सामग्री पर जाएँ
सर्वकोश
अमृतानुभव एवं चांगदेव पासष्टी (सन्त ज्ञानेश्वर - चिद्विलासवाद एवं अद्वैत अनुभूति सटीक)

अमृतानुभव एवं चांगदेव पासष्टी (सन्त ज्ञानेश्वर - चिद्विलासवाद एवं अद्वैत अनुभूति सटीक)

Amritanubhava and Changdev Pasashti of Sant Jnanadev

सन्त ज्ञानेश्वर / ज्ञानदेव महाराज द्वारा

DevanagariHindipublished138 पृष्ठ

पृष्ठ 83, कुल 138 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 83

८२ सार्थ अमृतानुभव
एवं ज्ञानाज्ञानमिठी । तेही फाकतसे दिठी ॥ दृश्यपणें ये
भेटी । आपुलिया ॥१३१॥ तैं दृश्य मोटकें देखें । आपण स्वयें
दृष्टत्वें तोखे । तेचि दिठीचेनि मुखें । माजी दाटे ॥१३२॥ तेव्हां
घेणें देणें घटे ॥ परी ऐक्याचें सूत न तुटे ॥ जेवीं मुखींमुख
वाटे । दर्पणें केलें ॥१३३॥ आंगें आंगावरी पहुडे । चेइला वेगळा
न पडे ॥ तया वारुवाचेनि पाडें । घेणें देणें ॥१३४॥ पाणी
कल्लोळाचेनि मिसें । आपणांपें वेल्हावे जैसें ॥ वस्तु वस्तुत्वें खेळों
ये तैसें । सुखें लाहे ॥१३५॥ गुंफी ज्वाळाचिया माळा । लेइलियाही
अनळा । भेदाचिया आहाळा । काय पडणें आहे ॥ १३६ ॥
जगांत कोणालाहि ज्ञानाचा किंवा अज्ञानाचा हा व्यवहार दिसतो, पण
तो सर्व पाहण्यायोग्य करून आत्मा आपला आपणच दृश्य होऊन भेटतो.
१३१. आणि गंमत ही कीं, तें दृश्य बघून स्वतः द्रष्टाच संतुष्ट होतो, तेंच
दृश्यपण आणि द्रष्टेपण परमात्मरूपांत मिळून जातें. १३२. यांत दिल्या-
घेतल्याची कृती झाल्यासारखी वाटते, पण मूळच्या एकपणाला बाध येत
नाहीं. आरसा मुखाचें प्रतिबिंब दाखविण्याचें कार्य करूनहि मूळचें तोंड
कांहीं बदलत नाहीं. तें जाग्यावरच असतें. १३३. घोडा उभ्यानें झोप
घेतो पण त्याची झोंप संपल्यावर त्याच्या उभे असण्यांत कांहीं बदल होत
नाहीं. अगदीं तसेंच याच्या ठिकाणीं देण्याघेण्याचे सारे व्यवहार होतात.
१३४. लहरींच्या मिषानें जळ विलास अनुभवितें तशाच पद्धतीनें पर-
मात्मा सहजपणानें क्रीडा करीत असतो असें अनुभवाला येतें. १३५.
विस्तवानें ज्वालांचे हार गळ्यात घालून घेतले आहेत असें म्हणण्यानें
ज्यापासून ज्वाला निर्माण होतात त्या अग्नीच्या मूळ स्थितींत कांहीं बदल
तर नाहीं ना होत ? १३६.