अमृतानुभव एवं चांगदेव पासष्टी (सन्त ज्ञानेश्वर - चिद्विलासवाद एवं अद्वैत अनुभूति सटीक)
Amritanubhava and Changdev Pasashti of Sant Jnanadev
सन्त ज्ञानेश्वर / ज्ञानदेव महाराज द्वारा
६८ सार्थ अमृतानुभव
हें असो मृत्यु आणि जिणें । हे शोभती काय मेहुणे ॥ तरी
आत्मेन असणें । अज्ञानेंशी ॥ २९ ॥ अहो आत्मेन जे बाधे ।
तेंचि आत्मेनशीं नांदे ॥ ऐशीं कायशी विरुद्धें । बोलणीं इये ॥३०॥
अहो अंधारपणींची पैज । सांडूनि अंधार तेज । जाला तैं सहज ।
सूर्य निभ्रांतचि ॥ ३१ ॥ दलांकुडपणा सांडिलें । आणि आगीपण
मांडिलें ॥ तैं तेंचि आगीं जालें । इंधन कीं ॥ ३२ ॥ कां गंगा
पावत खेवो । आनपणाचा ठावो ॥ सांडी तैं गंगा हो । लाहे
पाणी ॥ ३३ ॥ तैसें अज्ञान हें अज्ञान नोहे । तरी आत्मा असकें
असों लाहे ॥ येन्हवीं अज्ञान होये । लागलेंचि ॥ ३४ ॥ आत्मे-
नशी विरोधी । म्हणोनि नुरेचि इये संबंधीं ॥ वेगळे तरी सिद्धि ।
जायेचिना ॥ ३५ ॥ लवणाची मासोळी । जन्ही होय जिव्हाळी ॥
तरी जळीं ना वेगळी । न जिये जेवी ॥ ३६ ॥
हें असो; मृत्यु आणि जिवंतपणा हें जर मेहूण म्हणून मिरवेल तर,
आत्मा आणि अज्ञान एके ठिकाणीं राहूं शकतील. २९. अहो ! जें अज्ञान
आत्मज्ञानानें नष्ट होतें, तेंच अज्ञान आत्म्याचे ठिकाणीं नांदतें हें म्हणणें
परस्पर विरुद्ध नाहीं का ? ३०. अंधारपणा टाकून अंधार तेज झाला,
तर तो निःसंशय सूर्यच झाला ! ३१. लाकूडपणा टाकून लाकूड अग्निरूप
झालें, तर तें अग्नि झालें. ३२. किंवा ओहोळ गंगेला मिळतांक्षणींच
आपला ओहोळपणा टाकून गंगारूप होतो; ३३. त्याप्रमाणें अज्ञानाचा व
आत्म्याचा संयोग होतांच अज्ञान आपला अज्ञानपणा टाकून संपूर्ण ज्ञानच
होतें; परंतु संयोग होण्यापूर्वी अज्ञान अज्ञान स्वरूपानें शिल्लक असतेंच.
३४-३५. मिठाचा मासा करून त्यांत प्राण घातला तरी पाण्यामध्यें किंवा
-पाण्याच्या बाहेर तो जिवंत राहत नाहीं. ३६.
प्रकरण सातवें ६९
जे अज्ञान येथें नसे । तरीच आत्मा असे ॥ म्हणोनी बोलणीं
वायसें । नायकावीं कीं ॥ ३७ ॥ दोरी सर्पाभास होये । तो
तेणें दोरें बांधो ये ॥ ना दवडणें न साहे । जयापरी ॥ ३८ ॥
नाना पुनिवेचनि आंधारें । दिहाभेण राती महुरे ॥ कीं येतचि
सुधाकरें । गिळिजे जेंवी ॥ ३९ ॥ तियापरी उभयतां । अज्ञान
शब्द गेला वृथा । हा तर्का वांचोन हाता । स्वरूपें नये ॥ ४० ॥
तरी अज्ञानस्वरूप कैसें । काय कार्यानुमेय असे ॥ कीं प्रत्यक्षचि
दिसे । धांडोळूं आतां ॥ ४१ ॥ अहो प्रत्यक्षादि प्रमाणीं । कीजे
जयाची घेणी ॥ ते अज्ञानाची करणी । अज्ञान नव्हे ॥ ४२ ॥
जैशीं अंकुरेंसीं सरळ । वेली दिसे वेल्हाळ ॥ तें बीज नव्हे केवळ ।
बीज कार्य होये ॥ ४३ ॥
वरील दृष्टान्ताप्रमाणें अज्ञान आत्म्याचे ठिकाणीं, स्वरूपानें अगर वेगळें
स्वतंत्रपणानें नसून आत्माच आहे. म्हणून अज्ञानाचा व आत्म्याचा संबंध
आहे, किंवा अज्ञान वेगळें स्वतंत्र आहे, हीं दोन्ही बोलणीं तर्कसंगत
नाहींत. कारण अज्ञान तत्त्वतः केव्हांच नाहीं, निरंतर आत्माच आहे. ३७.
ज्या दोरीवर सर्पाभास झाला त्या दोरीनें त्या भासमान सर्पाला बांधणें होईल
काय ? ३८. अथवा त्या दोरीपासून त्याला वेगळें तरी करतां येईल काय ?
दोन्ही असंभव आहे अथवा पौर्णिमेच्या दिवशीं अंधार, दिवसाच्या भीतीनें
रात्रीकडे वळला, तों चंद्रानें लगेच त्यास गिळून टाकिलें ३९. त्याप्रमाणें
दोन्ही बाजूंनीं अज्ञान शब्द वायां गेला. हें अज्ञान शब्दमात्र आहे; म्हणजे
त्याला स्वरूपसिद्धि नाहीं. अज्ञान आहे हा तर्कमात्र आहे. ४० आज्ञान-
स्वरूपविषयक विचार करतांना अज्ञान हें कार्यानुमेय आहे कीं प्रत्यक्षसिद्ध
आहे, याकडे दृष्टि टाकूं. ४१. प्रत्यक्षादि प्रमाणांनीं ज्या प्रमेयाची देवघेव
होते, प्रमाता प्रमाण व प्रमेय ही त्रिपुटी हें अज्ञानकार्य आहे, अज्ञान
नव्हे. ४२. अंकुररूपानें सरळ वाढून वेल पसरते, पण तो विस्तार, बीज
नाहीं, बीजकार्य होय. ४३.
७० सार्थ अमृतानुभव
कां शुभाशुभरूपें । स्वप्नदृष्टि आरोपें ॥ तें नीद नव्हे जाउर्पे ।
निदेचें कीं ॥ ४४ ॥ नाना चांदु एकु असे । तो व्योमीं दुणावला
दिसे ॥ तें तिमिरकार्य जैसें । तिमिर नव्हे पैं ॥ ४५ ॥ तैसें
प्रमाता प्रमेय । प्रमाण जें त्रय ॥ तें अज्ञानाचें कार्य । अज्ञान
नव्हे ॥ ४६ ॥ म्हणोनी प्रत्यक्षादिकीं । अज्ञान कार्य विशेखीं ॥ न
घेपे येविषयीं । आनु नाहीं ॥ ४७ ॥ अज्ञान कार्यपणें । घेइजे तें
अज्ञान म्हणणें ॥ तरी घेताही करणें । तयाचेंचि ॥ ४८ ॥ स्वप्नीं
दिसे तें स्वप्न । मा देखता काय आन ॥ तैसें कार्याचि अज्ञान ।
केवळ जरी ॥ ४९ ॥ तरी चाखिला गूळ गूळें । माखिलें काजळ
काजळें ॥ कां घेपे देपे शूळें । हालया शूळें ॥ ५० ॥
किंवा स्वप्नांत शुभाशुभरूपानें दिसणारें सर्व झोंप नाहीं. तें झोंपेचें
पिलं म्हणजे कार्य आहे. ४४. अथवा आकाशांत चंद्र एक असून दोन
दिसतात, पण ते दोन दिसणें हें अंधाराचें कार्य आहे, अंधार नव्हे. ४५.
