दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 410, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ेंन्मवरी पडिला संबंध । नाना प्रकारीं विरुद्ध । ताडांतोडी ॥ १० ॥ निद्रा-
काळीं ढेंकूण पिसा । नाना प्रकारीं वळँसा । नाना उपायें वळसा । त्यांस
होय ॥ ११ ॥ भोजनकाळीं माशा येती । नाना पदार्थ उंदीर नेती । पुढें
त्यांचीहि फजिती । मार्जारें करिती ॥ १२ ॥ उवा चामवा गोचिड । गां-
धलें कानटे उदंड । एकास एक चर्फंड । दोहोंकडे ॥ १३ ॥ विंचू सर्प वाघ
रिसें । सुसर लांडगे माणसांस माणसें । परस्परें सुखसंतोषें । एकहि नाहीं
॥ १४ ॥ चौन्यायशीं लक्ष उत्पत्ति । एकास एक भक्षिती । नाना पीडा दु-
खणीं किती । काय म्हणोन सांगावें ॥ १५ ॥ ऐशी अंतरात्माची करणी ।
नाना जीव दाटले धरणीं । परस्परें संहारणी । एक एकाची ॥ १६॥ अखंड
रडती चर्फडती । विवळविवळों प्राण देती । मूर्ख प्राणी त्यांस म्हणती । परब्रह्म
॥ १७ ॥ परब्रह्म जाणार नाहीं । कोणास दुःख देणार नाहीं । स्तुति निंदा
दोनी नाहीं । परब्रह्मीं ॥ १८ ॥ उदंड शिव्या दिधल्या । तितुक्या अंतरा-
त्म्यास लागल्या । विचार पाहतां प्रत्ययास आल्या । यथातथ्य ॥ १९ ॥
धगडीचा बटकीचा लंवडीचा । गधडीचा कुत्रीचा वोंगळीचा । ऐसा हिशेब
शिव्यांचा । किती म्हणोन सांगावा ॥ २० ॥ इतकें परब्रह्मीं लागेना । तेथें
कल्पनाचि चालेना । ताडातोडीचें ज्ञान मानेना । कोणी एकासी ॥ २१ ॥
सृष्टीमध्यें सकळ जीव । सकळांस कैंचें वैभव । या कारणें ठायाठाव । नि-
र्मिला देवें ॥ २२ ॥ उदंड लोक बाजारींचे । जें जें आलें तें तें वेंचे । उत्त-
म तितुकें भाग्याचे । लोक घेती ॥ २३ ॥ येणेंचि न्यायें अन्न-वसनें । येणें-
चि न्यायें देवतार्चन । येणेंचि न्यायें ब्रह्मज्ञान । प्राप्तव्यासारिखें ॥ २४ ॥
अवघेचि लोक सुखी असती । संसार गोड करून नेती । महाराजे वैभव
भोगिती । तें करंट्यास कैंचें ॥ २५ ॥ परंतु अंतीं नाना दुःखें । तेथें
होतें सकट सारिखें । पूर्वी भोगिलीं नाना सुखें । अंतीं दुःख सोसवेना
॥ २६ ॥ प्राण शरीर सोडीना । कठिन दुःख सोसवेना । मृत्युदुःख
सकळ जनां । कासावीस करी ॥ २७ ॥ नाना अवयवहीन झालें ।
तैसेंचि पाहिजे वर्तलें । प्राणी अंतकाळीं गेलें । कासावीस होउनी ॥ २८ ॥
रूप लावण्य आवघें जातें । शरीरसामर्थ्य तेंही जातें । कोणी नसतां मर-
तळटीपा (Footnotes):
१. घोटाळा. २. उपद्रव. ३. खरोखर. ४. वस्त्र.