सामग्री पर जाएँ
सर्वकोश
भक्त नरसिंह मेहता: जीवन एवं पद (वैष्णव जन तो तेने कहिये - गुजराती से हिन्दी रूपान्तरण)

भक्त नरसिंह मेहता: जीवन एवं पद (वैष्णव जन तो तेने कहिये - गुजराती से हिन्दी रूपान्तरण)

Bhakta Narsi Mehta: Jeevan Aur Pad

भक्त नरसिंह मेहता (सम्पादक: रामचन्द्र तिवारी) द्वारा

DevanagariHindipublished99 पृष्ठ

पृष्ठ 9, कुल 99 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 9

जीवन चरित्र 7
गेले. त्यांना विहिरीत रणछोडरायांचे काळ्या पाषाणाचे दशांगुल रूप सापडले. पर्वतदासांच्या
घराजवळ, नगराच्या उत्तर दरवाजाच्या आंत ही गोमती विहीर आहे. त्याच दिवशी दीवचा
वासुदेव सलाट (शिल्पकार) काळ्या पाषाणाचे एक छोटेसे सिंहासन घेऊन समुद्रमार्गे द्वारकेला
जात होता. समुद्रांत तुफान झाल्यामुळे तो मांगरोळ बंदरात उतरला. पर्वतदासची हकीगत
त्याच्या कानावर गेली. पर्वतदासांकडे जाऊन त्याने सिंहासन, रणछोडरायांच्या आसनासाठी,
त्याच्या स्वाधिन केले. तो दिवस उत्सवाप्रमाणे साजरा केला गेला. रात्रीच्या समारंभात नरसिंह
हजर होते. सारी रात्र त्यांनी प्रभुकीर्तनात घालवली. त्यांना तहान लागली, तेव्हा त्यांची विधवा
सून पाण्याची झारी घेऊन आली. नरसिंह भक्तिरंगात इतके रंगले होते की प्रत्यक्ष परमेश्वर
मोहिनी रूपाने आले आहेत अशा आशयाची त्यांनी तीन पदे म्हटली. चौथ्या पदांत मात्र 'ही
सुनबाई' असा निर्देश केला. ही चारी पदे झारीची पदे म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यापैकी तीन
नरसिंहाच्या उच्च प्रतीच्या प्रतिभेची द्योतक आहेत.
मुलगी कुंवरबाईचे लग्न केव्हां झाले, याचा उल्लेख नरसिंहानी कुठेही केलेला नाही.
मामेरू च्या एका पदात पत्नी आणि पुत्राच्या मृत्यूनंतर कुंवरबाईंचे 'आणु' (वयांत
आल्यानंतरची, भेटी देऊन पाठवणी ) येऊन ती सासरी गेल्याचा तसेच हुंडी च्या पत्रात
कुंवरबाईच्या सासऱ्याकडून खुशालीचा समाचार येत असल्याचा, उल्लेख आहे. मुलीचा
सीमंत (डोहाळे समारंभ) समारंभ 'उनाला' उजविला गेला. निमंत्रण पत्रिका मिळाल्यावर पत्नी
पुत्र नसल्यामुळे स्वतः नरसिंह मामेरु (मामाकडचा आहेर) करायला त्या समारंभाला गेले. हा
दिवस चैत्र शुद्ध द्वादशी होता आणि वर्ष वि.स. १५०१ इ.स.१४४५ असावे. नरसिंह
व्याह्यांच्या घरी पोचले. स्नानाला पाणी आले, ते आधणपाणीच होते. नरसिंहानी ईश्वरप्रार्थना
केली आणि पाऊस पडून ते पाणी योग्य तितके थंड झाले. कुवरबाईच्या आजेसासूला
(मामाकडच्या आहेराची) मामेरू ची यादी करायची नरसिहानी विनंती केली. नरसिंह व्याही,
अत्यंत धनाढ्य आहेत अशा समजुतीने की कल्पनेने, आजेसासुबाईंनी खूपच महागडी यादी
बनवली. प्रत्यक्ष भगवान आणि लक्ष्मी, दामोदर दोशी आणि त्यांची पत्नी बनून आले आणि
त्यांनी मामाकडचा आहेर (मामेरु) पुरा केला, असे नरसिंह म्हणतात. विवाहं काव्याप्रमाणे मामेरु
हे काव्यही, नरसिंहांनी उच्च प्रतिभेच्या आविष्काराने लिहिले आहे. आई वेगळ्या मुलीकडे
रिकाम्या हातानी नरसिंह गेले. त्या प्रसंगातली मनोवेदना एका मनोवेधक पदांत आहे. मामेरू
(मामाकडचा आहेर) पुरे केल्याची त्यांची पदे अद्भुतरसाने परिपूर्ण आहेत.
या ४ प्रसंगानंतरचा ५ वा प्रसंग, नरसिंहाच्या जीवनातला, भक्त म्हणून कठिण कसोटीचा
आहे. त्या काळात जुनागडला राजवीरा मांडलिक राजा होता.त्यांच्या दरबारात हा प्रसंग घडला.
ईश्वर भजनात भाग घेण्यासाठी नरसिंहाकडे अनेक स्त्री-पुरुष भक्तजन येत असत. नरसिंहाच्या