सामग्री पर जाएँ
सर्वकोश
संग्रह पर लौटें

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

कॉपीराइट समस्या बताएँ

DevanagariHindipublished467 पृष्ठ

इस ग्रन्थ के बारे में

दासबोध महाराष्ट्र के सन्त समर्थ रामदास स्वामी (1608–1681) का मराठी ओवी छन्द में रचित ग्रन्थ है। यह गुरु-शिष्य संवाद के रूप में है और बीस दशकों में बँटा है, जिनमें से प्रत्येक में दस समास हैं। इसमें भक्ति, ज्ञान और वैराग्य के साथ-साथ व्यावहारिक जीवन, प्रयत्न, चतुराई, लोक-संग्रह और नेतृत्व पर भी विस्तार से उपदेश है। मूर्ख और पढ़त-मूर्ख के लक्षण, उत्तम पुरुष और महन्त के लक्षण, तथा राजनीति-विषयक समास इसकी विशेष पहचान हैं।

सूची में इसे हिन्दी टीका सहित बताया गया है, लेकिन स्कैन का मुखपृष्ठ इसे मराठी में छपा 'श्रीदासबोध (श्रीसमर्थांचें चरित्र व शिकवण यांसह)' बताता है। इसे भट आणि मंडळी, बुधवार पेठ, पुणे ने अक्टूबर 1915 में प्रकाशित किया और अच्युत चिंतामण भट ने अपने यशवन्त छापखाने में छापा; मूल्य एक रुपया था।

मराठी उपोद्घात में समर्थ का संक्षिप्त चरित्र है, जिसमें 'श्रीसमर्थप्रताप' की प्रस्तावना और न्यायमूर्ति रानडे के मराठा इतिहास का हवाला देकर बताया गया है कि महाराष्ट्र की सन्त-परम्परा में समर्थ रामदास का स्थान अग्रणी है। पुस्तक 467 पृष्ठों की है।

पृष्ठ 402
स्थायी लिंक
पृष्ठ 402 स्कैन

१७ वा.] शिवशक्ति. ३६७
पाहिजे ॥ १४ ॥ मत्स्य कूर्म वराह देउळें । भूगोल धरिला सर्वकाळें । क-
राळें विक्राळें निर्मिलें । कितीएक ॥ १५ ॥ कितीएक देउळीं सौख्य पाहे ।
भरितें अवघे सिंधूस आहे । परी तें सर्वकाळ न रहे । अशाश्वत ॥ १६ ॥
अशाश्वताचा मस्तकमणी । जयाची एवढी करणी । दिसेना तरी काय झालें
धनी । तयासीच म्हणावें ॥ १७ ॥ उद्भवोन्मुख होतां अभेद । विमुख
होतां उदंड खेद । ऐसा अधोध्वं संवाद । होत जातो ॥ १८ ॥ सकळांचें
मूळ दिसेना । भव्य भारी आणि भासेना । निमिष एक वसेना । एके
ठायीं ॥ १९ ॥ ऐसा अगाध परमात्मा । कोण जाणे त्याचा महिमा । तुझी
लीला सर्वोत्तमा । तूंचि जाणसी ॥ २० ॥ संसारास आलियाचें सार्थक ।
जेथें नित्यानित्यविवेक । इहलोक आणि परलोक । दोन्ही साधिले ॥ २१
॥ मननशीळ लोकांपासीं । अखंड देव अहर्निशीं । पाहतां त्यांच्या पूर्व-
संचितांसी । जोडा नाहीं ॥ २२ ॥ अखंड योग म्हणोनि योगी । योग नाहीं
तो वियोगी । वियोगी तोहि योगी । योगबळें ॥ २३ ॥ भल्याची महिमा
ऐसी । जे सन्मार्ग लावी लोकांसी । पोहणार असतां बुडत्यासी । बुडों
नेदी ॥ २४ ॥ स्थूळसूक्ष्म तत्त्वझाडा । पिंडब्रह्मांडाचा निवाडा । प्रचीत
पाहे ऐसा थोडा । भूमंडळीं ॥ २५ ॥ वेदांतींचें पंचीकरण । अखंड तयाचें
विवरण । महावाक्यें अंतःकरण । रहस्य पाहे ॥ २६ ॥ जे पृथ्वीमध्यें वि-
वेकी असती । धन्य तयांची संगती । श्रवणमात्रें पावती गती । प्राणि-
मात्र ॥ २७ ॥ सत्संग आणि उत्तम गुण । सत्संग आणि सच्छास्त्रश्रवण ।
अखंड होतसे विवरण । नाना परोपकारांचें ॥ २८ ॥ जे सत्कीर्तीचे पुरुष ।
ते परमेश्वराचे अंश । धर्मस्थापनेचा हव्यास । तेथेंचि वसे ॥ २९ ॥ विशेष
सारासारविचार । तेणें होय जगदुद्धार । संगत्यागें निरंतर । होऊन गेले ॥
३० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सप्तमदशके देवबलात्कारनिरूपणं
नाम प्रथमः समासः ॥ १ ॥
२. शिवशक्ति.
श्रीगणेशाय नमः ॥ ब्रह्म निर्मळ निश्चळ । जैसें गगन अंतराळ । निरा-
१. विश्वांतपत्तीचा विचार करितां. २. विश्व आणि ब्रह्म. ३. पुण्यास.

