अमृतानुभव एवं चांगदेव पासष्टी (सन्त ज्ञानेश्वर - चिद्विलासवाद एवं अद्वैत अनुभूति सटीक)
Amritanubhava and Changdev Pasashti of Sant Jnanadev
सन्त ज्ञानेश्वर / ज्ञानदेव महाराज द्वारा
पृष्ठ 11, कुल 138 में से
संदर्भ में पढ़ें१० सार्थ अमृतानुभव
जियेतें पहावयाचिया लोभा । चढे दृष्टत्वाचिया क्षोभा ॥
जियेतें न देखतुचि उभा । आंगचि सांडी ॥ ३३ ॥ कांतेचिया
भिड । अबला होये जगायेवढा ॥ अंगविला उघडा । जियेवीण
॥३४॥ जो हा ठाव मंदरूपें । उवाइलेपणें हारपे ॥ तो जाला
जियेचेनि पडपें । विश्वरूप ॥३५॥ जिया चेवविला शीवु । वेद्याचें
बोणें बहु ॥ वाढितेणेशी जेउ । धाला जो ॥ ३६ ॥ निदेलेनि
भातारें । जे विये चराचरें ॥ जियेचा विसावला नुरे । आंबुले-
पणही ॥ ३७॥ जंव कांत लपों बैंसे । तंव नेणिजे जियोद्देशें ॥
जिये दोघे आरिसे । जिया दोघा ॥ ३८ ॥
प्रकृतीला पाहण्याच्या इच्छेनें पुरुष द्रष्टा बनतो म्हणजे द्रष्टत्वदशेला
येतो आणि ती दिसली नाहीं तर उभ्या उभ्या अंग टाकतो ! ३३. पत्नीच्या
भिडेने पति जगाएवढी मोठी उपाधि आवरणारा होतो आणि तिच्यावांचून
उघडा दिसतो. माया नाहींशीं झाल्याबरोबर जीवेश्वरादि सर्व जगत् नष्ट
होते व परमात्माच शिल्लक राहतो. ३४. आपल्या स्वरूपानंदाने परमात्मा
इतक्या सूक्ष्म भावाला येतोसा दिसतो म्हणजे सामान्यरूपानें सर्वव्यापक
होऊन प्रकृतीच्या शोभेनें विश्वरूप बनतो ३५. ज्या प्रकृतीनें, वेदरूपी
पक्वान्नाच्या भोजनाकरितां पुरुषाला जागा केला, पण तो जागा झाल्याबरोबर
वाढणारीणीसुद्धां विश्वरूपीं सर्व पक्वान्नें खाऊन टाकून तृप्त झाला म्हणजे शुद्ध
अब्रह्मच स्वरूपानें शिल्लक राहतें. ३६. पुरुष निजला असतां प्रकृति चराचर
जगताला प्रसवते आणि ती लयाला गेली म्हणजे त्याचा पुरुषपणा राहत
नाहीं. ३७. पुरुष हिच्याकरितां विशेष रूपाचें निरोधन घेतो, तेव्हा तो
विशेषरूपानें कळून येत नाहीं. परस्परांना प्रकाशित करणारे हे दोन
आरसेच आहेत. सारांश, पुरुषाचें ज्ञानस्वरूप प्रकृतीच्या सत्त्वगुणामुळें
प्रतीत होते, आणि प्रकृतीचें अस्तित्व पुरुषाच्या सत्तेनें उपलब्ध होतें.३८.