अमृतानुभव एवं चांगदेव पासष्टी (सन्त ज्ञानेश्वर - चिद्विलासवाद एवं अद्वैत अनुभूति सटीक)
Amritanubhava and Changdev Pasashti of Sant Jnanadev
सन्त ज्ञानेश्वर / ज्ञानदेव महाराज द्वारा
पृष्ठ 24, कुल 138 में से
संदर्भ में पढ़ेंप्रकरण दुसरें २३
कैसा आपणा आपण । दोंवीण सोयरेपण ॥ या याहूनि
विलक्षण । नाहीं ना नोहे ॥ ५६ ॥ जग अवघें पोटीं माये ।
गगनायेवढें होऊनि ठाये ॥ कीं तेचि निसी साहे । नाहींपणाची
॥ ५७ ॥ कां पूर्णते तरी आधारू । सिंधू जैसा दुर्भरू ॥ तैसा
विरुद्धा पाहुणेरू । याच्या घरीं ॥ ५८ ॥ तेजा तमातें कांहीं ।
परस्परें निकें नाहीं ॥ परी सूर्याच्या ठाईं । सूर्यचि असे ॥ ५९ ॥
एक म्हणता भेदें । ते कीं नानात्वें नांदे ॥ विरुद्धे आपणया विरुद्धे ।
होतील काई ॥ ६० ॥ म्हणोनि शिष्य आणि गुरुनाथु । या
दोही शब्दांचा अर्थु ॥ श्रीगुरुचि परी होतु । दोहों ठाईं ॥ ६१ ॥
कां सुवर्ण आणि लेणें ॥ वसतें एके सुवर्णे । बसतें चंद्र चांदिणें ।
चंद्रींचि जेवी ॥ ६२ ॥
उत्पत्ति ही दांपत्याशिवाय होत नसते, यानें आपणालाच आपला
जोडीदार केला आहे. जन्ममरणातीतत्व असें याचें सारेंच विलक्षण आहे.
५६. हें अगडबंब जग याच्या पोटांत सामावलें आहे. उजेडामुळे दिवसा
खूप विस्तृत दिसणारें हें जग काळोखांत रात्रीं जेव्हां बुडतें तेव्हां तें तेथें
नाहींच असें वाटतें. ५७. समुद्र हाच एक भरती आणि ओहोटी यांना
आधार असतो. या एकमेकाविरुद्ध असणाऱ्या द्वैत आणि अद्वैत या पाहु-
ण्यांचा निवास यांच्या घरीं असतो. ५८. अंधार आणि उजेड यांची मैत्री
किती ? अगदीं शून्य, मुळींच नाहीं. बरें, ज्यापासून ते दोघे होतात तो
सूर्य तर एकाला एकच आहे. ५९. त्यावरहि सूर्य एकच म्हणूं तर तो
अनेक रूपांनीं वावरतो आहे. पण हा परस्पर विरोध गुरूंच्या ठायीं
नसतो. ६०. म्हणून श्रीज्ञानेश्वरमहाराज सांगतात कीं, गुरु आणि शिष्य या
दोन शब्दांचा अर्थ मात्र एकच आहे. तो आहे सद्गुरु. ६१. दागिन्यांतलें
सोनेंच हें सर्व दागिन्याभर असतें. तें एकच असतें. चंद्र आणि त्याचें
चांदणें वेगळें नसतें. तें चांदणें चंद्रमय असतें. ६२.