दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 411, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें३७६ श्रीदासबोध. [ दशक
तें । आपद् आपदों¹ ॥ २९ ॥ अंतकाळीं दैन्य² दीन । सकळिकांस तत्समान ।
ऐसें चंचल अवलक्षण । दुःखकारी ॥ ३० ॥ भोगून अभोक्ता म्हणती ।
हें तों अवघीच फजिती । लोक उगेच बोलती । पाहिल्याविण ॥ ३१ ॥
अंतकाळ आहे कठिण । शरीर सोडीना प्राण । बराड्यासारिखें लक्षण ।
अंतकाळीं ॥ ३२ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सप्तदशदशके देहा-
त्मनिरूपणं नाम षष्ठः समासः ॥ ६ ॥
७. जगज्जीवन.
श्रीगणेशाय नमः ॥ मुळीं उदक निवळ असतें । नाना वल्लीमध्यें
जातें । संगदोषें तैसें होतें । आम्लें³ तीक्ष्ण⁴ कडवट ॥ १ ॥ आत्मा आहमपणें
असतो । देहासंगें विकारतो । साभिमानें भरीं भरतो । भलतीकडे ॥ २ ॥
बरी संगति सांपडली । जैसी उंसास गोडी आली । विषयवल्ली फोपावली ।
घातकी प्राणीं ॥ ३ ॥ अठरा भार वनस्पती । गुण सांगावे ते किती । नाना
देहांचे संगती । आत्मयास होय ॥ ४ ॥ त्यामध्यें कोणी भले । ते संतसंगें
निवाले । देहाभिमान सांडून गेले । विवेकबळें ॥ ५ ॥ उदकाचा नाशचि
होतो । आत्मा विवेकें निघतो । ऐसा आहे प्रत्यय तो । विवेकें पाहावा
॥ ६ ॥ ज्यासी स्वहितचि करणें । त्यास किती म्हणोन सांगणें । हें ज्याचें
त्याणें समजणें । सकळ कांहीं ॥ ७ ॥ आपला आपण करी कुडौवा⁵ । तो
आपला मित्र जाणावा । आपला नाश करी तो समजावा । वैरी ऐसा ॥८॥
आपलें आपण अनहित करावें । त्यास आडवें कोणें रिघावें । एकांतीं जा-
ऊन जीवें । मारी आपणासी ॥ ९ ॥ जो आपला आपण घातकी । तो
आत्महत्यारा पातकी । या कारणें विवेकी । धन्य साधू ॥ १० ॥ पुण्यवंता
सत्संगती । पापिष्ठास असत्सगंती । गति आणि अवगती । संगतियोंगें
॥ ११ ॥ उत्तम संगति धरावी । आपली आपण चिंता करावी । अंतरीं बरी
विवरावी । बुद्धि जाणत्याची ॥ १२ ॥ इहलोक आणि परलोक । जाणता
तो सुखदायक । नेणत्याकरितां अविवेक । प्राप्त होतो ॥ १३ ॥ जाणता
देवाचा अंश । नेणता म्हणजे तो राक्षसांश । यामध्यें जें विशेषे । तें जाणो-
१. डाळ होऊन. २. दीनवाणें. ३. आंबट. ४. तिखट. ५. रक्षण.