भक्त नरसिंह मेहता: जीवन एवं पद (वैष्णव जन तो तेने कहिये - गुजराती से हिन्दी रूपान्तरण)
Bhakta Narsi Mehta: Jeevan Aur Pad
भक्त नरसिंह मेहता (सम्पादक: रामचन्द्र तिवारी) द्वारा
अनुक्रमणिका
१ जीवन चरित्र १
२ साहित्य साधनेच्या मार्गांत ११
३ आख्यान मबलक काव्यें २६
४ ज्ञानी - भक्त - उपदेशक ४१
५ भावगीत गायक ५०
६ नवनवोन्मेषशाली कवी ६५
७ उपसंहार ७५
८. निवडक पदें ७७
जीवन चरित्र
गुजरातच्या सौराष्ट्र विभागांतील भावनगर जिल्ह्याच्या पहाडावर बौद्धकालीन गुहा आहेत.
त्या गुहांमुळेच ओळखल्या जाणाऱ्या तळाजा गांवी 'नरसी' चा जन्म झाला. त्यांच्या 'मामेरू'
नावाच्या आत्मचरित्रपर काव्यांत तळाजा गांवी माझा जन्म झाला असा उल्लेख आहे.
त्याकाळी नरसिंहाचे मातृकुल किंवा पितृकुल या गांवांत राहत असावे, यावरून एक गोष्ट
सिद्ध होते की नरसी मेहतांच्या जातीतील एकादा छोटा मोठा समुह तळाजा गावीं आणि त्याच्या
आसपासच्या प्रदेशांत राहत होता. नरसिंहच त्यांच्या 'मामेरू' काव्यांत नागर कुटुंबी निर्धन
जन्मलों या शब्दांत स्वतःला नागर ब्राह्मण म्हणत आहेत. यावरून तळाजा गावांत नागर वस्ती
जुन्या काळापासून असावी हेही लक्षात घेण्यासारखे आहे. तळाजा (किंवा तालध्वजनगर) इ.स.
च्या १३ व्या शतकारंभी महास्थान (मोठे शहर) म्हणून प्रसिद्ध होते. वि.स.१२६४ (इ.स.१२०७)
मध्ये शेत्रुंजी नदीच्या खोऱ्याचा प्रदेश सोलंकी राजा भीमदेव बीजाच्या सत्तेखाली होता. या
प्रदेशावर त्याचा मांडलिक (दर्जाचा) महेर राजा जगमल राज्य करीत होता. तळाजामहास्थानात
त्याने भगवान श्री चौडेश्वर आणि श्री पृथ्वीश्वर (महादेव) यांची मंदिरे बांधली. त्या काळी तिथे
जैनांची धर्मस्थाने पण होती. त्याहूनही जुन्या काळांत तिथे बौद्धांची चांगल्यापैकी वस्ती होती.
ही गोष्ट, पर्वतांवरील त्यांच्या गुहावरून स्पष्ट होते. वल्लभनगरच्या मैत्रकांच्या
ताम्रदानशासनाच्या आधारे असे म्हणता येईल कीं इ.स.४५० पासून साधारण पणे इ.स. ७६६
पर्यंत वल्लभीराजे राज्यावर होते. तोपर्यंत त्यांनी बौद्धधर्माला चांगले उत्तेजन दिले. ब्राह्मण
धर्मालाही त्यांचे उल्लेखनीय उत्तेजन होते, त्यांनी आनंदपूर वास्तव्य, आनंदपूरविनिर्गत,
आनर्तपूरवास्तव्य आणि आनर्तपूर विनिर्गत ब्राह्मणांना अगणित दाने दिली होती. आनंदपूर
आणि आनर्तपूर ही नावे उत्तर गुजरातच्या 'वडनगर' ची पर्यायी नावे आहेत. वडनगर हे नागर
लोकांचे जुने स्थान आहे. मैत्रक राजानी (वल्लभी राजे) आनंदपूर तसेच आनर्तपूरचे रहिवासी,
आणि तेथून सौराष्ट्रांत गेलेल्या लोकांनाही दाने दिली. अशाप्रकारे सौराष्ट्रात गेलेल्या
ब्राह्मणाना उपजिवीकेचे साधन उपलब्ध करून दिले. त्यामुळे वडनगर किंवा नगरचे निवासी
2 नरसी मेहता
नागर सौराष्ट्रांत ब्राह्मण म्हणून स्थायी झाले. त्यातलेही काही वल्लभीनगराच्या आसपासच्या
प्रदेशांत आले होते. नरसिंह महेताच्या पितृवंशातले अगर मातृवंशातले कोणते पूर्वज
गोहिलवाड्यात किंवा थेट तळाजांत येऊन राहिले, ते नक्की करायला आपल्याशी कोणतेच
साधन नाही; परंतु थेट ५ व्या शतकापासून त्यांचे वास्तव्य सुरू होऊन गेले होते. याला मात्र
इतिहासाचा सबळ आधार आहे.
नागर (ब्राह्मणांत) लोकांत वडनागरा, वीसनगरा, साठोदरा चितरोडा, कृष्णोरा आणि प्रश्नोरा
असे भेद केव्हां पडले हे सांगणे कठीण आहे, तरीपण जो समूह वडनगरांत स्थिरपणे राहिला
तो 'वडनागरा' म्हणून प्रसिद्ध आहे. काहीना काही कारणांमुळे काहीं काहीं कुटुंबे ज्या ज्या
गावांत स्थायिक झाली, त्या त्या गांवच्या संबंधामुळे त्याना पोटजातीचे नागर (ब्राह्मण) म्हणून
ओळखले जाऊ लागले. सहाजिक त्यांचे नामभेद झाले. नरसिंहांच्या पुत्राचा विवाह
वडनगरच्या मदन महेतांच्या मुलीशी झाला होता. परवत महेता नरसिंहाचे काका. अजुनही
वैष्णव अवटंक म्हणून ओळखले जाणारे. पर्वतरायांचे वंशज, वडनागरा नागर म्हणून
ओळखले जात आहेत. यावरून नरसी महेता वडनागरा नागर होते हे स्पष्ट आहे. यांच्या
उपलब्ध वंशावळीवरून यांच्या आजोबांचे नाव पुरुषोत्तम पंड्या. वडिलांचे नाव कृष्णदास
आणि काकाचे नाव पर्वतदास होते. या वंशावळीनुसार जीवनराम आणि नरभेराम हे
नरसिंहाचे मोठे भाऊ होते. जुनागडपासून साधारण ६४ कि.मी. नैऋत्येला समुद्रतटावरील
नांगरोळ (सोरट) गांवी पर्वतदास काकांचा बराचसा जीवनकाळ गेला. त्या काळी तिथे
नागरलोकांची लहानशी वसाहत होती. पर्वतदासांचे जीवन कशा तऱ्हेचे होते हे सांगणे शक्य
नाही. वृद्धावस्थेंत हे एक मोठे भक्त होते. वृद्धावस्थेमुळे जेव्हा त्याना द्वारकेला जाणे अशक्य
झाले, तेव्हां त्यांच्याकडे रणछोडरायां दशांगुल स्वरूप प्रगट झाले, असा उल्लेख 'पर्वतपचीसा'
या काव्यात आहे. हे काव्य पर्वतदासांचे वंशज गायकवाडी मजमुदार आणि नामांकित
भक्तकवी त्रिकमदास भवानीशंकर, यांनी लिहिले आहे. नरसिंहांचे वडील कुठे राहात होते हे
सप्रमाण सिद्ध करणे अशक्य आहे. नरसिंहाचे एक वडील बंधू तळाजा गावी. राहत असत,
त्यांचे वडीलही कदाचित तळाजालाच, पुत्रसमवेत राहत, असे अनुमान काढणे शक्य आहे.
तळाजात जन्मलेल्या नरसिंहाचा इतिहास तळाजांतच सुरू झाला. त्याची जन्मवेळ आणि वर्ष,
दोहींची कुठेही नोंद नाही. नरसिंहाच्या आत्मचरित्रपर रचनांमधे, निरनिराळ्या प्रसंगाबाबत
महिना, पंधरवडा, तिथी, वार यांची नोंद आहे. मात्र एक रचना सोडून बाकी कुठेही (वर्षांची)
साल नोंद नाही. 'हारसमें' च्या शेवटच्या पदांत वि.स.१५१२ च्या सालाची नोंद आहे. हे
तितकेच खरे, 'हारमाळाच्या' संकलीत केलेल्या छोट्यामोठ्या पदांत वार आणि महिने
संगतवार आढळत नाहीत.तरीपण 'हारसमा' च्या एका गीतांत मृगनक्षत्र मावळल्याचा निर्देश
जीवन चरित्र [right-aligned: ३]
आहे. म्हणूनच वि.स.१५१२, मार्गशिर्ष शुद्ध सप्तमी आणि रविवार (१५-११-१४५५) हा
दिवस (काव्यांचा काळ म्हणून) नक्की होऊ शकतो. 'हारसमे' च्या पदांत मुलीला द्यायचे
मामाकडचे आंदण परमेश्वरानेच दिले, आणि मुलाच्या विवाहपदांत मामेरू पुढे पुरे करायचे
आहे असा निर्देश आहे विवाह, मामेरू आणि हार हे तीन प्रसंग नरसिंहाचे जन्मवर्ष नक्की
करण्यात मदत करतात. नरसिंहाच्या मुलाचा लग्नाचा दिवस, वैशाख शुद्ध पंचमी, गुरुवार,
आहे. महिना, पंधरवडा तिथी आणि वार, यांच्या उल्लेखांवरून, गणितदृष्ट्या हे वर्ष वि.
