भक्त नरसिंह मेहता: जीवन एवं पद (वैष्णव जन तो तेने कहिये - गुजराती से हिन्दी रूपान्तरण)
Bhakta Narsi Mehta: Jeevan Aur Pad
भक्त नरसिंह मेहता (सम्पादक: रामचन्द्र तिवारी) द्वारा
पृष्ठ 43, कुल 99 में से
संदर्भ में पढ़ें४ ज्ञानी भक्त उपदेशक
ब्रज प्रदेशांतील वृंदावनीय भक्तींत दंग झालेल्या कवीकडून सिद्धांतवादी साहित्याची
आशा करणे चूकच आहे. नरसिंहाच्या उत्तरकालांतील व्रजभाषिय अष्टछाप कवींनीं तसेच
यांच्या पूर्वकालीन, बिहारच्या विद्यापती आणि त्यांच्याही पूर्वीच्या महानुभाव पंथाच्या कवीनीं,
या तऱ्हेचे (सिद्धांतवादी) साहित्य लिहिलेले आढळत नाही. वारकरी सांप्रदायाच्या नामदेव
कवींनी लीनात्मक काव्य लिहिलें नाही. सैद्धांतिक पदे लिहिली पण त्यांत शब्दलालित्य
नाही. कबीरांच्या शेकडों पदांत वाक्चातुर्य, सहजपणे सांपडते. नरसिंह महेतांची उपदेशपर पदें
थोडी आहेत आणि त्यांत शब्दलालित्याचा वेग मर्यादित आहे. यांची ज्ञानभक्तिपर पदें पाहिलीं
तर केवळ शब्दलालित्याचा वेगच नव्हे तर काव्यतत्त्वाचा रोचक अनुभव मिळतो. नरसिंहाच्या
ज्ञत्व-भक्ती उपदेश पर साहित्याचे आपण तीन भाग पाडूं शकतो.
१ वैष्णव लक्षण २ वैराग्य बोध, भक्ती, आणि ज्ञानोपदेश ज्यांत आहे असा 'उपदेश' आणि
३ शुद्ध तत्त्वदर्शन ज्यांत काव्यचमकृती भरपूर आहेत.
१) वैष्णव लक्षण
यांत वैष्णव किंवा प्रभुभक्त कसा असला पाहिजे याचा गुणनिर्देश करुन, विचार मांडला
आहे. महात्मा गांधीजींनी 'राष्ट्र भक्ती गीत' म्हणून प्रतिष्ठित केलेलें आणि आज संपूर्ण भारतात
आदरणीय झालेले हें पद याचा सूचक नमुना आहे.
वैष्णव जन तो तेणे कहिये
जे पीड पराई जाणे रे
परदुःखे उपकार करे, ने मन अभिमान न आणे रे -१
सकल लोकमां सहु ने वंदे, निंदा न करे केनी रे
वाच काछ मन निर्मल राखे धन धन जननी तेनी रे -२
समदृष्टी ने तृष्णात्यागी, परस्त्री जेने मात रे,
जिव्हा थकी असत्य न बोले, परधन नव झाले हाथ रे -३