त्याप्रमाणें प्रमाता, प्रमाण, प्रमेय ही त्रिपुटी अज्ञानकार्य आहे; स्वयंअज्ञान
नव्हे. ४६. ही प्रत्यक्षादि सहा प्रमाणें अज्ञानाची विशेष कार्ये आहेत,
त्यांच्याकडून अज्ञानाचें ग्रहण होत नसलें तरी त्या विशेष कार्या-
वरूनच कारणरूपानें अज्ञान अनुमानलें पाहिजे. ४७. अज्ञानाच्या कार्या-
वरून अज्ञानसिद्ध आहें असें जर म्हणावें तरी पण ज्या प्रत्यक्षादि
प्रमाणांवरून अनुमानानें तो अज्ञानाची सिद्धि करतो. तेंही अज्ञानच होय;
कारण चैतन्याव्यतिरिक्त कोणताहि पदार्थ अज्ञानकार्य म्हणून समजलें जातें.
४८. जर स्वप्नांत दिसणारें सर्व एकरूपच आहे तर मग स्वप्न पाहाणारा
त्याहून निराळा आहे काय ? त्याप्रमाणें अज्ञानाचें कार्यच जर केवळ
अज्ञान आहे असें म्हणालास, ४९. गुळानेंच गुळाची चव घेतली;
काजळानेंच स्वतःला काजळ लाविलें किंवा सुळानेंच सुळाला मारलें
असें म्हटल्यासारखें होईल. ५०.
प्रकरण सातवें ७१
तैसें कारणअभिन्नपणें । कार्यही अज्ञान होणें ॥ तें अज्ञानीच
मा कोणें । काय घेपे ॥ ५१ ॥ आतां घेते घेइजे ते ऐसा ।
विचारु नये मानसा ॥ तरी प्रमाण जाला मासा । मृगजळींचा
ना ॥ ५२ ॥ तंव प्रमाणाचिया मापा । न संपडोचि जें बापा ॥
तया आणि खपुष्पा । विशेषु काई ॥ ५३ ॥ मा हे प्रमाणाचि
नुरवी । आधी हे कोण प्रस्तावी ॥ येणेंही बोले जाणावी ।
अज्ञान उखी ॥ ५४ ॥ एवं प्रत्यक्ष अनुमान । यया प्रमाणां
भाजन ॥ नहोनी जालें अज्ञान । अप्रमाण ॥ ५५ ॥ ना
स्वकार्यातें विये । जें कारणपणा नये ॥ मी अज्ञान ऐसें बिहे ।
मानू साचें ॥ ५६ ॥
त्याप्रमाणें जर कार्य, कारणरूपानें अभिन्न असेल तर सर्वच अज्ञान
झालें; मग घेण्यादेण्याचा व्यवहार करायला शिल्लक उरलाच कोण ? ५१.
म्हणून प्रमाता आणि प्रमेय असा भेद न राहिल्यामुळे व सर्वच अज्ञान
झाल्यामुळे वरील म्हणणें मृगजलांतील माशाइतकेंच सत्य ठरतें. ५२. जी
वस्तु प्रमाणानें सिद्ध होत नाहीं त्या वस्तूंत व आकाशपुष्पांत अंतर काय ?
५३. मग हें अज्ञान जर प्रमाणालाच उरू देत नाहीं, तर अज्ञान आहे हें
सिद्ध कोणीं करावें ? याचाच अर्थ या बोलण्यानेंच अज्ञानाचें खंडण झालें.
५४. अज्ञान हें अशा रीतीनें प्रत्यक्ष, अनुमान इत्यादि प्रमाणांनीं सिद्ध
होण्यास अपात्र असल्यानें तें अप्रमाण म्हणजे खोटें ठरलें. ५५. शिवाय
ज्यांत कार्य उत्पन्न करण्याची शक्ति नाहीं तें कारण होऊं शकत नाहीं;
तसेंच मी ' अज्ञान ' आहे असें सांगायला जें भितें, त्याला आपण अज्ञान
कां मानावें ? अहो ! ' मी ' अज्ञान आहे, असें हें म्हणणेंहि ज्ञानच नव्हे
का ? ५६.
७२ सार्थ अमृतानुभव
आत्मया स्वप्न दाउ । न सके कीर बहु ।। परी हाये ठाउ ।
निदेजो नेणें ॥५७॥ हें असो जिये वेळे । आत्मपणोंचि निखिळे ।।
आत्मा अज्ञानमेळे । असे तेणें ॥ ५८ ।। जैसें न करितां मंथन ।
काष्ठीं अवस्थान ।। जैसें कां हुताशन । सामर्थ्याचें ॥ ५९ ॥
तैसें आत्मा ऐसें नांव । न साहे आत्मयाची बरव । तैं का अज्ञान
हाव । बांधते का ॥६०॥ काय दीप न लाविजे । तैंचि काजळी
फेडिजे ॥ कीं नुगवतीया वाळीजे । रुखाची छाया ॥ ६१ ॥
नाना नुठिता देहदशा । कालवूनि लाविजे चिकसा ।। न घडितां
आरसा । उटिजे काई ॥ ६२ ॥ कां वोहाच्या दुधीं । सायची
असावी आधीं ॥ मग ते फेडु इये बुद्धि । पवाडु कीजे ॥ ६३ ॥
आत्म्याला, अज्ञान निश्चयँकरून स्वप्न दाखवूं शकत नाहीं; पण जरी
अज्ञान आहे असे धरलें, तरी जेथें तें असतें, त्या आत्म्याला आवरणहि
करीत नाहीं, हें कसें ? ५७. बरें, आतां हें राहूं द्या. जेव्हां तुमचा आत्मा
अगदीं शुद्ध स्वरूपानें असतो, तेव्हां त्याच्याबरोबरच आमचें अज्ञान आहे.
५८. लाकडें मंथन करण्याच्या पूर्वी अग्नि ज्याप्रमाणें आपल्या सामर्थ्यानें
त्यांत असतो. ५९. त्याप्रमाणें अज्ञान आत्म्याबरोबर असतें. ज्या आत्म्याला
'आत्मा' हें नांवहि सहन होत नाहीं, त्या आत्म्याच्या ठिकाणीं अज्ञान
शक्य नाहीं. ६०. थोडा तरी जळण्याच्यापूर्वीच दिव्याची काजळी कशी
झाडायची किंवा मुळींच न उगवलेल्या झाडाच्या छायेचा परित्याग करा-
वयाचा कसा ? ६१. उत्पन्न न झालेल्या देहाला उटणी केव्हां लावाव-
याची ? किंवा आरसा तयार व्हायच्या आधीं कसा पुसायचा ? अगर
कासेंतल्या दुधाला अगोदर साय असावी आणि मग ती साय निराळी
करण्याची युक्ति सुचवावी. ६३.
