अमृतानुभव एवं चांगदेव पासष्टी (सन्त ज्ञानेश्वर - चिद्विलासवाद एवं अद्वैत अनुभूति सटीक)
Amritanubhava and Changdev Pasashti of Sant Jnanadev
सन्त ज्ञानेश्वर / ज्ञानदेव महाराज द्वारा
प्रकरण सहावें ५७
नाहीं तयाचेनि नासे । शब्द नये प्रमाणदशे ॥ आंधारीं
अंधारा जैसें । नव्हे रूप ॥ ५६ ॥ अविद्येची नाहीं जाती । तेथें
नाहीं म्हणतया युक्ति ॥ जैंवी दुपारी कां वाती । अंगणींचिया
॥ ५७ ॥ न पेरितां शेतीं । जे कीं संवगाणिया जाती ॥ तया
लाजापरौती । जोडी आहे ॥ ५८ ॥ खवाणियाच्या आंगा । जेणें
केला वळघा ॥ तो न करितांचि उगा । घरीं होता ॥ ५९ ॥
पाण्यावरी वरखु । होतां कें असे विशेखु ॥ अविद्यानाशी
उन्मेखु । फाकावा तैसा ॥६०॥ माप मापपण श्लाघे । जंव आकाश
मऊं नरिघे ॥ तम पाहतां वाउगें । दीपाचे जन्म ॥ ६१ ॥
गगनाची रससोये । जीभ जैं अरोगूं जाये ॥ मग रसना हे होयें ।
आडनांव कीं ॥ ६२ ॥ नव्हतेन वल्लभें । आहेवपण कां शोभे ॥
खातां केळीचे गाभे । न खातां गेलें ॥ ६३ ॥
शब्द हा नसणाऱ्या अविद्येच्या नाशानें प्रमाणदशेला येत नाहीं.
अंधारांत अंधार वेगळा नसतो. ५६. अंगणांत दोन प्रहरीं दिवा नेऊन
ठेविला तर त्याचा उपयोग काय ? अविद्येलाच जर खरूपस्थिति नाहीं,
तर तेथें युक्तीचा उपयोग काय ? ५७. धान्य न पेरतां जे शेतकाढणीला
जातात, त्यांना लाजेशिवाय दुसरें मिळणार काय ? ५८. आकाशाच्या
अंगावर हल्ला करणारा स्वस्थ घरांत होता असेंच म्हटलें पाहिजे. ५९.
समुद्रावर वर्षाव झाला तर त्यांत काय झालें ? त्याप्रमाणें अविद्येचा नाश
करण्यांत शब्दाचा प्रयत्न व्यर्थ आहे. ६०. आकाशाचें माप घेतलें जात
नाहीं तोंपर्यंतच मापाला मापपणाची शोभा. दिव्यानें अंधकार पाहिला तर
त्याचा जन्म व्यर्थ होय ! ६१. आकाशाच्या पक्वान्नाची जीभ जर चव
घेईल, तर तिचें रसना म्हणजे चव घेणारी हें नांव व्यर्थ होईल. ६२.
जिचा पती जिवंत नाहीं त्या स्त्रीला ‘ सुवासिनी ’ असें म्हणणें शोभेल
काय ? किंवा केळीचा गाभा कोणी भक्षण करूं म्हणेल तर तें भक्षण
करणें न भक्षण करणेंच होय. ६३.
५८ सार्थ अमृतानुभव
स्थूल सूक्ष्म कवणयेकु । पदार्थ न प्रकाशी अर्कु ॥ परी
रात्रीविषयीं अप्रयोजिकु । जालाचि कीं ॥ ६४ ॥ दिठी पाहतां
काय न फवे । परी निदेतें तंव न देखवे ॥ चेतातें न संभवे ।
म्हणूनियां ॥ ६५ ॥ चकोराचिया उद्यमा । लटिकेपणाची सीमा ॥
जरी दिहाची चंद्रमा । गिंवसूं बैसे ॥ ६६ ॥ नुसधीयेचि
साच्या । मुका होय वाचरुकाचा ॥ अंतराळीं पायाचा । पेंधा
होय ॥ ६७ ॥ तैशी अविद्येसीं सन्मुखे । सिद्धाचि प्रतिसेदके ॥
उठलींचि निरर्थकें । जल्पें होतीं ॥ ६८॥ अवसे आला सुधाकरु ।
न करीचि काई अंधःकारु ॥ अविद्यानाशी विचारु । तैसा होये
॥ ६९॥ नाना न निफजतेन अन्नें । जेवणें तोचि लंघनें ॥ निमा-
लेन नयनें । पाहणाचि अंधु ॥ ७० ॥
सूर्य स्थूल किंवा सूक्ष्म असा कोणता पदार्थ प्रकाशित करीत नाहीं. परंतु
तोच सूर्य रात्रीचा प्रकाश करण्यांत निरुपयोगीच ठरणार. ६४. दृष्टि इतर
सर्व पाहते पण ती झोपेला पाहायला दुबळी आहे; कारण जागा असलेला
‘झोपला आहे’ हें म्हणणें संभवतच नाहीं. ६५. दिवसा चंद्रामृतपान
करण्याच्या इच्छेनें चकोर चंद्राला शोधीत बसेल तर फुकट आहे. ६६.
‘कोरा कागद वाच’ असें सांगितलें तर वाचणारा मुका होतो, कसलाहि
चालणारा आकाशांत चालताना पांगळा होतो. ६७. त्याप्रमाणें स्वाभाविक
अभावरूप असणाऱ्या अविद्येच्या समोर, तिचा नाश करणारा शब्द उठला
तरी तो निरर्थकच होतो. ६८. अंवसेच्या रात्री चंद्र उदयास आलाच तर
तो प्रकाश देईल म्हणून ती अंवस नव्हेच. त्याप्रमाणें अविद्येच्या अनाशा-
विषयी शब्दाची स्थिति होय. ६९. किंवा तयार न केलेल्या अन्नाचें जें
जेवण तेंच लंघन; फुटलेल्या डोळ्यांनीं पाहणारा तोच आंधळा. ७०.
प्रकरण सहावें ५९
कैसेंन ही वस्तु नसे । तेथें जैं शब्दाचा अर्थ हों बैसे ॥ तैं
निरर्थकपणें नाशे । शब्दही थिता ॥ ७१ ॥ आतां अविद्याचि
नाहीं । हें कीर म्हणों काई ॥ परी नाशितां कांहीं । नुरोचि
शब्दाचें ॥ ७२ ॥ यालागीं अविद्येचिया मोंहरा । उठिलियाही
विचाग ॥ आंगाचाचि संसारा । होऊनि ठेला ॥ ७३ ॥ म्हणोनी
अविद्येचोनि मरणें । प्रमाणा येईल बोलणें ॥ हे अविद्याचि नाहीं-
पणें । नेदी घडो ॥ ७४ ॥ आणि आत्मा हन आत्मया । दाऊनि
बोलू महिमया ॥ येईल हे साविया । विरुद्धचि ॥ ७५ ॥ आपणया
आपणपेशी । लागलें लग्न कवणें दिवशीं ॥ कीं सूर्य आंग ग्रासी
ऐसें ग्रहण आहे ॥ ७६ ॥ गगन आपणया निघे । सिंधू आपणपा
रिघे ॥ कीं तळतात काय वळंघे । आपणपया ॥ ७७ ॥
कोणत्याहि रूपानें नसणाऱ्या पदार्थांची सिद्धि करण्याविषयीं शब्द
प्रयत्न करूं लागला तर तो प्रयत्न निरर्थक होऊन शब्द आपले अस्तित्व
मात्र नाहींसें करून घेतो. ७१. आतां अविद्याच नाहीं, असें कसे म्हणावें ?
