अमृतानुभव एवं चांगदेव पासष्टी (सन्त ज्ञानेश्वर - चिद्विलासवाद एवं अद्वैत अनुभूति सटीक)
Amritanubhava and Changdev Pasashti of Sant Jnanadev
सन्त ज्ञानेश्वर / ज्ञानदेव महाराज द्वारा
पृष्ठ 45, कुल 138 में से
संदर्भ में पढ़ेंआतां द्वंद्वाचे लवंचक । सांडुनि दुणीचें कंचुक ॥ सुखामात्रचि
येक । स्वयें आथी ॥ ३३ ॥ वरी येकपणे गणिजे । तैं गणतेनसी
दुजै ॥ म्हणोनी हें न गणिजे । ऐसें एक ॥ ३४ ॥ सुखा आंतोनी
निघणें । तैं सुखियें सुखी तेणें ॥ हें सुखामात्रचि मा कोणें ।
अनुभवावें ॥ ३५ ॥ जैं प्रकृति डंकु अनुकरे । तैं प्रकृति डंके अव-
तरे ॥ मा डंकूचि तैं भरे । कोण कोणा ॥३६॥ तैसें आपुलेनि
सुखपणें । जया नाहीं सुखावणें ॥ आणि नाहीं हेंही जेणें ।
नेणिजे सुखें ॥ ३७ ॥ आरिसा न पाहतां मुख । स्वयें सन्मुख
ना विन्मुख । तेवीं नसोनी सुखासुख । सुखाचि जें ॥३८॥
सर्वसिद्धांताच्या उजरिया । सांडूनिया निदसुरिया ॥ आपुलिया
हाता । चोरिया आपणाचि जे ॥३९॥
भेदाचें लवंचक म्हणजे मिथ्याभान म्हणजे विक्षेप, आणि त्याला कारण
अज्ञानाचें आवरण, त्याच्या नाशानें सुखमात्रच स्वस्वरूपानें असते. ३३.
आता एकपणानें मोजले तर मोजणारा द्वैत ठरतो, म्हणजे हें न मोजतां
येण्यासारखे आहे. ३४. तसेंच सुखांतून निघणारा त्या सुखानें सुखी होईल,
पण ही वस्तु केवळ सुखमात्रच असल्यामुळेच त्याचा अनुभव कोणीं घ्यावा?
३५. जेव्हां पुरुषास प्रकृतीचा दंश होतो, तेव्हां माणूस घुमतो. एखादा
मग केवळ दंशच असेल आणि माणूस नसेल तर त्या दंशानें कोणाला
दंश करावा ? आणि घुमावें तरी कोणीं ? ३६. त्याप्रमाणें परमात्मा स्वतः
सुखरूप असल्यामुळे, त्याला सुख होणें नाहीं आणि सुख नाहीं हेंहि
म्हणणें मूळ सुखापुढें योग्य नाहीं. ३७. आरशांत मुख न पाहतां मुखाला
समोर किंवा मागें अशी स्थिति नसते; त्याप्रमाणें सुखदुःखशून्य जे केवळ
सुखच परमात्मा असतो. ३८. अज्ञानाच्या नाशासंबंधीं शास्त्रांतील पांडित्यानें
भरलेलें ज्ञान न समजल्यामुळे कांहीं हातचें-मुळांतील-ज्ञान मिळविणें
शिल्लक राहावें तसा सुखरूप परमात्मा स्वरूपानें राहतो. ३९.