स.१४९४ म्हणजे ता. ७-४-१४४० तंतोतंत बरोबर ठरते. मुलगा लग्नात १२ वर्षांचा होता,
म्हणजे त्याचा जन्म वि.स. १४८४ (इ.स.१४२८) चा असला पाहिजे. नरसिंहाचा गृहत्यागाचा
दिवस चैत्र शुद्ध सप्तमी सोमवार, म्हटला आहे. तिथी दृष्ट्या हे वर्ष वि.स.१४८४
(२३-३-१४२८) ठरते. नरसिंहाच्या संतानांमध्ये मुलगा मोठा की मुलगी हे सांगणे कठीण
आहे. विवाहनिमित्त केलेल्या पदरचनांमध्ये मुलाचा निर्देश प्रथम आहे. पुत्रजन्माच्या वेळी
नरसिंहाचे वय १८ वर्षे स्वीकारले तर त्यांचे जन्मवर्ष वि.स. १४६६ (इ.स.१४१०) ठरते. हे
अनुमान, आजवर स्वीकारलेल्या त्यांच्या जन्मवर्षाच्या (वि.स.१४६९) आसपासचेच आहे.
शिवाय त्यांच्या आत्मचरित्रपर पदांत दर्शविलेल्या काळाच्या संदर्भात निश्चितपणा देणारे
आहे.
नरसिंहाच्या जीवनातील बदल घडवून आणणारा प्रथम प्रसंग गृहत्याग आणि शंकराची
आराधना होय. लग्न होऊन गेले होते. आणि भाऊ भावजयी समवेत काळ चालला होता.
त्यांच्यावर जबाबदारी पडू नये म्हणून नरसिंह काहीतरी कामधंदा करीत होतेच. एके दिवशी
संध्याकाळी दिवसभर करून थकून भागून नरसिंह घरी आले. भावजयी त्यांनी पाणी मागि
तले. भावजयीने पाणी तर दिले नाहीच, उलट मनाला लागतील असे, खोचक बोचक टोमणे
मारले. नरसिंहाना हे सारे खोल जखमेप्रमाणे बोचले. त्यांच्या मनात आले, सावत्र आईच्या कटू
बोलण्यामुळे ध्रुवबाळ वनात निघून गेला. तपश्चर्या करून त्याने सिध्दी प्राप्त केल्या - मी पण
हे घर सोडून जायला हवे - नरसिंहाना चीड आली. गृहत्याग करून ते अरण्यातल्या एका उजाड
शिवालयांत पोचले. सात दिवस उपाशी राहून त्यांनी घोर तपश्चर्या केली. आपल्या काव्यमय
वाणीत ते म्हणतात. “त्यानुसार सात दिवसानंतर भगवान शंकर प्रसन्न झाले. नरसिंहाना 'वर'
मागायला सांगितल्यावर आपल्याला जे प्रिय तेच मला वरदान द्या" असे नरसिंह म्हणाले.
शंकरानी नरसिंहाना आपल्याबरोबर द्वारकेला नेले आणि भगवान श्रीकृष्णाच्या
रासलीलेचा साक्षात्कार घडवला. 'हारमाळा' च्या गीतांत स्वप्नांत येऊन गेलेल्या महादेवांनी
वरदान मागायला सांगितले ' असे नरसिंह म्हणतात. 'विवाह' काव्यांत नरसिंह ३ महिने
द्वारकेत राहिले आणि काव्यरचना करण्याचा, श्रीकृष्णांनी कृपापूर्ण आशिर्वाद दिल्याचा निर्देश
4 नरसी मेहता
आहे. नरसिंह असेही म्हणतात की श्रीकृष्णांनी त्याच्या हातांत एक फूल ठेवले ‘साचु सुपन मे
दृष्ट देख्युं’ (सत्य स्वप्न मी स्पष्ट पाहिले) असा निर्वाळा नरसिंह देतात. भगवान शंकराचे
वरदान आणि श्रीकृष्णांची कृपा प्राप्त करून तळाजा गांवीं गेले आणि भाऊ-भावजयीला भेटले.
भाऊभावजयीकडून त्यांना थोडा मान मिळाला. आता त्यांच्याकडे गावागावांतून आणि
दूरदूरच्या ठिकाणांहूनही संतमंडळी आणि भक्तमंडळी येऊ लागली होती. अशा परिस्थितींत
भाऊ भावजयीवर भार टाकणे, नरसिंहाना योग्य वाटले नाही. जुनागडला, नागरांच्या वस्तीत
एक छोटेसे घर भाड्याने घेऊन नरसिंह पत्नीसह राहूं लागले. तिथेच पुत्र सामळदासाचा जन्म
झाला, आणि पुढील वर्षाच कन्या कुंवरबाई जन्माला आली.
पुत्राचे लग्न वि.स. १४९६ (इ.स.१४४०) मधें झाले. तोंपर्यंतची १२ वर्षे नरसिंहानी काही
कामधंदा करून काढली की फक्त भजनकीर्तनांत घालवली हे खात्रीपूर्वक सांगायला काही
पुरावा नाही. अशी शक्यता वाटते, की उदरनिर्वाहासाठी अर्थार्जन करीत असतांनाच
भजनकीर्तनांत आणि नवीननवीन पद्यरचना करीत ते आपला काळ घालवीत असावेत. या
१२ वर्षांच्या काळात नरसिंह नागर ब्राह्मणांच्या टीका टिंगलीचे विषय बनले होते. नरसिंहाच्या
‘विवाह’ काव्यात हे स्पष्ट करणारी एक घटना आहे. मदन महंतांचे दिक्षित गोरमदन वडनगरहून
मदन महंतांच्या ‘रतन’ नावाच्या मुलीसाठी वरसंशोधनार्थ जुनागडला आले. त्यांना कोणतांच
सुयोग्य मुलगा, जातिबांधवात आढळला नाही. निराश होऊन ते परत जात असतां टिंगलखोर
नागरांनी गोरमदन दीक्षिताना नरसिंहाचे घर दाखविले. नरसिंह टीकाटिंगलीचे विषय कां झाले,
याचे नीटसें स्पष्टीकरण नरसिंहांनी, दिलेले नाही. मात्र नरसिंहाची छाप असलेल्या एका पदांत
एका घटनेचा उल्लेख आहे. गिरनारच्या पायथ्याशी असलेल्या ‘दामोदर’ कुंडांत स्नान
करण्याचा, नरसिंहाचा परिपाठ होता. तिथे एकदां, अस्पृश्य जातीच्या एका नामांकित भक्तांने
नरसिंहाचे चरण धरले. त्याने विनंती केली ‘आमच्या अंगणात आपण कीर्तन करावे.’
नरसिंहाला त्या हरिभक्ताची करुणा आली. त्यांनी सांगितले, जमीन गोमूत्राने स्वच्छ करा, आणि
तुळशीचे रोप लावून ठेवा. रात्री नरसिंह तिथे गेले. रात्रभर तिथे त्यानी उत्सव आणि भजनकीर्तन
केले. बरोबर नेलेला भगवत् प्रसाद सर्वांना वाटला. पहाटे नरसिंह ईश्वर भजन करीत जेव्हा
आले, तेव्हा नागरब्राह्मण, टाळ्यांच्या तालांत ‘ब्राह्मण पुत्राच्या भगवत् वेडाची’ मस्करी करूं
लागले. नरसिंहांनी मुकपणे सारे सहन केले. सकाळी लोक जागे झाले. त्यांना पण नरसिंहांच्या
विवेकहीन - म्हणजे ब्राह्मणाने अस्पृश्यांच्या घरी जाणे, अशा वर्तनाचा तिरस्कार वाटला.
नरसिंहांनी ‘जिथे वैष्णव, तिथे मी’ अशा शब्दांत आपल्या वर्तनाची तरफदारी केली. आपल्या
वर्तनाला ‘वैष्णव’ हाच आधार त्यांनी घेतला. हे अनुसंधान घेऊन त्यांनी खालील पद रचले.’