पण तिचा नाश करू जातां शब्दच उरत नाहीं. ७२. म्हणजेच अविद्येचा
नाश करण्यासाठीं विचार म्हणजे शब्द तिच्यासमोर उभा राहील तर तो
स्वतःनाश पावेल. ७३. म्हणून अविद्येच्या नाशानें शब्दाला प्रामाण्य
येईल ही गोष्ट, अविद्याच आपल्या नाहींपणानें घडूं देत नाहीं. ७४. आणि
आत्म्याला आत्मा दाखवून शब्द प्रतिष्ठेला येईल, हें म्हणणेंच खरोखर
उलट आहे. ७५. आपलें आपल्याशींच लग्न लागले असें कुठें तरी ऐकलें
आहे कां ? किंवा सूर्य आपलें बिंब आपणच ग्रासतो असें कुठे तरी ऐकलें
आहे का ? ७६. स्वतःकडे जाण्यासाठीं आकाश निघूं शकेल काय ?
किंवा स्नानाकरितां समुद्र आपल्या पोटांत शिरेल तरी कसा ? अगर
तळहात तळहातावरच चढेल काय ? ७७.
६० सार्थ अमृतानुभव
सूर्य सूर्यासी विवळे । फळ आपणया फळे ॥ कीं परिमळु
परिमळे । घेतसे ॥ ७८ ॥ चराचरा पाणीपाजणी । करूं
येईल एके क्षणीं ॥ परी पाणियासी पाणी । पाजों ये काई
॥ ७९ ॥ साठीतिसा दिवसा । माजी एकादा होय ऐसा ॥ जे
सूर्यासी सूर्य जैसा । डोळा दावी ॥ ८० ॥ कृतांत जरी कापेल ।
तरी त्रैलोक्य हें जाळील ॥ वांचूनि आगी लावील । आगीसी
काई ॥ ८१ ॥ आपणपे आपणया । दर्पणेवीण धातया ॥ समोर
होआवया । ठाकी आहे ॥८२॥ दिठी दिठींतें रिघों पाहे । रुचि
रुचीतें चाखूं सूये ॥ कीं चेतया चेवऊं ये । हें नाहींच कीं
॥ ८३ ॥ चंदन चंदनपणा लावी । रंग रंगपणा रावी ॥ मोती-
पण मोती लेववी । ऐसें कैसें ॥ ८४ ॥
सूर्य सूर्यालाच उदय करील ? फळ आपला उपयोग आपणच घेते
काय ? गंधाला आपलाच वास घेतां येईल काय ? ७८. सर्व चराचराला
एकाच क्षणांत पाणी पाजण्याचें मनांत आणलें तर तें शक्य आहे; पण
पाण्याला कसें पाणी पाजतां येईल ? ७९. तीनशें साठ दिवसांत एखाद्या
दिवशीं तरी सूर्य आपल्या डोळ्यांनीं आपल्यास पाहील काय ? ८०.
प्रलयकालचा अग्नि कोपानें त्रैलोक्य जाळून टाकील, पण त्याला स्वतःला
पेटवून घेतां येईल काय ? ८१. ब्रह्मदेवाला तरी आरशावांचून आपल्या-
समोर आपलें रूप पाहण्याची काय सोय आहे ? ८२. दृष्टि दृष्टीला कशी
पाहील ? रुचि आपली रुचि घेईल काय ? किंवा जाग्यास जागें करतां
येईल काय ? हें नाहींच. ८३. चंदन आपली उटी आपल्यास लावील,
रंग आपल्यालाच रंगवील किंवा मोतीं आपलीच प्रभा आपल्याच अंगावर
घालील हें कधीं घडेल काय ? ८४.
प्रकरण सहावें ६१
सोनेंपण सोनें कसी । दीपपण दीप प्रकाशी ॥ रसपण
बुडी दे रसीं । तें के जोडे ॥ ८५ ॥ आपुले मुकुटीं समर्थां ।
चंद्र बैसविला सर्वथा । परी चंद्र चंद्राचिये माथा । वाऊं ये काई
॥ ८६ ॥ तैसा आत्मराज तंव । ज्ञानमात्रचि भरीव ॥ आतां
ज्ञाने ज्ञानासी खेव । कैसें दीजे ॥ ८७ ॥ आपुलेनि जाणपणें ।
आपणयातें जाणों नेणें ॥ डोळ्या आपुले पाहणें । दुवाड जैसें
॥ ८८ ॥ आरसा आपुलिये । आंगीं आपणा पाहे ॥ तैं जाणणें
जाणों लाहे । आपणयातें ॥ ८९ ॥ दिगंता पैलीकडेचें ।
धांवोनि सूर्या खोचे ॥ मा तिये कां तियेचें । आंग फुटे ॥९०॥
रसवृत्तीसी उगारणें । घेऊनि जिव्हाग्र शहाणें ॥ परी काई कीजे
नेणें । आपणपें चाखों ॥ ९१ ॥
सोनेंच सोन्याचा कस लावील, दिवाच दिव्याला प्रकाश करील, रसच
रसांत बुडी देईल, हें कसें घडेल ? ८५. समर्थ भगवान् शंकरांनीं आपल्या
डोक्यावर चंद्र बसविला, पण चंद्राला आपल्याच डोक्यावर बसतां येणें
शक्य आहे काय ? ८६. ज्याप्रमाणें कधींच ह्या गोष्टी घडणें शक्य नाहीं.
त्याचप्रमाणें आत्मा तर भरीव ज्ञान आहे, तेव्हां आतां त्या ज्ञानाला शब्द-
रूपी ज्ञानानें आलिंगन कसें द्यावें ? ८७. आपणा स्वतःला पाहतां येत
नाहीं. ८८. आरसा आपल्याच ठिकाणीं आपलें स्वरूप पाहूं शकेल, तरच
ज्ञान आपल्यास ज्ञेय करून जाणूं शकेल. ८९. सुरी धांवत जाऊन
आकाशापलीकडच्या पदार्थालाहि मारूं शकेल, पण ती स्वतःला मारून
घेईल का ? ९० सर्व रसांची चव घेण्यांत जीभ कुशल असली तरी
आश्चर्य हें कीं, ती स्वतःला चाखूं शकत नाहीं. ९१.
