अमृतानुभव एवं चांगदेव पासष्टी (सन्त ज्ञानेश्वर - चिद्विलासवाद एवं अद्वैत अनुभूति सटीक)
Amritanubhava and Changdev Pasashti of Sant Jnanadev
सन्त ज्ञानेश्वर / ज्ञानदेव महाराज द्वारा
प्रकरण पांचवें ४३
जें जें बोलिजे तें तें नव्हे । होय तें तंव न बोलवे ॥ साउलि-
वरी न मववे । मविते जैसें ॥२६॥ मग आपुलियाकडे मवितया
से पडे ॥ तैं लाजलाजों आखुडे । मविती जैसी ॥ २७ ॥ तैसी
सत्ताचि स्वभावें । असत्ता तंव नव्हे ॥ मा सत्तात्व संभवे ।
सत्तेसी काई ॥२८॥ आणि अचिदाचेनि नाशें । आलें जें चिन्मा-
त्रदशे ॥ आतां चिन्मात्रचि मा कैसें । चिन्मात्रीं ये ॥ २९ ॥
नीद प्रबोधाच्या ठाईं । नसे तैसें जागणेंही ॥ तेवि चिन्मात्रचि
मा काई । चिन्मात्रीं ये ॥ ३० ॥ ऐसें यया सुखपणें । नाहीं
कीरु दुःख होणें ॥ मा सुख हें गणणें । सुखाशीं काई ॥ ३१ ॥
म्हणोन सदसदत्वें गेलें । चिदाचिदत्वें मावळलें ॥ सुखासुख
जालें । कांहीं ना कीं ॥ ३२ ॥
ज्याप्रमाणें आपलें माप सावलीवरून घेतांच येत नाहीं, त्याप्रमाणें
प्रतिपादन करतांना जें जें बोलण्यांत येते, तें तें आत्मा नव्हे, वस्तुस्वरूप
शब्दाला विषय होणारें नसते. २६. मग माप घेणाराला आपल्या शरी-
राची आठवण होते तेव्हां लाज वाटून तो आपली स्वतःच किंमत ओळख-
तो ! २७. स्वभावानें सर्वत्र परमात्म्याचेंच अस्तित्व आहे. असत् तर
नाहींच, मग 'सत् आहे' असे बोलणें संभवेल काय ? २८. अचिदाची
निवृत्ति करण्यासाठीं चिन्मात्रदशेला आलें, त्याला 'चिन्मात्र' असें
म्हणणे संभवेल का ? २९. निद्रेसंबंधीं आपली साक्षेप जागृति गेल्यावर
जागृति खरूपानें असते, त्याप्रमाणें चिन्मात्र स्वरूपाच्या ठिकाणीं चिन्मात्र
म्हणणें कसें संभवणार ? ३०. केवळ सुख हेंच ज्याचें स्वरूप आहे, दुःख
संबंध नाहींच अशा परमात्म्याला तो सुख म्हणजे आनंद आहे असें कसें
म्हणावें ? ३१. म्हणजे सत् हें पद असत् पदासह नाहींसें झालें; चित्
अचित्सह मावळले, आणि दुःखांची निवृत्ति करून सुख हें पद आपण
स्वतःहि नष्ट झालें कीं साक्षेप असें कांहींच शिल्लक उरत नाहीं. ३२.
आतां द्वंद्वाचे लवंचक । सांडुनि दुणीचें कंचुक ॥ सुखामात्रचि
येक । स्वयें आथी ॥ ३३ ॥ वरी येकपणे गणिजे । तैं गणतेनसी
दुजै ॥ म्हणोनी हें न गणिजे । ऐसें एक ॥ ३४ ॥ सुखा आंतोनी
निघणें । तैं सुखियें सुखी तेणें ॥ हें सुखामात्रचि मा कोणें ।
अनुभवावें ॥ ३५ ॥ जैं प्रकृति डंकु अनुकरे । तैं प्रकृति डंके अव-
तरे ॥ मा डंकूचि तैं भरे । कोण कोणा ॥३६॥ तैसें आपुलेनि
सुखपणें । जया नाहीं सुखावणें ॥ आणि नाहीं हेंही जेणें ।
नेणिजे सुखें ॥ ३७ ॥ आरिसा न पाहतां मुख । स्वयें सन्मुख
ना विन्मुख । तेवीं नसोनी सुखासुख । सुखाचि जें ॥३८॥
सर्वसिद्धांताच्या उजरिया । सांडूनिया निदसुरिया ॥ आपुलिया
हाता । चोरिया आपणाचि जे ॥३९॥
भेदाचें लवंचक म्हणजे मिथ्याभान म्हणजे विक्षेप, आणि त्याला कारण
अज्ञानाचें आवरण, त्याच्या नाशानें सुखमात्रच स्वस्वरूपानें असते. ३३.
आता एकपणानें मोजले तर मोजणारा द्वैत ठरतो, म्हणजे हें न मोजतां
येण्यासारखे आहे. ३४. तसेंच सुखांतून निघणारा त्या सुखानें सुखी होईल,
पण ही वस्तु केवळ सुखमात्रच असल्यामुळेच त्याचा अनुभव कोणीं घ्यावा?
३५. जेव्हां पुरुषास प्रकृतीचा दंश होतो, तेव्हां माणूस घुमतो. एखादा
मग केवळ दंशच असेल आणि माणूस नसेल तर त्या दंशानें कोणाला
दंश करावा ? आणि घुमावें तरी कोणीं ? ३६. त्याप्रमाणें परमात्मा स्वतः
सुखरूप असल्यामुळे, त्याला सुख होणें नाहीं आणि सुख नाहीं हेंहि
म्हणणें मूळ सुखापुढें योग्य नाहीं. ३७. आरशांत मुख न पाहतां मुखाला
समोर किंवा मागें अशी स्थिति नसते; त्याप्रमाणें सुखदुःखशून्य जे केवळ
सुखच परमात्मा असतो. ३८. अज्ञानाच्या नाशासंबंधीं शास्त्रांतील पांडित्यानें
भरलेलें ज्ञान न समजल्यामुळे कांहीं हातचें-मुळांतील-ज्ञान मिळविणें
शिल्लक राहावें तसा सुखरूप परमात्मा स्वरूपानें राहतो. ३९.
