सामग्री पर जाएँ
सर्वकोश
अमृतानुभव एवं चांगदेव पासष्टी (सन्त ज्ञानेश्वर - चिद्विलासवाद एवं अद्वैत अनुभूति सटीक)

अमृतानुभव एवं चांगदेव पासष्टी (सन्त ज्ञानेश्वर - चिद्विलासवाद एवं अद्वैत अनुभूति सटीक)

Amritanubhava and Changdev Pasashti of Sant Jnanadev

सन्त ज्ञानेश्वर / ज्ञानदेव महाराज द्वारा

DevanagariHindipublished138 पृष्ठ

पृष्ठ 23, कुल 138 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 23

२२ सार्थ अमृतानुभव
नाना बिंबपणासरिसे । घेऊनि प्रतिबिंब नासे ॥ नेलें
वंद्यत्व येणें तैसें । वंदतेनसी ॥ ४९ ॥ नाहीं रूपाची जेथें सोये ।
तेथें दृष्टिचें कांहींच नव्हे ॥ आम्हां फळले हे पाये । ऐशिया दशा
॥ ५० ॥ गुणातैलाचिया सोइरिका । निर्वाहिली दीपकाळिका ॥
ते कां होईल पुळिका । कापुराचिया ॥ ५१ ॥ तया दोहों
परस्परें । होय ना जंव मैल्हेरे ॥ तंव दोहींचेंही सरे । मरिसोंचि
॥ ५२ ॥ तेवि देखेना मी ययातें । तंव गेले वंद्य वंदिते ॥ चेइलिया
कांते । स्वप्नींचि जेवि ॥ ५३ ॥ किंबहुना इया भाषा । द्वैताचा
जेथें उपखा ॥ फेडूनियां स्वसखा । श्रीगुरु वंदिला ॥ ५४ ॥
याच्या सख्याची नवाई । आंगीं एकपणा रूप नाहीं ॥ आणि
गुरुशिष्य दुवाळीही । पवाडु केला ॥ ५५ ॥
बिंबासकट प्रतिबिंब नाहींसें होतें तसें वंदन करणाऱ्याच्या सह
सद्गुरू वंद्य नाहींसे करतात. म्हणजे दुजाभाव घालवितात. ४९. हें सारें
रूप आणि आकार ज्ञानाच्या पलीकडचें आहे तेथें त्या ज्ञानाचा कांहीं
उपयोग नाहीं हें समजायला मात्र सद्गुरूच्या चरणांचा आश्रय घ्यावा
लागतो.हा लाभ आम्हांस झाला आहे. ५०. कापूर ह्या वस्तूची ज्योति वेगळ्या
प्रकारची असते. तेल आणि त्यांत ठेवायची वात यांच्या सहवासानें उपज-
लेली ज्योत ही पण आणखी वेगळ्या प्रकारची असते. ५१. कापुराला
अग्नि लावल्याबरोबर कापूर जळतो, अग्नि नष्ट होतो. ते दोघेहि एकदमच
नाश पावतात. ५२. जागे झालेल्याला स्वप्नांतलें दांपत्यसुख कुचकामी.
श्रीगुरूंना पाहिल्याबरोबर वंदकत्व आणि वंद्यत्व नाहींसें झालें. ५३.
द्वैताचे हें शाब्दिक वर्णनहि निरर्थक म्हणून स्वात्मसखा श्रीगुरूंना मीं
नमस्कार केला. ५४. हें या स्वात्मसखा श्रीगुरूचें आश्चर्य आहे कीं याला
एकटेपणा नाही, रूप नाहीं आणि तरीसुद्धां गुरुशिष्याच्या द्वैतरूपानें
जगभर ज्ञान फैलावले आहे. ५५.