६२ सार्थ अमृतानुभव
तरी जिभे काय आपुलें । चाखणें हन ठेलें ॥ तैसें नव्हे
संचलें । तेंचि तें कीं ॥ ९२ ॥ तैसा आत्मा सच्चिदानंदु ।
आपणया आपण सिध्दु ॥ आतां काय दे शब्दु । तयाचें तया
॥ ९३ ॥ कोणाही प्रमाणाचेन हाते । वस्तु घे ना नेघे आपण-
यातें ॥ जें स्वयें आइते । घेणें ना नघेणें ॥९४॥ म्हणोनी आत्मा
आत्मलाभे । नांदवुनि शब्द शोभे ॥ येईल ऐसा न लभे । उमसु
घेवो ॥ ९५ ॥ एवं माध्यान्हीची दिवा । तम धाडी ना दिवो
दावी ॥ तैशी उभयतां पदवी । शब्दा जाली ॥ ९६ ॥ आतां
अविद्या नाहींपणें । नाहीं तये नासणें ॥ आत्मा सिध्दुचि मा
कोणें । काय साधावें ॥ ९७ ॥
असें जरी आहे तरी जिभेचे चाखणें नाहींसें झाले असें म्हणावें तर
तसें नाहीं. किंतु जिव्हाग्र चाखणेंपणानेंच भरले आहे. ९२. त्याचप्रमाणें
आत्मा सच्चिदानंदज्ञानरूप आपल्या ठिकाणीं आपण सहजच सिद्ध आहे.
आतां अशा स्वतःसिद्ध प्रकाशरूप आत्म्याला तो शब्द आपल्या पदरचें
नवीन ज्ञान काय देणार ? ९३. (प्रत्यक्षादि ) प्रमाणाच्या साहाय्यानें
परमात्मा स्वतःचें अस्तित्व सिद्ध करीत नाहीं किंवा होऊं देत नाहीं;
कारण अनादिसिद्धच आहे. सिद्धि वा असिद्धि हा शब्द वस्तुस्वरूपाच्या
ठिकाणीं कुचकामी आहे. ९४. म्हणून आत्म्याला सच्चिदानंद स्वरूपाची
प्राप्ति करून देऊन शब्दाला शोभा येईल असें मुळींच नाहीं. ९५. एवंच
ज्याप्रमाणें मध्यान्हकालीं सूर्यप्रकाशांत ठेविलेला दिवा अंधार घालवूं
शकत नाहीं व दिवसही दाखवू शकत नाहीं, त्याप्रमाणें आत्मस्वरूप
प्रकाशित किंवा अज्ञान निवृत्त करण्याविषयीं पात्रता नसल्यामुळे शब्दाला
तीच दशा प्राप्त होते. ९६. आतां अविद्या मुळींच नाहीं म्हणून तिचा
नाश संभवत नाहीं. आणि आत्मा स्वतःसिद्ध असल्यामुळे शब्दानें त्याची
सिद्धि होत नाहीं, अशा स्थितींत कोणीं काय साधावें ? ९७.
प्रकरण सहावें ६३
ऐसा उभयपक्षीं । बोला न लाहोनि नखी ।। हारपला प्रळयो-
दर्कीं । वोधू तैसा ।। ९८ ।। आतां बोला भागू कांहीं । असणें
जयाच्या ठाईं ।। अर्थता तरी नाहीं । निपटूनियां ।। ९९ ।। बागूल
आला म्हणते । बोलणें जैसें रितें ।। कां आकाश वोळंबतें ।
तळहातीं ।। १०० ।। तैसीं निरर्थकें जल्पे । होऊनियां सपडपें ।।
शोभती जैशीं लेपें । रंगावरी ।। १०१ ।। एवं शब्दैकजीवनें ।
बापुडीं ज्ञानें अज्ञानें ।। साचपणें वनें । चित्रींचीं जैशीं ।।१०२।।
या शब्दाचा निमाला । महाप्रळयो हो सरला ।। अभ्रासवें गेला ।
दुर्द्दिनु जैसा ।। १०३ ।।
इति श्रीसिद्धानुवादे श्रीमदनुभवामृते शब्दखंडनं
नाम षष्ठप्रकरणं संपूर्णम् ॥
दोन्ही बाजूंनीं नखाइतकाहि शब्दाचा प्रवेश न होता प्रलयजळांत
ओघ नाहींसा होतो, शब्दहि नाहींसा होतो. ९८. विचार केला कीं
शब्दाचा आत्मस्वरूपाशीं कसलाहि संबंध नाहीं, हें लक्षांत येतें. ९९.
बागुलबोवा आला, आभाळ हातांत पकडलें हें बोलणें निरर्थक १००.
रंगांतील चित्रे जितकीं निर्बल तितकाच आपल्या सर्व बडिवारासह शब्द
आत्म्याला सिद्ध करण्यास दुबळा ठरतो. १०१ केवळ शब्दाच्या साम-
र्थ्यानें जगणारीं ज्ञानें आणि अज्ञानेंहि चित्रांत रंगविलेल्या उपवनाप्रमाणें
खरीं भासतात. १०२. ढगाळ हवा नाहींशीं झाली कीं दुष्काळ पडण्याचें
संकट नाहींसें होतें. त्याचप्रमाणें येथें शब्द अकार्यक्षम होतो म्हणून
त्यावर आधारलेली व परमात्मस्वरूप स्पष्ट करूं इच्छिणारीं ज्ञानें आणि
अज्ञानेंहि अशीं निरर्थक ठरतात. ॥१०३॥
प्रकरण सहावें समाप्त
प्रकरण सातवें
येन्हवीं तन्ही अज्ञाना । जैं ज्ञानाची नसे क्षोभना ॥ तै तरी
काना- । खालींच दडे ॥ १ ॥ आडसूनि अंधारी । खद्योत दीप्तीं
सिरी । तैसें लटिकेवरी । अनांदी होये ॥ २ ॥ जैसी स्वप्ना
स्वप्नीं महिमा । तर्मी मानूं असे तमा ॥ तेवी अज्ञानगरिमा ।
अज्ञानींची ॥ ३ ॥ कोल्हेरीचे । असिवारु न येता धारकी घरु ॥
नये लेणा श्रृंगारु । वोडंबरीचे ॥ ४ ॥ हे जाणण्याच्या घरीं ।
खोंचिलेंही आन न करी ॥ काई चांदिणां उठे लहरी । मृग-
जळाची ॥ ५ ॥ आणि ज्ञान हें जें म्हणिजे । तें अज्ञानचि पा
दुजें ॥ एक लपवूनि दाविजे । एक नव्हे ॥ ६ ॥
तसें पाहिलें तर ज्ञानाचा टेका अज्ञानाला नसेल तर अज्ञान हा शब्द
ऐकायलाहि मिळणार नाहीं. १. अंधाराचा आश्रय घेऊन काजवा आपलें
तेज मिरवतो, तसें अज्ञान अभावाचा आश्रय घेऊन अनादिपणानें मिरवितें.
२. स्वप्नाचें महत्त्व स्वप्नांतच; अथवा अंधकाराचें महत्त्व अंधकारांतच,
त्याप्रमाणें अज्ञानाची थोरवी अज्ञानांतच. ३. कुंभारानें तयार केलेले मातीचे
घोडे रणावर वरतां येत नाहींत. मंत्रानें केलेले दागिने अंगावर घाल-
ण्याच्या उपयोगीं पडत नाहींत. ४. त्याप्रमाणें ज्ञानाच्या घरांत अज्ञानाला
डिवचलें तरी तें भिन्नरूपानें प्रत्ययास येत नाहीं. ( अरे ! ) चांदण्यामुळे
मृगजळाच्या लाटा तयार होतील का ? ५. व्यवहारांत जसें दोन समान
पदार्थ असले म्हणजे एक लपवून दुसरा दाखवीत नाहींत का, तसें
ज्याला ज्ञान म्हणतात तेंहि पण दुसरें अज्ञानच होय. ६.