प्रकरण पांचवें ४५
न लविता ऊंस । तें जैसेनि असे रस ॥ तेथींचा मिठांश ।
तोचि जाणे ॥४०॥ कां न सजिता विणा । तो नादु जो अबो-
लणा । तया तेणेंचि जाणा होआवें लागे ॥४१॥ नाना पुष्प-
चिया उदरा । न येता पुष्पसारा ॥ आपणचि भवरा । हों आवें
पडे ॥४२॥ नाना न रांधिता रससोयें । ते गोडी कैसी पा
आहे ॥ हें पाहणें तैसें नोहे । आणिका जोगी ॥४३॥ तैसें
सुखपणा येवो । लाजे आपुलें सुख पावो । तें अणिका चाखो
सुवों । येईल काई ॥४४॥ दिहाच्या दुपारीं । चांदू जैसा अंबरीं
॥ तें असणे चांदावरी । जाणावें कीं ॥४५॥ रूप नाहीं तैं
लावण्य । अंग नुठी तैं तारुण्य ॥ क्रिया न फुटे तैं पुण्य । कैसें
असे ॥४६॥
ऊंस न लाविला तरी त्यांतील रस कायम असून त्यांतील गोडी चाख-
लेली नसते. ४०. वीणा जरी वाजविण्यासाठीं जुळवला नाहीं तरी तिच्या-
तला नाद सुप्त असतो आणि तो इतरांना प्रत्यक्ष ऐकूं येत नाहीं. ४१.
फुलांचा मकरंद घेणारा भ्रमर न आला तर त्या मकरंदालाच भ्रमर
होऊन पडावें लागतें. ४२. अनेक प्रकारचें पाक न केलें तर त्यांच्यातील
गोडी कशी आहे, ती इतरांना कशी समजणार ? त्यांचे तेच जाणोत !
४३. त्याप्रमाणें मूळ सुख हे प्राकृतिक रूपानें सुख म्हणून लाजून पुढें येत
नाहीं, तर मग ते बिचारे इतरांना काय सुख देणार ? ४४. भर दिवसा
आकाशांत चंद्र असूनहि त्याचें चांदणे अनुभवास येत नाहीं. अनुमानावें
लागते. ४५. रूप नसणारें लावण्य, वार्धक्यांतले तारुण्य किंवा कांहीं
दान न देतां केलेले पुण्य; या गोष्टी अस्तित्वांत असतीलच कशा ? ४६.
४६ सार्थ अमृतानुभव
जैं मनाचा अंकुर नुपजे । तेथलेन मकरध्वजें ॥ तोचि हन माजे ।
तरीच घडे ॥ ४७ ॥ कां वाद्यविशेषाची सृष्टि । जैं जन्म नेघे
दृष्टीं ॥ तैं नाद ऐशी गोष्टी । नादाचि जोगी ॥ ४८ ॥ नाना
काष्ठाचिया विटाळा । वोसरलियाही अनळा । लागणें केवळ ।
आंगासीचि ॥ ४९ ॥ दर्पणाचेनि नेमें । विणचि मुख प्रेमे ॥
आणिती तेंचि वर्में । वर्मती येणें ॥ ५० ॥ न पेरितां पिक जोडे ।
तें मुडाचि आहे रोकडें ॥ ऐशिया सोई उघडे । बोलणें हैं ॥ ५१ ॥
एवं विशेष सामान्य । दोहों नातळे चैतन्य ॥ तें भोगिजे अनन्य ।
तेणेंसी सदा ॥ ५२ ॥ आतां यावरी जें बोलणें । तें येणेंचि
बोलें शहाणे ॥ जें मौनाचेंही निपटणें । पिऊनि गेले ॥ ५३ ॥
किंवा मनाचा अंकुर उत्पन्न झालेला नसेल अशा स्थितींतील काम
प्रकट होतो. ४७. अथवा निरनिराळीं वाद्यें वाजवितांना ऐकली नाहींत
तोपर्यंत नादांची स्थिति स्वतः नादालाच माहीत. ४८. लांकडाचा संबंध
सोडल्यावर अग्नि आपल्या केवळ स्वरूपानेंच असतो. ४९. आरशावांचून
आपल्या मुखाचें ज्ञान ज्यास होते, त्यासच गुप्त परंतु निश्चित या गोष्टींतील
रहस्य कळेल. ५०. पेरण्याच्या पूर्वी पीक जसें भाताच्या मुढ्यांत असते,
तसें आमचे गुप्त, पण उघड बोलणें आहे. ५१. एवंच, सामान्यविशेष
भावाला चतन्य आकळलेंच जात नाहीं, उलट ते स्वस्थितींत भावशून्य
आपल्याशींच सर्वदा अनन्य असते. ५२. यापुढें विवरण असें करतां
येईल कीं, मौनसुद्धां त्या स्थितींत निःशेषपणानें नाहींसें होते. ५३.
प्रकरण पांचवें ४७
एवं प्रमाणें अप्रमाण । पण केलें प्रमाण ॥ दृष्टांतीं वाइली
आण । दिसावयाची ॥ ५४ ॥ आंगाचिया अनुपपत्ती ॥ आटालिया
उपपत्ती । येथें उठली पांती । लक्षणांची ॥ ५५ ॥ उपाय मागिला
पाये । येऊनि जाले वाये॥ प्रतीति सांडिली सोये। प्रत्ययाची॥५६॥
येथें निर्धारेंसीं विचार । निमोनि जाला साचार । स्वामीच्या
संकटीं शूर । सुभटु जैसा ॥ ५७ ॥ नाना नाश साधुनी
आपुला । बोध बोधें लाजिन्झला ॥ नुसधेपणें थोटावला । अनुभवु
जेथ ॥ ५८ ॥ भिंगाचिया चडला । पदराचा पुंज वेगळा ॥
करितां जैसा निष्फळा । आंगाचा होये ॥ ५९ ॥ कां गजबजिला
उवा । पांघुरणें केळीचा गाभा ॥ सांडी तेव्हेळी उभा । कैचा
कीजे ॥ ६० ॥ तैसें अनुभाव्य अनुभाविक । इहीं दोहीं अनु-
भूतिक ॥ तें गेलिया कैंचें एक । एकासीचि ॥ ६१ ॥
आतांपावेतों प्रत्यक्षादि प्रमाणांनीं आपल्या अप्रामाण्याची सिद्धि केली;
दृष्टांतांनीं पुढें न येण्याची शपथ घेतली. ५४. युक्तींनीं आपली अनुपत्ति
करून घेतलीं, आणि लक्षणांच्या तर रांगाच्या रांगा लागल्या. ५५. योगादि
नाना उपाय मागल्यामागेंच पाय काढून चालतें झालें, प्रतीतीनें प्रत्यय
दाखवावयाचें टाळले. ५६. शूर योद्धा ज्याप्रमाणें आपल्या स्वामीच्या
संकटकालीं आपला जीव देऊन, संकट दूर करतो, ५७. किंवा बोध
आपला नाश करून घेतो व बोध म्हणूनच घेण्याचें टाळतो; अनुभव
एकटा राहिल्यामुळे पांगळा होतो, ५८. अथवा अभ्रकाचें पापुडें काढलें
तर स्वतः अभ्रकाचा नाश होतो. ५९. किंवा केळीचा गाभा उष्णतेनें
त्रासल्यामुळे आपल्या अंगावरचीं सोपटें काढूं लागला तर त्याला उभा
कसा करावा ? ६०. त्याप्रमाणें अनुभव्य, अनुभवि आणि अनुभव ही
त्रिपुटी नाहींशीं झाल्यावर एकमेकांचा संबंध कसा राहाणार ? ६१.