पृष्ठ 403
स्थायी लिंक
पृष्ठ 403 स्कैन

३६८ श्रीदासबोध. [ दशक
कार केवळ । निर्विकारी ॥ १ ॥ अंतचि नाहीं तें अनंत । शाश्वत आणि
सदोदित । असंत१ नव्हे तें संत । सर्वकाळ ॥ २ ॥ परब्रह्म तें अविनाश ।
जैसें आकाश अवकाश । न तुटे न फुटे सावकाश । जैसें तैसें ॥ ३ ॥ तेथें
ज्ञान ना अज्ञान । तेथें स्मरण ना विस्मरण । तेथें अखंड निर्गुण । निर२व-
लंबी ॥ ४ ॥ तेथें चंद्र सूर्य ना पावक । नव्हे काळोख प्रकाश । उपाधी-
वेगळें एक । निरूपाधि ब्रह्म ॥ ५ ॥ निश्चळीं स्मरण चेतलें । त्यास चैतन्य
ऐसें कल्पिलें । गुणसमानत्वें झालें । गुणसाम्य ऐसें ॥ ६ ॥ गगनीं आली
अभ्रच्छाया३ । तैशी जाणिजे मूळमाया । उद्भव आणि विलया । वेळ नाहीं ॥
॥ ७ ॥ निर्गुणीं गुणविकार । तोचि षड्गुणेश्वर । अर्धनारी नटेश्वर । तयासि
म्हणिजे ॥ ८ ॥ आदिशक्ति शिवशक्ति । मुळीं आहे सर्वशक्ति । तेथून पुढें
नाना व्यक्ती । निर्माण झाल्या ॥ ९ ॥ तेथून पुढें शुद्ध सत्व । रजतमाचें
गूढत्व । तयासि म्हणिजे महत्तत्व । गुण४क्षोभिणी ॥ १० ॥ मुळीं असेचि
ना व्यक्ती । तेथें कैंची शिवशक्ती । ऐसें म्हणाल तरी चित्तीं । सावधान
असावें ॥ ११ ॥ ब्रह्मांडावरून पिंड । अथवा पिंडावरून ब्रह्मांड । अधोध्वं
पाहतां निवाड । कळों येतें ॥ १२ ॥ बीज फोडून आणिलें मना । तेंथें
फळ तों दिसेना । वाढत वाढत पुढें नाना । फळें येती ॥ १३ ॥ फळ फो-
डितां बीज दिसे । बीज फोडितां फळ नसे । तैसा विचार असे । पिंड-
ब्रह्मांडीं ॥ १४ ॥ नरनारी दोन्ही भेद । पिंडीं दिसती प्रसिद्ध । मुळीं न-
सतां विशद । होतील कैसीं ॥ १५ ॥ नाना बीजरूप कल्पना । तींत काय
एक असेना । सूक्ष्म म्हणोन भासेना । एकाएकीं ॥ १६ ॥ स्थूळाचें मूळ
तें वासना । ते वासना आधीं दिसेना । स्थूळा वेगळें अनुमानेना । सकळ
कांहीं ॥ १७ ॥ कल्पनेची सृष्टि केली । ऐशीं वेदशास्त्रं बोलिलीं । दिसेना
म्हणोन मिथ्या केलीं । न पाहिजेत कीं ॥१८॥ पडदा एकेक जन्माचा । तेथें
विचार कळेल कैंचा । परंतु गूढत्व हा नेमाचा । ठाव आहे ॥ १९ ॥ नाना
पुरुषांचे जीव । नाना स्त्रियांचे जीव । एकचि परी देहस्वभाव । वेगळाले ॥
२० ॥ नवरीस नवरी नलगे । ऐसा भेद दिसों लागे । पिंडावरून उमगे ।
ब्रह्मांडबीज ॥२१॥ नवरीचें मन नवऱ्यावरी । नवऱ्याचें मन नवरीवरी । ऐशी
१. असत्. २. आश्रयरहित. ३. ढगांची सांवली. ४. त्रिगुणांस चाळविणारी.

