अमृतानुभव एवं चांगदेव पासष्टी (सन्त ज्ञानेश्वर - चिद्विलासवाद एवं अद्वैत अनुभूति सटीक)
Amritanubhava and Changdev Pasashti of Sant Jnanadev
सन्त ज्ञानेश्वर / ज्ञानदेव महाराज द्वारा
पृष्ठ 78, कुल 138 में से
संदर्भ में पढ़ेंप्रकरण सातवें ७७
अगा चंद्रापासोनि उजळ । जेणें राखिले वस्तु धवल ॥ तयातें
काजळ । म्हणिजेत असे ॥ ९६ ॥ आगीचें काज पाणी ।
निफजा जरी आणी ॥ अज्ञान इया वाहणी । मानूं तरी ते
॥ ९७ ॥ कळीपूर्ण चंद्रमा । आणवूनि मेळवी आमा ॥ तरी
ज्ञान हें अज्ञान नामा । पात्र होइजे ॥ ९८ ॥ वोरसोनि लोभें ।
विष का अमृते दुभे ॥ ना दुभे तरी लाभे । विषचि म्हणणें
॥ ९९ ॥ तैसा जाणणेयाचा वेव्हारु । जेथे माखला समोरु ॥
तेथें आणिजे पुरु । अज्ञानाचा ॥ १०० ॥ तया नांव अज्ञान
ऐसें । तरी ज्ञान होआवें तें कैसें ॥ येन्हवीं कांहींच असे । आत्मा
काई ॥ १०१ ॥ कांहींच जया न होणें । होय तें स्वतां नेणें ॥
शून्याची देवांगणें । प्रमाणासी ॥ १०२ ॥ असें म्हणावया जोगें ।
नाचरे कीर आंगें ॥ परी नाही हें नलगे । जोडावेंचि ॥१०३॥
एखादी वस्तु स्वच्छ करून चंद्रापेक्षांहि उजळ केली तर तिला काजळ
असें म्हणतां येईल काय ? ९६. अग्नीचें काम जर पाणी करूं शकेल,
तर हें दृश्य अज्ञानापासून विस्तारलेलें आहे असें खुशाल मानावें. ९७. सर्व
काळांनीं नटलेला पौर्णिमेचा चंद्र जर दर्शन घडवील तर हें ज्ञान, अज्ञान,
या नांवाला पात्र होईल. ९८. विषानें अत्यन्त प्रेमानें पान्हा सोडला तर
तें काय अमृत देईल ? विषानें पान्हा सोडला तरी विषच दुभणार. ९९.
त्याप्रमाणें ज्या ठिकाणीं हा सर्व ज्ञानाचा व्यवहार प्रत्यक्ष ओतप्रोत भरलेला
दिसतो, त्या ठिकाणीं अज्ञानाचा पूर आला आहे असें म्हणणें कसें शोभेल ?
१००. ज्ञानाच्या सर्व व्यवहाराला अज्ञान म्हणतों तर ज्ञानाचें स्वरूप काय ?
वास्तविक सर्व ज्ञानरूप आत्माच आहे. १०१. ज्या आत्म्याला कांहींच होणें
नाहीं, त्या आत्म्याला 'मी आहें' 'इदमित्थम्' म्हणजे आत्मा असा किंवा
आत्मा शून्य आहे असा कोणताहि निर्णय करितां येत नाहीं अशी प्रमाणांनीं
शपथच घेतली. १०२. 'आहे' असें म्हणण्यासारखी आत्म्याला स्वरूप-
स्थिति नाहीं, मग 'नाहीं' हें म्हणायाचें प्रयोजन नाहीं. सारांश, 'आहे;
नाहीं' अशा दोहीं धर्मांनीं शून्य आत्मा आहेपणानेंच आहे. १०३.