एवा रे अमो एवा रे एवा, तमे कहो छो वली तेवा रे- भक्ति करतां जो भ्रष्ट कहेशो तो करशुं
जीवन चरित्र 5
दामोदरनी सेवा रे " ( असे रे, असे रे, असे रे आम्ही तुम्ही म्हणता चला तसेच आम्ही, भक्ती
करतो. तर भ्रष्ट म्हणता तर आतां दामोदरची सेवा करूं.)
सगळा साथमां हुं एक भुंडो, भुंडाथी वली भुंडो
तमारे मन माने ते कहेजो, स्नेह लाग्यो छे मने उंडो.
(सर्वांमध्ये मीच एक खराब - खराब पेक्षांही खराब हो. तुम्हाला वाटते, ते तुम्ही म्हणा-
मला ईश्वराचे अगाध प्रेम वाटते)
हळवां कर्मना तुँ नरसैंयो, मुझने तो वैष्णव वहाला,
हरिजनथी जे अंतर गणशे, नेनां फोगट फेरा डाला.
(हलकी कर्में करणारा मी नरसिंह, मला 'वैष्णव' प्रिय आहे, हरीजनांपासून स्वतः ला भिन्न
मानणाराचा हा जन्मफेरा फुकट जातो). नरसिंह महेता कृत काव्य इ.स.१४७१ या काळात
अस्पृश्य-पण जो वैष्णव आहे, त्याच्या बाबतींत, जातीची भेदरेषा आखायला नरसिंहांचा स्पष्ट
नकार आहे. ते भक्तिमार्गाच्या (भागवत मार्ग) उदात तत्त्वांना उचलून धरीत आहेत. महात्मा
गांधींनी दलित वर्गाला व्यापक अर्थी, जे हरिजन म्हणून संबोधले, त्याच्या मुळाशी, नरसिंहानी
वापरलेला 'हरिजन' हा शब्द कारणीभूत आहे.
नागरजात, पुरातन काळापासून आचारशुद्धीसाठी प्रसिद्ध आहे. आचारप्रणालीबद्दल,
नरसिंहाचा उदार दृष्टिकोन त्याना न रुचणे तसे स्वाभाविक वाटतें; म्हणूनच जातीबांधवांना
नरसिंहांचा तिरस्कार वाटत होता.
नरसिंहांच्या शब्दांतच, नागर जातीची, त्यांच्या बाबतींतल्या व्यंगात्मक वृत्तीची ओळख
पटते. आपली वैष्णव भक्तांची भूमिका, निर्भयपणे, जराही उणेपणा न आणतां नरसिंहानी
निभावली. भगवंतावर त्यांची पूर्ण श्रध्दा होती. ईश्वर भक्तांची संकटे निवारतो, असा यांचा दृढ
विश्वास होता. या अनुसंधानांतच त्यांनी पुत्राचा लग्नप्रसंग निरूपला आहे. १३ दिवसांची
मजल मारून वऱ्हाडी मंडळी जुनागडहून उत्तर गुजराथच्या वडनगरात येते. त्या काळात उत्तर
आणि मध्य गुजराथवर मुसलमान सुलतानांची सत्ता होती. इ.स.१४४० साली सामळदासांचे
लग्न झाले हे निश्चित मानल्यास, अहमदशहा पहिला, इ.स.१४११ ते १४४२ पर्यंत सत्तेवर
होता. आजोबा मुझफरशहानंतर, अहमदशहा राज्यावर आला होता. इ.स. १४१४ मधे,
साबरमतीच्या पूर्व किनाऱ्यावर, असावल आणि कर्णावती नजिक, अहमदाबादमधे, त्याने नवी
राजधानी वसवली आणि गुजराथमधे, मुस्लिम सत्ता स्थीर केली. नरसिंहानी मदन महेतांचा
संक्षिप्त परिचय दिला आहे, त्यावरून ते अहमदशहांचे 'वडनगर' पुरते हकीम होते असें
दिसते. विचार केला कीं खरच वाटते; केवळ नरसिंहाच्या दृढ ईश्वरभक्तीच्या प्रभावामुळेच
लग्नकार्य सांगोपांग पार पाडले- नरसिंहांना पावलोपावली अंतर्यामी भगवंतांची सोबत
6 नरसी मेहता
जाणवत होती. लोक सुद्धां तो लग्नसोहाळा कमालीच्या साफल्याने पार पाडल्याचा आनंद
मनोमनी अनुभवीत होते.
नरसिंहांनी त्यांच्या 'मामेरा' काव्यात म्हटल्या प्रमाणे, अल्प काळांतच पत्नी माणेक महेती
आणि पुत्र सामळदास मृत्यू पावलेले दिसतात, त्या दरम्यान पुत्री कुंवरबाईचे लग्न 'उना' गावांत
श्रीरंग महेतांच्या पुत्राबरोबर झाले होते. उना गाव, दक्षिण सौराष्ट्रात गीरपंथकच्या दक्षिणेला
आहे. मुलीच्या सीमंत समारंभापूर्वी (पहिल्या गर्भारपणात करायचा समारंभ) नरसिंहाच्या
जीवनाशी संबंध असणाऱ्या दोन घटना घडल्या. त्यांपैकी प्रथम कोणती आणि नंतर कोणती,
हे सांगणे कठीण आहे. यापैकी एक घटना 'हुंडी' ची आहे. विदेशी यात्रिक जुनागडची यात्रा
करायला आले होते. द्वारकेची यात्रा करायची त्यांची ईच्छा होती. द्वारकेचा मार्ग धोकादायक
असल्यामुळे रोकड रक्कम बरोबर घेऊ नये, असे यात्रिकांना वाटत होते. एकाद्या व्यारायाशी
रोकड रक्कम देऊन त्याची हुंडी (पावती- पत्र) घेऊन, यात्रेला निघावे असे त्यांनी ठरवले.
शहरात त्यांना कोणी सधन व्यापारी न मिळाल्यामुळे ते निराश झाले होते. तिरस्कार आणि
कुचेष्टा करणाऱ्या नागरांनी त्याना नरसिंह महेतांचे घर मुद्दाम दाखवले. ईश्वरावर परम श्रद्धा
ठेवणाऱ्या नरसिंहांनी ७०० रुपये मोजून घेऊन द्वारकेच्या सामळशा शेठ च्या नावे हुंडी लिहून
दिली. यात्रिक द्वारकेला पोचले. तपास करूनही त्यांना शामळशा सेठ सापडला नाही. आपण
फसवलो गेलो असा त्यांनी समज करून घेतला. तेवढ्यात शामळशा शेठ त्यांना भेटले आणि
त्यांनी यात्रिकाना ७०० रुपये नगद दिले. प्रत्यक्ष भगवान शामळशा शेठ बनले, आणि त्यांनी
भक्तांची लाज राखली असा अत्यंत भक्तीभावपूर्वक उल्लेख नरसिंहाच्या हुंडी या काव्यात
आढळतो.
वि. स.१५०१ मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी, सोमवार रोजी मध्यरात्री दुसरी एक रमणीय घटना
घडली, असे सांगण्यात येते कीं. नरसिंहाचे काका अनेक वर्षांपासून मांगरोल (सोरठ) ला
राहात होते. तिथे त्यांचा काय व्यवसाय होता हें कळायला मार्ग नाही. ते कदाचित् तिथे
हकिमांची किंवा तत्सम कांही नोकरी करीत असावेत. दरवर्षी तळहाती तुळशीचे रोप घेऊन,
द्वारकाधीश रणछोडरायांच्या दर्शनार्थ, द्वारकेला जायचा त्यांचा नियम होता. हा त्यांचा नियम
६० वर्षे अव्याहत चालत होता, अशी ग्वाही त्यांचे वंशज त्रिकमलाल भवानी शंकर त्यांच्या
'पर्वतपचासी' काव्यांत देतात. शिरस्त्याप्रमाणे यावर्षी पण ते निघाले. सीताभाई नावाने
ओळखल्या जाणाऱ्या 'विष्णूतीर्थ' ठिकाणी ते रात्री राहिले. मांगरोळच्या उत्तर पश्चिमेला २०
कि.मीटर अंतरावर 'आजक' गाव आहे, त्याच्या बाजूलाच हे ठिकाण आहे. भगवंतानी रात्री
स्वप्नात येऊन त्यांना सांगितले की मीच तुझ्याकडे मांगरोळला येतो आहे. दुसऱ्या दिवशी
भक्त पर्वतदास मांगरोळला परत आले. रोजच्या नियमानुसार, ते गोमती विहिरीवर स्नानाला
जीवन चरित्र 7
गेले. त्यांना विहिरीत रणछोडरायांचे काळ्या पाषाणाचे दशांगुल रूप सापडले. पर्वतदासांच्या
घराजवळ, नगराच्या उत्तर दरवाजाच्या आंत ही गोमती विहीर आहे. त्याच दिवशी दीवचा
वासुदेव सलाट (शिल्पकार) काळ्या पाषाणाचे एक छोटेसे सिंहासन घेऊन समुद्रमार्गे द्वारकेला
जात होता. समुद्रांत तुफान झाल्यामुळे तो मांगरोळ बंदरात उतरला. पर्वतदासची हकीगत
त्याच्या कानावर गेली. पर्वतदासांकडे जाऊन त्याने सिंहासन, रणछोडरायांच्या आसनासाठी,
त्याच्या स्वाधिन केले. तो दिवस उत्सवाप्रमाणे साजरा केला गेला. रात्रीच्या समारंभात नरसिंह
हजर होते. सारी रात्र त्यांनी प्रभुकीर्तनात घालवली. त्यांना तहान लागली, तेव्हा त्यांची विधवा
सून पाण्याची झारी घेऊन आली. नरसिंह भक्तिरंगात इतके रंगले होते की प्रत्यक्ष परमेश्वर
मोहिनी रूपाने आले आहेत अशा आशयाची त्यांनी तीन पदे म्हटली. चौथ्या पदांत मात्र 'ही
सुनबाई' असा निर्देश केला. ही चारी पदे झारीची पदे म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यापैकी तीन
नरसिंहाच्या उच्च प्रतीच्या प्रतिभेची द्योतक आहेत.