प्रकरण सातवें ७३
तैसें आत्मयाच्या ठाईं । जैं आत्मपणा ठाऊ नाहीं ॥ तैं
अज्ञान कांहीं । सारिखें कैसें ॥ ६४ ॥ म्हणौनी तेव्हांही अज्ञान
नसे । हें जालेंचि असे आपैसें ॥ आतां रिकामें कायसे । नाहीं
म्हणो ॥ ६५ ॥ ऐसाही आत्मा जेव्हां । जैं नातळे भावाभावा ॥
अज्ञान असे तेव्हां । तरी तें ऐसें ॥६६॥ जैसें घटाचें नाहींपण ।
फुटोनि होय शतचूर्ण ॥ किंवा सर्वांपरी मरण । मारवलें ॥६७॥
नाना निदे नीद आली । कीं मूर्छा मूर्छे गेली ॥ कीं अंधारी पडली ।
आंधकुपी ॥६८॥ कां अभाव अवघडला । कां केळीचा गाभा
मोडला ॥ चोखळा असुडला । आकाशाचा ॥६९॥ कां निवाटिया
सूदेल विख । मुकियाचें बांधिलें मुख ॥ नाना नुठितां लेख । पुसिलें
जैसें ॥७०॥ तैसें अज्ञान आपुलिये वेळ । भोगी हेंचि टवाळ ॥ आतां
तरी केवळ । वस्तु होऊनि असे ॥७१॥ देखां वांझ कैशी विये ।
विरुढती भाजली बियें ॥ कीं सूर्य कोणा लाहे । अंधारातें ॥७२ ॥
त्याप्रमाणें ज्या काळीं आत्म्याच्या ठिकाणीं आत्मपणाचाच ठिकाण
नाहीं, अशा केवळ आत्म्याच्या ठिकाणीं अज्ञान असें असणार. ६४.
या कारणास्तव त्या वेळींहि अज्ञान 'नाहीं नाहीं,' असें शेंकडों
वेळां केवळ म्हणण्यात काय अर्थ ? ६५. याप्रमाणें भावाभावातींत
आत्मा जेव्हां असतो, तेव्हां अज्ञान आहे हें म्हणणें कशा प्रकारचें तें आतां
ऐका. ६६. कोणत्याच आकारांत नसलेला घट फुटून त्याचे शेंकडों तुकडे
झाले किंवा त्याला मरण आलें, ६७. अथवा झोंपेला झोंप आली, किंवा
मूर्च्छेला मूर्च्छा आली, किंवा अंधार अंधाऱ्या विहिरींत पडला, ६८. किंवा
अभाव संकटांत पडला किंवा केळीचा गाभा मोडला; किंवा आकाशाचा
स्वच्छपणा मोडला; ६९ मेलेल्याला विष घातलें, मुक्याला गप्प बसविलें
किंवा न लिहिलेलें पुसलें ७०. हें म्हणणें जितकें निरर्थक तितकेंच
आत्मस्वरूपाच्या ठिकाणीं, अज्ञान साहचर्यानें आहे हें बोलणें अर्थहीन
आहे ७१. वंध्या कधीं प्रसूत होते काय ? जळालेले बीज उगवतें काय ?
सूर्याला अंधार कधीं भेटला आहे काय ? ७२.
७४ सार्थ अमृतानुभव
तैसा चिन्मात्रीं चोखडा । भलतैसा अज्ञानाचा झाडा ॥ घेतला
तन्हीं पवाडा । येईल काई ॥ ७३ ॥ जे सायेचिया चाडे । डहुळे
दुधाचे भांडें ॥ ते दिसे कीं विघडे । तैसें हें पा ॥ ७४ ॥ नाना
नीद धरावया हातीं । चेऊनि उठिला झडती ॥ ते लाभे कीं थिती ।
नासली होये ॥ ७५ ॥ तेवीं पहावया अज्ञान ऐसें । हें आंगीं
पिसें कायसें ॥ न पाहतां आपैसें । न पाहणेंचि कीं ॥ ७६ ॥
एवं कोण्हेही परी । अज्ञानभावाची उजरी । न पडेचि नगरी
विचाराचिये ॥ ७७ ॥ अहो कोण्हेही वेळे ॥ आत्मा अथवा वेगळे ॥
विचाराचे डोळे । देखते कां ॥ ७८ ॥ ना निर्धाराचें तोंड न
माखे । प्रमाण स्वप्नींही नायके ॥ कीं निरुती हन मुके ।
अनसाईपणा ॥ ७९ ॥ इतुलियाही भागू । अज्ञानाचा तरी तो
मागु ॥ निगे ऐसा वागु । पडतां कीं देवा ॥ ८० ॥
त्याप्रमाणें ज्ञानस्वरूप आत्म्याच्या ठिकाणीं अज्ञानाचा कितीहि शोध
घेतला तरी तो सांपडेल काय ? सायीच्या दुधाचें भांडें ढवळलें तर
दुधावर साय येईल कीं नाहींशी होईल ? ७४. अथवा एकादा झोपलेला
झटकन जागा होऊन, आलेल्या निद्रेला हातांत पकडूं म्हणेल तर ती हातीं
लागेल कीं नाहींशी होईल ? ७५. तेव्हां अशाप्रकारें अज्ञान पाहणें हा
वेडेपणा आहे. अज्ञानाचा विचार करावयास गेलें असतां अज्ञान नाहींच
आणि ज्या वेळीं विचार करीत नाहीं, त्या वेळीं तर तें सहजच नाहीं;
तात्पर्य नाहींच अज्ञानाचा अत्यंताभाव आहे. ७६ याप्रमाणें कोणत्याहि
प्रकारें अज्ञानाची सिद्धि विचाराच्या गांवीं होत नाहीं. ७७. अहो, कोण-
त्याही वेळीं आत्म्याच्या ठिकाणीं किंवा दुसरीकडे विचार दृष्टीनें अज्ञान
दिसतें का ? ७८. अज्ञानानें निर्धाराचें तोंड माखलें जात नाहीं. प्रमाण
तर अज्ञानाला स्वप्नांतही पाहात नाहीं. फार काय, अज्ञान वेगळेपणानें
निश्चित नाहीं. ७९. अशा प्रकारें सर्व बाजूंनीं अज्ञानाचा पत्ता लागला
असता तर बरें झालें असतें. पण त्याचा कांहीं थांग लागत नाहीं. ८०.