४८ सार्थ अमृतानुभव
अनुभवा ही ठावोवारी । आपुलीच अनवसरी ॥ तेथें अक्षराची
हारी । वाइल काई ॥ ६२ ॥ कां परेसी पडे मिठी । तेथें नादा
सळु नुठी ॥ मी वावरीजेल वोठीं । हें कें आहे ॥ ६३ ॥ चेइलिया
पाठीं । चेत्रगयाच्या गोष्टी ॥ कीं धाला बैसें पाठी । रंधनाच्या
॥ ६४ ॥ उदेलिया दिवसपती । तैं कीं दिवें सेजें येती ॥
वांचूनि पिकलां शेती । सुइजताती नांगर काई ॥ ६५ ॥ म्हणोनि
बंधमोक्षाचें व्याज । नाहीं निमालें काज ॥ आतां निरूपण
मोज । वोळगे जरी ॥ ६६ ॥ आणि पुढील कां आपणापें ।
वस्तु विसराचेनि हातें हारपें ॥ मग शब्देंचि घेपे । आठवूनियां
॥ ६७ ॥ येतुलियाही परौते । चांगावें नाहीं शब्दांतें ॥ जरी
स्मारकपणें कीर्तीतें । मिरवी हा जगीं ॥ ६८ ॥
इति श्रीसिद्धानुवादे श्रीमदनुभवामृते सच्चिदानंद
पदत्रयविवरणं नाम पंचमप्रकरणं संपूर्णम् ॥
परमात्मस्वरूपाच्या ठिकाणी अनुभवाची अशी दशा होते, मग त्या
ठिकाणीं शब्दांची काय मातब्बरी ? ६२. ज्याचें वर्णन करतांना परावाणी
लुळीं पडते, जेथें नादाची सत्ता असत नाहीं, त्या परमात्म वस्तूचें तोंडानें
वर्णन करता येईल कां ? ६३. जागा झाल्यानंतर जागें करण्याच्या गोष्टी
कशाला ? अगर तृप्त झालेला पुरुष स्वयंपाक करण्याच्या भानगडींत कशाला
पडेल? ६४. सूर्योदय झाल्यावर दिवे मालवतात; शेत पिकल्यावर त्यांत कोणी
कशाला नांगर धरील ? ६५. म्हणून बंधमोक्षाचें निमित्त नाहीं, कार्य संपलें,
तरी हें निरूपण कौतुकानें प्राप्त झालें आहे. ६६. आणि दुसऱ्याला किंवा
आपल्याला स्वस्वरूपवस्तूविषयीं विसर पडला असेल, तर त्या वस्तूविषयीं
शब्दच स्मृति करून देतो, असा अनुभव आहे. ६७. परमात्म्याची स्मृति
करून देणारा हा शब्द त्याचें स्मारक म्हणून जगांत कीर्ति मिरवीत असला
तरी त्याच्याजवळ यापेक्षां जास्त चांगुलपणा नाहीं. ६८. याप्रमाणें श्रीमत्
अमृतानुभवग्रंथांतील सच्चिदानंद पदत्रयविवरण प्रकरण पांचवें समाप्त झालें.
प्रकरण पांचवें समाप्त
प्रकरण सहावें
बाप उपेगी वस्तु शब्दु । स्मरणदानीं प्रसिद्धु ॥ अमूर्ताचा
विशदु । अरिसा नव्हे ॥ १ ॥ पाहते अरिसा पाहे । येथे
कांहींचि नवल नव्हे ॥ परी दर्पणें येणें होये । न पाहतें पाहतें
॥ २ ॥ वडिला अव्यक्ताचिया वंशा । उद्योतकार सूर्य जैसा ॥
येणें एकें गुणें आकाशा । अंबरत्व ॥ ३ ॥ आपण तंव खपुष्प ।
परी फळ दे जगद्रूप ॥ शब्द मवी तैं अमुप । कोण आहे
॥ ४ ॥ विधिनिषेधाचिया वाटा । दाविता हाचि दिवटा ॥ बंध-
मोक्ष कळीकटा । शिष्ट हाचि ॥ ५ ॥
शब्द ह्या शब्दांतील अक्षरें अत्यंत उपयुक्त तर आहेतच; पण आठवण
करून देणारा म्हणूनहि 'शब्द' हा विख्यात आहे. ह्या अक्षरांना, व्यक्त
नसलेल्या परमात्म्याला स्पष्ट करून दाखविणारें जसें आरसेंच म्हणूं नये
काय ? १. डोळ्यांनी पाहणारा आरशांत पाहील यांत कांहीं विशेष नाहीं;
पण हा अध्यात्मशास्त्ररूप दर्पण असा विशिष्ट गुणवान् आहे कीं, त्यांत
अंधसुद्धां पाहूं शकतात, ज्ञानी होतात. २. शब्द हा मूळ मायेच्या वंशां-
तला; रवीसारखा कुलदीप आहे. शब्दाच्या या एका गुणामुळेंच आभा-
ळाला अंबर म्हणतात. ३. स्वतः आकाशाचें फूल असला तरी शब्द
जगाची सिद्धि करवितो. शब्दानें मोजतां येत नाहीं असा कोणता पदार्थ
आहे सांगा पाहूं ? ४. ही शब्दरूपी मशाल विधिनिषेधाच्या वाटा दाखविते.
एखाद्याला बंध आणि दुसऱ्या एखाद्याला मोक्ष अशा वेगवेगळ्या
तऱ्हा सांगून दोघांत भांडण लावणारा हा शब्द मोठा शिष्टच दिसतो
कीं ! ५.
सा. अ. ...४
५० सार्थ अमृतानुभव
हाचि अविद्येचा आंगीं पडे । तैं नाथिले ऐसें रूढे ॥ न
लाहिजे तीन कवडे । साचा वस्तु ॥ ६ ॥ शुद्धा शिवाच्या
शरीरीं । कुमारु हा जीउ भरी ॥ जेवि आंगे पंचाक्षरी । तेविचि
बोलु ॥ ७ ॥ जीव देहे बांधिला । तो बोलें एकें सुटला ॥ आत्मा
बोलें भेटला । आपणपया ॥ ८ ॥ दिवसातें उगो गेला । तंव
रात्रीचा द्रोहो आला ॥ म्हणोनि सूर्यो या बोला। उपमा नव्हेचि
॥ ९ ॥ जे प्रवृत्ति आणि निवृत्ति । विरुद्धा इया हातु धरिती ॥
मग शब्दाँचि चालती । एकलोंनि ॥ १० ॥ सहाय आत्मविद्येचें ।
करावया आपण वेचे ॥ गोमटे काय शब्दाचें । एकैक वानूं
॥११॥ किंबहुना शब्दु । स्मरणदानीं प्रसिद्धु । परी ययाही
संबंधु । नाहीं येथें ॥ १२ ॥
अविद्येची बाजू घेऊन शब्द हा हें खोटें दिसणारें जग खरें आहे असें
दाखवितो तेव्हां सद्रूप परमात्म्याला तीन कवडीहि किंमत उरत नाहीं. ६.