चतुर्थ से षष्ठ प्रकरण: अज्ञान-खण्डन एवं वस्तु-प्रभा (चित्-स्वरूप)
प्रकरण सातवें ६५
असो आता हा प्रस्तावो । आधीं अज्ञानाचा धांडोळा घेवों ॥
मग तयाच्या साची लाहो । ज्ञानही लटिकें ॥ ७ ॥ या अज्ञान
ज्ञानातें । आंगेंचि आहे जितें ॥ तरी जेथें असे तयातें । नेण कां
न करी ॥ ८ ॥ अज्ञानें जेथें असावें । तेणें सर्व नेण होआवें ॥
ऐशी जाती स्वभावें । अज्ञानाची ॥ ९ ॥ तरी शास्त्रमत्त ऐसें ।
जे आत्माच अज्ञान असे ॥ आणि तेणें तो गिवसे । आश्रो जरी
॥ १० ॥ तरी नुठिता दुजें । जैं अज्ञान असे बीजे ॥ तैं तेंचि
आधीं हें बुझे । कोण येथें ॥ ११ ॥ अज्ञान तंव आपणयातें ।
जडपणें नेणें निरुतें ॥ आणि प्रमाण प्रमाणातें । होत आहे ॥१२॥
अज्ञानाप्रमाणेंच ज्ञान हें लटकें आहे हा ज्ञानखंडनाचा हा एक तत्त्व-
विचार तूर्त बाजूला ठेवूं. या प्रकरणांत अज्ञानविषयक विचार करूं या.
त्याच्या विचारांत तें लटकें ठरलें तर त्यावरून ज्ञानहि खोटें म्हणावयास
कांहीं अडचण आहे काय ? ७. ज्या परमात्म्याच्या ठिकाणीं तें अज्ञान
आहे त्याच्या स्वरूपाचा तें लोप कां करीत नाहीं ? ८. ज्या ठिकाणीं
अज्ञान असतें तें ज्ञानाला झांकून टाकतें. तो तर अज्ञानाचा स्वभाव आहे.
९. त्या आत्म्यावर अज्ञानाचें आवरण असल्यानें आत्मा त्याचा आश्रित
असून आच्छादित आहे असें शास्त्रमत आहे. १०. वेगळेपणा उत्पन्न न
होतां त्याच्या ठिकाणीं अज्ञान हें बीजरूपानें आहे असें मानावें; तर
मग तें तेथे आहे हें कोणाला समजणें शक्य आहे ? ११. स्वतः आपण
जड (अचेतन) असल्यानें अज्ञान हें त्याचें त्यास व इतरांसहि
समजत नाहीं. अविश्वासार्ह अज्ञान प्रमाण म्हणून कसें मानतां
येईल ? १२.
सा. अ. . ५
६६ सार्थ अमृतानुभव
यालागीं जरी अज्ञान । करील आपुलें ज्ञान ॥ हें म्हणत खेव
घववी मौन । विरोधचि ॥ १३ ॥ आणि जाणती वस्तु येक ।
तें येणें अज्ञानें कीजे मूर्ख ॥ तैं अज्ञान हे लेख । कवण धरी
॥ १४ ॥ अहो आपणयाही पुरता । नेणू न करवे जाणता ॥
तयातें अज्ञान म्हणता । लाजिजे कीं ॥ १५ ॥ आभाळें भानु
ग्रासे । तैं आभाळ कोणें प्रकाशे ॥ सुषुप्ती सुषुप्ते या रुसे । तें तेंचि
कोणा ॥ १६॥ तैसें अज्ञान असे जेथें । तेंच जरी अज्ञान आते ॥
तरी अज्ञान अज्ञानातें । नेणतां गेलें ॥ १७ ॥ नातरी अज्ञान
एक घडे । हें जयास्तव निवडे ॥ तें अज्ञान नव्हे फुडें । कोण्हे
काळीं ॥१८॥ पडळही आथी डोळां । आणि डोळा नव्हे आंधळा ॥
तरी आथी या पोकळा । बोलिया कीं ॥१९॥ इंधनाच्या आंगी ।
खवळलेन आगी ॥ तें न जळे तरी बाउगी । शक्तीच ते ॥२० ॥
एवढ्यासाठीं अज्ञानानें स्वतः माहिती करून घ्यावी, असें म्हटल्यास
विरोध येतो. त्यामुळे मौन स्वीकारावें लागतें. १३. परमात्मा ही जाणून
घेण्याची वस्तु या अज्ञानानें मूढ केली, असें म्हटलें तर हें अज्ञानाचें ज्ञान
तरी कोणाला झालें ? १४. आपल्यापुरता परमात्मा हा तरी ज्ञेय-अज्ञेय,
अतीत आहे. तो अज्ञानी म्हणावयास लाजणार. १५. आभाळानें सूर्य
ग्रासला म्हणावें तर मुळांत आभाळ दिसणार तें कोणामुळें ? झोंपी गेलेल्या
इसमावर निद्रा रुसली म्हणावें तर मग त्या माणसांस काय मिळालें ? १६.
त्याप्रमाणें ज्या ठिकाणीं अज्ञान असतें तो जर आज्ञेय झाला, तर मूळचें
अज्ञान या झांकलेल्या अज्ञानामुळे न कळतांच गेलें असें होणार नाहीं का?
१७. सिद्धांत असा कीं, ज्या ज्ञानानें अज्ञान निवटलें जातें, तें ज्ञान
केव्हांही अज्ञान होणार नाहीं. १८. डोळ्यांवर पडळ आलें तरी डोळा
आंधळा नाहीं, 'पडळ आलें', हें म्हणणें जसें पोकळ आहे. १९. ज्या
अग्नींत लाकूड टाकलें त्यांत तें जळत नसेल तर अशा अग्नीला अग्नि असें
म्हणताच येणार नाहीं. २०.