प्रकरण सातवें ७५
अवसेचेनि चंद्रबिंबें । निर्वाँळिलिये सभे ॥ कां मांडले जैसें
खांबे । शशविषाणाचे ॥ ८१ ॥ नाना गगनौलाचिया माळा ।
वांझिचिया झालिया गळा ॥ घापती तो सोहळा । पाविजेत असे
॥ ८२ ॥ आणूनि कासवांचें तूप । भरूं आकाशाचें माप ॥ तरी
साचा येती संकल्प । ऐसे ऐसे ॥ ८३ ॥ आम्ही येऊनि जाऊनी
पुढती । अज्ञान आणावें निरुतीं ॥ ते नाहीं तरी किती । वतवतु पा
॥ ८४ ॥ म्हणौनि अज्ञान अक्षरें । नमसूं आतां निदसुरें ॥ परी
आन एक स्फुरे । इयेविषयीं ॥ ८५ ॥ आपणया ना आणिकातें ।
देखोनि होय देखतें ॥ वस्तु ऐशिया पुरतें । नव्हेचि आंगें
॥ ८६ ॥ तरी ते आपणया पुढें । दृश्य पघळें येवढें ॥ आपण
करी फुडें । द्रष्टेपण ॥ ८७ ॥ जेथें आत्मत्वाचें सांकडें । तेथें
उठे हे येवढें ॥ आणि उठिलें तरी रोकडें । देखत असो ॥८८॥
आमावास्येच्या चंद्रानें स्वच्छ प्रकाश पाडला; सशाच्या शिंगाचे खांब
तयार करून मंडप घातला. ८१. किंवा वांझेच्या मुलाच्या गळ्यात आकाश
फुलाच्या माळा घालून सोहळा केला. ८२ कांसवीचे तूप आणून आकाशाचे
मापटें भरलें, ह्या दृष्टान्ताप्रमाणें गोष्टी असल्या किंवा घडल्या तर अज्ञान-
सिद्धीसंबंधीं जे हें विचार त्यांना सफलता येऊन अज्ञानाचा पत्ता लागला
असता. ८३. आम्हीं इकडून तिकडून पुनः पुन्हां अज्ञानाची सिद्धि करण्याचा
प्रयत्न केला, परंतु तें नाहींच; पण व्यर्थ गडबड करून काय उपयोग ?
८४. म्हणून आतां ' मिथ्या अज्ञान ' हीं अक्षरेंसुद्धां उच्चारण्याचा उल्हास
राहात नाहीं. परंतु अज्ञानाच्या सिद्धीच्या बाबत आणखी एक तर्क असा
सुचतो की ८५. आत्मवस्तु आपल्या स्वतःला किंवा दुसऱ्याला दृश्य
करून पहाणारी नसून निजस्वरूपानें दृश्यद्रष्टातीत आहे. ८६. मग आपणा-
पुढें दृश्यत्वाला आलेला एवढा विकार, आपणच द्रष्टेपणाने पाहतों हें कसें?
८७. ज्या ठिकाणीं आत्मत्व म्हणणें हें सुद्धां संकट आहे तेथें दृश्याचा
विस्तार उठतो व तो प्रत्यक्ष प्रतीतीसहि येतो. ८८.
७६ सार्थ अमृतानुभव
न दिसे जरी अज्ञान । तरी आहे हें नव्हे आन ॥ यया
दृश्या अनुमान । प्रणाम जालें ॥ ८९ ॥ नातरी चंद्र एकु असे ।
तो व्योमीं दुणावला दिसे ॥ तरी डोळा तिमिर ऐसें । मानूं ये
कीं ॥ ९० ॥ भूमीवेगळीं झाडें । पाणी घेती कवणीकडे ॥ न
दिसती आणि अपाडे । साजीं असती ॥ ९१ ॥ तरी भरवसेनी
मूळें । पाणी घेती हें न ढळे ॥ तैसें अज्ञान कळे । दृश्यास्तव
॥ ९२ ॥ चेइलेया नीद जाय । निंद्रिता तंव ठाउवी नव्हे ॥
परी स्वप्न दाऊनी आहे । म्हणों ये कीं ॥ ९३ ॥ म्हणोनि
वस्तुमात्रें चोखें । दृश्य जरी येवढें फाके ॥ तेव्हां अज्ञान आथी
सुखें । म्हणों ये कीं ॥ ९४ ॥ अगा ऐशिया ज्ञानातें । अज्ञान
म्हणणें केउतें ॥ काय दीवो करी तयातें । अंधारु म्हणिपे ॥९५॥
म्हणून जरी अज्ञान दिसत नाहीं तरी अज्ञान आहे हें खोटें नाहीं. कारण
यास प्रमाण दृश्य अनुमान हें आहे; म्हणजे दृश्यामानावरूनच अज्ञान
सिद्ध होतें. ८९. किंवा आकाशात चंद्र एक असून जर दोन दिसले, तर
डोळ्यांत तिमिर दोष आहे, असें मानावें लागतें. ९०. झाडें पृथ्वीशिवाय
दुसरीकडून पाणी घेतांना दिसत नाहींत आणि ताजी टवटवीत तर दिसतात.
९१. त्यावरून झाडाचीं मुळें पाणी शोषून घेतात, हें कबूल करावेंच लागतें.
त्याप्रमाणें दृश्यावरून अज्ञानाची सिद्धि होते. ९२. जागृत पुरुषाला झोंप
नसते आणि निजलेल्याला तर झोंप ठाऊक नाहीं, पण ज्या अर्थी स्वप्न
दिसतें त्या अर्थी निद्रा आहे असें म्हणावेंच लागतें. ९३. म्हणून निर्मल
वस्तुमात्र आत्म्याच्या ठिकाणीं जर एवढा दृश्याचा पसारा दिसतो, तर
अज्ञान आहे असें म्हणण्यास कांहींच प्रत्यवाय नाहीं. ९४. अहो, हें
बोलणें सारें ज्ञान आहे. त्या ज्ञानालाच अज्ञान असें कसें म्हणावें ? जो
प्रकाश करितो त्याला काय अंधार म्हणावें ? ९५.
प्रकरण सातवें ७७
अगा चंद्रापासोनि उजळ । जेणें राखिले वस्तु धवल ॥ तयातें
काजळ । म्हणिजेत असे ॥ ९६ ॥ आगीचें काज पाणी ।
निफजा जरी आणी ॥ अज्ञान इया वाहणी । मानूं तरी ते
॥ ९७ ॥ कळीपूर्ण चंद्रमा । आणवूनि मेळवी आमा ॥ तरी
ज्ञान हें अज्ञान नामा । पात्र होइजे ॥ ९८ ॥ वोरसोनि लोभें ।
विष का अमृते दुभे ॥ ना दुभे तरी लाभे । विषचि म्हणणें
॥ ९९ ॥ तैसा जाणणेयाचा वेव्हारु । जेथे माखला समोरु ॥
तेथें आणिजे पुरु । अज्ञानाचा ॥ १०० ॥ तया नांव अज्ञान
ऐसें । तरी ज्ञान होआवें तें कैसें ॥ येन्हवीं कांहींच असे । आत्मा
काई ॥ १०१ ॥ कांहींच जया न होणें । होय तें स्वतां नेणें ॥
शून्याची देवांगणें । प्रमाणासी ॥ १०२ ॥ असें म्हणावया जोगें ।
नाचरे कीर आंगें ॥ परी नाही हें नलगे । जोडावेंचि ॥१०३॥
एखादी वस्तु स्वच्छ करून चंद्रापेक्षांहि उजळ केली तर तिला काजळ
असें म्हणतां येईल काय ? ९६. अग्नीचें काम जर पाणी करूं शकेल,
तर हें दृश्य अज्ञानापासून विस्तारलेलें आहे असें खुशाल मानावें. ९७. सर्व
काळांनीं नटलेला पौर्णिमेचा चंद्र जर दर्शन घडवील तर हें ज्ञान, अज्ञान,
या नांवाला पात्र होईल. ९८. विषानें अत्यन्त प्रेमानें पान्हा सोडला तर
तें काय अमृत देईल ? विषानें पान्हा सोडला तरी विषच दुभणार. ९९.