मुलगी कुंवरबाईचे लग्न केव्हां झाले, याचा उल्लेख नरसिंहानी कुठेही केलेला नाही.
मामेरू च्या एका पदात पत्नी आणि पुत्राच्या मृत्यूनंतर कुंवरबाईंचे 'आणु' (वयांत
आल्यानंतरची, भेटी देऊन पाठवणी ) येऊन ती सासरी गेल्याचा तसेच हुंडी च्या पत्रात
कुंवरबाईच्या सासऱ्याकडून खुशालीचा समाचार येत असल्याचा, उल्लेख आहे. मुलीचा
सीमंत (डोहाळे समारंभ) समारंभ 'उनाला' उजविला गेला. निमंत्रण पत्रिका मिळाल्यावर पत्नी
पुत्र नसल्यामुळे स्वतः नरसिंह मामेरु (मामाकडचा आहेर) करायला त्या समारंभाला गेले. हा
दिवस चैत्र शुद्ध द्वादशी होता आणि वर्ष वि.स. १५०१ इ.स.१४४५ असावे. नरसिंह
व्याह्यांच्या घरी पोचले. स्नानाला पाणी आले, ते आधणपाणीच होते. नरसिंहानी ईश्वरप्रार्थना
केली आणि पाऊस पडून ते पाणी योग्य तितके थंड झाले. कुवरबाईच्या आजेसासूला
(मामाकडच्या आहेराची) मामेरू ची यादी करायची नरसिहानी विनंती केली. नरसिंह व्याही,
अत्यंत धनाढ्य आहेत अशा समजुतीने की कल्पनेने, आजेसासुबाईंनी खूपच महागडी यादी
बनवली. प्रत्यक्ष भगवान आणि लक्ष्मी, दामोदर दोशी आणि त्यांची पत्नी बनून आले आणि
त्यांनी मामाकडचा आहेर (मामेरु) पुरा केला, असे नरसिंह म्हणतात. विवाहं काव्याप्रमाणे मामेरु
हे काव्यही, नरसिंहांनी उच्च प्रतिभेच्या आविष्काराने लिहिले आहे. आई वेगळ्या मुलीकडे
रिकाम्या हातानी नरसिंह गेले. त्या प्रसंगातली मनोवेदना एका मनोवेधक पदांत आहे. मामेरू
(मामाकडचा आहेर) पुरे केल्याची त्यांची पदे अद्भुतरसाने परिपूर्ण आहेत.
या ४ प्रसंगानंतरचा ५ वा प्रसंग, नरसिंहाच्या जीवनातला, भक्त म्हणून कठिण कसोटीचा
आहे. त्या काळात जुनागडला राजवीरा मांडलिक राजा होता.त्यांच्या दरबारात हा प्रसंग घडला.
ईश्वर भजनात भाग घेण्यासाठी नरसिंहाकडे अनेक स्त्री-पुरुष भक्तजन येत असत. नरसिंहाच्या
8 नरसी मेहता
वैष्णव नीतीचा द्रोह करणाऱ्या लोकांनी, नरसिंह वर्णधर्माचा भंग करणारा लंपटा आहे, अशी
नालस्ती दूरवर पसरवली. नरसिंहाची चहाडी थेट राजापर्यंत पोचली. परिणामस्वरूप राजाज्ञेने
नरसिंह पकडले गेले. या दामोदर भक्ताला अशी ताकीद दिली गेली की जर तू खरा आणि
प्रामाणिक वैष्णव असशील, तर तुझी इष्ट देवता प्रत्यक्ष येऊन तुला हार घालील. नंतरच तुझी
मुक्तता होईल. या प्रसंगी नरसिंहानी 'हारसभेना पद' म्हणून विख्यात असलेली पदे म्हटली
होती. यापूर्वीच्या चारी प्रसंगात आर्तभक्तीचा चैतन्यशील प्रवाह पाहायला मिळत नाही. या
पदावलीत मात्र त्याचे प्रमाण कमाल मर्यादेत आहे. अर्थात् हा प्रसंग तीव्र परीक्षेचा होताच.
रात्रभर त्यांनी भगवंताचे गुणगान केले आहे आणि प्रार्थनेचा प्रवाह वाहू लागला. अरुणोदय
झाला. आकाशांत मृगनक्षत्र (मार्गशीर्ष महिना असल्यामुळे) मावळायला आले. तोपर्यंत
नरसिंह भगवंताची गुणगानपर पदे गात होते. शेवटी भगवान केशवाने आपल्या गळ्यातला
हार काढून, नरसिंहाच्या गळ्यात घातला. नरसिंहानी मोठ्या समाधानाने या घटनेचे पद म्हटले
आहे.
पूर्वी स्पष्ट केल्यानुसार 'हारसमे' च्या पदांअखेर नमुद केलेला हा दिवस वि.स.१५१२
मार्गशिर्ष शुद्ध सप्तमी, रविवार (ता.१६-११-१४५५) हा होता. या प्रसंगापूर्वीच कन्या कुवरबाई
विधवा झाली होती. बहुदा नरसिंहाच्या मृत्यूनंतर, कीर्तनकारांनी हारसमे चा प्रसंग
व्यवस्थितपणे सविस्तर मांडला. राजवीरा मांडलाकच्या दरबारात, नरसिंह, वैष्णव संन्यासी
भीम आणि स्मार्त संन्यासी, यांच्यात संवाद आणि चर्चा झाली. हारसमें चा सुरवातीचा मोठा
भाग, निरूपणाने भरला आहे. त्यांत 'हारसमें' ची पदे, प्रसंगोपात् घेतली आहेत. 'हारमाळा'
मधे प्रथम ५० पदे होती. नंतर १०८ झाली. शेवटी शेवटी तर ही संख्या २५०, ३०० पदांपेक्षाही
वाढली. हा क्रम अनेक वर्ष चालला. नरसिंहांनी भिन्न भिन्न प्रसंगी जी जी पदे लिहिली, त्याचाही
समावेश, या वाढलेल्या 'हारमाळा' मधे केला गेला. गुजराथी भाषेचा उच्च प्रवचनकार
प्रेमानंदानी, या पदांचे संकलन केल्याचे सांगण्यात येते, परंतु अजूनपर्यंत तसा खात्रीदायक
पुरावा उपलब्ध नाही.
नंतरच्या प्रवचनकारांनी एका आदर्श भक्ताच्या पौराणिक कथांप्रमाणे, स्वतःच्या रचना,
स्वतंत्रपणे मांडून 'हुंडी आणि मामेरू' निरूपले आहे. गुजराथी साहित्याच्या इतिहासांत
नरसिंह हे असे एक भक्त झाले, की ज्यांचे 'नायक' म्हणून चित्रण करायचा प्रयत्न झाला.