ज्याप्रमाणें पंचाक्षरी हा अक्षता फेकून पिशाच्चाला बोलावितो, नेमका
तसाच हा शब्द 'जीवेश्वर भाव' उमटवितो. ७. शुद्ध परमात्मारूप जीव
हा देहाच्या सान्निध्यानें बद्ध झाला असला तरी तो श्रुतिशब्दरूप महा-
वाक्यानें देहसंबंधांतून अलग होतो. मग आपलें आपल्यालाच शुद्ध परमा-
त्मस्वरूप भेटतें तेंहि शब्दानेंच ८. सूर्य दिवसाचा उदय करावयास गेला
असता रात्रीचा मात्र नाश करतो, म्हणून सूर्याची उपमा शब्दाला देणें
बरोबर नाहीं. ९. पण प्रवृत्ति आणि निवृत्ति ह्या एकमेकीविरुद्ध असणाऱ्या
दोघींना एकमेकींचे हात धरून शब्द मात्र चालवितो. १०. शब्दांचा
चांगुलपणा किती सांगावा ! हा आत्मविद्येची प्राप्ति करून देण्यांत
स्वतःचा नाश करून घेतो. ११. अधिक काय बोलावें ? स्मरण करून
देण्यांत शब्द प्रसिद्ध आहे हें खरे, पण ब्रह्माच्या ठिकाणीं स्मरणाचा संबंध
येतोच कोठें ? १२.
प्रकरण सहावें ५१
आत्मया बोलाचें । कांहींच उपयोगा न वचे ॥ स्वसंवेद्या
कोन्हाचें । ओझें आधी ॥ १३॥ आठवे कां विसरे । विषयो
होऊनि अवतरे ॥ तरी वस्तूशीं वस्तु दुसरे । असेना कीं ॥१४॥
आपण आपणयातें । आठवी विसरे केउते ॥ काय जिभ जिभेतें ।
चाखे न चाखे ॥ १५॥ जागणेया नीद नाहीं । मा जागणें
घडे काईं । स्मरणास्मरण दोन्हीही । स्वरूपीं तैशीं ॥ १६ ॥
सूर्यो रात्री पां नेणे । मा दिवो काय जाणे । तेवी स्मरणास्मरणें ।
आपण वस्तु ॥ १७ ॥ एवं स्मरणास्मरण नाहीं । तरी स्मारकें
काज काई ॥ म्हणोनि इये ठाई । बोलू न सरे ॥ १८ ॥
आत्मस्वरूपाच्या ठिकाणीं शब्दांचा उपयोग कांहींच नाहीं. स्वसंवेद्य
परमात्म्याला कोणाची मदत लागत नाहीं. १३. स्मरण होवो, विस्मरण
होवो, अथवा विषयांचे रूपाने प्रकट होवो, तरी पण एक वस्तूच, दुसरें
कांहीं नाहीं. १४. स्वतःचें स्वतःला स्मरण किंवा विस्मरण कसे संभवणार ?
जीभ स्वतःला चाखते किंवा चाखत नाहीं हें म्हणणें योग्य आहे का ?
१५. जागणाऱ्याला झोंप तर नाही, मग ' मी जागा आहे ' असे म्हणणें
त्याच्या ठिकाणीं संभवेल का ? अर्थात् नाहीं. त्याप्रमाणें स्वरूपाच्या
ठिकाणीं स्मरण विस्मरण हीं दोन्ही नाहींत. १६. सूर्याला रात्र ठाऊकच
नाहीं, मग त्याला दिवस तरी ठाऊक आहे ? त्याप्रमाणें परमात्मवस्तु, स्मरण
आणि विस्मरण या दोघांनाहि जाणवत नाहीं. १७. परमात्मस्वरूपाच्या
ठिकाणीं जर स्मरण वा विस्मरणाचा संबंध नाहीं; तर मग स्मरण करून
देणारा जो शब्द त्याचेंहि कारण नाहीं, म्हणून परमात्मवस्तूच्या ठिकाणीं
शब्दानें काम भागत नाहीं, तिचा लाभ होत नाहीं. १८.
५२ सार्थ अमृतानुभव
आणिक एक शब्दें । काज कीरु भले सिद्धे ॥ परी धिवसा
न बंधे । विचारु येथें ॥ १९ ॥ कां जे बोले अविद्या नाशे ।
मग आत्मैन आत्मा भासे ॥ म्हणत खेव पिसें । आलेंच कीं
॥ २० ॥ सूर्यो रात्री मारील । मा आपणया उदो करील । हे
कुडे सरती बोल । साचाच्या गांवीं ॥ २१ ॥ निदेलें निदे रुसे ।
ऐसें कीं नीद असे ॥ कीं चेइलें चेऊं बैसे । ऐसे चेणें आहे
॥ २२ ॥ म्हणौनि नाशा पुरती । अविद्या नाहीं निरुती । नाही
आत्मा आत्मस्थिती । रिगे ऐसा ॥ २३ ॥ अविद्या तंव स्वरूपें ।
वांझेचें कीर जाऊपे । ना तर्काचें खुरपें । खांडणे कोणा ॥ २४ ॥
इंद्रधनुष्या सिते । कवण धनवई न घालिजेते ॥ तें दिसे तैसें
होतें । साच जरी ॥ २५ ॥
शब्दानें आणखी एक चांगले काम केलें जातें हें खरें; पण हा विचार
करण्याचा धीर होत नाहीं. १९. कारण शब्द अविद्येचा नाश करितो,
मग आत्मा आत्म्याला भासमान होतो, असें म्हणणें वेडगळपणाचें ठरतें.
२०. सूर्य प्रथम रात्रीचा नाश करील आणि मग आपला उदय करील; हें
बिनबुडाचे बोलणें विचाराच्या गांवांत टिकणारें नाहीं. २१. जागा झाल्या-
वर निद्रेची भीति वाटेल अशी कोठें निद्रा असते ? नेहमीं जागा आहे तो
‘ जागा झाला ’ असें जागणें कोठें आहे कां ? २२. म्हणून शब्दानें नाश
करण्यापुरती खरोखर अविद्या तर नाहींत, आणि शब्दसाहाय्यानें आत्म-
स्थितींत आत्मा प्रवेश करील असा आत्माहि नाहीं. २३. खरोखर अविद्या
तर स्वरूपानें वांझेचें पोर आहे. अभावरूप आहे. मग शब्दरूपी खुरपें
कोणाचा नाश करणार हो ? २४. दिसतें तसें इंद्रधनुष्य जर खरें असतें,
तर एखाद्या धनुष्य धारण करणाऱ्याने त्याला प्रत्यंचा चढविला नसतां
काय ? २५.