त्याप्रमाणें ज्या ठिकाणीं हा सर्व ज्ञानाचा व्यवहार प्रत्यक्ष ओतप्रोत भरलेला
दिसतो, त्या ठिकाणीं अज्ञानाचा पूर आला आहे असें म्हणणें कसें शोभेल ?
१००. ज्ञानाच्या सर्व व्यवहाराला अज्ञान म्हणतों तर ज्ञानाचें स्वरूप काय ?
वास्तविक सर्व ज्ञानरूप आत्माच आहे. १०१. ज्या आत्म्याला कांहींच होणें
नाहीं, त्या आत्म्याला 'मी आहें' 'इदमित्थम्' म्हणजे आत्मा असा किंवा
आत्मा शून्य आहे असा कोणताहि निर्णय करितां येत नाहीं अशी प्रमाणांनीं
शपथच घेतली. १०२. 'आहे' असें म्हणण्यासारखी आत्म्याला स्वरूप-
स्थिति नाहीं, मग 'नाहीं' हें म्हणायाचें प्रयोजन नाहीं. सारांश, 'आहे;
नाहीं' अशा दोहीं धर्मांनीं शून्य आत्मा आहेपणानेंच आहे. १०३.
७८ • सार्थ अमृतानुभव
कोन्हाचे असणेनवीण असे । कोन्ही न देखतांचि दिसे ॥
हे आधीं तरी कायसें । हारतलेपण ॥१०४॥ मिथ्या
वादाची कुटी आली । ते निवांतचि साहिली ॥ विशेपाही
दिधली । पाठी जेणें ॥१०५॥ जो निमालीही नीद देखे ।
तो सर्वज्ञ येव्हढा काय चुके ॥ परी दृश्याचिये न ठके । सोइ
जो ॥१०६॥ वेदु काय काय न बोले । परी येथें नांवचि
नाहीं घेतलें ॥ ऐसें कांहीं जोडलें । नाहीं जेणें ॥१०७॥ सूर्य
कोणा न पाहे । परी आत्मा दाविला आहे ॥ गगनें व्यापितां
ठाये । ऐशी वस्तु ॥१०८॥ देह हाडाची मोळी । मी म्हणोनी
पोटाळी ॥ तो अहंकारु गाळी । पदार्थु हा ॥१०९॥ बुद्धि
बोध्या सोके । ते येवढी वस्तु चुके ॥ मना संकल्प निके ।
याहीहूनी ॥ ११०॥
कोणाच्या असण्यावांचून आत्मा आपल्या स्वरूपानें आहेच. कांही न
पाहतां, तो पाहणेपणानेंच आहे. असा स्वयंसिद्ध आत्मा 'नाहीं' असें
कसें म्हणतां येईल ? १०४. आत्मा हा नाहींपणाचा आळसुद्धा मुकाट्यानें
सहन करितो, व तसेंच कोणी सच्चिदानंदादि विशेष भावाला आणले
असतां स्वस्थ असतो. १०५. जो सर्व लयाचा साक्षी आहे, तो सर्वज्ञ
एवढें दृश्य पाहण्यास असमर्थ आहे काय ? परंतु तत्त्वतः दृश्याचा अभाव
आहे म्हणून दृश्याच्या गावाच्या शिवेपर्यंतहि आत्मा जात नाहीं. १०६ वेदानें
इतर सर्व प्रतिपादन केलें, पण आत्म्याचें नांवही घेतलें नाहीं; म्हणजे
अमुक प्रकारचा, अशा तऱ्हेचा आत्मा आहे असें सिद्ध केलें नाहीं. १०७.
सूर्य कोणास प्रकाशित करीत नाहीं ? पण त्यानें आत्म्याला प्रकाशित
केलें नाहीं. त्याचप्रमाणें आकाश आत्म्याला व्याप्त करूं गेलें असतां
त्याची व्याप्तिच थांबते. १०८. हाडाची मोळी असा हा देह त्यावर अहंकार
आपली सत्ता चालवितो; पण तो आत्मस्वरूपाला मात्र वगळतो. १०९.
मद्धि सर्व विषयांना जाणते, पण एवढ्या आत्मवस्तूला मात्र जाणत नाहीं;
बुनहि आत्मस्वरूपावांचून संकल्प करण्यास योग्य आहे. ११०.
प्रकरण सातवें ७९
विषयाचिया बरडी । अखंड घासती तोंडीं ॥ ते इंद्रियें गोडी
न घेपती हे ॥ १११ ॥ परी नाहींपणा सकट । खाऊनी भरलें
पोट ॥ ते कोणाही सकट । कां फावेल ॥ ११२ ॥ जो आप-
णासी नव्हे विखो । तो कोणा लाहे देखो ॥ जे वाणी न सके
चाखों । आपणापें ॥ ११३ ॥ हें असो नांवें रूपें । पुढासूनि
अमूपें ॥ जेथें आलीच वासिपे । अविद्या हे ॥ ११४ ॥ म्हणौनि
आपुलेंचि मुख । पहावयाची भूक ॥ न बाणे मा आणिक । के
रिघेल ॥ ११५ ॥ नाडिलें जे वादीकोडे । आतुचि बाहेरी सवडे ॥
तैसा निर्णो सुनाथा पडे । केला येथें ॥ ११६ ॥
विषयरूपीं जमिनीवर खडबडीत इंद्रियें तोंड घासतात, पण तीं
आत्म्याची गोडी घेण्यास असमर्थ आहेत. १११. ज्या परमात्मवस्तूनें नाहीं-
पणसुद्धां खाऊन टाकून आपलें पोट भरलें म्हणजे यावत् दृश्याभावाचें जो
ग्रहण करतो, तो परिपूर्ण आत्मा कोणास प्राप्त होईल ? ११२. जो आत्मा
स्वतःला विषय होत नाहीं, त्याला पाहण्यास कोणता अनात्मपदार्थ
समर्थ होईल ? जीभ आपला स्वाद घेऊं शकत नाहीं व तिचा स्वाद
दुसऱ्याकडूनहि घेतला जात नाहीं. ११३. हें असो. अविद्या पुष्कळ नाम-
रूपें पुढें करून ज्या परमात्मस्वरूपाच्या पुढें येतांच भयानें नाहींशी
होते. ११४. म्हणून ज्या ठिकाणीं आपलें स्वरूप पहाण्याचा संकल्प
देखील उठत नाहीं, तेथें दुसऱ्याचा प्रवेश होईल असें म्हणणें योग्य
आहे काय ? ११५. जुगारी चामड्याची वादी गुंडाळून त्यांत मध्यें
काडी घालून ती वादी ओढतो. पण शेवटीं पाहावें तर ती काडी त्या
गुंडाळींत कांहीं अडकलेली नसेलच. तो प्रयत्न फुकटच जातो. तसेंच
'इदम् इत्थम्' असें कितीहि वेळां जरी सांगितलें तरी आत्मस्वरूपाची
निश्चित ओळख पटणें कठीण आहे. तें बोलणें फुकट जातें. ११६.