प्रकरण सातवें ६७
आंधारु कोंडूनि घरीं । घरा पडसाई न करी ॥ तैं अंधारु
इहीं अक्षरीं । न म्हणावा कीं ॥ २१ ॥ वोजावों नेदी जागणें ।
तिये निदेतें नीद कोण म्हणे ॥ दिवसा नाणी उणें । तैं रात्र
कैची ॥ २२ ॥ तैसें आत्मा अज्ञान असिके । असता तो न
मुके ॥ तैं अज्ञानशब्द लटके । आलेंचि कीं ॥ २३ ॥ येन्हवीं तरी
आत्मया । माजीं अज्ञान असावया ॥ कारण म्हणतां न्याया ।
चुकी येईल कीं ॥ २४ ॥ अज्ञान तममेळणी । आत्मा प्रकाशाची
खाणी ॥ आतां दोहीं मिळणी । एकी कैशी ॥ २५ ॥ स्वप्न
आणि जागरु । आठवू आणि विसरु ॥ हे युग्मे एका हारु ।
चालती जरी ॥ २६ ॥ शीता तापा एकवट । वाहे वस्तीची
वाट ॥ कां तमें बांधिजे मोट । सूर्यरश्मींची ॥ २७ ॥ नाना
राती आणि दीवो । येती एकेठायीं राहो । तैं आत्मा जीवें जीवो ।
अज्ञानाचेनि ॥ २८ ॥
अंधार घरांत कोंडून भरलेला आहे, पण तो अंधकाराचें काम करीत
नसेल तर त्याला अंधकार असें तरी कसें म्हणावें ? २१. जागृतींतील
'ओ' देण्याचें काम थांबलेलें नाहीं, तर मग निद्रा आली असें म्हटल्यास
अशा निद्रेला कोणी निद्रा म्हणेल का ? किंवा दिवसाला उणेपणा न
येतां रात्र आहे हें म्हणणें संभवत नाहीं. २२. आत्म्याच्या ठिकाणीं संपूर्ण
अज्ञान असतांना आत्म्याचें ज्ञान तर कमी होत नाहीं, यावरून अज्ञान
हा शब्दच लटका ठरतो. २३. आत्म्याच्या ठिकाणीं अज्ञान आहे हें
म्हणणें संयुक्तिक धरून नाहीं. २४. कारण अज्ञान तर घनीभूत अंधकार-
रूप. आत्मा तर प्रकाशाची खाणच, मग हे दोघे एके ठिकाणीं कसे
असतील ? २५. असें पाहा, स्वप्न व जागृति, स्मरण व विस्मरण दोन्ही
जर एके ठिकाणीं राहूं शकतील; २६. थंडी व उष्णता एका ठिकाणीं
असतील किंवा अंधकारानें सूर्यकिरणांची मोट बांधली असेल, २७. आणि
जर रात्र आणि दिवस एकत्र राहतील; तर आत्मा अज्ञानाच्या जिवावर
जगतो असें म्हणतां येईल. २८.
६८ सार्थ अमृतानुभव
हें असो मृत्यु आणि जिणें । हे शोभती काय मेहुणे ॥ तरी
आत्मेन असणें । अज्ञानेंशी ॥ २९ ॥ अहो आत्मेन जे बाधे ।
तेंचि आत्मेनशीं नांदे ॥ ऐशीं कायशी विरुद्धें । बोलणीं इये ॥३०॥
अहो अंधारपणींची पैज । सांडूनि अंधार तेज । जाला तैं सहज ।
सूर्य निभ्रांतचि ॥ ३१ ॥ दलांकुडपणा सांडिलें । आणि आगीपण
मांडिलें ॥ तैं तेंचि आगीं जालें । इंधन कीं ॥ ३२ ॥ कां गंगा
पावत खेवो । आनपणाचा ठावो ॥ सांडी तैं गंगा हो । लाहे
पाणी ॥ ३३ ॥ तैसें अज्ञान हें अज्ञान नोहे । तरी आत्मा असकें
असों लाहे ॥ येन्हवीं अज्ञान होये । लागलेंचि ॥ ३४ ॥ आत्मे-
नशी विरोधी । म्हणोनि नुरेचि इये संबंधीं ॥ वेगळे तरी सिद्धि ।
जायेचिना ॥ ३५ ॥ लवणाची मासोळी । जन्ही होय जिव्हाळी ॥
तरी जळीं ना वेगळी । न जिये जेवी ॥ ३६ ॥
हें असो; मृत्यु आणि जिवंतपणा हें जर मेहूण म्हणून मिरवेल तर,
आत्मा आणि अज्ञान एके ठिकाणीं राहूं शकतील. २९. अहो ! जें अज्ञान
आत्मज्ञानानें नष्ट होतें, तेंच अज्ञान आत्म्याचे ठिकाणीं नांदतें हें म्हणणें
परस्पर विरुद्ध नाहीं का ? ३०. अंधारपणा टाकून अंधार तेज झाला,
तर तो निःसंशय सूर्यच झाला ! ३१. लाकूडपणा टाकून लाकूड अग्निरूप
झालें, तर तें अग्नि झालें. ३२. किंवा ओहोळ गंगेला मिळतांक्षणींच
आपला ओहोळपणा टाकून गंगारूप होतो; ३३. त्याप्रमाणें अज्ञानाचा व
आत्म्याचा संयोग होतांच अज्ञान आपला अज्ञानपणा टाकून संपूर्ण ज्ञानच
होतें; परंतु संयोग होण्यापूर्वी अज्ञान अज्ञान स्वरूपानें शिल्लक असतेंच.
३४-३५. मिठाचा मासा करून त्यांत प्राण घातला तरी पाण्यामध्यें किंवा
-पाण्याच्या बाहेर तो जिवंत राहत नाहीं. ३६.
प्रकरण सातवें ६९
जे अज्ञान येथें नसे । तरीच आत्मा असे ॥ म्हणोनी बोलणीं
वायसें । नायकावीं कीं ॥ ३७ ॥ दोरी सर्पाभास होये । तो
तेणें दोरें बांधो ये ॥ ना दवडणें न साहे । जयापरी ॥ ३८ ॥
नाना पुनिवेचनि आंधारें । दिहाभेण राती महुरे ॥ कीं येतचि
सुधाकरें । गिळिजे जेंवी ॥ ३९ ॥ तियापरी उभयतां । अज्ञान
शब्द गेला वृथा । हा तर्का वांचोन हाता । स्वरूपें नये ॥ ४० ॥
तरी अज्ञानस्वरूप कैसें । काय कार्यानुमेय असे ॥ कीं प्रत्यक्षचि
दिसे । धांडोळूं आतां ॥ ४१ ॥ अहो प्रत्यक्षादि प्रमाणीं । कीजे
जयाची घेणी ॥ ते अज्ञानाची करणी । अज्ञान नव्हे ॥ ४२ ॥
जैशीं अंकुरेंसीं सरळ । वेली दिसे वेल्हाळ ॥ तें बीज नव्हे केवळ ।
बीज कार्य होये ॥ ४३ ॥
वरील दृष्टान्ताप्रमाणें अज्ञान आत्म्याचे ठिकाणीं, स्वरूपानें अगर वेगळें
स्वतंत्रपणानें नसून आत्माच आहे. म्हणून अज्ञानाचा व आत्म्याचा संबंध
आहे, किंवा अज्ञान वेगळें स्वतंत्र आहे, हीं दोन्ही बोलणीं तर्कसंगत
नाहींत. कारण अज्ञान तत्त्वतः केव्हांच नाहीं, निरंतर आत्माच आहे. ३७.
ज्या दोरीवर सर्पाभास झाला त्या दोरीनें त्या भासमान सर्पाला बांधणें होईल
काय ? ३८. अथवा त्या दोरीपासून त्याला वेगळें तरी करतां येईल काय ?