प्रकरण सहावें ५३
अगस्तीचिया कौतुका । पुरती जरी मृगतृष्णिका ॥ तरी
मार देतो तर्का । अविद्येशीं ॥ २६ ॥ साहे बोलाची वळधी ।
ऐशी अविद्या असे जगीं ॥ तरी जाळूना कां आगीं । गंधर्वनगरें
॥ २७ ॥ नातरी दीपाचिये सोये । अंधारें कीर न साहे ॥
तेथें कांहीं आहे । जावयाजोगें ॥ २८ ॥ नातरी पाहावया दिवसु ।
वातीचा कीजे सोसु ॥ तेव्हढाही उद्दसु । उद्दसु पडे ॥ २९ ॥
जेथें साउली न पडे । तेथें नाहीं जेणें पाडें ॥ मा पडे तेथें
तेव्हडें । नाहींच कीं ॥ ३० ॥ दिसताचि स्वप्न लटिकें । हें
जागरीं होय ठाउकें ॥ तैविं अविद्याकाळीं सतुके । अविद्या नाहीं
॥ ३१ ॥ वोडंबरीच्या लेणिया । घरभरी आतुडलिया ॥ नागवे
नागविलिया । विशेषु काई ॥ ३२ ॥ मनोरथाचें परिमळ । अरो-
गिजतु कां लक्षवेळ । परी उपवासा वेगळ । आनु आथी ॥ ३३ ॥
मृगजळ अगस्तीच्या घोटाला पुरलें असतें, तर शब्दानें अविद्येचा नाश
झाला असता. २६. शब्दाची चढाई सहन करणारी अविद्या जगांत असती
तर, खऱ्या अग्नीनें गंधर्वनगरें का जाळूं नयेत ? २७. दिव्यापुढें अंधार
येणें शक्य नाहीं असें जर आहे; तर मग दिव्याच्या प्रकाशानें नाहीसे
होण्यासारखें कांहीं आहे का ? २८. अथवा सूर्य पाहण्यासाठीं वाती
लावण्याची खटपट करणें जसा व्यर्थ शिण होय; त्याप्रमाणें शब्दानें
अविद्येचा नाश होतो हें म्हणणें अडाणीपणाचें आहे. २९. जेथें सावली पडत
नाहीं तेथें जितक्या प्रमाणांत ती नाहीं, तितक्याच प्रमाणांत जेथें सावली
पडतें, तेथेंहि ती नसणारच कीं ! ३०. झोपेंत दिसणारें स्वप्न दिसत
असतांहि तें खोटें आहे, हें जागें झाल्यावर समजतें; त्याचप्रमाणें अविद्या-
कालींहि अविद्या मुळींच नाहीं. ३१. गारुड्यानें खेळांत दाखविलेलें दागिने
तिजोरींत भरून ठेविले, अगर एखाद्या नागव्या माणसांस लुटलें तर त्यानें
विशेष काय साधणार ? ३२. कल्पनेतील पक्वान्नें लाखो वेळ खाल्ली
तरी उपाशी राहण्याशिवाय दुसरें कांहीं फल मिळणार नाहीं. ३३.
५४ सार्थ अमृतानुभव
मृगजळ जेथ नमुंडे । तेथ असे पां कोरडे । मा उमंडे तेथ
जोडे । वोल्हांसु काई ॥ ३४ ॥ हें दिसे तैसें असे । तरी
चित्रींचेनि पाउसें ॥ बोल्हावस्तु कां माणसें । आगरा तळीं
॥ ३५ ॥ कालवूनि अंधारें । लिहो येती अक्षरें ॥ तरी मशी-
चिये वोरबारे । कां शिणावें ॥ ३६ ॥ आकाश काय निळें ।
न देखतु हे डोळे ॥ तेवी अविद्येचे टवाळे । जाणोनि घेईं
॥ ३७ ॥ अविद्या येणें नांवें । मी विद्यमानाचि नव्हे ॥ हे
अविद्याचि स्वभावें । सांगतसें ॥३८॥ आणि इये अनिर्वाच्यपण ।
ते दुजेही देवांगण ॥ आपुलां अभावीं आपण । साधितसे ॥३९॥
कांहींच जरी आहे । तरी निर्धारु कां न साहे ॥ वरी घटाभावीं
भोये । अंकित दिसे ॥ ४० ॥
ज्या जागीं मृगजळ दिसत नाहीं, ती कोरडी असते. पण जेथें तें दिसते
त्या जागीं तरी कांहीं ओलावा असतो काय ? ३४. प्रत्यक्ष दिसणारें
जग जसें दिसतें, तसेंच अविद्याकार्य यथार्थ असतें, तर चित्रांत काढलेल्या
पावसानें माणसें, भाताची आगरें व तळींहि भिजून नसती का गेली ? ३५.
अंधार जसा दिसतो तसाच जर तो खरोखर काळा पदार्थ असता, तर तो
पाण्यांत कालवून लिहितां आलें असतें व मग शाईकरितां काजळ
मिळविण्याची उठाठेव तरी कोणी कशाला केली असती ? ३६. मुळींच रंग
नसणारे आकाश जसें डोळ्यांना निळें दिसतें, त्याप्रमाणें हें अविद्याकार्य
जगत् नसूनहि दिसतें; म्हणून तें मिथ्या समजावे. ३७. 'अविद्या' या
नांवानें मी विद्यमानच असें अविद्या स्वतःच सांगते. ३८. आणि अविद्येनें
आपल्या अनिर्वाच्यपणाची शपथ घेऊन आपलें नसलेपण आपल्या
नांवावरून सिद्ध करून दिलें. ३९. कारण ही अविद्या आहे असें म्हणावें
तर ती विचारांपुढें कां टिकत नाही ? घटाभावानें जमीन कोठे घटाभास-
युक्त दिसते काय ? ४०.
प्रकरण सहावें ५५
अविद्या नाशी आत्मा । ऐसी नव्हे प्रभा । सूर्या आंगीं तमा ।
जयापरी ॥ ४१ ॥ हे अविद्या तरी मायावी । परी मायावीपणचि
लपवी ॥ हे साचा आली अभावी । आपुलां हे ॥ ४२ ॥ बहुता-
परी ऐसी । अविद्या नाहीं आपैशी ॥ आतां बोलू हात वसी ।
कवणावरी ॥ ४३ ॥ साउलि येते साबळे । हालया भोय
आडळे ॥ कीं हालेन अंतराळें । थोटावे हातु ॥ ४४ ॥ कां
मृगजळाच्या पानीं । गगनाच्या आलिंगनी ॥ नातरी चुंबनीं ।
प्रतिबिंबाच्या ॥ ४५ ॥ उठावला बोथरे तवका । तो सुनाथा
पडे असिका ॥ अविद्यानाशी तर्का । तैसें होये ॥ ४६ ॥ ऐशी
अविद्या नासावी । हें वाहेल जो जीवीं ॥ त्यानें साली काढावी ।
आकाशाची ॥ ४७ ॥
ज्याप्रमाणें अंधकाराचा नाश करणें हें सूर्याची प्राप्ति करून घेणें
नाही; त्याप्रमाणें अविद्येचा नाश झाल्यावर आत्म्याची प्राप्ति होईल असें
बुद्धीस वाटत नाहीं. ४१. अविद्या ही मायावी असून ती आपला मायावी-
पणाच लपविते असें म्हणणें असेल, तर या म्हणण्यानेंच तिचा अभाव
सिद्ध झाला. ४२. निरनिराळ्या बाजूंत विचार केला तरी अविद्या नाहीं,
असें सहजच ठरतें; मग शब्दानें कोणावर हात उचलावयाचा ? ४३.