८० सार्थ अमृतानुभव
कां मस्तकांत निर्धारिली । जो छाया उडों पाहे आपुली ॥
तयांची फाकावली । बुद्धि जैसी ॥११७॥ तैसें टणकोनी सर्वथा ।
हे ते ऐशी व्यवस्था ॥ करी तो चुके होता । वस्तूचा जिये ॥११८॥
आतां सांगिजे तें केउते । शब्द संसारा नाहीं जेथें ॥ दर्शना
बीजें तेथें । जाणीव आणी ॥ ११९ ॥ जयाचेनि बळें । अच-
क्षुपण आंधळें ॥ फिटोनि वस्तु मिळे । देखणी दिशा ॥१२०॥
आपुलेंचि दृश्यपण । उमर्सो न लाहे आपण ॥ दृष्टत्वा कीर
आण । पडली असता ॥ १२१ ॥ कोणा कोण भेटे । दिठी
कौचि फुटे ॥ ऐक्यासकट पोटें । आटोनि गेली ॥ १२२ ॥
येवढें हीं सांकडे । जेणे सारूनी येकीकडे ॥ उघडलीं कवाडें ।
प्रकाशाचीं ॥ १२३ ॥
डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत पडलेल्या लांबलचक सावलीवरून
पलीकडे उडीं मारणें ह्या खटपटींत ज्याची बुद्धि गुरफटलेली असते ११७.
त्याप्रमाणें खूप परिश्रम करून वस्तु अशा प्रकारची आहे, तशा प्रकारची
आहे अशा निर्णयापर्यंत येणाऱ्या माणसाच्या हातीं कांहींच येत नाहीं.
वस्तूचा बोध होतच नाहीं. ११८. सांगून किती सांगणार ? शब्दांनीं, आत्म-
स्वरूप जाणण्याच्या बाबतींत कांहीं मात्राच जेथें चालत नाहीं तेथें दृश्य,
द्रष्टा, दर्शन यांच्यांतील भेदांचें ज्ञानानें आत्मस्वरूपाचा बोध होईलच कसा ?
जाणीव होण्याच्या बाबतींत 'कांहीं न दिसणें' ही अंधावस्था जाऊन
वस्तूला द्रष्टेपण प्राप्त झालें आहे. ११९. १२०. त्याची बघण्याची स्थिति
लोप पावते. कारण तो स्वतःचें दृश्यत्व पाहण्यास असमर्थ आहे. १२१.
तेथें कोणाला आणि कोणी बघावयाचें ? भेटायचें ? दृष्टीला तरी पाहणेंपण
कसें मिळणार ? सारें कांहीं एकरस एकपणांत सामावलें आहे. १२२.
आपल्या कोणत्याहि धर्म नसण्याच्या स्थितीचें अपार वैभव बाजूस सारून
जो केवळ ज्ञानाच्या विलासासाठीं प्रकाशाचीं द्वारें खुलीं करण्यांत रमला,
जो सर्व त्रिपुट्या स्वतःच बनला. १२३.
प्रकरण सातवें ८१
दृश्याचिया सृष्टी । दिठीवरी दिठी ॥ उठलिया तळवटी ।
चिन्मात्रचि ॥ १२४ ॥ दर्शनऋद्धि बहुवसा । चिच्छेषु मातला
ऐसा ॥ जे शिळा न पाहे अरिसा । वेद्यरत्नाचा ॥ १२५ ॥
क्षणाक्षणीं नीच नवी । दृश्याची चोख मदवी ॥ दिठीकरवी
वेढवी उदार जे ॥ १२६ ॥ मागीलिये क्षणींचीं आंगें ।
पारसी म्हणोनिया वेगें ॥ सांडूनि दृष्टि रिघे । नवीया रूपा
॥ १२७॥ तैशीच प्रतिक्षणीं । जाणिवेचीं लेणीं ॥ लेवोनी
आणी ॥ जाणतेपणा ॥ १२८ ॥ तया परमात्मपदींचें शेष ।
ना कांहीं तया सुमास ॥ आणि होय येवढी कास । घातली
जेणें ॥ १२९ ॥ सर्वज्ञतेची परी । चिन्मात्राचें तोंडवरी ॥ परी
ते आन घरीं । जाणिजेना ॥ १३० ॥
या सर्व उत्पत्तीला एक चिन्मात्र परमात्माच मूलाधार आहे. मग विविध
दृश्यांनी युक्त अशी सृष्टी उत्पन्न झालेली असो किंवा ज्ञानापाठीमागें
अनेक ज्ञानें उदित झालेलीं असोत ! १२४. हीं बहुविध वैभवें निर्मिण्यात
चिदंश इतका रमला कीं त्या पूर्वीच्या सृष्टपदार्थरूप जुन्या आरशाकडे
त्याचें लक्षच जाईना ! १२५. क्षणाक्षणाला नवीन असणाऱ्या दृश्यांना तो
द्रष्टा आपल्या दर्शनरूप स्त्रीकडून तलम सुंदर वस्त्रें नेसवूं लागला. इतका
तो उदार आहे. १२६. मागील क्षणाचें दृश्य जुनें शिळें झालें म्हणून
ते तो ताबडतोब टाकून देतो व नवीन नवीन रूप पाहण्यात मग्न होतो.
१२७. प्रत्येक क्षणाला हा परमात्मा ज्ञानाचे नवे अलंकार घालून आप-
ल्याला दर्शनीय बनवितो. १२८. इतकें करूनहि त्या परमात्म्याला संतोष
होईना म्हणून ब्रह्माण्डाएवढ्या विस्तारानें विनटण्यासाठीं त्यानें कंबर
बांधली. १२९. केवळ परमात्म्याच्या स्वरूपांशीं ज्ञानाचें सर्व
प्रकार संबंधित होतात, पण त्या सर्वांचा परमात्म्याठायीं मुळींच अंश
नसतो. १३०.
सा. अ. ... ६
८२ सार्थ अमृतानुभव
एवं ज्ञानाज्ञानमिठी । तेही फाकतसे दिठी ॥ दृश्यपणें ये
भेटी । आपुलिया ॥१३१॥ तैं दृश्य मोटकें देखें । आपण स्वयें
दृष्टत्वें तोखे । तेचि दिठीचेनि मुखें । माजी दाटे ॥१३२॥ तेव्हां
घेणें देणें घटे ॥ परी ऐक्याचें सूत न तुटे ॥ जेवीं मुखींमुख
वाटे । दर्पणें केलें ॥१३३॥ आंगें आंगावरी पहुडे । चेइला वेगळा
न पडे ॥ तया वारुवाचेनि पाडें । घेणें देणें ॥१३४॥ पाणी
कल्लोळाचेनि मिसें । आपणांपें वेल्हावे जैसें ॥ वस्तु वस्तुत्वें खेळों
ये तैसें । सुखें लाहे ॥१३५॥ गुंफी ज्वाळाचिया माळा । लेइलियाही
अनळा । भेदाचिया आहाळा । काय पडणें आहे ॥ १३६ ॥
जगांत कोणालाहि ज्ञानाचा किंवा अज्ञानाचा हा व्यवहार दिसतो, पण
तो सर्व पाहण्यायोग्य करून आत्मा आपला आपणच दृश्य होऊन भेटतो.