दोन्ही असंभव आहे अथवा पौर्णिमेच्या दिवशीं अंधार, दिवसाच्या भीतीनें
रात्रीकडे वळला, तों चंद्रानें लगेच त्यास गिळून टाकिलें ३९. त्याप्रमाणें
दोन्ही बाजूंनीं अज्ञान शब्द वायां गेला. हें अज्ञान शब्दमात्र आहे; म्हणजे
त्याला स्वरूपसिद्धि नाहीं. अज्ञान आहे हा तर्कमात्र आहे. ४० आज्ञान-
स्वरूपविषयक विचार करतांना अज्ञान हें कार्यानुमेय आहे कीं प्रत्यक्षसिद्ध
आहे, याकडे दृष्टि टाकूं. ४१. प्रत्यक्षादि प्रमाणांनीं ज्या प्रमेयाची देवघेव
होते, प्रमाता प्रमाण व प्रमेय ही त्रिपुटी हें अज्ञानकार्य आहे, अज्ञान
नव्हे. ४२. अंकुररूपानें सरळ वाढून वेल पसरते, पण तो विस्तार, बीज
नाहीं, बीजकार्य होय. ४३.
७० सार्थ अमृतानुभव
कां शुभाशुभरूपें । स्वप्नदृष्टि आरोपें ॥ तें नीद नव्हे जाउर्पे ।
निदेचें कीं ॥ ४४ ॥ नाना चांदु एकु असे । तो व्योमीं दुणावला
दिसे ॥ तें तिमिरकार्य जैसें । तिमिर नव्हे पैं ॥ ४५ ॥ तैसें
प्रमाता प्रमेय । प्रमाण जें त्रय ॥ तें अज्ञानाचें कार्य । अज्ञान
नव्हे ॥ ४६ ॥ म्हणोनी प्रत्यक्षादिकीं । अज्ञान कार्य विशेखीं ॥ न
घेपे येविषयीं । आनु नाहीं ॥ ४७ ॥ अज्ञान कार्यपणें । घेइजे तें
अज्ञान म्हणणें ॥ तरी घेताही करणें । तयाचेंचि ॥ ४८ ॥ स्वप्नीं
दिसे तें स्वप्न । मा देखता काय आन ॥ तैसें कार्याचि अज्ञान ।
केवळ जरी ॥ ४९ ॥ तरी चाखिला गूळ गूळें । माखिलें काजळ
काजळें ॥ कां घेपे देपे शूळें । हालया शूळें ॥ ५० ॥
किंवा स्वप्नांत शुभाशुभरूपानें दिसणारें सर्व झोंप नाहीं. तें झोंपेचें
पिलं म्हणजे कार्य आहे. ४४. अथवा आकाशांत चंद्र एक असून दोन
दिसतात, पण ते दोन दिसणें हें अंधाराचें कार्य आहे, अंधार नव्हे. ४५.
त्याप्रमाणें प्रमाता, प्रमाण, प्रमेय ही त्रिपुटी अज्ञानकार्य आहे; स्वयंअज्ञान
नव्हे. ४६. ही प्रत्यक्षादि सहा प्रमाणें अज्ञानाची विशेष कार्ये आहेत,
त्यांच्याकडून अज्ञानाचें ग्रहण होत नसलें तरी त्या विशेष कार्या-
वरूनच कारणरूपानें अज्ञान अनुमानलें पाहिजे. ४७. अज्ञानाच्या कार्या-
वरून अज्ञानसिद्ध आहें असें जर म्हणावें तरी पण ज्या प्रत्यक्षादि
प्रमाणांवरून अनुमानानें तो अज्ञानाची सिद्धि करतो. तेंही अज्ञानच होय;
कारण चैतन्याव्यतिरिक्त कोणताहि पदार्थ अज्ञानकार्य म्हणून समजलें जातें.
४८. जर स्वप्नांत दिसणारें सर्व एकरूपच आहे तर मग स्वप्न पाहाणारा
त्याहून निराळा आहे काय ? त्याप्रमाणें अज्ञानाचें कार्यच जर केवळ
अज्ञान आहे असें म्हणालास, ४९. गुळानेंच गुळाची चव घेतली;
काजळानेंच स्वतःला काजळ लाविलें किंवा सुळानेंच सुळाला मारलें
असें म्हटल्यासारखें होईल. ५०.
प्रकरण सातवें ७१
तैसें कारणअभिन्नपणें । कार्यही अज्ञान होणें ॥ तें अज्ञानीच
मा कोणें । काय घेपे ॥ ५१ ॥ आतां घेते घेइजे ते ऐसा ।
विचारु नये मानसा ॥ तरी प्रमाण जाला मासा । मृगजळींचा
ना ॥ ५२ ॥ तंव प्रमाणाचिया मापा । न संपडोचि जें बापा ॥
तया आणि खपुष्पा । विशेषु काई ॥ ५३ ॥ मा हे प्रमाणाचि
नुरवी । आधी हे कोण प्रस्तावी ॥ येणेंही बोले जाणावी ।
अज्ञान उखी ॥ ५४ ॥ एवं प्रत्यक्ष अनुमान । यया प्रमाणां
भाजन ॥ नहोनी जालें अज्ञान । अप्रमाण ॥ ५५ ॥ ना
स्वकार्यातें विये । जें कारणपणा नये ॥ मी अज्ञान ऐसें बिहे ।
मानू साचें ॥ ५६ ॥
त्याप्रमाणें जर कार्य, कारणरूपानें अभिन्न असेल तर सर्वच अज्ञान
झालें; मग घेण्यादेण्याचा व्यवहार करायला शिल्लक उरलाच कोण ? ५१.
म्हणून प्रमाता आणि प्रमेय असा भेद न राहिल्यामुळे व सर्वच अज्ञान
झाल्यामुळे वरील म्हणणें मृगजलांतील माशाइतकेंच सत्य ठरतें. ५२. जी
वस्तु प्रमाणानें सिद्ध होत नाहीं त्या वस्तूंत व आकाशपुष्पांत अंतर काय ?
५३. मग हें अज्ञान जर प्रमाणालाच उरू देत नाहीं, तर अज्ञान आहे हें
सिद्ध कोणीं करावें ? याचाच अर्थ या बोलण्यानेंच अज्ञानाचें खंडण झालें.
५४. अज्ञान हें अशा रीतीनें प्रत्यक्ष, अनुमान इत्यादि प्रमाणांनीं सिद्ध
होण्यास अपात्र असल्यानें तें अप्रमाण म्हणजे खोटें ठरलें. ५५. शिवाय
ज्यांत कार्य उत्पन्न करण्याची शक्ति नाहीं तें कारण होऊं शकत नाहीं;
तसेंच मी ' अज्ञान ' आहे असें सांगायला जें भितें, त्याला आपण अज्ञान
कां मानावें ? अहो ! ' मी ' अज्ञान आहे, असें हें म्हणणेंहि ज्ञानच नव्हे
का ? ५६.
