सामग्री पर जाएँ
सर्वकोश
भक्त नरसिंह मेहता: जीवन एवं पद (वैष्णव जन तो तेने कहिये - गुजराती से हिन्दी रूपान्तरण)

भक्त नरसिंह मेहता: जीवन एवं पद (वैष्णव जन तो तेने कहिये - गुजराती से हिन्दी रूपान्तरण)

Bhakta Narsi Mehta: Jeevan Aur Pad

भक्त नरसिंह मेहता (सम्पादक: रामचन्द्र तिवारी) द्वारा

DevanagariHindipublished99 पृष्ठ

पृष्ठ 5, कुल 99 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 5

जीवन चरित्र [right-aligned: ३]

आहे. म्हणूनच वि.स.१५१२, मार्गशिर्ष शुद्ध सप्तमी आणि रविवार (१५-११-१४५५) हा
दिवस (काव्यांचा काळ म्हणून) नक्की होऊ शकतो. 'हारसमे' च्या पदांत मुलीला द्यायचे
मामाकडचे आंदण परमेश्वरानेच दिले, आणि मुलाच्या विवाहपदांत मामेरू पुढे पुरे करायचे
आहे असा निर्देश आहे विवाह, मामेरू आणि हार हे तीन प्रसंग नरसिंहाचे जन्मवर्ष नक्की
करण्यात मदत करतात. नरसिंहाच्या मुलाचा लग्नाचा दिवस, वैशाख शुद्ध पंचमी, गुरुवार,
आहे. महिना, पंधरवडा तिथी आणि वार, यांच्या उल्लेखांवरून, गणितदृष्ट्या हे वर्ष वि.
स.१४९४ म्हणजे ता. ७-४-१४४० तंतोतंत बरोबर ठरते. मुलगा लग्नात १२ वर्षांचा होता,
म्हणजे त्याचा जन्म वि.स. १४८४ (इ.स.१४२८) चा असला पाहिजे. नरसिंहाचा गृहत्यागाचा
दिवस चैत्र शुद्ध सप्तमी सोमवार, म्हटला आहे. तिथी दृष्ट्या हे वर्ष वि.स.१४८४
(२३-३-१४२८) ठरते. नरसिंहाच्या संतानांमध्ये मुलगा मोठा की मुलगी हे सांगणे कठीण
आहे. विवाहनिमित्त केलेल्या पदरचनांमध्ये मुलाचा निर्देश प्रथम आहे. पुत्रजन्माच्या वेळी
नरसिंहाचे वय १८ वर्षे स्वीकारले तर त्यांचे जन्मवर्ष वि.स. १४६६ (इ.स.१४१०) ठरते. हे
अनुमान, आजवर स्वीकारलेल्या त्यांच्या जन्मवर्षाच्या (वि.स.१४६९) आसपासचेच आहे.
शिवाय त्यांच्या आत्मचरित्रपर पदांत दर्शविलेल्या काळाच्या संदर्भात निश्चितपणा देणारे
आहे.
नरसिंहाच्या जीवनातील बदल घडवून आणणारा प्रथम प्रसंग गृहत्याग आणि शंकराची
आराधना होय. लग्न होऊन गेले होते. आणि भाऊ भावजयी समवेत काळ चालला होता.
त्यांच्यावर जबाबदारी पडू नये म्हणून नरसिंह काहीतरी कामधंदा करीत होतेच. एके दिवशी
संध्याकाळी दिवसभर करून थकून भागून नरसिंह घरी आले. भावजयी त्यांनी पाणी मागि
तले. भावजयीने पाणी तर दिले नाहीच, उलट मनाला लागतील असे, खोचक बोचक टोमणे
मारले. नरसिंहाना हे सारे खोल जखमेप्रमाणे बोचले. त्यांच्या मनात आले, सावत्र आईच्या कटू
बोलण्यामुळे ध्रुवबाळ वनात निघून गेला. तपश्चर्या करून त्याने सिध्दी प्राप्त केल्या - मी पण
हे घर सोडून जायला हवे - नरसिंहाना चीड आली. गृहत्याग करून ते अरण्यातल्या एका उजाड
शिवालयांत पोचले. सात दिवस उपाशी राहून त्यांनी घोर तपश्चर्या केली. आपल्या काव्यमय
वाणीत ते म्हणतात. “त्यानुसार सात दिवसानंतर भगवान शंकर प्रसन्न झाले. नरसिंहाना 'वर'
मागायला सांगितल्यावर आपल्याला जे प्रिय तेच मला वरदान द्या" असे नरसिंह म्हणाले.
शंकरानी नरसिंहाना आपल्याबरोबर द्वारकेला नेले आणि भगवान श्रीकृष्णाच्या
रासलीलेचा साक्षात्कार घडवला. 'हारमाळा' च्या गीतांत स्वप्नांत येऊन गेलेल्या महादेवांनी
वरदान मागायला सांगितले ' असे नरसिंह म्हणतात. 'विवाह' काव्यांत नरसिंह ३ महिने
द्वारकेत राहिले आणि काव्यरचना करण्याचा, श्रीकृष्णांनी कृपापूर्ण आशिर्वाद दिल्याचा निर्देश