अमृतानुभव एवं चांगदेव पासष्टी (सन्त ज्ञानेश्वर - चिद्विलासवाद एवं अद्वैत अनुभूति सटीक)
Amritanubhava and Changdev Pasashti of Sant Jnanadev
सन्त ज्ञानेश्वर / ज्ञानदेव महाराज द्वारा
पृष्ठ 25, कुल 138 में से
संदर्भ में पढ़ें२४ सार्थ अमृतानुभव
नाना कापूर आणि परिमळु । कापूरचि केवळु ॥ गोडी आणि
गुळु । गूळचि जेवि ॥ ६३ ॥ तैसा गुरुशिष्यमिसें । हाचि एकु
उल्हासे ॥ जरी कांहीं दिसे । दोन्हीपणें ॥ ६४ ॥ आरसा
आणि मुखीं । मी दिसे हे उखी । हे आपुलिये ओळखी । जाणे
मुख ॥६५॥ पहा पा निरंजनीं निदेला । तो निर्विवाद एकला ॥
परी चेता चेवविता जाला । दोन्ही तोचि ॥६६॥ जे तोचि चेता
तोचि चेववी । तेवीं हाचि बुझे हा बुझावी ॥ गुरु शिष्यत्व नांदवी ।
ऐसेन हा ॥ ६७ ॥ दर्पणेंवीण डोळां । आपुले भेटीचा सोहळा ॥
भोगिता तरी लीळा । सांगतों हे ॥ ६८ ॥ एवं द्वैतासी उमसो ।
नेदी ऐक्याशी विसकुसो ॥ सोइरिकीचा अतिसो । पोखींतसे
॥ ६९ ॥ निवृत्ति जया नांव । निवृत्ति जया बरव ॥ जया
निवृत्तीची राणीव । निवृत्तीची ॥ ७० ॥
कापूर आणि त्याचा सुवास हें अभिन्न एकच. गूळ आणि गोडी हीं
अभिन्न. ६३. परमात्मारूप सद्गुरु जरी रूपातीत असला, तरी तो
सत्शिष्याच्या प्रतीकानें जगद्विलास करतो. ६४. आपणास आरशाचें
प्रतिबिंब हें आपल्याच मुखाचें आहे हें कळतें व तें क्षणैक असतें हें
आपण जाणतों. ६५. एखाद्या घोर निर्जन अरण्यांत कोणी झोंपला तर तो
एकटा असेना ? पण नंतर तो जागा होणारा आणि जागे करणारा असा
त्याचा तोच दोन्ही असतो. ६६. जागा होणाराच जागे करणारा असतो,
त्याप्रमाणें हा सद्गुरु स्वतः सांगतो व स्वतःलाच समजावून घेतो. अशा
प्रकारे गुरुशिष्यांचे संबंध चालवीत असतो. ६७. आरशाशिवाय नेत्र जर
प्रतिबिंबदर्शनाचा आनंद मिळवूं शकेल, त्याप्रमाणें हें आहे. ६८ तो
द्वैताला फिरकूं देत नाहीं, अद्वैतपणा विस्कटूं देत नाहीं. पण परस्पर
संबंध तर उत्तम तऱ्हेनें पोषीत असतो. ६९. निवृत्तिनाथ ज्यांचें नांव,
निवृत्ति ज्याची शोभा, निवृत्तीचें राज्यपद जो भोगतो; तेच हे खरेखुरे
निवृत्तिनाथ. ७०.