७२ सार्थ अमृतानुभव
आत्मया स्वप्न दाउ । न सके कीर बहु ।। परी हाये ठाउ ।
निदेजो नेणें ॥५७॥ हें असो जिये वेळे । आत्मपणोंचि निखिळे ।।
आत्मा अज्ञानमेळे । असे तेणें ॥ ५८ ।। जैसें न करितां मंथन ।
काष्ठीं अवस्थान ।। जैसें कां हुताशन । सामर्थ्याचें ॥ ५९ ॥
तैसें आत्मा ऐसें नांव । न साहे आत्मयाची बरव । तैं का अज्ञान
हाव । बांधते का ॥६०॥ काय दीप न लाविजे । तैंचि काजळी
फेडिजे ॥ कीं नुगवतीया वाळीजे । रुखाची छाया ॥ ६१ ॥
नाना नुठिता देहदशा । कालवूनि लाविजे चिकसा ।। न घडितां
आरसा । उटिजे काई ॥ ६२ ॥ कां वोहाच्या दुधीं । सायची
असावी आधीं ॥ मग ते फेडु इये बुद्धि । पवाडु कीजे ॥ ६३ ॥
आत्म्याला, अज्ञान निश्चयँकरून स्वप्न दाखवूं शकत नाहीं; पण जरी
अज्ञान आहे असे धरलें, तरी जेथें तें असतें, त्या आत्म्याला आवरणहि
करीत नाहीं, हें कसें ? ५७. बरें, आतां हें राहूं द्या. जेव्हां तुमचा आत्मा
अगदीं शुद्ध स्वरूपानें असतो, तेव्हां त्याच्याबरोबरच आमचें अज्ञान आहे.
५८. लाकडें मंथन करण्याच्या पूर्वी अग्नि ज्याप्रमाणें आपल्या सामर्थ्यानें
त्यांत असतो. ५९. त्याप्रमाणें अज्ञान आत्म्याबरोबर असतें. ज्या आत्म्याला
'आत्मा' हें नांवहि सहन होत नाहीं, त्या आत्म्याच्या ठिकाणीं अज्ञान
शक्य नाहीं. ६०. थोडा तरी जळण्याच्यापूर्वीच दिव्याची काजळी कशी
झाडायची किंवा मुळींच न उगवलेल्या झाडाच्या छायेचा परित्याग करा-
वयाचा कसा ? ६१. उत्पन्न न झालेल्या देहाला उटणी केव्हां लावाव-
याची ? किंवा आरसा तयार व्हायच्या आधीं कसा पुसायचा ? अगर
कासेंतल्या दुधाला अगोदर साय असावी आणि मग ती साय निराळी
करण्याची युक्ति सुचवावी. ६३.
प्रकरण सातवें ७३
तैसें आत्मयाच्या ठाईं । जैं आत्मपणा ठाऊ नाहीं ॥ तैं
अज्ञान कांहीं । सारिखें कैसें ॥ ६४ ॥ म्हणौनी तेव्हांही अज्ञान
नसे । हें जालेंचि असे आपैसें ॥ आतां रिकामें कायसे । नाहीं
म्हणो ॥ ६५ ॥ ऐसाही आत्मा जेव्हां । जैं नातळे भावाभावा ॥
अज्ञान असे तेव्हां । तरी तें ऐसें ॥६६॥ जैसें घटाचें नाहींपण ।
फुटोनि होय शतचूर्ण ॥ किंवा सर्वांपरी मरण । मारवलें ॥६७॥
नाना निदे नीद आली । कीं मूर्छा मूर्छे गेली ॥ कीं अंधारी पडली ।
आंधकुपी ॥६८॥ कां अभाव अवघडला । कां केळीचा गाभा
मोडला ॥ चोखळा असुडला । आकाशाचा ॥६९॥ कां निवाटिया
सूदेल विख । मुकियाचें बांधिलें मुख ॥ नाना नुठितां लेख । पुसिलें
जैसें ॥७०॥ तैसें अज्ञान आपुलिये वेळ । भोगी हेंचि टवाळ ॥ आतां
तरी केवळ । वस्तु होऊनि असे ॥७१॥ देखां वांझ कैशी विये ।
विरुढती भाजली बियें ॥ कीं सूर्य कोणा लाहे । अंधारातें ॥७२ ॥
त्याप्रमाणें ज्या काळीं आत्म्याच्या ठिकाणीं आत्मपणाचाच ठिकाण
नाहीं, अशा केवळ आत्म्याच्या ठिकाणीं अज्ञान असें असणार. ६४.
या कारणास्तव त्या वेळींहि अज्ञान 'नाहीं नाहीं,' असें शेंकडों
वेळां केवळ म्हणण्यात काय अर्थ ? ६५. याप्रमाणें भावाभावातींत
आत्मा जेव्हां असतो, तेव्हां अज्ञान आहे हें म्हणणें कशा प्रकारचें तें आतां
ऐका. ६६. कोणत्याच आकारांत नसलेला घट फुटून त्याचे शेंकडों तुकडे
झाले किंवा त्याला मरण आलें, ६७. अथवा झोंपेला झोंप आली, किंवा
मूर्च्छेला मूर्च्छा आली, किंवा अंधार अंधाऱ्या विहिरींत पडला, ६८. किंवा
अभाव संकटांत पडला किंवा केळीचा गाभा मोडला; किंवा आकाशाचा
स्वच्छपणा मोडला; ६९ मेलेल्याला विष घातलें, मुक्याला गप्प बसविलें
किंवा न लिहिलेलें पुसलें ७०. हें म्हणणें जितकें निरर्थक तितकेंच
आत्मस्वरूपाच्या ठिकाणीं, अज्ञान साहचर्यानें आहे हें बोलणें अर्थहीन
आहे ७१. वंध्या कधीं प्रसूत होते काय ? जळालेले बीज उगवतें काय ?
सूर्याला अंधार कधीं भेटला आहे काय ? ७२.
७४ सार्थ अमृतानुभव
तैसा चिन्मात्रीं चोखडा । भलतैसा अज्ञानाचा झाडा ॥ घेतला
तन्हीं पवाडा । येईल काई ॥ ७३ ॥ जे सायेचिया चाडे । डहुळे
दुधाचे भांडें ॥ ते दिसे कीं विघडे । तैसें हें पा ॥ ७४ ॥ नाना
नीद धरावया हातीं । चेऊनि उठिला झडती ॥ ते लाभे कीं थिती ।
नासली होये ॥ ७५ ॥ तेवीं पहावया अज्ञान ऐसें । हें आंगीं
पिसें कायसें ॥ न पाहतां आपैसें । न पाहणेंचि कीं ॥ ७६ ॥
एवं कोण्हेही परी । अज्ञानभावाची उजरी । न पडेचि नगरी
विचाराचिये ॥ ७७ ॥ अहो कोण्हेही वेळे ॥ आत्मा अथवा वेगळे ॥
विचाराचे डोळे । देखते कां ॥ ७८ ॥ ना निर्धाराचें तोंड न
माखे । प्रमाण स्वप्नींही नायके ॥ कीं निरुती हन मुके ।
अनसाईपणा ॥ ७९ ॥ इतुलियाही भागू । अज्ञानाचा तरी तो
मागु ॥ निगे ऐसा वागु । पडतां कीं देवा ॥ ८० ॥
त्याप्रमाणें ज्ञानस्वरूप आत्म्याच्या ठिकाणीं अज्ञानाचा कितीहि शोध
घेतला तरी तो सांपडेल काय ? सायीच्या दुधाचें भांडें ढवळलें तर
दुधावर साय येईल कीं नाहींशी होईल ? ७४. अथवा एकादा झोपलेला
झटकन जागा होऊन, आलेल्या निद्रेला हातांत पकडूं म्हणेल तर ती हातीं
लागेल कीं नाहींशी होईल ? ७५. तेव्हां अशाप्रकारें अज्ञान पाहणें हा
वेडेपणा आहे. अज्ञानाचा विचार करावयास गेलें असतां अज्ञान नाहींच
आणि ज्या वेळीं विचार करीत नाहीं, त्या वेळीं तर तें सहजच नाहीं;
तात्पर्य नाहींच अज्ञानाचा अत्यंताभाव आहे. ७६ याप्रमाणें कोणत्याहि
प्रकारें अज्ञानाची सिद्धि विचाराच्या गांवीं होत नाहीं. ७७. अहो, कोण-
त्याही वेळीं आत्म्याच्या ठिकाणीं किंवा दुसरीकडे विचार दृष्टीनें अज्ञान
दिसतें का ? ७८. अज्ञानानें निर्धाराचें तोंड माखलें जात नाहीं. प्रमाण
तर अज्ञानाला स्वप्नांतही पाहात नाहीं. फार काय, अज्ञान वेगळेपणानें
निश्चित नाहीं. ७९. अशा प्रकारें सर्व बाजूंनीं अज्ञानाचा पत्ता लागला
असता तर बरें झालें असतें. पण त्याचा कांहीं थांग लागत नाहीं. ८०.
