अमृतानुभव एवं चांगदेव पासष्टी (सन्त ज्ञानेश्वर - चिद्विलासवाद एवं अद्वैत अनुभूति सटीक)
Amritanubhava and Changdev Pasashti of Sant Jnanadev
सन्त ज्ञानेश्वर / ज्ञानदेव महाराज द्वारा
पृष्ठ 20, कुल 138 में से
संदर्भ में पढ़ेंप्रकरण दुसरें १९
जेथें शब्दाची लिही पुसे । तेणेंसीं चावळों बैसे ॥ दुजयाच्या
रागीं रुसे । एकपणा जो ॥ २८ ॥ प्रमाणाची परी सरे । तैं
प्रमेयेचि अविष्करे ॥ नवल मेचु ये घुरे । नाहींपणाची ॥२९॥
कांहींबाही अळुमाळु । देखे येखादे वेळू ॥ तरी देखे तेंही
विटाळू । जया गांवीं ॥ ३० ॥ तेथें नमनें कां बोलें । केउती
सुये पाउले ॥ आंगीं लावूनि नाडिले । नांवचि येणें ॥ ३१ ॥
नव्हे आत्मया आत्मप्रवृत्ति । वाढवितां के निवृत्ति ॥ या नामाची
वाय बुंथी । सांडीचिना ॥ ३२ ॥ निवर्त्ये तंव नाहीं । मा
निवर्तवी हा काई ॥ तरी कैशी बैसे ठाईं । निवृत्तिनामाच्या
॥३३॥ परी सूर्यासी अंधकारु । कै जाहला होता गोचरु ॥ तरी
तमारी हा डगरु । आलाचि कीं ॥३४॥ तैसें लटिकें येणें रूढ ।
जड येणें उजिवडें ॥ न घडे तेंही घडे । याचिया मावा ॥३५॥
शाब्दिक वर्णनें जेथें कुचकामी तेथें तीं करून तरी काय उपयोग ?
वर्णन करणारा दुसरा असा द्वैतभाव त्यांना खपत नाहीं. ते एकरूप असतात.
२८. सर्व प्रकारचीं उदाहरणें बरोबर ठरत नाहींत, तेव्हांच मूळ स्वरूप
प्रकट होतें. तें निराकारी असूनहि साकार होतें, हें नवल होय. २९.
‘ थोडेसें पाहूं या ,’ असें म्हटलें तरी त्याचा तेथें स्पर्श चालत नाहीं. ३०.
माझ्या या नयनरूपी बोलांचा तेथें कसा प्रवेश होईल ? अनंत रूपांनीं
नटलेल्या परमात्म्यानें सर्व नामें व्यर्थ केलीं. या दृष्टीनें निवृत्ति हें नांव
सार्थच आहे. ३१. जर सद्गुरूच्या ठिकाणीं आत्मप्रवृत्ति नाहीं, मग
‘ निवृत्ति ’ हें नांव तरी कोठें टिकतें ? ३२. ते निवारण करणार म्हणजे
तरी काय करणार ? कारण निवारण करण्यासारखें कांहीं नाहींच. मग
निवृत्ति यांत असा काय मोठेपणा आहे ? ३३. सूर्यानें अंधार पाहिला
आहे तरी कधीं ? ‘ अंधाराचा शत्रु ’ असेंच सूर्याला म्हणतात ना ? ३४.
आणि सत्तेनें खोट्याला खरेपणा मिळतो. अचेतन, मिथ्या जगाला चेतना
मिळते आणि याच्या मायेनें न घडणारेंहि घडतें. ३५.