भक्त नरसिंह मेहता: जीवन एवं पद (वैष्णव जन तो तेने कहिये - गुजराती से हिन्दी रूपान्तरण)
Bhakta Narsi Mehta: Jeevan Aur Pad
भक्त नरसिंह मेहता (सम्पादक: रामचन्द्र तिवारी) द्वारा
34 नरसी मेहता
या सहस्त्रपदांचा निर्देश स्वीकारून स्व. ईच्छाराम सूर्यराम देसाई नीं, राससहस्त्रपदी या
नावाने. या गीतांचा काव्यसंग्रह छापला होता. त्यांत १८९ पदें आहेत; त्यांपैकीं भागवतांतील
रासपंचाध्यायी च्या क्रमाने केवळ शरदपौर्णिमेची क्रीडागीते (रास शरदना पदो ) त्यांच्याशी
मिळती जुळतीं काही स्वतंत्र पदे तसेच इतरही तेच भाव असणारी पर्दे एकत्र करून. मी (लेखक)
रास सहस्त्रपदीनो समुद्धार या नावाने काव्यसंग्रह प्रसिद्ध केला. या काव्यसंग्रहांत ११३ पदांचा
समावेश होऊं शकला . याचे वास्तविक स्वरूप सर्व कथाप्रकारांचे वर्णन असेंच आहे. यांत
साधारण रासक्रीडा, कृष्णविरह, गोपींचा विरह, विलाप, आणि शेवटी श्रीकृष्ण मीलनानंतर
महारास, इतकी सलग कथा आहे. यांत भागवतपुराणांतल्या कितीतरीं श्लोकांचा सरळ, अगर
भावात्मक अनुवाद असणारी, पर्दे आहेत. तशी एकदम स्वतंत्र पण काहीं पदे आहेत.
'मधराते मधुरी मारे वालेजीए वांसलडी वाही रे.
कामिनी काम गेहेली थई रे शहु वृंदावन आई रे - १
शाशु - नणंदनी लाज तजीने भूषण अंगे सजियारे
रजनी रास रमे वा कारण जई जादवने भाजिया रे - २
नयणभरी निररण्यो नंदनंदन अबला आनंद पायीरे
नरसियाच्यो स्वामी वृंदावन केल करे महाकामी रे
(प्रिय कृष्णाने मध्यरात्री अत्यंत मधुर बासरी वाजवली. काम-विव्हल होऊन सगळ्या
कामिनी वृंदावनांत आल्या. सासू नणंदांची मर्यादा सोडून त्यांनी अंगावर दागदागिने घातले
आणि नटून थटून रात्रीची रासक्रीडा करण्यासाठी यादवांची प्रार्थना केली(२) नंदनंदनाला
डोळे भरून पाहिलें आणि त्या अबला खुष झाल्या. नरसिंहाचा स्वामी (श्रीकृष्ण) महाकामी,
वृंदावनांत क्रीडा करतो)
चातुरी काव्यांत कुठेकुठे कवीने स्वतःचे सांनिध्य वर्णन केले आहे. तसेच खालील काव्यांत,
आढळते-
झांझरनो झणकर मनोहर रंग जाम्युं म्हाझम रचणी रे
त्रिकमनी ताली दिया तरुणी चतुर-चपल-मृगनयनी रे - ?
विठ्ठलने वश करना कारुण्य नाना भाव धरंतीं रे,
नयने-कटाक्षे मोह उपजायें मुखि नरकला करती रे -२
गोपी मेल करे. गोविंदस्यु तन-मन-धन सों सीपी रे
भणि नरसैयो, तृप्ती न पामूं, जोतो गोव्यंद गोपी रे -३
(पैंजणाचा झणकार मन मोहून टाकणारा आहे. कृष्णाने रचलेल्या रासक्रीडेंत काय रंग
जमला आहे. चतुर, चपल, मृगनयनी तरुणींनी, कृष्णाला टाळ्यांचा ताल दिला. विठ्ठलाला
आख्यान मूलक काव्य 35
आपलासा करण्यासाठी नानातऱ्हेचें भावदर्शन करताहेत. नयन कटाक्षांनी मोहवित आहेत.
आणि मुखाने मंदहास्य करीत आहेत. गोपींनी, एकत्र जमून, गोविंदाला तनमनधन अर्पण केले.
नरसिंह म्हणतात गोविंद आणि गोपी पाहून मन तृप्त होतच नाही.)
कवीची खरी तन्मयता खालील पदांत पहायला मिळते -
दिवेटिऊ रे दिवेटिऊं नरसैं हरि केरो दीवेटीयो
पुरुष प्रीत धरी मन माहे तो रसनाए रसभरियो
जवती जुथ जीवन रंगराती मंडलमां महालंती रे
इक नाचे इक तान मिळावे मधुरूं मधुरू गाती रे
मनगमतु भोगवतां भामा करि नेणना चाळोरे
नरसैयानु पऊथपणुं रे जाणे प्युं ते वेलां रे -
(दिवटीवाला रे, दिवटीवाला, हरीने नरसिंहाला दिवटी वाला केला आहे. मनात, पुरुष प्रीती,
उत्पन्न झाली आणि जीभ रसमय झाली (पुरुष म्हणजे एकच कृष्ण )
कोणी नाचत आहे. कुणी तान देऊन मधूर मधूर गात आहे. मनपसंत क्रीडेचा आनंद
भोगताना, सुंदरी डोळ्यांचे चाळे करीत आहेत. त्या वेळी नरसिंहाचे पुरुषपण नाहीसे
झाल्यासारखेच झाले.)
शिवाय त्याच्याही पुढे
धनि-धनि गोपी, धनि धनि लीला धनि जे रसमां माहाले रे
उमिलाखरनी बांहे वलप्यो नारसैं दीवी झाले रे-
(धन्य धन्य गोपी, धन्य धन्य त्यांच्या लीला, यां रसांत आनंद घेणारे धन्य, शंकराला मीठी
मारून नरसिंहानी दिवटी धरली )
वर्णन दृष्ट्या एक सुमधुर स्वतंत्र पद-
वृंदावनमा रच्यो अखाडा, नाचे गोपी ने गोपाल
नाल्, पखवाज-रबाब विसली, तान मिळावे नंदनुलाल -१
सुंदर रात्य शरद-पून्यमनी, सुंदर उडियो नभमां चंद
सुंदर गोपी-कंचनमाला, विचिमा मरवामणि गोल्यंद -२
झलके कुंडल राखडिआरे, लरके परय मोती-माल
रमझम रमझम नेपूर वाजे आनि मारकलडां करती बाल्य -३
हरख्या सुरिनर, मुनिजन पुष्पि, वधावे त्यांह आणि परखरियो
जय जय देव यशोदानंदन्, नरसैओ लहां दीवेटीयो -४
(वृंदावनांत अड्डा जमवला. गोप गोपी नाचत आहेत. ताल, पखवाज, ढोलके, आणि बांसरी
36 नरसी मेहता
वाजत आहे, नंदकुमार त्यांच्या तालावर गाण्याची तान मिळवीत आहे-१ शरद पोर्णिमेची
सुंदर रात्र आहे, आकाशांत सुंदर चंद्र उगवला आहे. सुंदर गोपींची सुवर्णमाळ (दिसते आहे)
आणि मधे गोविंद पाचूमणी (प्रमाणे शोभत आहे) कुंडले आणि राख्या झळकत आहेत, छातीवर
मोत्यांची माळ रुळत आहे. नूपूर रुमझुम रुमझुम वाजताहेत आणि गोपी बालिका स्मितहास्य
करीत आहेत-२. देव, मानव, मुनी, एकत्र होऊन तिथे जाऊन पुष्पवर्षाव करीत आहेत. जयदेवा,
यशोदानंदना, तुझा जयजयकार असो - तिथे नरसिंह पणती घेऊन उभा आहे.)