प्रकरण सातवें ७५
अवसेचेनि चंद्रबिंबें । निर्वाँळिलिये सभे ॥ कां मांडले जैसें
खांबे । शशविषाणाचे ॥ ८१ ॥ नाना गगनौलाचिया माळा ।
वांझिचिया झालिया गळा ॥ घापती तो सोहळा । पाविजेत असे
॥ ८२ ॥ आणूनि कासवांचें तूप । भरूं आकाशाचें माप ॥ तरी
साचा येती संकल्प । ऐसे ऐसे ॥ ८३ ॥ आम्ही येऊनि जाऊनी
पुढती । अज्ञान आणावें निरुतीं ॥ ते नाहीं तरी किती । वतवतु पा
॥ ८४ ॥ म्हणौनि अज्ञान अक्षरें । नमसूं आतां निदसुरें ॥ परी
आन एक स्फुरे । इयेविषयीं ॥ ८५ ॥ आपणया ना आणिकातें ।
देखोनि होय देखतें ॥ वस्तु ऐशिया पुरतें । नव्हेचि आंगें
॥ ८६ ॥ तरी ते आपणया पुढें । दृश्य पघळें येवढें ॥ आपण
करी फुडें । द्रष्टेपण ॥ ८७ ॥ जेथें आत्मत्वाचें सांकडें । तेथें
उठे हे येवढें ॥ आणि उठिलें तरी रोकडें । देखत असो ॥८८॥
आमावास्येच्या चंद्रानें स्वच्छ प्रकाश पाडला; सशाच्या शिंगाचे खांब
तयार करून मंडप घातला. ८१. किंवा वांझेच्या मुलाच्या गळ्यात आकाश
फुलाच्या माळा घालून सोहळा केला. ८२ कांसवीचे तूप आणून आकाशाचे
मापटें भरलें, ह्या दृष्टान्ताप्रमाणें गोष्टी असल्या किंवा घडल्या तर अज्ञान-
सिद्धीसंबंधीं जे हें विचार त्यांना सफलता येऊन अज्ञानाचा पत्ता लागला
असता. ८३. आम्हीं इकडून तिकडून पुनः पुन्हां अज्ञानाची सिद्धि करण्याचा
प्रयत्न केला, परंतु तें नाहींच; पण व्यर्थ गडबड करून काय उपयोग ?
८४. म्हणून आतां ' मिथ्या अज्ञान ' हीं अक्षरेंसुद्धां उच्चारण्याचा उल्हास
राहात नाहीं. परंतु अज्ञानाच्या सिद्धीच्या बाबत आणखी एक तर्क असा
सुचतो की ८५. आत्मवस्तु आपल्या स्वतःला किंवा दुसऱ्याला दृश्य
करून पहाणारी नसून निजस्वरूपानें दृश्यद्रष्टातीत आहे. ८६. मग आपणा-
पुढें दृश्यत्वाला आलेला एवढा विकार, आपणच द्रष्टेपणाने पाहतों हें कसें?
८७. ज्या ठिकाणीं आत्मत्व म्हणणें हें सुद्धां संकट आहे तेथें दृश्याचा
विस्तार उठतो व तो प्रत्यक्ष प्रतीतीसहि येतो. ८८.
७६ सार्थ अमृतानुभव
न दिसे जरी अज्ञान । तरी आहे हें नव्हे आन ॥ यया
दृश्या अनुमान । प्रणाम जालें ॥ ८९ ॥ नातरी चंद्र एकु असे ।
तो व्योमीं दुणावला दिसे ॥ तरी डोळा तिमिर ऐसें । मानूं ये
कीं ॥ ९० ॥ भूमीवेगळीं झाडें । पाणी घेती कवणीकडे ॥ न
दिसती आणि अपाडे । साजीं असती ॥ ९१ ॥ तरी भरवसेनी
मूळें । पाणी घेती हें न ढळे ॥ तैसें अज्ञान कळे । दृश्यास्तव
॥ ९२ ॥ चेइलेया नीद जाय । निंद्रिता तंव ठाउवी नव्हे ॥
परी स्वप्न दाऊनी आहे । म्हणों ये कीं ॥ ९३ ॥ म्हणोनि
वस्तुमात्रें चोखें । दृश्य जरी येवढें फाके ॥ तेव्हां अज्ञान आथी
सुखें । म्हणों ये कीं ॥ ९४ ॥ अगा ऐशिया ज्ञानातें । अज्ञान
म्हणणें केउतें ॥ काय दीवो करी तयातें । अंधारु म्हणिपे ॥९५॥
म्हणून जरी अज्ञान दिसत नाहीं तरी अज्ञान आहे हें खोटें नाहीं. कारण
यास प्रमाण दृश्य अनुमान हें आहे; म्हणजे दृश्यामानावरूनच अज्ञान
सिद्ध होतें. ८९. किंवा आकाशात चंद्र एक असून जर दोन दिसले, तर
डोळ्यांत तिमिर दोष आहे, असें मानावें लागतें. ९०. झाडें पृथ्वीशिवाय
दुसरीकडून पाणी घेतांना दिसत नाहींत आणि ताजी टवटवीत तर दिसतात.
९१. त्यावरून झाडाचीं मुळें पाणी शोषून घेतात, हें कबूल करावेंच लागतें.
त्याप्रमाणें दृश्यावरून अज्ञानाची सिद्धि होते. ९२. जागृत पुरुषाला झोंप
नसते आणि निजलेल्याला तर झोंप ठाऊक नाहीं, पण ज्या अर्थी स्वप्न
दिसतें त्या अर्थी निद्रा आहे असें म्हणावेंच लागतें. ९३. म्हणून निर्मल
वस्तुमात्र आत्म्याच्या ठिकाणीं जर एवढा दृश्याचा पसारा दिसतो, तर
अज्ञान आहे असें म्हणण्यास कांहींच प्रत्यवाय नाहीं. ९४. अहो, हें
बोलणें सारें ज्ञान आहे. त्या ज्ञानालाच अज्ञान असें कसें म्हणावें ? जो
प्रकाश करितो त्याला काय अंधार म्हणावें ? ९५.