अमृतानुभव एवं चांगदेव पासष्टी (सन्त ज्ञानेश्वर - चिद्विलासवाद एवं अद्वैत अनुभूति सटीक)
Amritanubhava and Changdev Pasashti of Sant Jnanadev
सन्त ज्ञानेश्वर / ज्ञानदेव महाराज द्वारा
पृष्ठ 15, कुल 138 में से
संदर्भ में पढ़ें१४ सार्थ अमृतानुभव
म्हणोनि भूतेशु भवानी । वंदिलीं न करोनि सिनानीं ॥ मी निघालों
नमनीं । तें हें ऐसें ॥ ६० ॥ दर्पणाचेनि त्यागें । प्रतिबिंब बिंबीं
रिगे ॥ कां बुडी दीजे तरंगें । वायूचा ठेला ॥ ६१ ॥ नातरी
नीदजात खेवो । पावे आपुला ठावो ॥ तैशी बुद्धित्यागें देवीदेवो ।
वंदिलीं मिया ॥ ६२ ॥ सांडूनि मीठपणाचा लोभु । मिठे सिंधु-
त्वाचा घेतला लाभु ॥ तेवीं अहं देउनि मी शंभु । शांभवी जालों
॥ ६३ ॥ शिवशक्ति समावेशें । नमन केलें म्यां ऐसें ॥ रंभागर्भे
आकाशे । रिघाला जैसा ॥ ६४ ॥
इति श्रीसिद्धानुवादे श्रीमदनुभवामृते शिवशक्ति-
समावेशनमनंनाम प्रथमं प्रकरणं संपूर्णम्
पुरुषाहून प्रकृति निराळी न होतां मीं त्यांना वंदन केलें.
असा हा माझा वंदन करण्याचा सोहळा आहे. ६०. मुखाचें प्रतिबिंब
आरशाच्या त्यागानें मूळ बिंबाशीं म्हणजे मुखाशीं ऐक्य पावतें, किंवा
वायु वाहण्याचा थांबल्याबरोबर तरंग पाण्यांत बुडी मारतात, पाणीरूप
होतात. ६१. झोंप संपताच लगेच आपल्याला आपलेपणाची प्राप्ति होते,
त्याचप्रमाणें जीवपणाच्या उपाधीचा त्याग करून मीं प्रकृतिपुरुषांना वंदन
केलें. ६२. मिठानें मीठपणाचा लोभ सोडल्यावर तें समुद्राएवढें होतें, त्याच-
प्रमाणें अहंपणा सोडून मीं प्रकृपुरुषरूप झालों. ६३. केळीचें सोपट काढलें
कीं, त्यांतील आकाश म्हणजे वायु आकाशरूप होतो, त्याचप्रमाणें प्रकृति-
पुरुषांशीं मीं अभिन्न असून त्याना अशाप्रकारें वंदन केलें. ६४.
याप्रमाणें श्रीमत् अमृतानुभव ग्रंथांतील शिवशक्तिसमावेशनमन नामक
पहिलें प्रकरण समाप्त झालें.
प्रकरण पहिलें समाप्त