पहारीनें सावलीस मारावयास गेलें तर जमिनीलाच खळगी पडेल; अगर
हातानें आभाळाला चापटी दिली तर हातच उखडेल ! ४४. किंवा मृग-
जळ प्यावें, आकाशाला मिठी मारावी, अथवा प्रतिबिंबाचें चुंबन घ्यावें,
४५. अशी मनांतली प्रबळ इच्छा कमी होऊन पूर्णपणें व्यर्थ होते.
शब्दाची स्थिति अविद्येचा नाश करण्याचे कामीं व सांगितल्याप्रमाणें होते.
४६. अशा अभावरूपानें असलेल्या अविद्येचा नाश करावा असें ज्याच्या
मनांत येईल त्यानें आकाशाची साल काढावी. ४७.
५६ सार्थ अमृतानुभव
तेणें शेळी गळां दोहावी । गुडगाडोळां वास पहावी ॥ वाळ-
वूनि काचरी करावी । सांजवेळेची ॥ ४८ ॥ जांभई वाटूनि
रसु । तेणें काढावा बहुवसु ॥ कालवूनि आळसु । मोदळा पाजावा
॥ ४९ ॥ तो पाटा पाणी परतु । पडली साउली उलथु ॥ वारयाचे
ताथू । वळूं सुखें ॥ ५० ॥ तो बागुलातें मारूं । प्रतिबिंब खोळे
भरूं ॥ तळहातींचे विंचरू । केश सुखे ॥ ५१ ॥ घटाचे नाहींपण
फोडूं । गगनाचीं फुलें तोडूं ॥ सशियाचे मोडूं । शिंग सुखें
॥ ५२ ॥ तो कापुराची मशी करु । रत्नदीपीं काजळ धरू ॥
वांझेंचें लेंकरूं ॥ परणू सुखें ॥ ५३ ॥ तो अवसेचिनि सुधाकरें ।
पोसू पाताळींचीं चकोरें ॥ मृगजळींची जळचरें । गाळूं सुखें
॥ ५४ ॥ अहो हें किती बोलावें । अविद्या रचिली अभावें ॥
आतां काय नासावें । शब्दें येणें ॥ ५५ ॥
शेळीच्या गळ्यांतील स्तनाचें दूध काढावें, गुडघ्यांच्या डोळ्यांनीं
मार्ग पाहावा, सांजवेळ वाळवून तिची काचरी करावी; ४८. जांभई वाटून
रस काढावा व त्यांत आळस कालवावा, तो चिखलाच्या गोळ्यास पाजावा;
४९. त्यानें पाण्यासुद्धां पाठ उलथावा; पाटाचें पाणी उलट दिशेला न्यावें;
सावली उलथवावी; वाऱ्याचे धागे वळावे; ५०. त्यानें बागुलबोवाला मारावें;
प्रतिबिंब वस्त्रांत घ्यावें, तळहातावरचें केस हवें तितकें विंचरावे ! ५१.
नसलेलें गाडगें फोडावें, आकाशाची फुले तोडावीं; सशाचें शिंग सुखानें
मोडावें; ५२. त्यानें कापूर जाळून त्याची शाई करावी, रत्नाच्या दिव्यावर
काजळ धरावें, वांझेच्या मुलीशीं लग्न करावें. ५३. अमावास्येचें चंद्रामृत
पाताळांतील चकोरांना घालून ते वाढवावेत, मृगजळांतील प्राणी पकडावे.
५४. खरोखर ह्या सर्व गोष्टी ज्याप्रमाणें असंभवनीय आहेत, त्याप्रमाणें
नाहींपणानें असणाऱ्या अविद्येचा शब्दानें नाश असंभवनीय होय. ५५
प्रकरण सहावें ५७
नाहीं तयाचेनि नासे । शब्द नये प्रमाणदशे ॥ आंधारीं
अंधारा जैसें । नव्हे रूप ॥ ५६ ॥ अविद्येची नाहीं जाती । तेथें
नाहीं म्हणतया युक्ति ॥ जैंवी दुपारी कां वाती । अंगणींचिया
॥ ५७ ॥ न पेरितां शेतीं । जे कीं संवगाणिया जाती ॥ तया
लाजापरौती । जोडी आहे ॥ ५८ ॥ खवाणियाच्या आंगा । जेणें
केला वळघा ॥ तो न करितांचि उगा । घरीं होता ॥ ५९ ॥
पाण्यावरी वरखु । होतां कें असे विशेखु ॥ अविद्यानाशी
उन्मेखु । फाकावा तैसा ॥६०॥ माप मापपण श्लाघे । जंव आकाश
मऊं नरिघे ॥ तम पाहतां वाउगें । दीपाचे जन्म ॥ ६१ ॥
गगनाची रससोये । जीभ जैं अरोगूं जाये ॥ मग रसना हे होयें ।
आडनांव कीं ॥ ६२ ॥ नव्हतेन वल्लभें । आहेवपण कां शोभे ॥
खातां केळीचे गाभे । न खातां गेलें ॥ ६३ ॥
शब्द हा नसणाऱ्या अविद्येच्या नाशानें प्रमाणदशेला येत नाहीं.
अंधारांत अंधार वेगळा नसतो. ५६. अंगणांत दोन प्रहरीं दिवा नेऊन
ठेविला तर त्याचा उपयोग काय ? अविद्येलाच जर खरूपस्थिति नाहीं,
तर तेथें युक्तीचा उपयोग काय ? ५७. धान्य न पेरतां जे शेतकाढणीला
जातात, त्यांना लाजेशिवाय दुसरें मिळणार काय ? ५८. आकाशाच्या
अंगावर हल्ला करणारा स्वस्थ घरांत होता असेंच म्हटलें पाहिजे. ५९.
समुद्रावर वर्षाव झाला तर त्यांत काय झालें ? त्याप्रमाणें अविद्येचा नाश
करण्यांत शब्दाचा प्रयत्न व्यर्थ आहे. ६०. आकाशाचें माप घेतलें जात
नाहीं तोंपर्यंतच मापाला मापपणाची शोभा. दिव्यानें अंधकार पाहिला तर
त्याचा जन्म व्यर्थ होय ! ६१. आकाशाच्या पक्वान्नाची जीभ जर चव
घेईल, तर तिचें रसना म्हणजे चव घेणारी हें नांव व्यर्थ होईल. ६२.