शरदऋतुतील क्रीडागीते, याहूनही, मधुर वर्णनात्मक आणि सुलभ आहेत. या गीतावलींचा
कीतीतरी भाग भावगीतांत मोडेल असा आहे जो योग्य वेळी पुढे दिला आहे. वर्णनात्मक पद
असो अगर भावगीत असो, नरसिंहाची कवीप्रतिभा दोन्ही प्रकारांत फुलून आलेली अनुभवास
येते.
५ श्री कृष्णजन्मसमयांनां - ६ श्रीकृष्णजन्मवधाईना आणि ७- बाललीलांनो पद
( ५ श्रीकृष्ण जन्म वेळची - ६ श्रीकृष्णजन्मसमारंभाची आणि ७- बाललीलांची पदे )
वास्तविक ३ प्रकाराची ही पदावली, कृष्णलीला सुरु होण्यापूर्वीची, भागवतांतील
दशमस्कंधाच्या प्रारंभीची आहे. यांत कृष्णजन्म- आणि कृष्णजन्मसमारंभाची पदें अशी आहेत,
की स्वतंत्र वर्णनात्मक ग्रंथ लिहिण्याची प्रवृत्ती तीं गीते दाखवत आहेत.
श्रीगुरुने प्रणाम करीने वर्णवुं श्रीजदुराय
श्री कृष्णनी लीला सांभळतां पातिक दूर पलाय
(श्री गुरुला वंदन करून श्री यदुराज (श्रीकृष्णाचें) मी वर्णन करतो. श्री कृष्णांच्या लीला
ऐकल्या की पातके दूर पळतात.)
कृष्णाच्या बाललीलांच्या पदांत, त्याचे बालसुलभ खेळ, गोपींच्या
आख्यान मूलक काव्य 37
वाडकामा पाणी घाली चांदीलिये दारण्यों
नरसिंयानो स्वामी शामळिओ, रडतो तव राख्यो -४
(आई, तो तिथला चांदोबा, मला खेळायला दे, आई, नक्षत्र आण आणि माझ्या खिशांत
टाक. (१) चंद्राकडे पाहून (कृष्ण) रडत राहिला. रात्र झाली. यशोदा माता कृष्णाचे अश्रु पुसत
राहिली. (२) लोक विलक्षण बालकां तूं काय वेडा झाला आहेस का ? चंद्र आकाशांत छान
दिसतो. तो कसा बरं घ्यायचा. (३) मोठ्या वाडग्यात पाणी घालून त्यांत चंद्र दाखवला
(कृष्णाला) तेव्हा नरसिंहाचा स्वामी श्यामसुंदर रडायचा थांबला.)
वात्सल्याच्या नमुन्यांपैकी हे एक गीत -
माता रे जशोदा हरिने घूमण घाले,
आनंद उलटे उभी वदन निहाले -१
घम घम घमके घुघरी हुंकारा करे
जोई जोई जनुनीनुं मनुडं ठरे -२
जहैन काजे महामुनी देह रे दमे
ते तो कृष्णाजी पारणांमां रंगे रे रमे -३
सुंदर वदन जोई चुंबन दिधु
नरसैंयाच्या स्वामी जोतो कारण सीयुं
(माता यशोदा हरीला (पाळण्याचा) झोका देते. उभी राहून हरीचे तोंड पाहते, तिचा आनंद
उफाळून येतो -१ खूप खूप, रुणझुण रुणझुण आवाज येतो, घुंगुर हुंकार देतात (जसे) त्याला
पाहून पाहून आईचे मन अगदी तृप्त होते आहे-२ ज्याच्या साठी महान मुनी देह झिजवतात,
तो श्रीकृष्ण तर पाळण्यांत खेळतो आहे आणि मजेत आहे. सुंदर मूख पाहुन पापा दिला
नरसिंहाच्या स्वामीचे दर्शन घेतां कार्यसिद्धी झाली “जल कमल छांडी जाने बाला, स्वामी
अमारो जागशे ” हे “कालिया दमना” चे नरसिंहाचे पद खूप प्रसिद्ध आहे. व्रजभाषेचे
अष्टछापीय भक्तकवी सूरदासांचे 'सूरसागर' नावाचे खंडकाव्य आहे. त्यांत नरसिंहाच्या या
'कालियादमन' काव्याचे व्रजभाषिय रूप आढळते. इतके हे काव्य लोकव्यापक बनलेले
दिसते. याशिवाय निमाडी लोकभाषेत एका लोकगीताच्या स्वरूपात या पदाचे सरळ किंवा
अप्रत्यक्ष रित्या अनुकरण केलेले दिसते.तसेच अनुकरण. 'गुण सागर सुरि' ची छाप असलेल्या
एका मारवाडी भाषेतल्या पदांत पण आढळते. एक छोटे सुंदर संवादकाव्य हे इथे पहा - जसे-
जल कमल छोडी जाने बाळा, स्वामी अमारो जागशे
जागशे, तने मारशे, मने बालहत्या लागशे-
कहे रे बालक तुं मारग भूल्यो के तारा वेरीए वळावियो
38 नरसी मेहता
निश्चय तारो काळ ज खुट्यो अहियां ते शीद आवीयो ?
नथी नागण हुं मारग भूल्यो नथी, मारा वेरीए वळवियो,
मथुरा नगरीमां जुगटुं रमतां नागनुं शीश हुं हारियो
रंगे रूडो, रूपे पुरो, दिसंतो कोडीलो कोकामणी
तारी माताए केटला जन्म्या तेमां तु अणखामणी ?
मारी माताए बहु जन्म्या
जगाड तारा नागने मारुं नाम कृष्ण कहनडो
लाख सवानो मारो हार आपुं, आपुं रे तुजने दोरियो
एटलु मारा नागथी छानुं आपुं तुजने चोरियो
शुं करूं नागण हार तारो, शुं करु तारो दोरीयो
शाने काजे नागण तारे, करवी घरमां चोरियो -
चरण चांपी, मुछ मरडी नागणे नाग जगाडियो ,
उठोने बळवंत कोई बारणे बालक आवियो -
बेऊं बळिया बाथे वळगिया कृष्णे कालिनाग नायियो
सहस्त्रफेणां फूकवे, जेम गगन गाजे हाथियो-
( बाळा, हे कमळ सरोवर सोडून जा, आमचा पती जागा होईल, तुला मारील आणि मला
बालहत्येचे पातक लागेल. मला सांग बाळा तूं वाट चुकलास, की तुझ्या वैऱ्याने तुला इथे
(फसवून) पाठवले ? नक्की तुझें आयुष्य संपले- तूं इथे आलास कुठून ? हे नागिणी, नाही मी
वाट चुकलो नाही. मला वैऱ्याने इकडे पाठवले. मथुरेत सोंगट्या खेळतांना 'नागाचे डोके' मी
हरवले. सुंदर रंग पूर्ण सौंदर्य असलेला तूं मोठा नटून थटून आला आहेस. तुझ्या आईने किती
मुलांना जन्म दिला ? तूं आवडता आहेस कां ? माझ्या आईने दोघांना जन्म दिला, त्यांत मी
'नटवर' छोटा . तूं तुझ्या पतीला उठव . माझे नांव कृष्ण कन्हैया आहे. माझा सवा लाखाचा
हार मी तुला देते- तुला मी गोफ (सोन्याचा) देते. माझ्या पतीपासून लपवून इतके मी तुला चोरून
देते. नागिणी तुझ्या हाराचे तुझ्या गोफाचे मी काय करूं नागिणी कोणत्या कारणासाठी तुला
घरांत चोरी करायची आहे ? पाय आपटून मिशी पिळून नागिणीने नागाला उठवले, अरे उठ
बळवान् ! दाराशी कुणी बालक आला आहे. दोघे बळवान् एकमेकांना बाहूंनी आवळून, लढूं
लागले, कालिया कालीया नागाला कृष्णाने वेसण घातली (ताब्यात आणले) . आकाशांत
हत्तींची गर्जना घुमते त्याप्रमाणे हजारो फणांनी कालिया नाग फुत्कार सोडायला लागला.)