पृष्ठ 404
स्थायी लिंक
पृष्ठ 404 स्कैन

१७ वा. ] श्रवणोपदेश. ३६९
वासनेसी परी । मुळींहून पाहावी ॥ २२ ॥ वासना मुळींच अभेद । देहसंबंधें
झाला भेद । तुटतां देहाचा संबंध । भेद गेला ॥ २३ ॥ नरनारीचें बीज
कारण । शिवशक्तीमध्यें जाण । देह धरितां प्रमाण । कळों आलें ॥ २४ ॥
नाना प्रचीतींच्या वासना । एकाचें एकास कळेना । तीक्ष्ण दृष्टीनें अनुमाना ।
कांहींसें येतें ॥ २५ ॥ बाळकास वाढवी जननी । हें तों नव्हे पुरुषाचेनी ।
उपाधि वाढे जयाचेनी । ते हे वनिता ॥ २६ ॥ वीट नाहीं कंटाळा नाहीं ।
आलस्य नाहीं त्रास नाहीं । इतुकी माया कोठेंचि नाहीं । माते वेग-
ळी ॥ २७ ॥ नाना उपाधि वाढवूं जाणे । नाना मायेनें गोवूं जाणे । नाना
प्रीति लावूं जाणे । नाना प्रपंचाची ॥ २८ ॥ पुरुषास स्त्रीचा विश्वास ।
स्त्रीस पुरुषाचा संतोष । परस्परें वासनेस । बांधोन टाकिलें ॥ २९ ॥ ईंश्वरें
मोठें सूत्र केलें । मनुष्यमात्र गुंतोन राहिलें । लोभाचें गुंडाळें केलें । उग-
वेना ऐसें ॥ ३० ॥ ऐसी परस्परें आवडी । स्त्रीपुरुषांची महा गोडी । हे मु-
ळींहून चालली रोकडी । विवेकें पाहावी ॥ ३१ ॥ मुळीं सूक्ष्म निर्माण
झालें । पुढें स्पष्ट दिसोन आलें । उत्पत्तीचें कार्य चाले । उभयतांकरितां ॥ ३२ ॥
मुळीं शिवशक्ती हें तों खरें । पुढें झालीं वधुवरें । चौऱ्याशीं लक्ष विस्तारें ।
विस्तारली जे ॥ ३३ ॥ येथें शिवशक्तीचें रूप केलें । श्रोतीं मनास पाहिजे
आणिलें । विवरल्याविण बोलिलें । तें व्यर्थ जाणावें ॥ ३४ ॥ इति श्रीदा-
सबोधे गुरुशिष्यसंवादे सप्तदशदशके शिवशक्तिनिरूपणं नाम द्वितीयः
समासः ॥ २ ॥
३. श्रवणोपदेश.
श्रीगणेशाय नमः ॥ थांबा थांबा ऐका ऐका । आधींच ग्रंथ सोडूं नका ।
सांगीतलें तें ऐका । सावधपणें ॥ १ ॥ श्रवणामध्यें सार श्रवण । तें हें अ-
ध्यात्मनिरूपण । सुचित्त करूनि अंतःकरण । ग्रंथामध्यें विवरावें ॥ २ ॥
श्रवण मननाचा विचार । निजध्यासें साक्षात्कार । रोकडा मोक्षाचा उधार ।
बोलोंच नये ॥ ३ ॥ नाना रत्नें परीक्षितां । अथवा वजनें करितां । उत्तम
सोनें पुटीं घालितां । सावधान असावें ॥ ४ ॥ नाना नाणीं मोजून घेणें ।
१. सूक्ष्म विचारानें. २. बायको. ३. पाहावें. ४. मुशींत.

पृष्ठ 405
स्थायी लिंक
पृष्ठ 405 स्कैन

नाना परीक्षा करणें । विवेकी मनुष्यास बोलणें । सावधानें असावें ॥ ५ ॥
जैसें लाखोलीचें धान्य । निवडोन वेंचिंतां होतें मान्य । सगट मोजितां अ-
मान्य । देव क्षोभे ॥ ६ ॥ एकांतीं नाजुक कारभार । तेथें असावें अति त-
त्पर । त्याच्या कोटिगुणें विचार । अध्यात्मग्रंथीं ॥ ७ ॥ काहण्या कथा गोष्टी
पवाडें । नाना अवतारचरित्रें वाड । त्यां समस्तांमध्यें जाड । अध्यात्मवि-
द्या ॥ ८ ॥ गत गोष्टीस ऐकिलें । तेणें काय हातासि आलें । म्हणती पुण्य
प्राप्त झालें । तरी तें दिसेना कीं ॥ ९ ॥ तैसें नव्हे अध्यात्मसार । हा प्रची-
तीचा विचार । कळतां अनुमानाचा संहार । होत जातो ॥ १० ॥ मोठे
मोठे येऊन गेले । आत्म्याकरितांच वर्तले । त्या आत्म्याचा महिमा बोले ।
ऐसा कवण ॥ ११ ॥ युगानुयुग एकटा एक । चालवितो तिन्ही लोक । त्या
आत्म्याचा विवेक । पाहिलाच पाहावा ॥ १२ ॥ प्राणी आले येऊन गेले ।
ते जैसे जैसे वर्तले । ते वर्तणुकेचें कथन केलें । इच्छेसारिखें ॥ १३ ॥ जेथें
आत्मा नाहीं दाट । तेथें अवघें सरसपाट । आत्म्याविण बापुडें काष्ठे । काय
जाणे ॥ १४ ॥ ऐसें वरिष्ठ आत्मज्ञान । दुसरें नाहीं या समान । सृष्टी-
मध्यें विवेकी जन । तेचि हें जाणती ॥ १५ ॥ पृथ्वी आणि आप तेज ।
यांचा पृथ्वीमध्यें समज । अंतरात्मा तत्वबीज । तें वेगळेंचि राहिलें ॥ १६ ॥
वायूपासून पैलीकडे । जो कोणी विवेकें पवाडे । जवळींच आत्मा सांपडे ।
तया पुरुषासी ॥ १७ ॥ वायुप्रकाशैं गुणमाया । प्रकृतिपुरुष मूळमाया ।
सूक्ष्मरूपें प्रतीत येया । कठिन आहे ॥ १८ ॥ मायादेवीच्या धांदली ।
सूक्ष्मीं कोण मन घाली । समजला त्याची तुटली । संदेहवृत्ती ॥ १९ ॥ मूळ-
माया चौथा देह । झाला पाहिजे निःसंदेह । देहातीत होऊन राहे । धन्य
तो साधु ॥ २० ॥ विचारें ऊर्ध्व चढती । तयासी ऊर्ध्वगती । येरां सकळां
अधोगती । पदार्थज्ञानें ॥ २१ ॥ पदार्थ चांगले दिसती । परी ते सर्वैचि
नासती । अतोभ्रष्टस्ततोभ्रष्ट होती । लोक तेणें ॥ २२ ॥ या कारणें प्रकृति-
ज्ञान । नाना जिनसांचें अनुमान । सर्व सांडूनि निरंजन । धुंडीत जावें
॥ २६ ॥ अष्टांगयोग पिंडज्ञान । त्याहून थोर तत्वज्ञानें । त्याहून थोर आ-
१. पोवाडे. २. लांकडासारखें निर्जीव शरीर. ३. वायूचा उद्भव. ४. सद्गति.
५. याला मुकला व त्यालाही मुकला. ६. महदादि तत्त्वांचें ज्ञान.