१३१. आणि गंमत ही कीं, तें दृश्य बघून स्वतः द्रष्टाच संतुष्ट होतो, तेंच
दृश्यपण आणि द्रष्टेपण परमात्मरूपांत मिळून जातें. १३२. यांत दिल्या-
घेतल्याची कृती झाल्यासारखी वाटते, पण मूळच्या एकपणाला बाध येत
नाहीं. आरसा मुखाचें प्रतिबिंब दाखविण्याचें कार्य करूनहि मूळचें तोंड
कांहीं बदलत नाहीं. तें जाग्यावरच असतें. १३३. घोडा उभ्यानें झोप
घेतो पण त्याची झोंप संपल्यावर त्याच्या उभे असण्यांत कांहीं बदल होत
नाहीं. अगदीं तसेंच याच्या ठिकाणीं देण्याघेण्याचे सारे व्यवहार होतात.
१३४. लहरींच्या मिषानें जळ विलास अनुभवितें तशाच पद्धतीनें पर-
मात्मा सहजपणानें क्रीडा करीत असतो असें अनुभवाला येतें. १३५.
विस्तवानें ज्वालांचे हार गळ्यात घालून घेतले आहेत असें म्हणण्यानें
ज्यापासून ज्वाला निर्माण होतात त्या अग्नीच्या मूळ स्थितींत कांहीं बदल
तर नाहीं ना होत ? १३६.
प्रकरण सातवें ८३
कीं रश्मीचेनि परिवारें । वेढूनि घेतला थोरें ॥ तन्ही सूर्यासी
दुसरें । बोलों येईल ॥१३७॥ चांदणियाचा गिवसु । चांदावरी
पडलिया बहुवसु ॥ काय केवळपणीं त्रासु । देखिजेल ॥ १३८॥
दाळचिया सहस्रवरी । फाको आपुलिया परी ॥ परी नाहीं
दुसरीं । भास कमळीं ॥ १३९ ॥ सहस्रवरी बाहिया । आहाति
सहस्रार्जुनाराया ॥ तरी तो काय तिया । एकोत्तरावा ॥१४०॥
सौकटीचिया वोजा । पसरो कां बहु पुंजा ॥ परी तातूवीण
दुजा । भाव आहे ॥१४१॥ कोडीवरी शब्दाचा । मेळावा घरीं
वाचेचा ॥ मिनला तरी वाचा । मात्र की ते ॥ १४२ ॥ तैसे
दृश्याचे दाखले । नाना दृष्टीचे उमाळे । उठती लेखा वेगळे ।
दृष्टत्वोंचि ॥ १४३ ॥
प्रकाशाच्या किरणांनीं सूर्याला वेढून टाकलें आहे. अशा स्थितींत
तेथें सूर्याशिवाय दुसरा कोणी निर्माण होतो काय ? १३७. चंद्रम्यावर
चांदण्यांचा खूप उजेड पडला तरी चंद्रम्याला त्याची कांहीं कटकट होईल
काय ? १३८. आपणच हजारों दलांनीं विस्तार पावलें तरी कमळाच्या
ठिकाणीं कमळावांचून दुसऱ्या शब्दाचा प्रयोग नाहीं. १३९. सहस्रार्जुन
राजाला हजार हात आहेत म्हणून सहस्र हात, आणि अर्जुन एक, मिळून
हजार आणि एक हाताचा अर्जुन होईल का ? १४०. कोष्टयाच्या मागावर
सुताच्या पुष्कळ गुंड्या नीट ठेवणें तरी तेथें सुतावांचून दुसरें काय ? १४१.
वाणीच्या ठिकाणीं कोट्यावधि शब्द उत्पन्न झाले तरी तो सर्व शब्दसमुदाय
वाणीरूपच आहे. १४२. त्याप्रमाणें एका परमात्म्यावरच अनंत दृश्य पदार्थ,
अनंत दर्शनें (ज्ञानें) व त्यांचे अनंत द्रष्टे, या सर्व त्रिपुट्या कल्पित
आहेत; सर्व परमात्मारूपच तेथें भेदाचा लवलेश नाहीं. १४३.
८४ सार्थ अमृतानुभव
गुळाचा बांधा । फुटलिया मोडीचा धांदा ॥ जाला तरी
नुसधा । गुळाचि कीं तो ॥ १४४ ॥ तैसें हें दृश्य देखो । कीं
बहु होऊनि फांको ॥ परी भेदाचा नव्हे विखो । तेंचि म्हणवूनि
॥१४५॥ तया आत्मयाच्या भाखा । न पडोचि दूसरी रेखा ॥
जरी विश्वा अशोखा । भरलें आहे ॥ १४६ ॥ दुबंधी क्षीरोदकीं ।
वाने परी अनेकीं ॥ दिसती तरी तितुकीं । सुतें आथी ॥१४७॥
पातयाची मिठी । नुकालतां दिठी ॥ अवघीयाची सृष्टी । पाविजे
जरी ॥१४८॥ न फुटता बीजकणिका-। माजी विस्तारे वडु
असिका ॥ तरी अद्वैत फाका । उपमा आथी ॥ १४९ ॥ मग
माते म्यां न देखावें । ऐसेंही भरे हांवें ॥ तरी आंगााचिये विसवे।
सेजेवरी ॥ १५० ॥
गुळाची ढेप फुटून तिची अनेक खंडें म्हणजे भेद व प्रतीति झाली;
गुळांत भेदप्रतीति न होतां, तो गूळपणानें तसाच आहे. १४४.
परमात्मा द्रष्टा होऊन दृश्य पाहो किंवा आपण स्वतःचा पुष्कळ पुष्कळ
होऊन विस्तार करो, पण तितक्या रूपांनीं तो स्वतःच होतो म्हणून
भेदाला कांहीं विषय नाहीं होत. १४५. हें अनंत द्वैतानें भरलेलें जगत्
जरी सर्व परमात्मरूप आहे तरी परमात्मवस्तूच्या द्वैतपणाची जाणीव होत
नाहीं. १४६. गंगाजमनी वस्त्रामध्यें अनेक प्रकारच्या रंगांच्या तन्हा
दिसल्या तरी तितक्या प्रकारचे तंतु आहेत थोडेच ? १४७. जर पापण्या
उघडल्याशिवाय डोळा सृष्टि पाहू शकेल, १४८. किंवा बीज अंकुर
आल्याशिवाय सर्व वड विस्तार पावेल, तरच ह्या अद्वैत पसाऱ्याला एखादी
उपमा मिळेल. १४९. मग जसा आपणांस पाहूं नये अशी इच्छा उत्पन्न
झाली असतां तो आपल्या अंगच्याच शय्येवर विश्रांती पावतो म्हणजे
अधिष्ठानरूप होतो. १५०.
प्रकरण सातवें ८५
पातयाचीं मिठी । पडिलिया कींजे दिठी ॥ आपुलियेची
पोटीं । रिगोनी असणें ॥ १५१ ॥ कां नुदेलिया सुधाकरु ।
आपणपें भरे सागरु ॥ ना कूर्मी गिळी विस्तारु । आपेआप
॥ १५२ ॥ आवसेचिये दिवशीं । सतराविये अंशीं ॥ स्वयें जैसे
शशी । रिगणें होय ॥ १५३ ॥ तैसें दृश्य जिणतां द्रष्टे । पडिले
जैताचिये कुटे ॥ तया नांव वावटे । आपणपेया ॥ १५४ ॥
सहजें आवघेंचि आहे । तरी कोणा कोण पाहे ॥ तें देखणेंचि
आहे । स्वरूपनिद्रा ॥१५५॥ नाना न देखणें नको । म्हणे मीचि
मातें देखो ॥ तरी आपेआप विखो । आपैसें असे ॥ १५६ ॥
पापण्या बंद केल्यावर दृष्टी जशी आपल्यांत सामावून राहाते. १५१.