(८) वसंत नां अने हींडोळाना पद
(वसंत ऋतुची आणि झोपाळ्याचीं पदे )
आख्यान मूलक काव्य 39
या पदावलीत कवीचे वसंत आणि वर्षा ऋतूतील कृष्णाचा विहार वर्णन केला आहे.
वर्षाऋतुतील विहारपण वसंत ऋतुतील विहाराप्रमाणे वनविहार च आहे. पण यांत खास करून
झाडांच्या फांद्याना झोपाळे बांधून झोके घेणे अशा प्रकारचे वर्णन आहे. नरसिंहाना शास्त्रीय
रागांची उत्तम माहिती होती. त्यांनी दोन्ही ऋतूंतील पदांना अनुकुल असे राग दिले आहेत.
उदा. वसंतऋतुतील पदे वसंत रागांत आणि झोपाळ्यावरची पदे मल्हार आणि केदार जशा
रागांत लिहिले आहेत. या पदांत कितीतरी भाग वर्णनात्मकच आहे. जसा -
वसंत रत्यनी बहु बलिहारी, नार्य निरंकुश फाग रमे
माधव सखा सहित ग्रह ग्रह प्रति ज्यम अंबूज-वन भ्रमर-भगे - १
मनभावना वचन परस्पर विनता-वृंद विलास को,
लडशडतो लाडयलो लघुवर पाई पाई सहने बाथ भरे -२
कनक-कलश केसर रस परिभरि पाछल मस्तक ढोले
करतल बरी शिखंडी अगररस मुखलोचन उपर्य रोले -३
सासू नणंदी डाहां डमरां मरजादां अनुशरतो
ते कहे बहुवर चालो रमियो आडा घूंघट जे धरतां -४
नार्सिया च्यो स्वामी नित्य नवली परय विचित्र लीलाकेल्य करे
ए लहरिओ झडमां आवे पुरुष लखण तेहेन विशरे -५
(वसंत ऋतुची मोठी खुशी आहे, स्त्रीया अनिर्बंध होळी खेळतात. कमळांच्या ताटव्यात
भ्रमर जसा विहार करतो, तसा एकेकीला घेऊन माधव सखा क्रीडा करतो.-१
एकमेकांशी मनपसंत गप्पा करीत स्त्रीवृंद क्रीडा करीत आहे. मनमौजी लाडका कन्हैया
आळीपाळीनी सर्वांना मिठ्या मारतो-२
सुवर्ण कलशांत केशरांचे पाणी भरभरून पाठीकडून डोक्यावर ओततो. ओंजळीत,
गोपीचंद आणि चंदनाचा लेप भरून तोंडाला आणि डोळ्यांना फासतो -३ सासू आणि नणंद
समंजस आणि नव्या पालवीने भरलेल्या होळीक्रीडेत सामील होऊन घुंघटाच्या आडून
विनयपूर्वक म्हणतात. 'वहुवर (कृष्ण) चला खेळूंया -४ नरसिंहाचा स्वामी नित्य नव्या प्रकारची
विचीत्र क्रीडा खेळत राहतो. या क्रीडा गुंगीच्या वादळांत (क्षेत्रांत) जो येतो तो आपले पुरुषपण
विसरतो.)
अशाच प्रकारे हिंडोळ्याच्या पदात पण वर्णनाचा असा प्रकार पहायला मिळतो
हिंडोला बांध्यो रे वृंदावन् हींचोले व्रजनारी रे
केसर कामिनी कांनने छाटे उनमदपणे उबारी रे -१
वाजा वाजे झोझर नेपूर, घूघरडी घमकार रे
40 नरसी मेहता
अवील गुलाल उछाले अबला उलट अंग्य अपार रे -२
श्रावणमास शुहामणो रे, सुंदर जमनातीर रे
सुरिनर लोक मळीने आल्यां जोवा हलधर-वीर रे -३
गान करे गोपी शुं मळीने काहान कामिनी राती रे -
आलींगन चुंबन घे चतुरां अधुर अप्रतरस पाती रे -४
हींची हाम हैयानी पोहोती, पोती मननी आश रे
हींडोलो राख्यो लक्ष्मीवर, हुं छुं तमारी दासी रे -५
मरकलडे मोहनजी मोह्या रह्या भीतर लीधी रे,
नरंसिया स्वामी भले मालियो आप सरिखडी कीधी रे -६
(वृदावनात झोपाळा बांधला आहे, आणि त्यावर वज्रसुंदरी झोके घेत आहेत. केशर,
भरभरून घेऊन कामिनी अधिरपणाने कन्हैयावर उडविला आहेत. (१) बाजा , पैंजण नूपूर
वाजत आहेत. घुंघुराचा आवाज होतो आहे, स्त्रीया अबीर आणि गुलाल उधळत आहेत. अंगात
अपार उल्हास आहे. (२) श्रावणमास सुंदर, यमुना तीर सुंदर, देव मानव सर्व जमून बलराम
आणि कृष्णाला पहायला आले (३) कान्हां आणि गोपी मिळून काय सुंदर गाताहेत. रात्र कामिनी
झाली आहे. या चतुरा गोपी आलिंगन देताहेत, चुंबन घेऊन ओठावरचा अमृतरस पीत आहेत
(४) हिंमत करून घेतलेला झोका (कृष्णाच्या) हृदयापर्यंत पोचला. मनातली आशा पुरी झाली -
श्रीकृष्णांनी झोपाळा थांबविला. मी तुमची दासी आहे. (असे कामिनी म्हणाली) तिच्या
स्मितहास्याने मोहन मोहून गेले आणि त्यांनी तिला उराशी घट्ट आवळले. नरसिंहाचे स्वामी
भेटले, फार आनंद वाटला. तिला त्यांनी (कृष्णांनी) आपल्यासारखीच केली)
वसंत आणि वर्षाऋतुंच्या या पदावलीत, त्या त्या ऋतूचे आणि त्या त्या वनक्रीडेचे हुबेहुब
उभे करण्याची कवीची हातोटी, आपल्याला आकर्षीत केल्याशिवाय राहत नाही. सरळ शब्दांत
म्हणजे नरसिंह प्रत्येक वेळची घटना, स्वाभाविक स्वरूपात मूर्त करून दाखवतात.
यांच्या सर्व पदसाहित्यांत परलक्षित वर्णनात्मक गीतांचे प्रमाण फारसे नाही. मनांतल्या
भावमय आत्मलक्षीत उर्मीचे यांच्या गीतात खूप प्रमाणात दर्शन होते. हा विषय भावगीतांत
मोडतो, म्हणून या नंतर योग्य वेळी तो सांगायचा आहेच.
४ ज्ञानी भक्त उपदेशक
ब्रज प्रदेशांतील वृंदावनीय भक्तींत दंग झालेल्या कवीकडून सिद्धांतवादी साहित्याची
आशा करणे चूकच आहे. नरसिंहाच्या उत्तरकालांतील व्रजभाषिय अष्टछाप कवींनीं तसेच
यांच्या पूर्वकालीन, बिहारच्या विद्यापती आणि त्यांच्याही पूर्वीच्या महानुभाव पंथाच्या कवीनीं,
या तऱ्हेचे (सिद्धांतवादी) साहित्य लिहिलेले आढळत नाही. वारकरी सांप्रदायाच्या नामदेव
कवींनी लीनात्मक काव्य लिहिलें नाही. सैद्धांतिक पदे लिहिली पण त्यांत शब्दलालित्य
नाही. कबीरांच्या शेकडों पदांत वाक्चातुर्य, सहजपणे सांपडते. नरसिंह महेतांची उपदेशपर पदें
थोडी आहेत आणि त्यांत शब्दलालित्याचा वेग मर्यादित आहे. यांची ज्ञानभक्तिपर पदें पाहिलीं
तर केवळ शब्दलालित्याचा वेगच नव्हे तर काव्यतत्त्वाचा रोचक अनुभव मिळतो. नरसिंहाच्या
ज्ञत्व-भक्ती उपदेश पर साहित्याचे आपण तीन भाग पाडूं शकतो.