पृष्ठ 406
स्थायी लिंक
पृष्ठ 406 स्कैन

१७ वा.] अनुमान. ३७१
त्मज्ञान । तें पाहिलें पाहिजे ॥ २४ ॥ मूळमायेचे शेवटीं । हरिसंकल्प मुळीं
उठी । उपासनायोगें मिठी । तेथें घातली पाहिजे ॥ २५ ॥ मग त्या पैली-
कडे जाण । निखळ ब्रह्म निर्गुण । निर्मळ निश्चळ त्याची खूण । गगनासा-
रिखी ॥ २६ ॥ येथून तेथवरी दाटलें । प्राणिमात्रास भेटलें । पदार्थमात्रीं
लिगटलें । व्यापून आहे ॥ २७ ॥ त्याऐसें नाहीं थोर । सूक्ष्माहूनि सूक्ष्मवि-
चार । पिंडब्रह्मांडांचा संहार । होतां कळे ॥ २८ ॥ अथवा पिंडब्रह्मांड अ-
सतां । विवेकप्रलय पाहों जातां । शाश्वत कोण हें तत्त्वतां । उमजों लागे
॥ २९ ॥ करून अवघा तत्त्वझाडा । सारासारांचा निवाडा । सावधपणें ग्रंथ
सोडा । सुखेनैव ॥ ३० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सप्तदशदशके
श्रवणोपदेशनिरूपणं नाम तृतीयः समासः ॥ ३ ॥

४. अनुमान.
श्रीगणेशाय नमः ॥ बहुत जनांसि उपाय । वक्त्यास पुसतां त्रासूं नये ।
बोलतां बोलतां अन्वय । सांडूंच नये ॥ १ ॥ श्रोत्यानें आशंका घेतली ।
ते तात्काळ पाहिजे फेडिली । स्वगोष्टीनें स्वगोष्टी पेंचली । ऐसें न व्हावें
॥ २ ॥ पुढें धरितां मागें पेंचला । मागें धरितां पुढें उडाला । ऐसा सांप-
डतांचि गेला । ठायीं ठायीं ॥ ३ ॥ पोहणारचि गुचक्या खातो । जनांस
कैसा काढूं पाहतो । आशय लोकांचा राहत जातो । ठायीं ठायीं ॥ ४ ॥
आपणाचि बोलिला संहार । आपणचि बोलिजे सर्वसार । दुस्तर मायेचा
पार । दाविला पाहिजे ॥ ५ ॥ जें जें सूक्ष्म नाम द्यावें । त्याचें रूप बिंब-
वूनि द्यावें । तरीच वक्ता म्हणावें । विचारवंत ॥ ६ ॥ ब्रह्म कैसें मूळमाया
कैसी । अष्टधा प्रकृति शिवशक्ति कैसी । षड्गुणैश्वर्याची स्थिती कैसी ।
गुणसाम्याची ॥ ७ ॥ अर्धनारी नटेश्वर । प्रकृतिपुरुषांचा विचार । गुण-
क्षोभिणी तदनंतर । त्रिगुण कैसे ॥ ८ ॥ पूर्वपक्ष कोठून कोठवरी । वाच्यां-
श लक्ष्यांशाची परी । सूक्ष्म नाना विचार करी । धन्य तो साधु ॥ ९ ॥
नाना पाल्हाळीं पडेना । बोलिलांचि बोलवेना । मौनगर्भे अनुमाना ।


१. 'एकोऽहं बहु स्याम्' (मी एक आहें तो पुष्कळ होईन.) असा ईश-
संकल्प. २. ज्याचा गर्भ (स्वरूप) सांगण्यास शब्द नाहींत तें मौनगर्भ; ब्रह्म.