नरसिंहाच्या जीवनात अनेक प्रसंग आले. त्यांत कवी प्रेमानंदानी, नरसिंहाच्या पित्याचे 'श्राद्ध'
म्हणून एक रचना करून भर टाकली. त्याचा आशय असा आहे. पत्नीच्या विनंतीनुसार, भोजन
सामुग्री आणायला नरसिंह बाजारात गेले. जवळच कुठेतरी भजन चालले होते. नरसिंह भजनात
रमले. घरी पत्नी वाट पाहात होती. भगवान नरसिंहाच्या रूपाने घरी आले आणि त्यांनी
जीवन चरित्र ९
वडिलांचे श्राद्ध सांगोपांग पार पाडले. रात्री नरसिंह भजन करीतच घरी आले, तेव्हा त्यांना सर्व
हकीगत समजली. हा प्रसंग नरसिहानी काव्यमय केला आहे. असे सिद्ध करणारे एकही पद
अजूनपर्यंत ज्ञात नाही. हे काव्य प्रेमानंदानी नरसिंहाच्या खाती रुजू केले, हेच शक्य वाटते.
नरसिंहाच्या जीवनातल्या घटना म्हणजे, लग्नानंतर भावजयीच्या कटू बोचण्यामुळे केलेला
गृहत्याग, आणि तपश्चर्या तळाजागावी पुनरागमन, शांतिमय जीवनासाठी, जुनागड मधील
नागर लोकांत निवास, तेथील जीवनातले त्यांनी काव्यमय केलेले प्रसंग - अपवाद फक्त
मांगरीलमधील झारीचा प्रसंग आणि शेवटची घटना, राजवीरा मांडलीक नी घेतलेली हाराची
कसोटी या होत. हे वर्ष वि.स.१५१२ (इ.स.१४५५) हे होय. यानंतर नरसिंहाचे जीवन कसे आणि
कुठे गेले हे जाणून घ्यायला आपल्यापाशी कोणतेही विश्वसनीय साधन नाही. नंतरच्या काळात
सुखसंग्राम आणि 'गोविंदगमन' नावाच्या रचना नरसिंहाच्या नावावर खपवल्या गेल्या.
त्यापैकी गोविंदगमन काव्यांत, अंगमां वळीया अने पणीयो (अंगावर सुरकुत्या आणि पांढरे
केस) अशी स्थिती झाली, तेव्हाचे हे काव्य आहे, असा निर्देश आहे. म्हणजेच वृद्धावस्थेत
नरसिंहानी हे काव्य लिहिले आहे हे सुचवले आहे. भगवंताचे गुणगान करायला नरसिंहाचा
निश्चय होता. म्हणून त्या स्थितीत (कुणी दुसऱ्याच माणसाने) हे भखियुं (भक्तीगान) लिहिले
असावे. कारण नरसिंहाच्या कालांतर नाहीच पण इतर कुठेही न दिसलेले हे भक्तिगीतांचे रूप
हे या काव्य रचनेत आहे. अर्थात् हे काव्य नरसिंहाचे असेल असा विश्वास वाटत नाही.
नरसिंहाच्या पुष्कळशा काव्य रचना आहेत, त्यावरून ते दीर्घकाल जगले असे मानतां येईल.
प्रश्न असा आहे की त्यांचा वृद्धापकाळ कुठे गेला असावा. इ.स.१४७० च्या, डिसेंबर ४
तारखेला (वि.स.१५२७) महंमद बेगडांच्या सैन्याने जुनागडचा किल्ला सर केला. एका
मतानुसार मांडलीक मारला गेला, अन्य मतानुसार पकडला गेला) प्रचलित मतानुसार, बेगडाची
प्रतिज्ञा (मांडलीक' ला जीवंत पकडायची) खोटी ठरू नये म्हणून, एका भलत्या माणसालाच
'मांडलीक' म्हणून अहमदाबादच्या सुलतानासमोर हजर केला. त्याला मुसलमान करण्यांत
आले. मृत्यूनंतर त्याची कबर, अहमदाबादमधील माणेक चौकाजवळ हलवायांच्या आळीत
बांधण्यात आली. जुनागडचे 'चुडासमा' चे राज्य महमंद बेगडाच्या सत्तेखाली आले, तोपर्यंत
नरसिंह बहुतांशी जीवित असावेत. मांगरोल (सोरठ) च्या समुद्रकिनाऱ्यावरील जुन्या
स्मशानाला नरसिंहांचे स्मशान म्हटले जाते. त्यामुळे असं दिसते, की मांडलीक च्या वाढत्या
उपद्रवामुळे नरसिंह पर्वतदासांकडे मांगरोलला (सोरठ) आले असावेत. नहसिंहांचे विशाल
साहित्या पाहून खात्री वाटते त्यांनी जुनागडपासून आरंभ केला आणि थेट मांगरोळ (सोरठ)
पर्यंत शक्य झाले तोंवर वेळोवेळी अनेक काव्यरचना केल्या. पर्वतदास उच्च कोटीचे भक्त
होते. नरसिंहाच्या सहवास आणि सत्संगाची परिणिती म्हणून की काय पर्वतदासांची पदे
उपलब्ध आहेत. काका पुतण्यांमधे ३० वर्षांचे अंतर होते. नरसिंहाच्या मृत्यूपर्यंत पर्वतदास
10 नरसी मेहता
जीवित नसणारच नरसिंहांच्या उत्तरआयुष्यात पर्वतदासांच्या मुलाने अगर मुलीने त्यांना
संभाळले असले पाहिजे.
नरसिंहांच्या साहित्यांत मराठी संत नामदेवाच्या नामा म्हणे या रचनेची 'भणे नरसैयो'
अशी छाप दिसते (अर्थात गीतगोविंदांत भणति जयदेवः अशी रचना आहे. आणि नरसिंहांनी
'गीतगोविंद' अभ्यासले होते. त्यांनी जयदेवाचा नामनिर्देश केला आहे, एवढेच नव्हे, तर
'गीतगोविंद' चे अनुकरण करून त्यांनी 'चातुरी' काव्य रचलेली आहे) नामदेवांच्या अभंगाची
छाया, नरसिंहाच्या 'झुलणा' च्या विपूल रचनांवर पडल्यासारखी वाटते. तसेच 'हारसमे' च्या
एका पदांच्या देवा, अहमची वार कां बधीर होईल- आपुला भक्त कां विसरी गेला' या ओळीत
मराठी छाप स्पष्ट दिसते. नरसैयाच्या स्वामी हाही शब्दप्रयोग नरसिंहांनी वारंवार केल्याचे
आढळते. (भीम, मंडळ, कर्मण वगैरे कवींनी नरसिंहानंतरही चा प्रयोग सुरु ठेवला होता) हे
सर्व लक्षात घेतले की वाटते की नरसिंहावर दक्षिणेतल्या वारकरी संप्रदायाची छाप पडली
होती. नरसिंहांनी जसा संस्कृत भाषेतील भागवतपुराण, गीतगोविंद, सारख्या ग्रंथांचा गाढ
अभ्यास केला, तसा नामदेव आणि समकालीन कबीर साहित्याचा पण अभ्यास केला. या
अभ्यासाच्या जोरावर, नरसिंहाच्या उज्ज्वल प्रतिभेने, उच्च दर्जाचे भक्ती साहित्य भगवान्
कृष्णांच्या लीला विषयक साहित्य आणि नामदेवांच्या 'सुदामचरित्राचे' अनुकरण करून
'सुदामानां प्रभातियो' वगैरे साहित्य निर्माण केले. नरसिंह केवळ कवी नव्हते ते उच्च कोटीचे
भक्तही होते. म्हणूनच 'भक्त माळे' मधे, नाभाजीनी यांच्या चरित्राचा समावेश केला. यांची पदे
माधुर्यनि ओतप्रोत भरलेली आहेत. पुष्टिमार्गीय मंदीरात, वज्रभाषीय कवींची पर्दे-कीर्तने
गायली जातात, त्यांच्यासमवेत नरसिंहाची लीलाचरित्रांत समावेश करण्याजोगी पदे, जुन्या
काळापासून गायली आणि लिहिली जात आहेत. वल्लभचार्य महाप्रभू आणि त्यांचे चिरंजीव,
विठ्ठलनाथ गुसाईंजी या दोघांनी गुजराथ सौराष्ट्रात पुष्टिमार्गाचा (भक्तिमार्गाचा) प्रसार केला.
प्रत्यक्ष पर्वतदासांचे वंशज या मार्गाचे अनुयायी झाले. आणि त्यांनी 'वैष्णव' हे आडनाव घेतले.
