भक्त नरसिंह मेहता: जीवन एवं पद (वैष्णव जन तो तेने कहिये - गुजराती से हिन्दी रूपान्तरण)
Bhakta Narsi Mehta: Jeevan Aur Pad
भक्त नरसिंह मेहता (सम्पादक: रामचन्द्र तिवारी) द्वारा
पृष्ठ 6, कुल 99 में से
संदर्भ में पढ़ें4 नरसी मेहता
आहे. नरसिंह असेही म्हणतात की श्रीकृष्णांनी त्याच्या हातांत एक फूल ठेवले ‘साचु सुपन मे
दृष्ट देख्युं’ (सत्य स्वप्न मी स्पष्ट पाहिले) असा निर्वाळा नरसिंह देतात. भगवान शंकराचे
वरदान आणि श्रीकृष्णांची कृपा प्राप्त करून तळाजा गांवीं गेले आणि भाऊ-भावजयीला भेटले.
भाऊभावजयीकडून त्यांना थोडा मान मिळाला. आता त्यांच्याकडे गावागावांतून आणि
दूरदूरच्या ठिकाणांहूनही संतमंडळी आणि भक्तमंडळी येऊ लागली होती. अशा परिस्थितींत
भाऊ भावजयीवर भार टाकणे, नरसिंहाना योग्य वाटले नाही. जुनागडला, नागरांच्या वस्तीत
एक छोटेसे घर भाड्याने घेऊन नरसिंह पत्नीसह राहूं लागले. तिथेच पुत्र सामळदासाचा जन्म
झाला, आणि पुढील वर्षाच कन्या कुंवरबाई जन्माला आली.
पुत्राचे लग्न वि.स. १४९६ (इ.स.१४४०) मधें झाले. तोंपर्यंतची १२ वर्षे नरसिंहानी काही
कामधंदा करून काढली की फक्त भजनकीर्तनांत घालवली हे खात्रीपूर्वक सांगायला काही
पुरावा नाही. अशी शक्यता वाटते, की उदरनिर्वाहासाठी अर्थार्जन करीत असतांनाच
भजनकीर्तनांत आणि नवीननवीन पद्यरचना करीत ते आपला काळ घालवीत असावेत. या
१२ वर्षांच्या काळात नरसिंह नागर ब्राह्मणांच्या टीका टिंगलीचे विषय बनले होते. नरसिंहाच्या
‘विवाह’ काव्यात हे स्पष्ट करणारी एक घटना आहे. मदन महंतांचे दिक्षित गोरमदन वडनगरहून
मदन महंतांच्या ‘रतन’ नावाच्या मुलीसाठी वरसंशोधनार्थ जुनागडला आले. त्यांना कोणतांच
सुयोग्य मुलगा, जातिबांधवात आढळला नाही. निराश होऊन ते परत जात असतां टिंगलखोर
नागरांनी गोरमदन दीक्षिताना नरसिंहाचे घर दाखविले. नरसिंह टीकाटिंगलीचे विषय कां झाले,
याचे नीटसें स्पष्टीकरण नरसिंहांनी, दिलेले नाही. मात्र नरसिंहाची छाप असलेल्या एका पदांत
एका घटनेचा उल्लेख आहे. गिरनारच्या पायथ्याशी असलेल्या ‘दामोदर’ कुंडांत स्नान
करण्याचा, नरसिंहाचा परिपाठ होता. तिथे एकदां, अस्पृश्य जातीच्या एका नामांकित भक्तांने
नरसिंहाचे चरण धरले. त्याने विनंती केली ‘आमच्या अंगणात आपण कीर्तन करावे.’
नरसिंहाला त्या हरिभक्ताची करुणा आली. त्यांनी सांगितले, जमीन गोमूत्राने स्वच्छ करा, आणि
तुळशीचे रोप लावून ठेवा. रात्री नरसिंह तिथे गेले. रात्रभर तिथे त्यानी उत्सव आणि भजनकीर्तन
केले. बरोबर नेलेला भगवत् प्रसाद सर्वांना वाटला. पहाटे नरसिंह ईश्वर भजन करीत जेव्हा
आले, तेव्हा नागरब्राह्मण, टाळ्यांच्या तालांत ‘ब्राह्मण पुत्राच्या भगवत् वेडाची’ मस्करी करूं
लागले. नरसिंहांनी मुकपणे सारे सहन केले. सकाळी लोक जागे झाले. त्यांना पण नरसिंहांच्या
विवेकहीन - म्हणजे ब्राह्मणाने अस्पृश्यांच्या घरी जाणे, अशा वर्तनाचा तिरस्कार वाटला.
नरसिंहांनी ‘जिथे वैष्णव, तिथे मी’ अशा शब्दांत आपल्या वर्तनाची तरफदारी केली. आपल्या
वर्तनाला ‘वैष्णव’ हाच आधार त्यांनी घेतला. हे अनुसंधान घेऊन त्यांनी खालील पद रचले.’
एवा रे अमो एवा रे एवा, तमे कहो छो वली तेवा रे- भक्ति करतां जो भ्रष्ट कहेशो तो करशुं