पृष्ठ 407
स्थायी लिंक
पृष्ठ 407 स्कैन

३७२ श्रीदासबोध. [ दशक
आणून सोडी ॥ १० ॥ घडी एक विमळब्रह्म । घडी एक सर्व ब्रह्म ।
द्रष्टा साक्षी सत्ता ब्रह्म । क्षण एक ॥ ११ ॥ निश्चळ तेंचि झालें चंचळ ।
चंचळ तेंचि ब्रह्म केवळ । नाना प्रसंगीं खळखळ । निवाडा नाहीं ॥ १२ ॥
चळतें आणि निश्चळ । अवघें चैतन्याचि केवळ । रूपें वेगळालीं प्रबळ ।
बोलवेना ॥ १३ ॥ उगीच करी गाथागोवी । तो लोकांस कैसा उगवी ।
नाना निश्चय नाना गोवी । होत जाते ॥ १४ ॥ भ्रमास म्हणे परब्रह्म ।
परब्रह्मास म्हणे भ्रम । ज्ञातेपणाचा संभ्रम । बोलोन दावी ॥ १५ ॥ घाली
शास्त्रांचें दृढपण । प्रचीतीविण निरूपण । पुसों जातां उगाच शीण ।
अत्यंत मानी ॥ १६॥ झाल्यास आणि पडोंर्थेभिडा। तो काय बोलेल बापुडा ।
सारासारांचा निवाडा । झाला पाहिजे ॥ १७ ॥ वैद्य मात्रेची स्तुति करी ।
मात्रा गुण कांहींच न करी । प्रचीतीविण तैसी परी । ज्ञानाची झाली
॥ १८ ॥ जेथें नाहीं सारासार । तेथें अवघा अंधकार । नाना परीक्षांचे
विचार । राहिले तेथें ॥ १९ ॥ पाप पुण्य स्वर्ग नरक । विवेक आणि अवि-
वेक । सर्व ब्रह्मीं काय एक । सांपडलें नाहीं ॥ २० ॥ पावन आणि तें
पतन । दोन्ही मानिलीं तत्समान । निश्चय आणि अनुमान । ब्रह्मरूप ॥ २१॥
ब्रह्मरूप झालें आघवें । तेथें काय निवडावें । अवघी साकराच टाकावें ।
काय कोठें ॥ २२॥(तैसें सार आणि असार । अवघा झाला एकंकार । तेथें
बळावला अविचार । विचार कैंचा ॥ २३ ॥ वंद्य निंद्य एक झालें । तेथें
काय हातास आलें । उन्मत्त द्रव्यें जे भुलले । ते भलतेंच बोलती ॥२४॥
तैसा अज्ञानभ्रमें भुलला । सर्व ब्रह्म म्हणोन बैसला । महापापी आणि
भला । एकचि मानी ॥ २५ ॥ सर्वसंगपरित्याग । अवासवा विषयभोग ।
दोघे एकचि मानितां मग । काय उरलें ॥ २६ ॥ भेद ईश्वर करून गेला ।
तो याच्या बापाचेनि न वचे मोडिला । मुखामध्यें घांस घातला । तो
अपानीं घालावा ॥२७॥ ज्या इंद्रियास जो भोग । तो तो करी यथासांग ।
ईश्वराचें केलें जग । मोडितां उरेना ॥ २८ ॥ अवघी आंतीची ठकाठकी ।
प्रचीतीविण गोष्टी लटकी । वेड लागलें जे बटकी । ते भलतेंच बोले ॥२९॥
-प्रत्ययज्ञाता सावधान । त्याचें ऐकावें निरूपण । आत्मसाक्षात्काराची
१. गोंधळ. २. समजावी. ३. डौल. ४. खोभी. ५. मद्यानें.

पृष्ठ 408
स्थायी लिंक
पृष्ठ 408 स्कैन

सां पडोंच नये ॥ १३ ॥" or "सायासीं पडोंच नये"?
Usually: "सहज सांडून सायासीं । पडोंच नये ॥ १३ ॥"
In rhyme: सकळांसी / जाणत्यासी / सायासी.
Look at the image: सा या सीं - wait, the top of स has a curve to the right, which is a velanti (ी). But wait, does it have a kana too?
Ah, let's look at सायासों: the kana is not there, it's just सायासीं! Wait, no, look at the word: सायासों or सायासीं?
Wait, look at line 24: सायासें देव फुटे नासे ।
In line 23, look at the word: स ा य ा स and then a kana + matra?
Wait! स followed by ा and े = सो? No, look at पडोंच next to it: प ड ों च.
In सायासीं, look at the top: it has a circle/loop. Ah, it's सायासीं! Wait, why did it look like सायासों? Because the velanti hangs down. It is definitely सायासीं (rhyming with सकळांसी, जाणत्यासी