१ वैष्णव लक्षण २ वैराग्य बोध, भक्ती, आणि ज्ञानोपदेश ज्यांत आहे असा 'उपदेश' आणि
३ शुद्ध तत्त्वदर्शन ज्यांत काव्यचमकृती भरपूर आहेत.
१) वैष्णव लक्षण
यांत वैष्णव किंवा प्रभुभक्त कसा असला पाहिजे याचा गुणनिर्देश करुन, विचार मांडला
आहे. महात्मा गांधीजींनी 'राष्ट्र भक्ती गीत' म्हणून प्रतिष्ठित केलेलें आणि आज संपूर्ण भारतात
आदरणीय झालेले हें पद याचा सूचक नमुना आहे.
वैष्णव जन तो तेणे कहिये
जे पीड पराई जाणे रे
परदुःखे उपकार करे, ने मन अभिमान न आणे रे -१
सकल लोकमां सहु ने वंदे, निंदा न करे केनी रे
वाच काछ मन निर्मल राखे धन धन जननी तेनी रे -२
समदृष्टी ने तृष्णात्यागी, परस्त्री जेने मात रे,
जिव्हा थकी असत्य न बोले, परधन नव झाले हाथ रे -३
42 नरसी मेहता
मोह माया व्यापे नाहिंतेने, दृढ वैराग्य जेने मनमां रे
राम नाम शुं ताळी रे लागी, सकल तीरथ तेनां तनमां रे - ४
वण लोभी ने कपट रहित छे, काम क्रोध निवार्या रे
भणे नरसैय्यो तेनुं दरशण करतां कुल एकोत्तर तार्या रे -५
(दुसऱ्यांचे दुःख जो ओळखतो, त्याला वैष्णव म्हणावे दुसऱ्यांच्या दुःखात जो उपकार करतो,
परंतु मनांत त्याचा कधीही अभिमान बाळगत नाही.(१) जो सर्व ठिकाणी सगळ्यांना वंदन
करतो, कोणाचीही निंदा करीत नाही - काया वाचे, मने करून जो निर्मल असतो, त्याची माता
धन्य धन्य आहे (२) जो समदृष्टी आहे आणि ज्याने आसक्तीचा त्याग केला आहे, परस्त्री ज्याला
मातेसमान आहे. असत्य वाणी जो उच्चारित नाही, परद्रव्याला जो शिवत नाही (३) मोह माया
ज्याला नाही, आणि ज्याच्या मनांत दृढ वैराग्य आहे, राम नामात जो तल्लीन आहे, त्याच्या
मनात सर्व तीर्थे आहेत. (४) जो लोभ विरहित आणि कपटरहीत आहे, ज्याने काम क्रोधाचें
निवारण केले आहे, नरसिंह म्हणतात, याचे दर्शन ज्याने घेतले. त्याची ७१ कुळे तरली.
'वैष्णव जनने विषयथी ठळवुं' आणि 'वैष्णव जनने विरोध न कोई शुं' जशी लक्षणात्मक
पदें आणि वैष्णव ते जे स्नेहमार्गी हरि शुं खरो अभिलाख' अशी पण लक्षणात्मक गीते आतां
ज्ञात आहेत. खालील पद काव्यतत्त्वाने भरलेले आढळते -
संतो, अमे रे वेवारिया श्रीरामनामना
वेपारी आने छे बधा गामगामना
हमारुं वसाणुं साधु सरु कोने भावे
अठारे वरण जेने हारवाने आवे-
हमारूं वसाणुं काळ दुकाळे न खुटे
जेने राजा न दंडे, जेने चार न लूटे
लाख विनाना लेखा नही, ने पार विनानी पूंजी
होखी होय तो होरी लीजो कस्तुरी रे सोंधी
राम नाम धन हमारे, वाजे ने गाणें
छप्पन उपर भेर भेरी भुंगक वाजे -
आवरो ने खातावहीमां लक्ष्मीवरनुं नाम
चीतमां चतुरभुज लाखिया, नरंसियानुं काम -
(संत जनहो, आम्ही रामनामाचे व्यापारी, गावगावचे सगळे व्यापारी येत राहातात. आमचा
माल (वसांणु औषधी पाक) साधुना आणि सर्वानाच आवडतो. अठरा वर्णाचे लोक ज्याला
संपवायला येतात, तो आमचा औषधी पाक (माल) कोणत्याही काळी, दुष्काळांतही संपत नाही.
ज्ञानी भक्त उपदेशक ४३
त्याला राजा दंडीत नाही, चोर लुटीत नाही. याची नोंद लाखांचीच असते. याच्या भांडवलाला
पार नाही घ्यायचे असेल तर भरभरून घ्या कस्तुरी स्वस्त आहे. आमचे धन रामनाम आहे.
त्याचा मोठा गाजावाजा आहे.(याच्या गुणवर्णनात) भेर भेरी पिपाण्या वाजतात, त्यांची संख्या
५६ च्या वर असते. आवका आणि हिशोबाच्या वहीत, लक्ष्मीवराचे नाव आहे. मनांत चतुर्भुजाचे
नाव लिहीणे, नरसिंहाचे काम आहे.) - यांत एकही लक्षण उघडपणे निर्देश केलेले नाही - परंतु
प्रभुनामाचे अहर्निश जप काव्यात्मक भाषेंत मनोरंजक केला आहे. एकापदांत नकारात्मक
रितीने लक्षण सांगितले आहे.
वास नाही ज्या वैष्णव केरो, त्यां नव वासिये वासडियो - श्वासोश्वास हरिस्मरण न करे जो,
श्वास धमण केरी श्वासडिया -जिभलडी जपमाला न जपे, तो जीभलडी नही खासडिया - जनम
तेनो नहि लेखामां, जे न केहेवाय हरिदेसडिया-मोहनजीनी माया पारवे अवर माया जम
-फासडिया भणे नरसैंयो भारे मारी मावलडी दश मासडिया -
(जिथे वैष्णवाचें वास्तव्य नाही, तिथे मुरलीवाला राहात नाही, जो श्वासाश्वासा बरोबर
हरिस्मरण करीत नाही, त्याचा श्वासोश्वास म्हणजे भात्याचा श्वासोश्वास आहे. जिभेने वाणीने
जो नामस्मरण करीत नाही, ती जीभ नाही. जो स्वतःला हरीचा दास म्हणवत नाही, त्याचा जन्म
लक्षात घेण्याजोगा नाही. मोहन च्या प्रेमापुढें इतर प्रेम, नसून फास आहे. नरसिंह म्हणतात
माझ्या आईने माझा भार १० महिने (व्यर्थ) वाहिला )
आपल्याला वाटते कवी कांही उपदेश करूं पहात आहे, पण खोलवर विचार केला की,
समजते यांत हरिस्मरण जप शरणभावना, प्रभुवर आत्यंतिक प्रेम हींच लक्षणे सांगितली आहेत.
साधी गोष्ट काव्यमय करून, काव्यप्रतिभेने तेजाळ करायची हे नरसिंह महेतांचे वैशिष्ट आहे.