जिचा पती जिवंत नाहीं त्या स्त्रीला ‘ सुवासिनी ’ असें म्हणणें शोभेल
काय ? किंवा केळीचा गाभा कोणी भक्षण करूं म्हणेल तर तें भक्षण
करणें न भक्षण करणेंच होय. ६३.
५८ सार्थ अमृतानुभव
स्थूल सूक्ष्म कवणयेकु । पदार्थ न प्रकाशी अर्कु ॥ परी
रात्रीविषयीं अप्रयोजिकु । जालाचि कीं ॥ ६४ ॥ दिठी पाहतां
काय न फवे । परी निदेतें तंव न देखवे ॥ चेतातें न संभवे ।
म्हणूनियां ॥ ६५ ॥ चकोराचिया उद्यमा । लटिकेपणाची सीमा ॥
जरी दिहाची चंद्रमा । गिंवसूं बैसे ॥ ६६ ॥ नुसधीयेचि
साच्या । मुका होय वाचरुकाचा ॥ अंतराळीं पायाचा । पेंधा
होय ॥ ६७ ॥ तैशी अविद्येसीं सन्मुखे । सिद्धाचि प्रतिसेदके ॥
उठलींचि निरर्थकें । जल्पें होतीं ॥ ६८॥ अवसे आला सुधाकरु ।
न करीचि काई अंधःकारु ॥ अविद्यानाशी विचारु । तैसा होये
॥ ६९॥ नाना न निफजतेन अन्नें । जेवणें तोचि लंघनें ॥ निमा-
लेन नयनें । पाहणाचि अंधु ॥ ७० ॥
सूर्य स्थूल किंवा सूक्ष्म असा कोणता पदार्थ प्रकाशित करीत नाहीं. परंतु
तोच सूर्य रात्रीचा प्रकाश करण्यांत निरुपयोगीच ठरणार. ६४. दृष्टि इतर
सर्व पाहते पण ती झोपेला पाहायला दुबळी आहे; कारण जागा असलेला
‘झोपला आहे’ हें म्हणणें संभवतच नाहीं. ६५. दिवसा चंद्रामृतपान
करण्याच्या इच्छेनें चकोर चंद्राला शोधीत बसेल तर फुकट आहे. ६६.
‘कोरा कागद वाच’ असें सांगितलें तर वाचणारा मुका होतो, कसलाहि
चालणारा आकाशांत चालताना पांगळा होतो. ६७. त्याप्रमाणें स्वाभाविक
अभावरूप असणाऱ्या अविद्येच्या समोर, तिचा नाश करणारा शब्द उठला
तरी तो निरर्थकच होतो. ६८. अंवसेच्या रात्री चंद्र उदयास आलाच तर
तो प्रकाश देईल म्हणून ती अंवस नव्हेच. त्याप्रमाणें अविद्येच्या अनाशा-
विषयी शब्दाची स्थिति होय. ६९. किंवा तयार न केलेल्या अन्नाचें जें
जेवण तेंच लंघन; फुटलेल्या डोळ्यांनीं पाहणारा तोच आंधळा. ७०.
प्रकरण सहावें ५९
कैसेंन ही वस्तु नसे । तेथें जैं शब्दाचा अर्थ हों बैसे ॥ तैं
निरर्थकपणें नाशे । शब्दही थिता ॥ ७१ ॥ आतां अविद्याचि
नाहीं । हें कीर म्हणों काई ॥ परी नाशितां कांहीं । नुरोचि
शब्दाचें ॥ ७२ ॥ यालागीं अविद्येचिया मोंहरा । उठिलियाही
विचाग ॥ आंगाचाचि संसारा । होऊनि ठेला ॥ ७३ ॥ म्हणोनी
अविद्येचोनि मरणें । प्रमाणा येईल बोलणें ॥ हे अविद्याचि नाहीं-
पणें । नेदी घडो ॥ ७४ ॥ आणि आत्मा हन आत्मया । दाऊनि
बोलू महिमया ॥ येईल हे साविया । विरुद्धचि ॥ ७५ ॥ आपणया
आपणपेशी । लागलें लग्न कवणें दिवशीं ॥ कीं सूर्य आंग ग्रासी
ऐसें ग्रहण आहे ॥ ७६ ॥ गगन आपणया निघे । सिंधू आपणपा
रिघे ॥ कीं तळतात काय वळंघे । आपणपया ॥ ७७ ॥
कोणत्याहि रूपानें नसणाऱ्या पदार्थांची सिद्धि करण्याविषयीं शब्द
प्रयत्न करूं लागला तर तो प्रयत्न निरर्थक होऊन शब्द आपले अस्तित्व
मात्र नाहींसें करून घेतो. ७१. आतां अविद्याच नाहीं, असें कसे म्हणावें ?
पण तिचा नाश करू जातां शब्दच उरत नाहीं. ७२. म्हणजेच अविद्येचा
नाश करण्यासाठीं विचार म्हणजे शब्द तिच्यासमोर उभा राहील तर तो
स्वतःनाश पावेल. ७३. म्हणून अविद्येच्या नाशानें शब्दाला प्रामाण्य
येईल ही गोष्ट, अविद्याच आपल्या नाहींपणानें घडूं देत नाहीं. ७४. आणि
आत्म्याला आत्मा दाखवून शब्द प्रतिष्ठेला येईल, हें म्हणणेंच खरोखर
उलट आहे. ७५. आपलें आपल्याशींच लग्न लागले असें कुठें तरी ऐकलें
आहे कां ? किंवा सूर्य आपलें बिंब आपणच ग्रासतो असें कुठे तरी ऐकलें
आहे का ? ७६. स्वतःकडे जाण्यासाठीं आकाश निघूं शकेल काय ?
किंवा स्नानाकरितां समुद्र आपल्या पोटांत शिरेल तरी कसा ? अगर
तळहात तळहातावरच चढेल काय ? ७७.
६० सार्थ अमृतानुभव
सूर्य सूर्यासी विवळे । फळ आपणया फळे ॥ कीं परिमळु
परिमळे । घेतसे ॥ ७८ ॥ चराचरा पाणीपाजणी । करूं
येईल एके क्षणीं ॥ परी पाणियासी पाणी । पाजों ये काई
॥ ७९ ॥ साठीतिसा दिवसा । माजी एकादा होय ऐसा ॥ जे
सूर्यासी सूर्य जैसा । डोळा दावी ॥ ८० ॥ कृतांत जरी कापेल ।
तरी त्रैलोक्य हें जाळील ॥ वांचूनि आगी लावील । आगीसी
काई ॥ ८१ ॥ आपणपे आपणया । दर्पणेवीण धातया ॥ समोर
होआवया । ठाकी आहे ॥८२॥ दिठी दिठींतें रिघों पाहे । रुचि
रुचीतें चाखूं सूये ॥ कीं चेतया चेवऊं ये । हें नाहींच कीं
॥ ८३ ॥ चंदन चंदनपणा लावी । रंग रंगपणा रावी ॥ मोती-
पण मोती लेववी । ऐसें कैसें ॥ ८४ ॥
सूर्य सूर्यालाच उदय करील ? फळ आपला उपयोग आपणच घेते
काय ? गंधाला आपलाच वास घेतां येईल काय ? ७८. सर्व चराचराला
एकाच क्षणांत पाणी पाजण्याचें मनांत आणलें तर तें शक्य आहे; पण
पाण्याला कसें पाणी पाजतां येईल ? ७९. तीनशें साठ दिवसांत एखाद्या
दिवशीं तरी सूर्य आपल्या डोळ्यांनीं आपल्यास पाहील काय ? ८०.