पृष्ठ 409
स्थायी लिंक
पृष्ठ 409 स्कैन

३७४ श्रीदासबोध. [ दशक
यज्ञपुरुष पोटीं असती । तयांस अवदानें सकळ देती । लोक भांजेमध्यें
असती । आत्मयाचे ॥ १७ ॥ सहज देव जपध्यानें । सहज बोलणें स्तुति
स्तवनें । सहज घडे तें भगवानें । मान्य कीजे ॥ १८ ॥ सहज समजायाकारणें ।
नाना हठयोग करणें । परंतु एकाएक समजणें । घडत नाहीं ॥ १९ ॥ द्रव्य
चुकतें दारिद्र येतें । तैंळीं लक्ष्मी वैरी वर्तते । प्राणी काय करील तें ।
ठाउकें नाहीं ॥ २० ॥ तळघरामध्यें उदंड द्रव्य । भिंतीमध्यें घातलें द्रव्य ।
स्तंभीं तुळवटीं द्रव्य । आपण मध्यें ॥ २१ ॥ लक्ष्मीमध्यें करंटा नांदे ।
त्याचें दरिद्र अधिक सांधे । नवल केलें परमानंदें । परम पुरुषें ॥ २२ ॥ एक
पाहती एक खाती । ऐशी विवेकाची गती । प्रवृत्ति अथवा निवृत्ति । येणेंच
न्यायें ॥ २३ ॥ अंतरीं वसतां नारायणें । लक्ष्मीस काय उणें । ज्याची लक्ष्मी
तो आपण । बळकट धरावा ॥ २४ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
सप्तदशदशके अजपानिरूपणं नाम पंचमः समासः ॥ ५ ॥
६. देहात्मा.
श्रीगणेशाय नमः ॥ आत्मा देहामध्यें असतो । नाना सुखदुःखें भोगि-
तो । शेवटीं शरीर सांडून जातो । एकाएकीं ॥ १ ॥ शरीरशक्ति तारुण्य-
पर्णी । नाना सुखें भोगिती प्राणी । अशक्त होतां वृद्धपणीं । दुःखें भोगिती
॥ २ ॥ मरावें ना ऐसी आवडी । हात पाय खोडून प्राण सोडी । नाना
दुःखें अवघडी । वृद्धपणीं ॥ ३ ॥ देहात्मयाचे संगतीं । कांहींएक सुख भो-
गिती । चर्फडोंचर्फडून जाती । देहांतकाळीं ॥ ४ ॥ ऐसा आत्मा दुःख-
दायक । एकाचे प्राण घेती एक । आणि शेवटीं निरर्थक । कांहींच नाहीं
॥ ५ ॥ ऐसा दों दिवसांचा भ्रम । त्यास म्हणती परब्रह्म । नाना दुःखाचा
संभ्रमें । मानून घेतला ॥ ६ ॥ दुःखी होऊन चर्फडून गेले । तेथें काय
समाधान झालें । कांहीं एक सुख भोगिलें । तों सर्वंच दुःख ॥ ७ ॥ जन्म-
दारभ्य आठवावें । म्हणिजे अवघें पडेल ठावें । नाना दुःखें भोगावें । काय
म्हणोन ॥ ८ ॥ ऐसी आत्म्याची संगती । नाना दुःखें प्राप्त होतीं । दै-
न्यवाणे होऊन जाती । प्राणिमात्र ॥ ९ ॥ कांहीं आनंद कांहीं खेद । ज.
१. आहुति. २. कष्ट. ३. खालीं, वर. ४. वाढतें. ५. प्रसंग. ६. जन्मापासून.

पृष्ठ 410 स्कैन

न्मवरी पडिला संबंध । नाना प्रकारीं विरुद्ध । ताडांतोडी ॥ १० ॥ निद्रा-
काळीं ढेंकूण पिसा । नाना प्रकारीं वळँसा । नाना उपायें वळसा । त्यांस
होय ॥ ११ ॥ भोजनकाळीं माशा येती । नाना पदार्थ उंदीर नेती । पुढें
त्यांचीहि फजिती । मार्जारें करिती ॥ १२ ॥ उवा चामवा गोचिड । गां-
धलें कानटे उदंड । एकास एक चर्फंड । दोहोंकडे ॥ १३ ॥ विंचू सर्प वाघ
रिसें । सुसर लांडगे माणसांस माणसें ।

इस पृष्ठ का पूरा पाठ पढ़ने के लिए निःशुल्क खाता बनाएँ

पृष्ठ का स्कैन सभी के लिए निःशुल्क है।

खाता बनाएँ या साइन इन करें
पृष्ठ 411 स्कैन

३७६ श्रीदासबोध. [ दशक
तें । आपद् आपदों¹ ॥ २९ ॥ अंतकाळीं दैन्य² दीन । सकळिकांस तत्समान ।
ऐसें चंचल अवलक्षण । दुःखकारी ॥ ३० ॥ भोगून अभोक्ता म्हणती ।
हें तों अवघीच फजिती । लोक उगेच बोलती । पाहिल्याविण ॥ ३१ ॥
अंतकाळ आहे कठिण । शरीर सोडीना प्राण । बराड्यासारिखें लक्षण ।
अंतकाळीं ॥ ३२ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सप्तदशदशके