२) उपदेश - नरसिंह महेतांच्या उपदेशपर काव्यांची संख्या फारशी मोठी नाही. त्यात
साधा उपदेश, ज्ञान भक्ती वैराग्याचे महत्त्व सांगणारा उपदेश तसेंच विशिष्ट कृष्णभक्तीच्या
अनुसंधानात उपदेश आणि काही शिकवण्याच्या उद्देशांनीं रचलेली पदे, यांचा समावेश होतो.
“रेहेत रजनी ज्यारे पाछली खटपडी, ” “जो गमे जगतगुअरवे जगदीशने” वगैरे पर्दे साध्या
उपदेशाची आहेत. नरसिंह अशा तऱ्हेच्या पदांतही 'काव्यप्रकाराचा' अवलंब करतात. जसे -
देती वेळांमा हाथ वावरी लेजो, आगल लाफा लोळ नथी
आज छे एक काव्य नथी, काळे छेतरिया मोटा छत्रपती
मनसा देही देवताने दूर्लभ, एवं रे जाणीने लगे भजो रे हरी
पशु पंखीमां अवतरशो, पछे दानपुण्य नहि थाय फरी
लख चौरासिमां फरी पडशो, जमदूत आवे तेने शुं केहेरमे ?
44 नरसी मेहता
हाड्य् छेड् करिने सौको हांकशे एवा अवतार तमे केम रे सहरमे
कर्म तणो कांकरो काढी नारण्या, माथे मरण तणी छे मोठी घाटी
भणे नरसैयो भजन करी ल्यो, पलवट वाळीने थावो माटी
( द्यायच्या वेळी (दान) हातांचा वापर करा (मुक्त हस्ते दान करा ) पुढे कांही भानगड नको.
आज आहे तसे उद्या नाही - मोठ्या राजेरजवाड्यांना काळाने फसवले आहे. मनाने, देहाने
आणि देवताना दुर्लभ, हे ओळखून, तुम्ही हरीला भजत जा - पशू पक्ष्यांच्या जन्माला याल तर
परत दानाचे पुण्य मिळणार नाही. चौऱ्यांशी लाख योनीत पुन्हा पडाल, यमदूत येतील, त्यांना
काय सांगाल ? सगळेजण तुला, तिरस्कार करून, त्रास देऊन हाकलतील असा जन्म तुला
कसा से सहन होईल ? कर्मातल्या अडचणी दूर केल्या तरी मृत्युत कटोकटी-विघ्न आहे.
नरसिंह म्हणतात, भजन करून घे (भक्ती कर) आणि कमर बांधून खंबीरपणे तयार रहा )
फक्त ज्ञानोपदेश देणारी “ज्यां लगी आतमा तत्त्व चिन्यो नही,” “एक तुं एक तु एम सौ
को स्तवे” अशी पदे थोड्या प्रमाणांत आहेत. भक्तीमूलक पदांची संख्या पुष्कळ आहे. खालील
पदांचे लक्ष्य ‘भक्तियुक्त ज्ञान’ आहे, हे पहायला मिळते.
'जाय छे जुनानी, तारी जाय छे जुनानी
हरिना भजन विना जाय छे जुवानी -
काया तारी कंचन जेवी, मोती जेवा पाणी
मुआ केडे बाळी मुकशे उडी जये काहनी
जती रेहेशे जुवानी ने पछी थाशे हाणि
छावा माना जमडा आवशे लेइ जशे ताणी-
माटे तमो माया तजी थाओने ज्ञानी
नरसैयांनो स्वामी साचो, दुनिया दीवानी
(तारुण्य जात आहे, तुझे तारुण्य संपत आहे. हरीच्या भजनाशिवाय, तुझे तारुण्य जात आहे.
तुझी काया सोन्यासारखी आहे. कीर्ती मोत्यासारखी आहे. तूं मेल्यावर तुला जाळून टाकतील
आणि तुझी जीवनकथा उडून जाईल. तुझे तारुण्य संपेल आणि नंतर नुकसान होईल. चुपचाप
यमदूत येतील आणि जबरदस्ती तुला घेऊन जातील. म्हणून तुम्ही मायेचा त्याग करून ज्ञानी
व्हा नरसिंहाचे स्वामी काय ते ‘सत्य' आहेत, बाकी हे जग वेडे मूर्ख आहे.)
भक्ती करण्याचा साधा उपदेश देणारी, पदें खूप आहेत. ‘साधु साचे भजो चरण गोविंदना’,
'हरि हरि रटण कर कठण कलिकालमां' 'ध्यान धर ध्यान धर नेत्रमां नाथ छे' 'ध्यान धर हरि
तणुं' 'समर ते श्रीहरी' 'अल्या भुल्य मा भुल्य मा भक्ती भूधर तणी' 'जुवानी ने दहाडे रे हरिने
जाण्या नही रे' 'घडपण कोने मोकल्यु'?
ज्ञानी भक्त उपदेशक 45
वगैरे अनेक पदें आहेत. शेवटच्या पदांतले मृत्यू जवळ आल्यावर येणाऱ्या विचारांचे चित्र
खूप मार्मिक वाटते.
घड़पण केणे मोकल्युं जाण्युं जोबन रहे सौ काळ
उमरा तो डुंगरा थया रे, पादर थयां परदेश
गोळीई तो गंगा थई रे अंगे उजळा थया रे केश , -
न होतुं जोईतु ने शीद आवियुं रे, नहोती जोई तारी वाट
घरमांथी हलवा थया रे, एनी खुणे ढळावोने खाट -
नानपणे भावे लाडवां रे घड़पणे भावे शेव.
रोज ने रोज जोईए राबडी रे एवी बळी रे घड़पणनी टेव -
प्रातःकाळे प्राण माहरा रे, अन्न बिना अकলায়
घरनां कहे 'मरतो नथी रे', तने बेशी रहतां शुं थाय ?
दीकरा तो जुजवा थया रे, वहुओ दे छे गाळ
दिकरीओने तो जमाई लोई गया, हवे घड़पणना शारे हाल ?
नव नाडी जुजवी पडी ने आवी पहोच्यो काळ'
बैरां छोकरां फट्फट् करे रे नाना बालक दे छे गाळ
अंतकाळे वळी आविया रे दिकरा पधर्यां द्वार
पांसणीराथी वांसणी रे पछी छोडिने आपी बार
एवं सांभळी प्रभु भजो रे संभारजो जगनाथ
पर उपकार कीधे पा मशोरे गुण गाय नरसैयो दास
( सतत तारुण्य राहील असे वाटत असतांनां, म्हातारपण कोणी पाठवले. उंबरठा
डोंगरासारखा वाटतो आहे. आणि सरहद्द परदेशासारखी झाली आहे. पाण्याचा घडा, गंगा
वाटायला लागली आहे. आणि सर्व अंगावरचे केस पांढरे झाले आहेत.
नको होते ते कशासाठी आले आहे ? तुझी वाट मी पाहिली नव्हती- घरांत प्रतिष्ठा राहिली
नाही. “कोपऱ्यात हलवा याची खाट" (असे म्हणतात) लहानपणी लाडू आवडत होते,
म्हातारपणी शेव हवीशी वाटते आहे. रोज रोज बासुंदी हवी आहे, अशी म्हातारपणची जळ्ळी
सवय- अन्नाशिवाय सकाळी माझा जीव व्याकुळ होतो, आणि घरांतले म्हणतात 'मरत नाही.
अरे तुला गप्प बसायला काय होते आहे." (गप्प बस) "मुलगे वेगळे झाले. सुना शिव्या देतात.
जावयी मुलींना घेऊन गेले-आता म्हातारपणाची काय स्थिती होणार ? शरीरातल्या ९ नाड्या
सुटत चालल्या आणि काळ येऊन पोचला- बायका मुले तिरस्कार करू लागली. छोटी मुलेही
शिव्या देऊ लागली (अवमान करू लागली) - अंतकाळी मुलगे दाराशी येऊन ठाकले.
