सामग्री पर जाएँ
सर्वकोश
अमृतानुभव एवं चांगदेव पासष्टी (सन्त ज्ञानेश्वर - चिद्विलासवाद एवं अद्वैत अनुभूति सटीक)

अमृतानुभव एवं चांगदेव पासष्टी (सन्त ज्ञानेश्वर - चिद्विलासवाद एवं अद्वैत अनुभूति सटीक)

Amritanubhava and Changdev Pasashti of Sant Jnanadev

सन्त ज्ञानेश्वर / ज्ञानदेव महाराज द्वारा

DevanagariHindipublished138 पृष्ठ

पृष्ठ 72, कुल 138 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 72

प्रकरण सातवें ७१
तैसें कारणअभिन्नपणें । कार्यही अज्ञान होणें ॥ तें अज्ञानीच
मा कोणें । काय घेपे ॥ ५१ ॥ आतां घेते घेइजे ते ऐसा ।
विचारु नये मानसा ॥ तरी प्रमाण जाला मासा । मृगजळींचा
ना ॥ ५२ ॥ तंव प्रमाणाचिया मापा । न संपडोचि जें बापा ॥
तया आणि खपुष्पा । विशेषु काई ॥ ५३ ॥ मा हे प्रमाणाचि
नुरवी । आधी हे कोण प्रस्तावी ॥ येणेंही बोले जाणावी ।
अज्ञान उखी ॥ ५४ ॥ एवं प्रत्यक्ष अनुमान । यया प्रमाणां
भाजन ॥ नहोनी जालें अज्ञान । अप्रमाण ॥ ५५ ॥ ना
स्वकार्यातें विये । जें कारणपणा नये ॥ मी अज्ञान ऐसें बिहे ।
मानू साचें ॥ ५६ ॥
त्याप्रमाणें जर कार्य, कारणरूपानें अभिन्न असेल तर सर्वच अज्ञान
झालें; मग घेण्यादेण्याचा व्यवहार करायला शिल्लक उरलाच कोण ? ५१.
म्हणून प्रमाता आणि प्रमेय असा भेद न राहिल्यामुळे व सर्वच अज्ञान
झाल्यामुळे वरील म्हणणें मृगजलांतील माशाइतकेंच सत्य ठरतें. ५२. जी
वस्तु प्रमाणानें सिद्ध होत नाहीं त्या वस्तूंत व आकाशपुष्पांत अंतर काय ?
५३. मग हें अज्ञान जर प्रमाणालाच उरू देत नाहीं, तर अज्ञान आहे हें
सिद्ध कोणीं करावें ? याचाच अर्थ या बोलण्यानेंच अज्ञानाचें खंडण झालें.
५४. अज्ञान हें अशा रीतीनें प्रत्यक्ष, अनुमान इत्यादि प्रमाणांनीं सिद्ध
होण्यास अपात्र असल्यानें तें अप्रमाण म्हणजे खोटें ठरलें. ५५. शिवाय
ज्यांत कार्य उत्पन्न करण्याची शक्ति नाहीं तें कारण होऊं शकत नाहीं;
तसेंच मी ' अज्ञान ' आहे असें सांगायला जें भितें, त्याला आपण अज्ञान
कां मानावें ? अहो ! ' मी ' अज्ञान आहे, असें हें म्हणणेंहि ज्ञानच नव्हे
का ? ५६.