अमृतानुभव एवं चांगदेव पासष्टी (सन्त ज्ञानेश्वर - चिद्विलासवाद एवं अद्वैत अनुभूति सटीक)
Amritanubhava and Changdev Pasashti of Sant Jnanadev
सन्त ज्ञानेश्वर / ज्ञानदेव महाराज द्वारा
पृष्ठ 80, कुल 138 में से
संदर्भ में पढ़ेंप्रकरण सातवें ७९
विषयाचिया बरडी । अखंड घासती तोंडीं ॥ ते इंद्रियें गोडी
न घेपती हे ॥ १११ ॥ परी नाहींपणा सकट । खाऊनी भरलें
पोट ॥ ते कोणाही सकट । कां फावेल ॥ ११२ ॥ जो आप-
णासी नव्हे विखो । तो कोणा लाहे देखो ॥ जे वाणी न सके
चाखों । आपणापें ॥ ११३ ॥ हें असो नांवें रूपें । पुढासूनि
अमूपें ॥ जेथें आलीच वासिपे । अविद्या हे ॥ ११४ ॥ म्हणौनि
आपुलेंचि मुख । पहावयाची भूक ॥ न बाणे मा आणिक । के
रिघेल ॥ ११५ ॥ नाडिलें जे वादीकोडे । आतुचि बाहेरी सवडे ॥
तैसा निर्णो सुनाथा पडे । केला येथें ॥ ११६ ॥
विषयरूपीं जमिनीवर खडबडीत इंद्रियें तोंड घासतात, पण तीं
आत्म्याची गोडी घेण्यास असमर्थ आहेत. १११. ज्या परमात्मवस्तूनें नाहीं-
पणसुद्धां खाऊन टाकून आपलें पोट भरलें म्हणजे यावत् दृश्याभावाचें जो
ग्रहण करतो, तो परिपूर्ण आत्मा कोणास प्राप्त होईल ? ११२. जो आत्मा
स्वतःला विषय होत नाहीं, त्याला पाहण्यास कोणता अनात्मपदार्थ
समर्थ होईल ? जीभ आपला स्वाद घेऊं शकत नाहीं व तिचा स्वाद
दुसऱ्याकडूनहि घेतला जात नाहीं. ११३. हें असो. अविद्या पुष्कळ नाम-
रूपें पुढें करून ज्या परमात्मस्वरूपाच्या पुढें येतांच भयानें नाहींशी
होते. ११४. म्हणून ज्या ठिकाणीं आपलें स्वरूप पहाण्याचा संकल्प
देखील उठत नाहीं, तेथें दुसऱ्याचा प्रवेश होईल असें म्हणणें योग्य
आहे काय ? ११५. जुगारी चामड्याची वादी गुंडाळून त्यांत मध्यें
काडी घालून ती वादी ओढतो. पण शेवटीं पाहावें तर ती काडी त्या
गुंडाळींत कांहीं अडकलेली नसेलच. तो प्रयत्न फुकटच जातो. तसेंच
'इदम् इत्थम्' असें कितीहि वेळां जरी सांगितलें तरी आत्मस्वरूपाची
निश्चित ओळख पटणें कठीण आहे. तें बोलणें फुकट जातें. ११६.