46 नरसी मेहता
अस्थिपंजर तिरडीवर आणि नंतर बाहेर सोडून येणार हे सारं ऐकून (तरी) प्रभुला भजत जा.
त्या जगन्नाथाची आठवण करा-पर उपकार करून (मुक्ती) मिळेल नरसिंह दास (ईश्वराचे) प्रभुचे
गुणगान करतात)
३ शुद्ध तत्त्वदर्शन
नरसिंहानी 'शुद्ध तत्त्वदर्शन' संबंधित पदे अगदी थोडी लिहीली आहेत. सर्व जडचेतन
जगाचा विकास परब्रह्म श्रीहरी पासून झाला. हा सिद्धांत ते सरळ भाषेत वर्णन करतात - जसे
अखिल ब्रम्हांडमां एक तुं श्रीहरि जुजवें रूपे अनंत भासे
देहमां देव तुं, तेज तत्त्व मां तत्त्व तुं शुन्यमां शब्द थई वेद वासे
पवन तुं पाणी तुं भूमी तुं भूधरा, वृक्ष थई फुली रह्यो आकाशे
विविध रचना करी अनेक रस लेवाने, शिव थकी जीव थयो एज आशे
वेद तो एम वदे स्मृती श्रुती शाख दे, कनक कुंडल विषे भेद नोहे
घाट घडिया पछी नामरूप जुजवां अन्त्ये तो हेमनुं हेम होये
वृक्षमा बीज तुं, बीजमां वृक्ष तुं
जोवुं पटतरो एज पासे
भणे नरसैयो, ए मन तणी शोधना
प्रीत करूं प्रेमथी, प्रगट थाशे.
(सर्व ब्रम्हांडात तूं एकच आहेस, श्रीहरी (हे ब्रम्हांड म्हणजे श्रीहरीच आहे) अनेक रूपांमुळे
तुं अनंत भासतोस. शरीरांतला देव (आत्मा) तूं, तेजांतले प्रकाशतत्त्व तूं, आकाशात शब्द होऊन
तूं वेद सांगितलेस. हे भूधरा, वारा तूं, पाणी तूं आणि भूमी तूं वृक्ष होऊन आकाशांत फुलतो
आहेस. अनेक रसांचा स्वाद घ्यावा म्हणून तूं नानाप्रकारच्या रचना केल्यास आणि याच आशेने
तूं शीवा चा जीव झालास. वेद म्हणतात आणि स्मृतिश्रुति साक्ष देतात की, कनक आणि कुंडल
यात (वस्तुतः) भेद नाही. सोन्याचे घाट बनवले, मगच त्यांची रूपे आणि नावें भिन्न झाली शेवटी
सुवर्ण ते सुवर्णच राहणार. वृक्षातले बीज तूं, बीजातला वृक्ष तूं हा विभक्तपणा एकाजवळच
आहे, हें मी पाहातो. (वृक्ष आणि बीज हा विभक्तपणा एकांतच आहे). नरसिंह म्हणतात मनात
विचार करून पहा. प्रेमपूर्णतेने प्रेम करूनच तो परमेश्वर प्रगट होतो).
श्री वल्लभाचार्यांनी प्रसृत केलेला 'अविकृतपरिणामवाद' विचारांत घेऊन, अखंड
ब्रम्हवादाच्या सिद्धांतानुसार तत्त्वसिद्धांत इथे पहायला मिळतो, काश्मीरच्या शैव तंत्रात आणि
वारकरी संप्रदायाच्या ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीत अशा प्रकारच्या सिद्धांताचे दर्शन होते. श्री
वल्लभाचार्यांकडे वेदांतसिद्धांताची जी परंपरा आली, ती कर्नाटक आंध्र वगैरे प्रदेशांत, प्रसार
ज्ञानी भक्त उपदेशक 47
पावलेली होती असे आतां निदर्शनास आले आहे. श्री वल्लभाचार्यांच्या पूर्वी, ५०० वर्षांहूनही
अधिकच्या काळांत, नृसिंहउपासक विष्णुस्वामींनी ही वेदांत सिद्धांत प्रसारित केला होता.
नरसिंहाना ही परंपरा वारकरी संप्रदायाकडून, बहुधा मिळाली असावी असा संभव वाटतो.
शुद्ध परब्रम्हांतून जडचेतनात्मक सृष्टी विकसली, आणि त्यांत एकच ब्रम्ह आहे, त्याव्यतिरिक्त
दुसरे कांहीही नाही, हीच गोष्ट नरसिंहाच्या वरील पदांत स्पष्ट आहे. अशा तऱ्हेचा
ब्रम्हसाक्षात्कार केवळ प्रेमाने प्रेमलक्षणा भक्तीनेच शक्य आहे, हा भागवत पुराणात व्यक्त
झालेला, वैष्णवी सिद्धांत, नरसिंहानी वर्णन केला आहे.
नरसिंहांच्या खूप प्रसिद्ध गीतांत 'जागीने जोऊ तो जगत दीसे नही, रुंधमां अटपटां भोग
भासे' च्या दुसऱ्या चरणांत, अज्ञानी अवस्थेत येणारे अनुभव स्पष्ट केले आहेत. कनक आणि
कुंडला चा दृष्टांत देऊन, कार्य कारणाचा अद्वैतभाव, नरसिंहांनी सादर केला आहे. कवी
असल्यामुळे तत्त्वदर्शनांतही, काव्यमयता कायम ठेवतात -
निरख ने गगनमां कोण घुमी रह्यो, ते जहु, ते जहु शब्द बोले
श्यामना चरणमां इच्छुं छुं मरण रे, अहियां कोई नथी कृष्ण तोले
श्याम शोभा घणी बुद्धि ना शके कळी, अनंत उच्छवमां पंथ भूली
जड ने चेतन रस करी जाणवो, पकडी प्रेमे संजीवन मूळी
जलहर ज्योत उद्योत रविकोटमां, हेमनी कोर ज्या निसारे तोले
सच्चितानंद आनंद क्रीडा करे, सोनामां पारणांमाही झुले,
बत्ती विण तेल विण सूत्र विण जो वळी, अचल झळके सदा अनलदीनो
नेत्र विण निरखवो, रूप विण परखवो, वण-जिव्हाए रस सरस पीवो
अकल अविनाशी ए नवज जाये कत्यो अगध उरधनी मांहे महाले
नरसैयाच्यो स्वामी सकल व्यापी रह्यो प्रेमनां तंतमां संत झाले.
(पहा ना 'हृदय' आकाशांत कोण फिरत आहे. 'तोच मी' 'तोच मी' असा शब्द बोलत आहे.
श्रीकृष्णाच्या चरणाशी मृत्यू व्हावा हीच माझी इच्छा आहे. इथे या जगांत, कृष्णाच्या तुलनेत
कोणी नाही. अनंत उत्सव समारंभात वाट चुकलेली बुद्धी, शामसुंदराची अत्यंत शोभा महती
जाणूं शकणार नाही. जड आणि चैतन्य यांचा एकरस करून, प्रेमाने संजीवन देणारी मुळी
(श्रीकृष्ण) ओळखावी आणि पकडावी. कोटी सूर्याचे तेज (त्या परब्रम्हांत) झळकत आहे. जिथे
(ते परब्रम्ह कृष्णरूपाने अवतरते तिथे) सोन्याची झळाळी त्याच्याशी बरोबरी करायला बाहेर
पडते.
सच्चितानंद आनंद खेळ करतो आहे. सोन्याच्या पाळण्यांत झोके घेतो आहे. ज्योतिशिवाय,
48 नरसी मेहता
तेलाशिवाय, वातीशिवाय पहा तर सदासर्वकाळ अग्नीचा दिवा स्थिरपणे झळकत आहे-
नेत्रांशिवाय पहावा, रूपाविना ओळखावा- जिभेशिवाय सुंदर रसास्वाद करावा हा कालातीत,
अविनाशी कल्पनातित आहे. (उर्ध्व अधर) वर खाली, मध्यें, (सर्वत्र) हा आनंद करतो आहे.