नरसिंहाच्या भक्ती-साहित्यानें , वैष्णव भक्तीमार्गाला यापूर्वीच चैतन्य दिले होते. ते तर गुजराथ
सौराष्ट्रातले भक्तीमार्गाचे पुरस्कर्तेच होते. नरसिंहांनी उत्साहाला उधाण येईल, अशी हजारों पदे
लिहिली आणि ती पदे काव्यरस शास्त्राच्या सिद्धांतानुसार होती. गुजराथी भाषेत साहित्य
निर्माण करणाऱ्यांमध्ये नरसिंहाचे आद्य स्थान आहे. यामुळेच गुजराथी साहित्याच्या इतिहासात
त्यांना आद्यकवी म्हटले आहे. अलिकडे गुजराथ म्हणजे जुनी गुजराथी भाषा किंवा मध्यकालीन
गुजराथी भाषासाहित्य भरपूर प्रमाणात उपलब्ध झाले आहे. त्यापैकी काही प्रसिद्धही झाले
आहे. तरीपण आदिकवी नरसिंहाना 'आदिकवी' म्हणून अमान्य करण्याजोगा एकही पुरावा
उपलब्ध नाही.
२ साहित्य साधनेच्या मार्गात
वयाच्या १८ व्या वर्षी नरसिंह जुनागडला राहायला आले. अर्थात् तळाजांतच त्यांना
अभ्यासाची संधी मिळाली असणार. अध्यापन कार्य करणाऱ्या पंड्या कुटुंबातील असल्यामुळे,
नरसिंहांनी वडिलांपाशी अगर तळाजांतील कुणा विद्वानाशी संस्कृतचा अभ्यास केला असला
पाहिजे. त्यांची ‘रास सहस्र पदी’ची कवने पाहिली की खात्री वाटते, नरसिंहांनी भागवत
पुराणाच्या दशमस्कंधाचा चांगलाच अभ्यास केला असला पाहिजे. अनेक ठिकाणी मूळ शब्द
जसेच्या तसे ठेवून त्यांनी स्वतःच्या शब्दांत भावदर्शन केलेले आढळते. वडनगरहून आलेल्या
दीक्षितांच्या तोंडी त्यांनी खालील काव्य घातले आहे.-
हा भाग ‘विवाह’ काव्यातला आहे.
भक्तमहिमा कह्यो, भागवतमां लह्यो
पुराण, गीता सुणी वेदवाणी -
विष्णुनां भक्ता ते अमळ होये सदा,
संग किये थाय, शुद्ध प्राणी ( आ.च. काव्य पृ.६८)
(भक्त महिमा सांगितला गेला. भागवतांत लिहिला गेला. पुराण, गीता, वेदवाणीत ऐकला.
विष्णूभक्त नेहमीच शुद्ध असतात. त्याच्या संगतीने प्राणी शुद्ध होतो.) वरील काव्यपंक्ती वाचून
खात्री पटते की भागवतपुराण ‘अन्य पुराणे’ तसेच वेदांबाबत नरसिंहांचे ज्ञान परिपूर्ण होते.
नागर ब्राह्मणात, आपली वेदसंहिता तोंडपाठ करण्याची प्रथा जुन्या काळापासून प्रचलित होती.
त्याशिवाय संस्कृत पाठ्यपुस्तकांचा अभ्यास तसेच आवडीनुसार आणि गरजेनुसार पुराणादी
ग्रंथांचा अभ्यास केला जात असावा, असे दिसते. शुकदेवानी आणि गीतगोविंदकार जयदेवानी
भगवान कृष्णांच्या शृंगार लीलेची मजा अनुभवली होती, हे नरसिंह सांगतात । सारमा सार
शणगार-रस कीधोला, ते जाणी थई पुरव मोडे ऐ रस शुक देव चाखियो, नाथ लखणी हाथ
ओडे (नरसी मेहताना पद पृ २०५ )
(शृंगार रस सर्वात महत्त्वाचा (रसराज) मानला जातो. त्यांची जाणीव झाली म्हणजे शरम
12 नरसी मेहता
वाटते. हा रस लक्ष्मीवराच्या (कृष्णाच्या) आड राहून, शुकदेव, जयदेवांनी चाखला.
टीप - भगवतात जयदेवांनी शृंगार वर्णन केले. जयदेवांनी 'गीत गोविदात' शृंगार वर्णन
केले. शृंगर आणि त्याचा रसा स्वाद कृष्णाचे निमित्त करून घेतला.
दुसऱ्या ठिकाणी-
ए रस जाणे डावरलो रे जोगी, केवली मुनीवर जाणे रे
शुकसनकादीक नारद जाणे, जेहने वेद वखाने रे
के रस जाणे रे व्रजनी गोपी, के जैदेवे पीधो रे
उगरतो रस हलतो हुतो नारसिंह ए झोंटीने लिधोरे ।
न. न. पद पृ.५०
(क्वचित् एखादा जोगी आणि केवळ मुनी हा रस जाणतात. ज्यांची वेद स्तुती करतात, ते
शुकसनकादिक आणि नारदमुनी जाणतात, जो रस व्रज गोपींनी जाणला जो जयदेव -प्यायले
तो उतु जाऊन वाहात होता, तो नरसिंहानी हिसकावून घेतला.)
नरसिंहाची 'गीतगोविंद' शीही जवळीक -
त्वमसि शृंगार मम हार उरभूषणा
त्वमसि मम् मग्न चित संग दोले
न. म. पद पृ १०
(हे शृंगारा, तूं माझा हृदय-भूषण हार आहेस. माझ्या तल्लीन मनांत, मनोभावना बरोबर
(डोलणारा, तूं आहेस )
आणि 'राससहस्रपदी' च्या एका 'पदांत धीरसमीरे, जमनातीरे त्रिविधा तनना ताप शमे'
(धीरगंभीर पवनांकित यमुनातीरी, तीन प्रकारचा शरीर ताप शमतो) नरसिंह 'गीतगोविंद'
मधील शब्द जसेच्या तसेच उचलीत आहेत-
अहेतुकपणाने केवळ संबंध आल्यामुळे नरसिंहाला मराठीचे जे ज्ञान झाले त्याचा त्यांना
उपयोग करावासा वाटला. झुलणांच्या शेकडो ओव्यांमागे, नामदेवांच्या अभंगांचे अनुकरण
स्पष्ट आहे.
त्यांच्या प्रकाशित साहित्याचा अभ्यास करताना त्यांच्या विशाल साहित्यसेवेची कल्पना
येते. यांच्या रचना मुख्यतः चार विभागात विभागतां येतात.
१) आत्मचरित्रपर रचना २) व कथा वर्णन काव्य
३) ज्ञान भक्ती निरूपण तशी उपदेशात्मक पदे, आणि ४) उत्कट भावनापूर्ण रसप्रचुर
साहित्य साधनेच्या मार्गात 13
भावगीतें - भावगीतात नरसिंहांनी आत्मकेंद्री भावगीते तशीच चातुरीओ ( चातुर्यपूर्ण)
भावगीतांचा समावेश केला आहे.
१) आत्मचरित्र पर रचना
पूर्वी नमूद केल्याप्रमाणे खालील आत्मचरित्रपर रचना मूळ स्वरूपात उपलब्ध आहेत.
१) विवाह २) मामेरू ३) झारी ४) हुंडी आणि ५) हार - या ५ रचनांतून नरसिंहाचे व्यक्त झालेले
चरित्र पूर्वी सांगितले आहेच. वर्णनात्मक रचनांतून दोन गोष्टींचा स्पष्ट आविष्कार होतो. अ)
त्यांची आर्तभक्ती आणि आ) कवी प्रतिभा
अ) आर्तभक्ती
'झारी' रचना वगळून बाकीच्या चारी रचनांत नरसिंहावर आलेल्या प्रत्येक संकटांत,
प्रभूच्या साहाय्यासाठी केलेली आर्तयाचना आहे त्याची कमीजास्त प्रमाणांतली व्याकुळता,
स्पष्ट दिसते. विवाह काव्यांत ज्यावेळी ते असं म्हणतात.
'कष्ट पडे तिहां साहा थाओ तप्यो'
गाउ जस ताहरा मधुरी वाणी - शी-६
(कष्ट पडतील, तेव्हा मदतरूप व्हा, मधुर वाणीने मी तुमचा जयजयकार करीन ) तेव्हां
त्यांचा मुख्य उद्देश, मधुर वाणीने भगवंताचे गुणगान करण्याचा आहे. त्यांचे संकटसमयी प्रभुने
कष्ट दूर करावे, हे सुचवणे, म्हणजे केवळ निमित्त आहे. एका गोष्टीची त्यांना पक्की खात्री आहे.
“करमना भाग तो भोगव्ये छुटको, निपजे सर्व जे होय भावी” (कर्मभोग, भोगुनच सुटका होते
भविष्यात असेल ते होते ) म्हणूनच यापूर्वी त्यांनी म्हटले होते - “हरिरस गावा ने जे मळे खाना
ने हरिइच्छा मने संतोष ल्यावी” ( हरिभजन करावे, आणि मिळेल ते खावे, हरिइच्छा मला संतोष
देते)
नरसिंहाना स्वतःला कांहीच नको होते. मात्र सुरुवातीच्या निरनिराळ्या प्रसंगात आणि
अचानक आलेल्या नैमित्तिक संकटात, प्रभूने आपल्याला निभावून न्यावे. एवढीच इच्छा त्यांनी
व्यक्त केली आहे. ते प्रभूचे परम भक्त होते म्हणून कोणत्याही आपत्तीत “पुरशे मनोरथ कृष्ण
कामी” ( ईश्वर मनोरथ पुर्ण करील ) अशी त्यांची खात्री होती. म्हणुनच
“आपणु घर ते आद्य मोटु सदा,
निर्धन विहिवा ते केम थाशे ?”