प्रलयकालचा अग्नि कोपानें त्रैलोक्य जाळून टाकील, पण त्याला स्वतःला
पेटवून घेतां येईल काय ? ८१. ब्रह्मदेवाला तरी आरशावांचून आपल्या-
समोर आपलें रूप पाहण्याची काय सोय आहे ? ८२. दृष्टि दृष्टीला कशी
पाहील ? रुचि आपली रुचि घेईल काय ? किंवा जाग्यास जागें करतां
येईल काय ? हें नाहींच. ८३. चंदन आपली उटी आपल्यास लावील,
रंग आपल्यालाच रंगवील किंवा मोतीं आपलीच प्रभा आपल्याच अंगावर
घालील हें कधीं घडेल काय ? ८४.
प्रकरण सहावें ६१
सोनेंपण सोनें कसी । दीपपण दीप प्रकाशी ॥ रसपण
बुडी दे रसीं । तें के जोडे ॥ ८५ ॥ आपुले मुकुटीं समर्थां ।
चंद्र बैसविला सर्वथा । परी चंद्र चंद्राचिये माथा । वाऊं ये काई
॥ ८६ ॥ तैसा आत्मराज तंव । ज्ञानमात्रचि भरीव ॥ आतां
ज्ञाने ज्ञानासी खेव । कैसें दीजे ॥ ८७ ॥ आपुलेनि जाणपणें ।
आपणयातें जाणों नेणें ॥ डोळ्या आपुले पाहणें । दुवाड जैसें
॥ ८८ ॥ आरसा आपुलिये । आंगीं आपणा पाहे ॥ तैं जाणणें
जाणों लाहे । आपणयातें ॥ ८९ ॥ दिगंता पैलीकडेचें ।
धांवोनि सूर्या खोचे ॥ मा तिये कां तियेचें । आंग फुटे ॥९०॥
रसवृत्तीसी उगारणें । घेऊनि जिव्हाग्र शहाणें ॥ परी काई कीजे
नेणें । आपणपें चाखों ॥ ९१ ॥
सोनेंच सोन्याचा कस लावील, दिवाच दिव्याला प्रकाश करील, रसच
रसांत बुडी देईल, हें कसें घडेल ? ८५. समर्थ भगवान् शंकरांनीं आपल्या
डोक्यावर चंद्र बसविला, पण चंद्राला आपल्याच डोक्यावर बसतां येणें
शक्य आहे काय ? ८६. ज्याप्रमाणें कधींच ह्या गोष्टी घडणें शक्य नाहीं.
त्याचप्रमाणें आत्मा तर भरीव ज्ञान आहे, तेव्हां आतां त्या ज्ञानाला शब्द-
रूपी ज्ञानानें आलिंगन कसें द्यावें ? ८७. आपणा स्वतःला पाहतां येत
नाहीं. ८८. आरसा आपल्याच ठिकाणीं आपलें स्वरूप पाहूं शकेल, तरच
ज्ञान आपल्यास ज्ञेय करून जाणूं शकेल. ८९. सुरी धांवत जाऊन
आकाशापलीकडच्या पदार्थालाहि मारूं शकेल, पण ती स्वतःला मारून
घेईल का ? ९० सर्व रसांची चव घेण्यांत जीभ कुशल असली तरी
आश्चर्य हें कीं, ती स्वतःला चाखूं शकत नाहीं. ९१.
६२ सार्थ अमृतानुभव
तरी जिभे काय आपुलें । चाखणें हन ठेलें ॥ तैसें नव्हे
संचलें । तेंचि तें कीं ॥ ९२ ॥ तैसा आत्मा सच्चिदानंदु ।
आपणया आपण सिध्दु ॥ आतां काय दे शब्दु । तयाचें तया
॥ ९३ ॥ कोणाही प्रमाणाचेन हाते । वस्तु घे ना नेघे आपण-
यातें ॥ जें स्वयें आइते । घेणें ना नघेणें ॥९४॥ म्हणोनी आत्मा
आत्मलाभे । नांदवुनि शब्द शोभे ॥ येईल ऐसा न लभे । उमसु
घेवो ॥ ९५ ॥ एवं माध्यान्हीची दिवा । तम धाडी ना दिवो
दावी ॥ तैशी उभयतां पदवी । शब्दा जाली ॥ ९६ ॥ आतां
अविद्या नाहींपणें । नाहीं तये नासणें ॥ आत्मा सिध्दुचि मा
कोणें । काय साधावें ॥ ९७ ॥
असें जरी आहे तरी जिभेचे चाखणें नाहींसें झाले असें म्हणावें तर
तसें नाहीं. किंतु जिव्हाग्र चाखणेंपणानेंच भरले आहे. ९२. त्याचप्रमाणें
आत्मा सच्चिदानंदज्ञानरूप आपल्या ठिकाणीं आपण सहजच सिद्ध आहे.
आतां अशा स्वतःसिद्ध प्रकाशरूप आत्म्याला तो शब्द आपल्या पदरचें
नवीन ज्ञान काय देणार ? ९३. (प्रत्यक्षादि ) प्रमाणाच्या साहाय्यानें
परमात्मा स्वतःचें अस्तित्व सिद्ध करीत नाहीं किंवा होऊं देत नाहीं;
कारण अनादिसिद्धच आहे. सिद्धि वा असिद्धि हा शब्द वस्तुस्वरूपाच्या
ठिकाणीं कुचकामी आहे. ९४. म्हणून आत्म्याला सच्चिदानंद स्वरूपाची
प्राप्ति करून देऊन शब्दाला शोभा येईल असें मुळींच नाहीं. ९५. एवंच
ज्याप्रमाणें मध्यान्हकालीं सूर्यप्रकाशांत ठेविलेला दिवा अंधार घालवूं
शकत नाहीं व दिवसही दाखवू शकत नाहीं, त्याप्रमाणें आत्मस्वरूप
प्रकाशित किंवा अज्ञान निवृत्त करण्याविषयीं पात्रता नसल्यामुळे शब्दाला
तीच दशा प्राप्त होते. ९६. आतां अविद्या मुळींच नाहीं म्हणून तिचा
नाश संभवत नाहीं. आणि आत्मा स्वतःसिद्ध असल्यामुळे शब्दानें त्याची
सिद्धि होत नाहीं, अशा स्थितींत कोणीं काय साधावें ? ९७.