नरसिंहाचा स्वामी सर्वव्यापी आहे. प्रेमाच्या धाग्यांनी संत, त्याला पकडतात.)
छांदोग्य उपनिषदांचे महावाक्य 'तत्त्वमसि ' त्याचा सुप्रसिद्ध सिद्धांत या पदांत स्पष्ट केला
आहे. महावाक्याचे सर्व शब्द घेऊन, त्यांत व्यक्त झालेल्या अखंड ब्रम्हवादाचा परिचय देऊन,
जीवाभावाची आणि जगतभावाची सत्यता वर्णन केली आहे. त्याबरोबरच अशा स्वरूपाची
ब्रम्हप्राप्ती केवळ प्रेमाने होते, हा भक्तीमार्गाचा परम सिद्धांत हे (नरसिंह) बोटाने दाखवित
आहेत. प्रेमाच्या सानिध्यांत तर नरसिंह. ज्ञानाच्या गोष्टी पण तुच्छ समजतात, म्हणून त्यांना
ज्ञानाची नव्हे तर प्रेमाची अपेक्षा आहे.
प्रेमरस पाने तु, मोरना पिछधर, तत्वनुं टंपणुं तुच्छ लागे
दूबला ढोरनु कुशके मन चले, चतुरधा सुक्ती तेओ न मागे-
(मोराचे पीस धरणाऱ्या रे तू प्रेमरस पाज. मला तत्त्वज्ञान चर्चा तुच्छ वाटते. दुबळ्या
जनावरांचे मन गवतांत (खाण्यांत) राहणार, चतुरधा मुक्ती ती मागत नाहीत.)
याच पदांत नरसिंह स्पष्ट करतात :-
मे ग्रहो हाथ गोपीनाथ गरवा तणो , आवर बीजुं कोई ये न भावे
नरसैया महामती, गाय छे गुणकथी, जति सतिने तो स्वप्ने न आवे
(थोर गोपीनाथाचा हात मी धरला आहे. आता मला दुसरे काहीही आवडत नाही.
महाबुध्दीचा नरसिंह प्रभुच्या गुणांच्या कथा वर्णन करतो. साधू, साध्वीच्या स्वप्नातही त्या
कथा येणार नाहीत.)
आणि अशा रीतीने ज्ञानमार्गाला कमी प्रतिचा लेखून प्रेमलक्षणा भक्तीचे प्राधान्य वर्णन
करतात.
ते दुसऱ्या ठिकाणी म्हणतात पण
भूतल अवतारंनु फल एह , जो माहात वहाला शुं धरिये नेह
भक्ती सरखी जेहेने घरदासी, तो शुंकीजे अवर उपासी
जप तप तीरथ देहडी न दमिये, जो महारा वहाला शुं रंगभेररमिये-
जनमजनमनी हरिदासी थाशुं, नरसैंयाच्या स्वामीनी लीला गाशुं-
(पृथ्वीतलावर जन्म घेण्याचे फळ मिळते ते हे की, माझ्या प्रिय कृष्णावर प्रेम करतां येते.
भक्ती सारखी ज्याच्या घरांत दासी आहे, तिथे इतर आराधना करायचे काय ?
ज्ञानी भक्त उपदेशक 49
जप तप तीर्थ याना करून देह दमवू नये तर माझ्या कृष्णाशी आनंदभराने क्रीडा करावी
जन्मोजन्म हरीची दासी होऊन राहूं, आणि नरसिंहाच्या स्वामीच्या लीला गाऊं)
आणि आपण पाहिले आहे की, यांच्या आत्मचरित्र पर काव्यांत फक्त अनन्य शरणागतीची
भावनाच यांनी वर्णन केली आहे. ज्ञानापेक्षा भक्तीची श्रेष्ठता यांना अभिप्रेत आहे, हे नरसिंहानी
स्पष्ट केले आहे.
५ भावगीत गायक (भावगीताने गानारो)
गुजराथी साहित्याचा इतिहास लिहिला जाऊं लागला, तेव्हापासून नरसिंहांना आदिकवी
म्हणून मान्यता देण्यात आली आहे. मध्ये एकदा एक असा विरोधी स्वर उमटला की,
नरसिंहाच्या पूर्वी पण प्राचीन गुजराथी साहित्य निर्माण झाले होते, म्हणून त्याना आदिकवी
म्हणता येणार नाही. जैन साहित्यिकांनी रास-फागु-बारमासी इत्यादी रचना केल्या. एक गोष्ट
स्पष्ट आहे की, त्या सर्व रचनांत उत्तरकालीन गुर्जर भाषेचे अपभ्रष्ट रूप, कोणत्या ना कोणत्या
प्रकारे, प्रयत्नपूर्वक समाविष्ट करण्यांत आले होते. व्यावहारिक भाषेचा कल, नवीनतेकडे
संपूर्णपणे झुकला होता तरीपण लेखनांत जुन्या भाषेचा वापर करायचा प्रघात होता. हे खरं की
नरसिंहाच्या काळांतली, त्यांच्या रचनांची हस्तलिखिते उपलब्ध नाहीत. वि.स. १६५०-५५
इ.स. १५९४-९९ ची एक प्रत (मुंबई गुजराती प्रिप्रेस ची) आणि दुसरी, सं. १६६८ इ.स. १६१२
(अहमदाबाद-गुजराथ विद्यासभाची नं.६९ ची, प्रत, अशा या दोन प्रती, अजून पर्यंत
सापडलेल्या जुन्यांत जुन्या प्रती होत. ज्या काळात गुजर (भाषा किंवा मध्यकालीन गुजराथी
भाषेशिवाय एक तिसरी भाषा लेखन प्रचारांत होती, ह्या काळात अर्वाचीन बोली भाषा जतन
करणाऱ्या या प्रती पाहून असा संभव वाटतो की, ) नरसिंहांनी आपल्या काळांतल्या
बोलीभाषेचा आपल्या लेखनांत आदरपूर्वक वापर केला असला पाहिजे.
ही गोष्ट समजा आपण विचारात घेतली नाही तरीही काव्यरचनेत भावगीतांचा जो प्रकार
नरसिंहानी हाताळला तो गुजराती साहित्यात सर्वप्रथम होता. या भावगीतांची संख्या थोडी
थोडकी नाही. शेंकडोनी आहे. गुजराती हस्तलिखितांच्या संग्रहात आणि खाजगी मालकीच्या
हस्तलिखित भांडारात, अजूनहि अज्ञात असलेली भावगीते सापडत आहेत. हे लक्षांत घेतले
की वाटते विवाह काव्यात लक्ष सवा तणुं नाम कीर्तन करूं (तुझे सव्वालक्ष नामकिर्तन करतो)
ही प्रतिज्ञा थोडी जरी अर्थपूर्ण मानली तरी हजारो पदे, नरसिंहांनी रचली असली पाहिजेत.
निरनिराळ्या चालीत बसणारी असंख्य पदें आणि झुलणाना ढाळ (झोपाळ्यावरची गीतांच्या
चालीवर) ची अनेक पदें त्यांच्या हातून रचली गेली.
भावगीत गायक (भावगीताने गानारो ) [51]
हा प्रकार हाताळणारे नरसिंह प्रथम कवी होते, म्हणूनच त्याना सुरवातीला मिळालेला
आदिकवी चा मान ढळू शकत नाही. गुजराती साहित्याला पद्य साहित्याने समृद्ध करणारे
नामी अनामी शेकडो साहित्यिक झाले आणि शेकडो अज्ञातही आहेत. त्या सर्वांमध्ये आपल्या
विशिष्ट प्रतिभेने चमकणारे ३ कवी प्रथम श्रेणीत बसतात. १५ व्या शतकातले नरसिंह, सर्वोत्तम
आख्यानकार म्हणून, १७ व्या शतकाच्या उत्तरार्धातले, प्रेमानंद आणि श्रेष्ठ दर्जाची पदे आणि
गरबागीतांमुळे प्रसिद्ध असलेले १९ साव्या शतकाच्या पूर्वार्धातील दयाराम, हे ते कवी होत.