(आपले घर प्रथमपासुनच मोठे आहे, इथले लग्नकार्य थाटामाटांत कसे होणार नाही ?)
माणेक महेताच्या प्रश्नाला त्यांनी वरील उत्तर दिले- आणि लगेच
“ ध्यान धर कृष्णनु राख मन प्रसन्न तुं-
साहा थशे, नरसैया च्या स्वामी ”
14 नरसी मेहता
(कृष्णाचे ध्यान कर, मन प्रसन्न ठेव- नरसिंहाचा स्वामी साहाय्य देईल) अशा प्रकारची
खात्री पटवली- पुढे लग्नपत्रिका आल्यावर माणेक महेता म्हणते घर मांहे हुँ कोई नथी देखती
(घरात मला कांहीच दिसत नाही) तेव्हा नरसिंह हे स्पष्ट करतात-
शेठ छे सामलो, सर्वथी छे भलो
राख विश्वास ते देशे आणि
नरसियो नागर तिहां रंक छे बापडो
करशे संभाळ पोतांनो जाणी -
(सावळा शेठ आहे, सर्वांपेक्षा मोठा आहे. तो सारे आणून देईल, असा विश्वास ठेव. त्याचा
नरसिंह नागर बिचारा गरीब आहे. हे ओळखून तो आपुलकीने, त्याचा सांभाळ करील) विवाह
काव्याच्या १९ साव्या पदापासून नरसिंह विनवणी सुरू करतात. आणि द्वारकेच्या यात्रेला
निघून जातात. तिथेही विनवणी सुरु आहेच.
भक्त तमारो ने तग्यो छो भक्तना
भक्तविना परपंच खोटो -
भक्त नरसैयांनी भीड भांगो जई
नागरी ज्ञातनो थाय मोटो पृ.५
(भक्त तुमचा आणि तुम्ही आहात भक्ताचे. भक्ताशिवाय ईश्वराचा संसार खरा नाही. भक्त
नरसिंहाचे संकट दूर होईल, तेव्हाच तो नागर जातीत मान्यवर होईल.)
या विनवणीची तीव्रता २७ साव्या पदांत वाढलेली वाटते.
मित्र तु माधवा कंथ-राहीवरां तु बिना कृष्णजी केने जाचु ?
करमच्या भोग ते भोगव्ये छुटका एक निश्चे तारी भक्ती सांचु
(माधवा तू मित्र आहेस, रुक्मीणीचा नाथ आहेस. तुला सोडून कृष्णा, कुणाला शिणवूं ?
कर्मभोग भोगुनच मुक्ती होते. एकाग्रतेने तुझी भक्ती करणे, हेच (जीवनाचे) सार आहे)
हे खरे आहे की विवाह काव्यांत नरसिंहाची आर्त उत्कंठा तितकीशी अनुभवास येत नाही.
'मामेरा' मधे तिचा थोडासा अनुभव येतो. कुंवरबाईच्या आजेसासुने 'आंदणा' ची लांबलचक
यादी, सासरच्या देणग्यांनी भरलेल्या थाळींत ठेवली, तेव्हापासून नरसिंहाची आर्त विनवणी
सुरु झाली. १४ व्या पदापासून १८ व्या पदापर्यंत, काकूळती व्यक्त होत आहे. १७ व्या पदात
नरसिंह प्रभूला विनवणी करीत आहेत.
१) वार यै, विठ्ठला व्हारे वेगे चडो, रखे नागरी नातमां हांसी थाये,
आगे भक्त तम्यो अनेक ओधारिया, तमने तजी नाथजी केने धाये
साहित्य साधनेच्या मार्गात १५
२) भक्त प्रहलादने कारणे कृष्णजी, वास पुरयो तमे काष्ठ माहे,
भक्त उगारियो असुरने मारियो, भक्तवच्छल-बिरद वेद गायो.
३) दौपदि कारणे धाया 'हरि' पसमसी, पूरियां चीर अनेक जाते
राखिये लाज ए कार्य छे तम तणुं, येलपण नाणशो आणि वाते.
४) कुंवर बाईना कोड तो पूरजो, जगत माहे जस तारो थाशे
नरसियाच्या स्वामी आज आवो न तो आद्य नी अंतनी लाण जशे
या वेळी विठ्ठला लौकर मदतीला धावा कदाचित नागर जातीत
१) माझें हसें होईल. यापूर्वी अनेक भक्तांना तूं संकटमुक्त केले आहेस. तुला सोडून मी
कुणाचे ध्यान करूं ?
२) हे कृष्णा, भक्त प्रल्हादासाठी तूं खांभात (लाकडांच्या) अवतरलास. भक्ताला सोडवलंस,
राक्षसाला मारलंस. तुझे 'भक्त वत्सल ब्रीद' आहे असे वेद म्हणतात.
३) द्रौपदीसाठी तूं लगबगीने धावलास, आणि तिला अनेक प्रकारची वस्त्रे पुरवलीस.
माझी लाज राख हे कार्य तुझे आहे (तुझ्या भरवशावर आहे) सर्व काही ठीक झाले पाहिजे.
४) कुंवरबाईचे लाड तूं पुरव. नरसिंहाच्या स्वामी, आज ये, नाहीतर प्रथमपासून शेवटपर्यंत
फजिती होईल.
या प्रसंगी राधेने कृष्णाला अडवू नये म्हणून नरसिंह तिची पण प्रार्थना करतात. नागर
असल्यामुळे एक युक्ती पण आजमावत आहेत. जसे
" भणे नरसैंयो मेल मम नायने
निकवशे कादव कोने धोतां "
(माझ्या नाथाला (कृष्णाला) पाठवून दे, नरसिंह म्हणतात, घर धुवायला घेतले की चिखल
निघतो )
नरसिंहाचा स्पष्ट आशय असा की राधेने कृष्णाबरोबर नानातऱ्हेचे विलास केले आहेत.
नरसिंह ते सारे गौप्य, उघड्या वर आणतोय. !
हुंडी च्या ४ थ्या पदांत आपण 'हुंडी' लिहून देण्याचे साहस केले - त्याचे वर्णन करताना
म्हणतात -
“न काळजो वणज में कीधो छे वीठला,
राखशो शरम्, तो लाज रहेशे
जो हुंडी पाछी फरीने आवशे
16 नाना फडणीस
'भक्त वत्सल' तुने कोण कहेशे ?
(विठ्ठला, मी हा धंदा केला आहे तूं दुर्लक्ष करू नकोस. मी ते केले आहे. माझी लाज तूं
राखलीस, तर अब्रू राहील, हुंडी (वटवली न गेल्यामुळे) परत आली, तर तुला 'भक्तवत्सल'
कोण म्हणेल ?
यापुढे जाऊन श्रीकृष्णाला आणि लक्ष्मीला पण ते विनवतात -
जाग कमलापती हजी का सुई रह्यो ?
सेज रामातणी आज भावी ?
वार लागे घणी, लाज जाये हरि,
पछे शुं कृष्णाजी, करशो आवी ?
मेल मग नाथने, न भर तुं बाथने
का रे कमला, तुने लाज ना' वे ?
दासनी हास थशे, लाज तारी जशे
पछी तुने व्हालाजी, कोण ध्याशे ?
(उठ कमलापती, अजून झोपला आहेस ? आज लक्ष्मीची शय्या एवढी आवडली ?
उशीर होत आहे, हरि माझी बेअब्रू होईल नंतर येऊन कृष्णा काय करशील ?)
कमले माझ्या कृष्णाला पाठव. त्यात मिठी मारूं नको. अग कमला, तुला लाज वाटत नाही
कां ? भक्ताचे हसं झाल तर तुझी नाचक्की होईल आणि तसें झालें तर तुझे ध्यान कोण
करील ?)
या ३ ही काव्यात आर्तभक्तीची आत्यंतिक उत्कटता अनुभवास येत नाही. पण 'हारसमे'
ची पदे वाचतांना आर्तभक्तीची उत्कटता उत्तरोत्तर वाढत असल्याचा अनुभव येतो. या
काव्याच्या मंगलाचरणाच्या पहिल्या पदातच आर्ततेचें चिन्ह दिसते.
