अमृतानुभव एवं चांगदेव पासष्टी (सन्त ज्ञानेश्वर - चिद्विलासवाद एवं अद्वैत अनुभूति सटीक)
Amritanubhava and Changdev Pasashti of Sant Jnanadev
सन्त ज्ञानेश्वर / ज्ञानदेव महाराज द्वारा
पृष्ठ 7, कुल 138 में से
संदर्भ में पढ़ें६ सार्थ अमृतानुभव
आपुलिये आंगीं संसारा । देखिलिया चराचरा ॥ परी
नेदितीच तिसरा । झोक लागों ॥७॥ जया एके सत्तेचें बैसणें ।
दोघां एका प्रकाशाचें लेणें ॥ जे अनादि एकपणें । नांदती दोघें
॥ ८ ॥ भेदु लाजोनि आवडी । एकरसीं देत बुडी । जो भोग-
णया थाव काढो । द्वैताचा जेथें ॥ ९ ॥ जेणें देवें संपूर्ण देवी ।
जियेवीण कांहींना तो गोसावी ॥ किंबहुना एकोपजीवी । एक-
एकाची ॥ १० ॥ कैसा मेळु आला गोडिये । दोघे न माती
जगीं इये । कीं परमाणूहि माजी उवाये । मांडीली आहाती ॥ ११ ॥
जिहीं एकएकावीण । न कीजे तृणाचेंही निर्माण ॥ जिये दोघे
जीवप्राण । जिया दोघां ॥ १२ ॥
चराचर सृष्टि आपल्यापासून झाल्याचें पाहूनहि प्रकृतिपुरुष हे जग हा
आपल्याशिवाय अन्य पदार्थ आहे असा विचार अंगाला लागूं देत
नाहींत. ७. तीं दोघेहि एकाच प्रकाशानें प्रकाशतात, एकाच अधिष्ठाना-
वर राहतात. अनादिकालापासून एकपणानें राहत आहेत. ८. प्रकृति-
पुरुषांमध्यें, आपल्याला भोग व्हावा या इच्छेनें स्वतः भेद द्वैत शोधण्या-
करिता गेला; पण त्याला द्वैत तर सांपडलें नाहींच, उलट आपल्या
अपकीर्तीला लाजून, त्यांच्या ऐक्यरसामध्यें तो बुडी देतो, म्हणजे भेदच
अभेद होऊन जातो. ९. ज्या देवाच्या योगानें देवीला पूर्णपणा आला
व जिच्याशिवाय ज्याला गोसावीपणा नाहीं ! काय आश्चर्य सांगावें !
हीं प्रकृतिपुरुषें परस्परांचीं उपजीव आहेत. १०. या दोघांच्या गोडींतील
ऐक्याचें वर्णन काय करावें ? हीं दोघेहि त्रैलोक्यांत ओतप्रोत भरलेलीं
असून, परमाणूमध्येंही मोठ्या आनंदानें नांदत आहेत. ११. जीं परस्परां-
वांचून गवताच्या काडीचीही उत्पत्ति करीत नाहींत. हीं दोघें एकमेकांना
जीव कीं प्राण आहेत. १२