किंवा चंद्र उगवला नसतांना समुद्र जसा स्वतःत पूर्ण असतो, अथवा
स्वेच्छेनें कासवी सहज आपला विस्तार आपल्यांत सामावून टाकते. १५२.
अथवा अमावास्येच्या दिवशीं जसा चंद्र सतराव्या कलेंत म्हणजे मूळ
स्वरूपांत प्रवेश करतो, १५३. त्याप्रमाणें दृश्य जिंकल्यामुळे द्रष्ट्यावर
जिंकलेपणाचा आळ येतो, त्या जिंकलेपणाच्या आळाला स्वरूपांत ओहो-
टणें म्हणतात, म्हणजे मूळचें स्वरूप असणें हीच स्थिति कायम रहाते.
१५४. जर जगत् मूळचेंच ब्रह्मरूप तर कोणी कोणास बघावयाचें ? तेथें
अधिष्ठानें पाहणें आणि न पाहणें याशिवाय पाहुणेंपणानें आहे आणि या
स्थितीलाच योगनिद्रा असें म्हणतात. १५५. आतां व्यवहाराच्या भाषेत जें
न देखणें आहे, तें नको ! मी आपल्यासच बघून ज्ञानाचा व्यवहार करावा
असें वाटलें तरी पण त्या ज्ञानाच्या व्यवहारास विषय सहजपणें तोच
होतो. १५६.
८६ सार्थ अमृतानुभव
जें अनादीच दृश्यपणें । अनादीचि देखणें ।। हें आता काय
कोणें । रचूं जावें ॥ १५७ ॥ अवकाशेंशी गगना । स्पर्शेशी
पवना ॥ कीं दीप्तीशीं तपना । समंधु कीजे ॥ १५८ ॥ विश्व-
पणें उजिवडे । तरी विश्व देखे पुढें ॥ ना तें नाहीं तरी तेवढें ।
नाहींच देखे ॥ १५९ ॥ विश्वाचें असें नाहीं । विपायें बुडालि-
याहीं ॥ तन्ही दशा ऐशीही । देखताचि असे ॥ १६० ॥
कापुराही आधी चांदिणें । कीं तोचि न मखे तेणें ॥ तैसें केवळ
देखणें । ठायें ठावो ॥ १६१ ॥ किंबहुना ऐसें । वस्तु भलातिये
दशे ॥ देखतचि असे । आपणयातें ॥ १६२ ॥ मनोरथांचीं
देशांतरें । मनीं प्रकाशूनि नरें ॥ मग तेथें आदरें । हिंडे
जैसें ॥ १६३ ॥
कारण, परमात्मवस्तु दृश्यदर्शनरूपानें अनादीच शोभलीं आहे. मग
मग आतां दृश्य-द्रष्टा-भावाची कोणीं नवीन रचना करावयाची आहे कोठें ?
१५७. आकाशाचा अवकाशाशीं, वायूचा गतीशीं, अग्नीचे प्रकाशाशीं
वेगळें नातें कोणीं जोडावयास नको, कारण मूळचे दोन्ही एकच आहेत.
१५८. विश्वाचा प्रकाश झाला तरी निश्चयेंकरून विश्व पाहतो किंवा तें
विश्व नाहींसें झालें तरी तेवढा नाहींपणाही तो पाहतो. १५९. विश्वाची
उत्पत्ति व लय दोन्ही नाहींशीं झाल्यावर जी उरणारी स्थिति त्या स्थिति-
लाही पाहणारा तोच असतो. १६०. पांढरेपणा चंद्राच्या चांदण्याच्या
पांढरेपणानें माखलेला नाहीं तर तो स्वतःच पांढरा आहे, त्याप्रमाणें वस्तु
केवळ आपल्या ज्ञानस्वरूपानेंच आहे. १६१. फार काय वस्तु कोणत्याहि
काळीं आणि कोणत्याहि स्थळीं मनोराज्याची सृष्टि रचून त्या सृष्टीत
मनुष्य प्रेमानें हिंडतो. १६२-१६३.
प्रकरण सातवें ८७
कां दाटला डोळा डोळ्या । डोळाचि तारा होऊनियां ॥ स्फुरे
चोख म्हणोनिया । विस्मो नाहीं ॥ १६४॥ यालागीं एकें
चिद्रूपें आपणपया आपणपे ॥ देखिजे कां आरोपै । काय
काज ॥ १६५ ॥ किळेचें पांघरुण । आपजवी रत्ना कोण ॥
कीं सोनें ले सोनेपण । जोड जोडू ॥ १६६ ॥ चंदन सौरभ
वेढी । कां सुधा आपणाया वाढी ॥ कीं गूळ चाखें गोडी ।
ऐसें आर्थी हें ॥१६७॥ कीं उजाळाचे कीळे । कापुरा पुटीं
दिधले ॥ कीं ताऊनि ऊन केलें । आगीतें काई ॥ १६८ ॥
नाना ते लता । आपुले वेली गुंडाळतां ॥ घर करी न करितां
जयापरी ॥ १६९॥ कां प्रभेचा उभळा ॥ दीप प्रकाशे संचला ॥
तैसा चैतन्यें गिंवसिला । चिद्रूप स्फुरे ॥१७०॥ ऐसें आपणया
आपण । आपुलें निरीक्षण । करावें येणेंवीण । करीतूचि जसे॥१७१॥
अगर डोळा असा डोळाच चित्रविचित्र होऊन जसा नटतो; तसा शुद्ध
आत्मा सर्व त्रिपुट्या स्वतःच नटतो ह्यांत नवल नाहीं. १६४. मग आपणच
आपल्यास पाहिलें असा एकाच ज्ञानरूप आत्म्यावर आरोप करण्याचें काय
कारण ? १६५. रत्नावर कोणी प्रभेचें पांघरूण घालतो का ? किंवा सोने
काढून दुसरीकडून मागवून सोनेपणा आपल्या अंगावर घालतें काय ? १६६.
चंदनानें काय सुगंध पांघरलेला आहे किंवा अमृत आपल्याला चाखायला
अमृत स्वतःच वाढ करतें का ? गूळ आपली गोडी घेतो असे कांहीं आहे
का ? १६७. स्वच्छपणाच्या प्रभेनें कापुरावर पुट दिलें आहे का ? किंवा
अग्नीला तापवून ऊन केलें आहे काय ? १६८. अथवा वेल आपल्या
देहाच्या गुंडाळण्यानें जसें सहज घर करतें १६९ किंवा प्रभेच्या उत्क-
र्षानें दिवा जसा प्रकाशमान असतो, त्याप्रमाणें चैतन्याच्या व्याप्तीनें
चिद्रूप स्फुरतें. १७०. याप्रमाणें 'आपलें निरीक्षण आपण स्वतः करावे'
असा हेतु न ठेवतां निरीक्षण करीतच आहे. १७१.