेथें
नाहींच असें वाटतें. ५७. समुद्र हाच एक भरती आणि ओहोटी यांना
आधार असतो. या एकमेकाविरुद्ध असणाऱ्या द्वैत आणि अद्वैत या पाहु-
ण्यांचा निवास यांच्या घरीं असतो. ५८. अंधार आणि उजेड यांची मैत्री
किती ? अगदीं शून्य, मुळींच नाहीं. बरें, ज्यापासून ते दोघे होतात तो
सूर्य तर एकाला एकच आहे. ५९. त्यावरहि सूर्य एकच म्हणूं तर तो
अनेक रूपांनीं वावरतो आहे. पण हा परस्पर विरोध गुरूंच्या ठायीं
नसतो. ६०. म्हणून श्रीज्ञानेश्वरमहाराज सांगतात कीं, गुरु आणि शिष्य या
दोन शब्दांचा अर्थ मात्र एकच आहे. तो आहे सद्गुरु. ६१. दागिन्यांतलें
सोनेंच हें सर्व दागिन्याभर असतें. तें एकच असतें. चंद्र आणि त्याचें
चांदणें वेगळें नसतें. तें चांदणें चंद्रमय असतें. ६२.

२४ सार्थ अमृतानुभव
नाना कापूर आणि परिमळु । कापूरचि केवळु ॥ गोडी आणि
गुळु । गूळचि जेवि ॥ ६३ ॥ तैसा गुरुशिष्यमिसें । हाचि एकु
उल्हासे ॥ जरी कांहीं दिसे । दोन्हीपणें ॥ ६४ ॥ आरसा
आणि मुखीं । मी दिसे हे उखी । हे आपुलिये ओळखी । जाणे
मुख ॥६५॥ पहा पा निरंजनीं निदेला । तो निर्विवाद एकला ॥
परी चेता चेवविता जाला । दोन्ही तोचि ॥६६॥ जे तोचि चेता
तोचि चेववी । तेवीं हाचि बुझे हा बुझावी ॥ गुरु शिष्यत्व नांदवी ।
ऐसेन हा ॥ ६७ ॥ दर्पणेंवीण डोळां । आपुले भेटीचा सोहळा ॥
भोगिता तरी लीळा । सांगतों हे ॥ ६८ ॥ एवं द्वैतासी उमसो ।
नेदी ऐक्याशी विसकुसो ॥ सोइरिकीचा अतिसो । पोखींतसे
॥ ६९ ॥ निवृत्ति जया नांव । निवृत्ति जया बरव ॥ जया
निवृत्तीची राणीव । निवृत्तीची ॥ ७० ॥
कापूर आणि त्याचा सुवास हें अभिन्न एकच. गूळ आणि गोडी हीं
अभिन्न. ६३. परमात्मारूप सद्गुरु जरी रूपातीत असला, तरी तो
सत्शिष्याच्या प्रतीकानें जगद्विलास करतो. ६४. आपणास आरशाचें
प्रतिबिंब हें आपल्याच मुखाचें आहे हें कळतें व तें क्षणैक असतें हें
आपण जाणतों. ६५. एखाद्या घोर निर्जन अरण्यांत कोणी झोंपला तर तो
एकटा असेना ? पण नंतर तो जागा होणारा आणि जागे करणारा असा
त्याचा तोच दोन्ही असतो. ६६. जागा होणाराच जागे करणारा असतो,
त्याप्रमाणें हा सद्गुरु स्वतः सांगतो व स्वतःलाच समजावून घेतो. अशा
प्रकारे गुरुशिष्यांचे संबंध चालवीत असतो. ६७. आरशाशिवाय नेत्र जर
प्रतिबिंबदर्शनाचा आनंद मिळवूं शकेल, त्याप्रमाणें हें आहे. ६८ तो
द्वैताला फिरकूं देत नाहीं, अद्वैतपणा विस्कटूं देत नाहीं. पण परस्पर
संबंध तर उत्तम तऱ्हेनें पोषीत असतो. ६९. निवृत्तिनाथ ज्यांचें नांव,
निवृत्ति ज्याची शोभा, निवृत्तीचें राज्यपद जो भोगतो; तेच हे खरेखुरे
निवृत्तिनाथ. ७०.