भक्त नरसिंह मेहता: जीवन एवं पद (वैष्णव जन तो तेने कहिये - गुजराती से हिन्दी रूपान्तरण)
Bhakta Narsi Mehta: Jeevan Aur Pad
भक्त नरसिंह मेहता (सम्पादक: रामचन्द्र तिवारी) द्वारा
पृष्ठ 8, कुल 99 में से
संदर्भ में पढ़ें6 नरसी मेहता
जाणवत होती. लोक सुद्धां तो लग्नसोहाळा कमालीच्या साफल्याने पार पाडल्याचा आनंद
मनोमनी अनुभवीत होते.
नरसिंहांनी त्यांच्या 'मामेरा' काव्यात म्हटल्या प्रमाणे, अल्प काळांतच पत्नी माणेक महेती
आणि पुत्र सामळदास मृत्यू पावलेले दिसतात, त्या दरम्यान पुत्री कुंवरबाईचे लग्न 'उना' गावांत
श्रीरंग महेतांच्या पुत्राबरोबर झाले होते. उना गाव, दक्षिण सौराष्ट्रात गीरपंथकच्या दक्षिणेला
आहे. मुलीच्या सीमंत समारंभापूर्वी (पहिल्या गर्भारपणात करायचा समारंभ) नरसिंहाच्या
जीवनाशी संबंध असणाऱ्या दोन घटना घडल्या. त्यांपैकी प्रथम कोणती आणि नंतर कोणती,
हे सांगणे कठीण आहे. यापैकी एक घटना 'हुंडी' ची आहे. विदेशी यात्रिक जुनागडची यात्रा
करायला आले होते. द्वारकेची यात्रा करायची त्यांची ईच्छा होती. द्वारकेचा मार्ग धोकादायक
असल्यामुळे रोकड रक्कम बरोबर घेऊ नये, असे यात्रिकांना वाटत होते. एकाद्या व्यारायाशी
रोकड रक्कम देऊन त्याची हुंडी (पावती- पत्र) घेऊन, यात्रेला निघावे असे त्यांनी ठरवले.
शहरात त्यांना कोणी सधन व्यापारी न मिळाल्यामुळे ते निराश झाले होते. तिरस्कार आणि
कुचेष्टा करणाऱ्या नागरांनी त्याना नरसिंह महेतांचे घर मुद्दाम दाखवले. ईश्वरावर परम श्रद्धा
ठेवणाऱ्या नरसिंहांनी ७०० रुपये मोजून घेऊन द्वारकेच्या सामळशा शेठ च्या नावे हुंडी लिहून
दिली. यात्रिक द्वारकेला पोचले. तपास करूनही त्यांना शामळशा सेठ सापडला नाही. आपण
फसवलो गेलो असा त्यांनी समज करून घेतला. तेवढ्यात शामळशा शेठ त्यांना भेटले आणि
त्यांनी यात्रिकाना ७०० रुपये नगद दिले. प्रत्यक्ष भगवान शामळशा शेठ बनले, आणि त्यांनी
भक्तांची लाज राखली असा अत्यंत भक्तीभावपूर्वक उल्लेख नरसिंहाच्या हुंडी या काव्यात
आढळतो.
वि. स.१५०१ मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी, सोमवार रोजी मध्यरात्री दुसरी एक रमणीय घटना
घडली, असे सांगण्यात येते कीं. नरसिंहाचे काका अनेक वर्षांपासून मांगरोल (सोरठ) ला
राहात होते. तिथे त्यांचा काय व्यवसाय होता हें कळायला मार्ग नाही. ते कदाचित् तिथे
हकिमांची किंवा तत्सम कांही नोकरी करीत असावेत. दरवर्षी तळहाती तुळशीचे रोप घेऊन,
द्वारकाधीश रणछोडरायांच्या दर्शनार्थ, द्वारकेला जायचा त्यांचा नियम होता. हा त्यांचा नियम
६० वर्षे अव्याहत चालत होता, अशी ग्वाही त्यांचे वंशज त्रिकमलाल भवानी शंकर त्यांच्या
'पर्वतपचासी' काव्यांत देतात. शिरस्त्याप्रमाणे यावर्षी पण ते निघाले. सीताभाई नावाने
ओळखल्या जाणाऱ्या 'विष्णूतीर्थ' ठिकाणी ते रात्री राहिले. मांगरोळच्या उत्तर पश्चिमेला २०
कि.मीटर अंतरावर 'आजक' गाव आहे, त्याच्या बाजूलाच हे ठिकाण आहे. भगवंतानी रात्री
स्वप्नात येऊन त्यांना सांगितले की मीच तुझ्याकडे मांगरोळला येतो आहे. दुसऱ्या दिवशी
भक्त पर्वतदास मांगरोळला परत आले. रोजच्या नियमानुसार, ते गोमती विहिरीवर स्नानाला