प्रणमुं प्रेमे परब्रम्ह पुरुषोत्तमने
दासनी वीनती, हृदे धरजो
आज समे प्रभु मुंने आकरो आवियो
निज चरण-शरण संभाळ करजो-
(परब्रम्ह पुरुषोत्तमाला मी प्रेमाने प्रणाम करतो. दासाची विनंती मान्य कर. प्रभू आज
माझ्यावर मोठे संकट आले आहे. मी तुझ्या चरणाशी, शरण आहे. माझा सांभाळ कर) इथे
'आकरो समे' या शब्दांत आर्तता दिसते. नरसिंह तेजस्वी नागर जातीचे आहेत म्हणून वस्ताद
आहेत. कारणे अजमवण्यात आणि युक्त्या योजण्यांत ते कुशल आहेत. यापूर्वी 'मामेरा'
साहित्य साधनेच्या मार्गात 17
‘पदांत’ ‘निकळशे कादव कोठी धोता’ ही उक्ती, एक युक्ती प्रयोगच आहे. इथे
जो माहारां कर्मने भाणवेश, भूधरा-
पतितपावन तारा बिरद जशे
छांडवा तोहे, केम छुटशो सामळा ?
छोडेशो जो, उपहास थाशे “
( हे भूधरा, माझ्या कर्मावरच मला तू सोडवशील, तर तुझे पतितपावन हे ब्रीद (ध्येय)
राहणार नाही. तुला सोडून द्यायचे म्हटल, तरी तूं, श्याम, सुटशील कसा ? आणि तूं मला
सोडलंस तर तुझा उपहास होईल.) नरसिंहाचा आणि प्रभूचा दोघांचाही उपहास होईल, हे इथे
सुचवले आहे. आता प्रभूला सावधानं करण्याचा यांचा प्रयत्न पहा. “ देवा, अमची वार का
बधीर होईल ? ” आपुला भक्त कां विसरी गेला ?
ध्रु प्रह्लाद, अमरिख, विभीषण,
नामा- चें हाथ तें दूध पिउन
म्लेंच्छ जन मांटे ते कबीरनो उधर्यो,
नामाच्यां छापरां आप्यां छाणी-
जे-देवने पद्मावती आपी-मुंबे नागरो माटे रखे गेलो काही (देवा, यावेळी काय तूं बहिरा
झाला आहेस का ? आपल्या भक्ताला कां विसरलास ? ध्रुव, प्रल्हाद अमरीश, विभीषण (हे
तुझे भक्त आहेत) नाम्याच्या हाताने तर तू दूध प्यायला होतास. म्लेच्छ जातीसाठी तूं कबीराचा
उद्धार केलास. नामदेवांची कौले तूं चाळून दिलींस. जयदेवाला तूं पद्मावती दिलीस. मला या
नागराला मात्र कदाचित् रखडत ठेवशील ) स्वतः नरसिंह नागर आहेत. नागर जात कुशल
आणि व्यावहारिक असने. म्हणून प्रत्येक प्रसंगाला नरसिंह पुरून उरतील, असे मानून, स्वस्थ
न राहायची विनंती नरसिंह करीत आहेत.
'कहेशे गुण गातां नागरनो नव ह्यो,
भीकमा, तूने को नहि आराधे
(तुझे गुणगान गाणाऱ्या नागराचा (नरसिंहाचा) तूं झाला नाहीस. कृष्णा तुझी कोणी प्रार्थना
करणार नाही) आणि गोड अशी धमकी देत आहेत आणि तक्रार पण करताहे
पहा- विवचारां शी प्रीतडी, जे स्त्री रंग रातो ? -१
मंडलिक हारने परिभवे तूं रे मदमाते
कामी ध्यो रे केशवा, मूं ने परिभवे पापी
लोभी छो लक्ष्मीवरा, पूतना संतापी -२
18 नरसी मेहता
(जो स्त्री लंपट आहे, त्या व्यभिचाऱ्याचे प्रेम कसले ?
मंडलीक राजाला हार प्रकरण अनादरणीय आहे आणि तू उन्मत्त अभिमानी आहेस तू
आरक्त आहेस केशवा तूं आमान्यतेची भावना ठेवतोस, मी पापी ठरेन तूं लक्ष्मीवरा, लोभी
आहेस, पूतनाला दूखवणाऱ्यापुढे नरसिंह कडवट पण होताहेत-
सार कर सामळा, मेल मन- आंबळा
उठ गोपालराय, असूर थाये
नरंसियाने रे एक हार आपतां
ताहरा बापनुं शु रे जाय ?
(हे श्याम आतां मनातला अभिमान सोडून सगळं ठीक कर. उठ, उशीर होतो आहे - अरे,
नरसिंहाला एक हार देताना, तुझ्या बापाचे काय जाते आहे.)
अहो, टोमणे मारायलाही नरसिंह भीड बाळगत नाहीत-
आप रे हार, सुत नंद वसुदेवना
कंसना भे थकी, नासी गोकूल गयो
आ हीरा-शुं रह्यो प्रीत जोडी-१
हत्या गरजमाटे माय-बाप ते वे करयां
इंद्र-भव-अमर-मुनि- रखी जोतां
कंसनो वध करये, काज तारुं सरयुं
बापडा मुक्या ते वन रोतां -२
(नंद वसुदेवांच्या पुत्रा, देना हार. कंसाच्या भीतीने गोकूळांत पळून गेलास, या हिऱ्यावर
हारावर काय प्रेम करीत राहात आहेस ? ) अरे ए, गरजेपायी दोन दोन आई बाप केलेस तू.
इंद्र, सारे जग, देव मुनीची इच्छा पाहून तूं कंसाला मारलसं. तुझ काम संपले आणि तूं बिचाऱ्यांना
वनांत रडत ठेवलस (गोकूळवासियांनां ) आणि पुढे -
आप ने हार, कपटी तू कहानुवडा
आ गोकुळमा कपट घणां रे कीधो.
व्रजनी वनिता-शुं प्रीत जोडी करी
ते रे आहिएडांना दाण लीधा -१
कपट करीने दही दूध ते चोरियां
सुर असुर मुनी सर्वे रे जोतां
कपट करीने रंगे रास समाडियां
साहित्य साधनेच्या मार्गात 19
पछी बापडा मुक्यां वन रोतां - २
पहले प्रीत करी तहिये कपटी न जाणियो
हवे शुं कहुं तने अवर वाणी ?
भणे नरंसियो कर जोडिने विनवुं
राख ने लाज, सारंगपाणी - ३
१ (अरे कपटी कन्हैया, देवा आतां हार- गोकुळात भरपूर कपट केलेस . वज्रवासी गोपीवर
काय प्रेम केलेस, आणि नंतर गवळ्याकडून- गोपगोपीकडून- तुझी वसुली (दान) वसूल
केलीस.
२ (कपट करून तूं दही दूध चोरलेस. देव दानव पाहात होते. कपट करून रास क्रीडा
खेळलास- आणि नंतर बिचाऱ्याना रडत ठेवलंस वनांत.
३ (तूं कपटी आहेस, हे त्यानी न ओळखतां, तुझ्यावर प्रेम केलें आता तुला काही सांगून,
वाणी कशाला विटाळू ?) नरसिंह म्हणतात, हात जोडून विनवतो, हे शारंगपाणी, माझी लाज
राख
४४ सावे पद असेच टोमण्यांनी भरलेले आहे. त्याची दोन कडवी -
'को कहशे, महारां उनो महाबलतो कुजात रे'
धुतारो निरधारा जाणो, तेह तो तरजात रे-१
लंड लंपट चाडियो, सगळे पाडतो शोर रे
गोकुळ मांहे घणुं रहेतो, नवनीत कोरो चोर रे-२
१ (कोणी म्हणेल, हा (कृष्ण) कुणी मोठ्या रांडेचा पुत्र (अवैध) आहे. हीन जातीचा
कुविख्यात आहे. हा निश्चित तिरस्करणीय आहे. त्याची जातच वाईट आहे.
२ सगळ्यांची ओरड आहे, हा कृष्ण, स्त्रीलंपट, चहाडखोर आहे. गोकुळांत खूप राहिला.
तिथे लोण्याची चोरी करीत होता.
या पूर्वीच्या पदांत आता शिवी देणार नाही असे सांगून हार देऊन टाकायची विनंती करीत
आहेत. जे त्यांनीं या अगोदर म्हटले आहे.
१.“ भांगो भोगळ, भांगो भोगळ, भांगो भोगळ, रागणिणारे
घेला, घेलाई मुको, मारा व्हाला, गायोना चारण गोपालीयो रे "
२. आहिरने आवडो शो मचको ? आपो मोगरडानी माळा रे
खटको चितमां शेनो पेठो ? जे अटको मारा व्हाला रे ।