इस पृष्ठ का पूरा पाठ पढ़ने के लिए निःशुल्क खाता बनाएँ

पृष्ठ का स्कैन सभी के लिए निःशुल्क है।

खाता बनाएँ या साइन इन करें
पृष्ठ 412 स्कैन

१७ वा.] तत्त्वविवरण. ३७७
न घ्यावें ॥ १४ ॥ जाणता तो सकळां मान्य । नेणता होतो अमान्य ।
जेणें करितां होइजे धन्य । तेंचि घ्यावें ॥ १५ ॥ साक्षेपी शाहाण्याची संग-
ती । तेणें साक्षेपी शाहाणे होती । आळसी मूर्खाची संगती । होती आळसी
मूर्ख ॥ १६ ॥ उत्तमसंगतीचें फळ सुख । अधमसंगतीचें फळ दुःख । आंनंदू
सांडूनियां शोक । कैसा घ्यावा ॥ १७ ॥ ऐसें हें प्रगट दिसे ।

इस पृष्ठ का पूरा पाठ पढ़ने के लिए निःशुल्क खाता बनाएँ

पृष्ठ का स्कैन सभी के लिए निःशुल्क है।

खाता बनाएँ या साइन इन करें
पृष्ठ 413 स्कैन

१७८ श्रीदासबोध. [ दशक
मध्यमा वाचा बोलिजे त्याला । उच्चार होतां अक्षराला । वैखरी बोलिजे ॥२॥
नाभिस्यानीं परा वाचा । तोचि ठाव अंतःकरणाचा । अंतःकरणपंचकाचा ।
निवाडा ऐसा ॥ ३ ॥ निर्विकल्पीं जें स्फुरण । उगँच असतां आठवण । तें
जाणावें अंतःकरण । जाणती कळा ॥ ४ ॥ अंतःकरणीं आठवलें । पुढें होय
नव्हेसें गमलें । करूं न करूं ऐसें वाटलें । तेंचि मन ॥ ५ ॥ संकल्प विक-
ल्प तेंचि मन । तेणें

इस पृष्ठ का पूरा पाठ पढ़ने के लिए निःशुल्क खाता बनाएँ

पृष्ठ का स्कैन सभी के लिए निःशुल्क है।

खाता बनाएँ या साइन इन करें
पृष्ठ 414 स्कैन

१७ वा.] तनुचतुष्टय. ३७९
ऐसा हा सूक्ष्म देह । पाहतां होइजे निःसंदेह । येथें मन घालूनी पाहे ।
त्यासि हें उमजे ॥ २२ ॥ ऐसें सूक्ष्म देह बोलिलें । पुढें स्थूळ निरूपिलें ।
आकाश पंचगुणे वर्तलें । कैसें स्थूळीं ॥ २३ ॥ काम क्रोध शोक मोह भय ।
पंचविध आकाशाचा अन्वय १ । पुढें पंचविध वायु । निरूपिला ॥ २४ ॥
चळण वळण प्रसरण । निरोध आणि आकुंचन । हें पंचविध लक्षण ।

इस पृष्ठ का पूरा पाठ पढ़ने के लिए निःशुल्क खाता बनाएँ

पृष्ठ का स्कैन सभी के लिए निःशुल्क है।

खाता बनाएँ या साइन इन करें
पृष्ठ 415 स्कैन

३८० श्रीदासबोध. [ दशक
चारी भोग । चौदेहाचे ॥३॥ अकार उकार मकार । अर्ध मात्रा तो ईश्वर ।
ऐशा मात्रा चार । चौ देहांच्या ॥ ४ ॥ तमोगुण रजोगुण । सत्वगुण शुद्ध
सत्वगुण । ऐसे हे चार गुण । चौदेहांचे ॥ ५ ॥ क्रियाशक्ति द्रव्यशक्ति ।
इच्छाशक्ति ज्ञानशक्ती । ऐशा ह्या चार शक्ती । चौदेहांच्या ॥ ६ ॥ ऐशीं
हीं बत्तीस तत्वें । दोहींचीं पन्नास तत्वें । अवघीं मिळोन ब्यायसीं तत्वें । अ-

इस पृष्ठ का पूरा पाठ पढ़ने के लिए निःशुल्क खाता बनाएँ

पृष्ठ का स्कैन सभी के लिए निःशुल्क है।

खाता बनाएँ या साइन इन करें
पृष्ठ 416 स्कैन

१७ वा. ] सिद्ध. ३८१
१०. सिद्ध.
श्रीगणेशाय नमः ॥ आवरणोदकीं हाटकेश्वर । त्यास न घडे नम-
स्कार । महिमा अत्यंतचि थोर । तया पाताळलिंगाचा ॥ १ ॥ परंतु तेथें
जाववेना । शरीरें दर्शन घडेना । विवेकें आणावें अनुमाना । तया ईश्वरासी
॥ २ ॥ सातां समुद्रांचे वेढे । उदंड भूमि पैलीकडे । शेवटीं तुटले कडे ।
भूमंडळाचे ॥ ३ ॥ सात समुद्र बोलांडावे । तेथें जाणें कैसें फावे । म्हणोनि
विवेकीं