दुसरे सारे कवी या कवींच्या तुलनेत कमी दर्जाचे वाटतात.
नरसिंह महेतांनी आपली आदिकवी ही पदवी सिद्ध केली ती त्यांच्या भावगीतांमुळे ही
भावगीते कृष्णाचा विहार या विषयाशी संलग्न आहेत. जयदेवाच्या गीतगोविंद काव्यातूनच
नरसिंहाना, आपल्या भावगीतांच्या विचाराला खाद्य मिळाले. नरसिंहाच्या चातुरी गीतांत
वर्णनात्मक भाग मुख्यतः आहे, याची आपल्याला थोडीशी कल्पना आली आहे. गीतगोविंद
काव्यांतही वर्णनात्मक भागच मुख्य आहे. नरसिंहाच्या विशाल साहित्यातून पूर्वी सांगितलेली
वर्णनात्मक पदे वजा केली तर, वेगळ्याच थाटाची आत्मलक्षित अशी भरपूर भावगीते नजरेत
भरतात. त्याचा विचार केला, तर आपण स्वतः त्या त्या ठिकाणी एक पात्र म्हणून आहोत, अशा
वर्णनांची, गोपींच्या तोंडून घातलेल्या पदांचे आपण विच्छेदन करू शकतो. १) रास शरदना
पद (शरदऋतुतील रास क्रीडा पदे) २) वसंतना (वसंत ऋतुतील) ३) हिंडोळाना
(झोपाळ्यावरची) ४) दाणना (दान वसुली ची) ५) शृंगारमाळा (शृंगाराची ) ६) चांदलाना
(चंद्राची )
वरील ६ ही प्रकारांत मुख्यतः वियोग शृंगार रचना भरपूर प्रमाणांत आढळतात, अर्थात
कांही काव्यरचनांत संयोग शृंगाराचेही दर्शन होते. आपण क्रमशः त्यांचा परिचय करून घेऊ.
१ रास शरदनां पद (शरद ऋतुतील रासक्रीडा पदावली )
शरदऋतूतील - खास करून आश्विन महिन्यांतल्या श्रीकृष्णाच्या वनक्रीडेची यांत वर्णने
आहेत. कथाभागाऐवजीं पात्राच्या तोंडी घातलेल्या गीतांमुळे, या रचना आपोआपच
भावगीतांच्या सदरांत येतात. रासक्रीडेसाठी व्याकुळ झालेल्या गोपींचे शब्द
सजनी रे, श्यामलीओ वेण वाहे
रही न सकुं मारा तन मांहे
जागो मिलवाने मन थाए -
जल -जमुना -मसि आपण्य बहिनी, चालो जोवा जेईई-
सास मारी घेरय नयी, कानजीने कहिईं
जे किहिरो ते सिहिस्युं आपण्यात चालो जोवा जेईई
52 नरसी मेहता
नरसैयांच्या स्वामीने संगि रासलडा रे लही ई
(सखी गं श्याम मुरली वाजवतो आहे. माझ्या शरीरांत मी राहूं शकत नाही. ऐक, त्याला
भेटायची माझ्या मनांत इच्छा होते आहे. चल ग बहिणी, पाण्याने भरलेल्या यमुना नदीवर,
कृष्णाला पहायला जाऊं -कन्हैयाला सांगू, माझी सासू घरी नाही म्हणून जे बोलेल, ते सहन
करूं पण आपण कृष्णाला पहायला जाऊं. नरसिंहाच्या स्वामी बरोबर आपण रासक्रीडा खेळूं.)
नायकाचा विरह यात स्पष्ट होत आहे.
बाटडी जोऊं नाथ, नाहली
संगम रमवा माटेय जात मींबालीरे
पिहिलं अम्ह-स्यूं प्रीत करीने शुं मेहलु विसारी रे
मननी वात तु कुहुने कहिई ? अम्हने वेदनं भारी रे
आगे अम्हने बपैडा मारे, अम्हे अबला किम रहिये रे
नरसिंग्याच्या स्वामी विन बाई धीरज क्यटलं धरीई रे ?
(नाथ, मी प्रिया तुमची वाट पहात आहे. तुमच्याबरोबर क्रीडा करावी या इच्छेने मी 'माझेपण'
संपवून आले आहे. प्रथम आमच्यावर प्रिती केली, आतां सारे विसरून आमचा त्याग करता
का ? मनांतली गोष्ट आम्ही कोणाला सांगावी ते सांगा. आम्हाला केवढ्या यातना होताहेत.
अगोदरच आम्हाला बाप मारतो आहे. आम्ही अबला कसे दिवस काढायचे. नरसिंहाच्या
स्वामी शिवाय बाई ग किती धीर धरायचा.)
आणि नायकाचे मीलन झाल्यावर परत फिरायला नायक सांगतो तेव्हां नायिकेचा मनःक्षोभ
होतो
'श्या माटे शामलिया वा' ला शान करी वन्य तेडी रे ?
व्याकुल विनता थई शहु अंगे, वेण वजाडी रूडी रे.
आणि वेळा अधराते वला परवरिया परवार रे
शामुं आल चडावो अमने, लीलज नंदकुमार रे,
बोल विचारी बोलण्यो रे अमे अबला बल थोडूं रे
नरसिंग्याच्या स्वामी, रस पुरो दीन थई कर जोडुं रे-
(लाडक्या शामसुंदरा, शृंगार करून आम्हाला, कशासाठी वनांत आणलेस. सर्व बाजूंनी
गोपी व्याकुळ झाली. तू मुरली अशी सुंदर वाजवलीस सर्व संसार सोडायला लाऊन तूं
आम्हाला अर्ध्या रात्री आणलेंस. आता लीलाधर नंदकुमारा, शामा आमचे रक्षण कर. नीट
विचार करून सांग आम्ही कमी शक्ती असणाऱ्या अबला आहोत. नरसिंहाच्या स्वामी क्रीडा
रस पुरा कर. काकुळतीने आम्ही हात जोडतो.)
ज्ञानी भक्त उपदेशक 53
आणि नायकाच्या केवळ दर्शनानेच मीलनाचा अनुभव -
वाहलो आलिंगन सरखो, नयण भरी भरी निरखो जोई जोई मन हरखो-
सकल विश्व शीखंतां, बाई, मुख उपर्यु मुथ मुकवूं लाल
ए विषय आता न जाणुं कहो सखी अमृत कुणी पिरूला
ज्या एहवुं त्या स्नेहसमक्ष शी अम्हेने तां अलगां मेहलो
नरसिंयाच्या स्वामी जशी, यौवना अण तेड्यो आवे वेहलो
(रा. रा. समुद्धार पृ.३७६ )
(प्रियाने आलिंगन देताना नेत्र भरभरून मला पाहिले आणि मनं हर्षभरीत झाले सर्व
विश्वाला शिकवणारा त्याने माझ्या ओठांवर ओठ ठेवले ग बाई, या विषयांत मला काहींच
समजत नाही. सखी अमृत कोणी कोणाला पाजले ?
जिथे हे असे तिथे प्रेम, किंवा समजण्याची बुद्धी कुठली आम्हाला तर त्याने वेगळंच ठेवलं
नरसिंहाच्या स्वामी यौवनपूर्ण सुंदरी पहातांच न बोलवतांच त्वरीत येतो.)
आणि नायकाच्या मीलनात परमतृप्तीचा अनुभव
[