अमृतानुभव एवं चांगदेव पासष्टी (सन्त ज्ञानेश्वर - चिद्विलासवाद एवं अद्वैत अनुभूति सटीक)
Amritanubhava and Changdev Pasashti of Sant Jnanadev
सन्त ज्ञानेश्वर / ज्ञानदेव महाराज द्वारा
पृष्ठ 21, कुल 138 में से
संदर्भ में पढ़ें२० सार्थ अमृतानुभव
हांगा मायावशें दाविशी । तें माइक म्हणूनी वाळिशी ॥
अमाइक तव नव्हशी । कवणाही विषयो ॥ ३६ ॥ शिव शिवा
सद्गुरु । तुजला गूढा काय करूं ॥ एकाही निर्धार धरूं देतासी
कां ॥ ३७ ॥ नामें रूपें बहुवसें । उभारूनि पाडिलीं वोसें ॥
सत्तेचेनि आवेशें । तोषलासी ना ॥ ३८ ॥ जीवू घेतलिया उणें ।
चालों नेदिसी साजणें ॥ मृत्यु उरे स्वामीपणें । तेंही नव्हे
॥ ३९ ॥ विशेषाचेनि नांवें । आत्मत्वही न साहवे ॥ किंबहुना
नव्हे । कोण्हीच यया ॥ ४० ॥ राती नुरेचि सूर्या । नातरी
लवण पाणिया ॥ नुरे जेवि चेइलिया । नीद जैशी ॥ ४१ ॥
हे सद्गुरो ! आपण मायेच्या प्रकाशरूपीं ज्वालेने जगाचें दर्शन घडवितां
तें न टिकणारें आहे. निषिद्ध आहे असें सांगतां आणि आपण स्वतः तर
मायेच्या पैलतीराला असलेले आहांत ना ? ३६. छे छे, हे गुरुमाउली, हें तुझें
सारेंच गूढ आहे. ते उकलून समजून घ्यायचें ठरवून म्हटलें तरी तूं होऊं देत
नाहींस. ३७. केवढा तुझा व्याप ! किती तुझीं नांवें, अगणित तुझीं रूपें !
पण तूं सारींच पार जमीनदोस्त करतोस. पण या सत्तेचा तुम्हांला संतोष
वाटतो थोडाच ? ३८. छे, तिचा तुम्हांला गर्वहि नाहीं. शिष्यावर कृपा
करण्याआधीं हे गुरो, तुम्ही त्याच्या अहंपणाचा, जीवाभावनेचा बळी घेतां,
त्याला त्याशिवाय सामर्थ्यवान् करीत नाहीं. आपल्याशीं समरस झाल्यावर
तरी तो गुरुरूपानें शिल्लक राहतो म्हणावें तर तसें मुळींच नाहीं. ३९. त्यांतहि
विशेष म्हणजे जीवाला ' आत्मत्व ' हि सहन होत नाहीं. एवढेंच नव्हे,
कांहींच व्हावयाचें नसतें. ४०. सूर्योदयानंतर रात्र नसते. पाण्यांत पडल्यावर
मीठ शिल्लक राहात नाहीं आणि जागे झाल्यावर झोंप नाहीं. ४१.