इस पृष्ठ का पूरा पाठ पढ़ने के लिए निःशुल्क खाता बनाएँ

पृष्ठ का स्कैन सभी के लिए निःशुल्क है।

खाता बनाएँ या साइन इन करें
पृष्ठ 417 स्कैन

काँचया लोकांस । काय म्हणावें ॥ १९ ॥ ईश्वरें नाना भेद केले । भेदें स-
कळ सृष्टि चाले । आंधळे परीक्षकवंत मिळाले । तेथें परीक्षा कैंची ॥ २० ॥
जेथें परीक्षेचा अभाव । तो टोणपा समुदाय । गुणचि नाहीं गौरवें¹ । येईल
कैंचें ॥ २१ ॥ खरें खोटें एकचि झालें । तरी विवेकानें काय केलें । असार
सांडून सार घेतलें । साधुजनीं ॥ २२

इस पृष्ठ का पूरा पाठ पढ़ने के लिए निःशुल्क खाता बनाएँ

पृष्ठ का स्कैन सभी के लिए निःशुल्क है।

खाता बनाएँ या साइन इन करें
पृष्ठ 418 स्कैन

१८ वा. ] बहु देवस्थान . ३८३

विशीं वर्तविशी । जाणजाणों ॥ ४ ॥ धन्य धन्य भोळा शंकर । जयाच्या
देण्यास नाहीं पार । रामनाम निरंतर । जपत आहे ॥ ५ ॥ धन्य धन्य
इंद्रदेव । सकळ देवांचाहि देव । इंद्रलोकींचें वैभव । काय म्हणोन सांगावें ॥
६ ॥ धन्य धन्य यमधर्म । सकळ जाणती धर्माधर्म । प्राणिमात्रांचें वर्म ।
ठायीं पाडिती ॥ ७ ॥ व्यंकटेशीं महिमा किती । भले उभ्यां अन्न खाती ।
वडे

इस पृष्ठ का पूरा पाठ पढ़ने के लिए निःशुल्क खाता बनाएँ

पृष्ठ का स्कैन सभी के लिए निःशुल्क है।

खाता बनाएँ या साइन इन करें
पृष्ठ 419 स्कैन

३८४ श्रीदासबोध. [ दशक
॥ २४ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे अष्टादशदशके बहुदेवस्थान-
निरूपणं नाम प्रथमः समासः ॥ १ ॥
२. सर्वज्ञसंग.
श्रीगणेशाय नमः ॥ नेणपणें झालें तें झालें । झालें तें होऊनि गेलें ।
जाणतेपणें वर्तलें । पाहिजे नेमस्त ॥ १ ॥ जाणत्याची संगति धरावी । जा-
णत्याची सेवा करावी । जाणत्याची सद्बुद्धि घ्यावी । हळूहळू ॥ २ ॥ जाण-
त्यापाशीं लिहों

इस पृष्ठ का पूरा पाठ पढ़ने के लिए निःशुल्क खाता बनाएँ

पृष्ठ का स्कैन सभी के लिए निःशुल्क है।

खाता बनाएँ या साइन इन करें
पृष्ठ 420 स्कैन

१८ वा. ] निस्पृह. ३८५
जाणत्याची सहिष्णुता । जाणत्याची उदारता । समजोन घ्यावी ॥ १७ ॥
जाणत्याची नाना कल्पना । जाणत्याची दीर्घसूचना । जाणत्याची विवंच-
ना समजोन घ्यावी ॥ १८ ॥ जाणत्याचा काळ सार्थक । जाणत्याचा अ-
ध्यात्मविवेक । जाणत्याचे गुण अनेक । अवघेच घ्यावे ॥ १९ ॥ जाणत्याचा
भक्तिमार्ग । जाणत्याचा वैराग्ययोग । जाणत्याचा अवघा प्रसंग ।

इस पृष्ठ का पूरा पाठ पढ़ने के लिए निःशुल्क खाता बनाएँ

पृष्ठ का स्कैन सभी के लिए निःशुल्क है।

खाता बनाएँ या साइन इन करें
पृष्ठ 421 स्कैन

३८६ श्रीदासबोध. [ दशक
विलें । देखत देखतां ॥ ३ ॥ मूर्खपणाचा अभ्यास केला । बाष्कळपणें
घातला घाला । काम चांडाळ उठिला । तरुणपणीं ॥ ४ ॥ मूर्ख आळसी
आणि तरुणा । सर्वांविषयीं दैन्यवाणा । कांहीं मिळेना कोणा । काय
म्हणावें ॥ ५ ॥ जें जें पाहिजे तें तें नाहीं । अन्न वस्त्र तेंहि नाहीं । उत्तम
गुण कांहींच नाहीं । अंतर्यामीं ॥ ६ ॥ बोलतां येइना बैसतां येइना ।

इस पृष्ठ का पूरा पाठ पढ़ने के लिए निःशुल्क खाता बनाएँ

पृष्ठ का स्कैन सभी के लिए निःशुल्क है।

खाता बनाएँ या साइन इन करें