सामग्री पर जाएँ
सर्वकोश
दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

पृष्ठ 412, कुल 467 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 412

१७ वा.] तत्त्वविवरण. ३७७
न घ्यावें ॥ १४ ॥ जाणता तो सकळां मान्य । नेणता होतो अमान्य ।
जेणें करितां होइजे धन्य । तेंचि घ्यावें ॥ १५ ॥ साक्षेपी शाहाण्याची संग-
ती । तेणें साक्षेपी शाहाणे होती । आळसी मूर्खाची संगती । होती आळसी
मूर्ख ॥ १६ ॥ उत्तमसंगतीचें फळ सुख । अधमसंगतीचें फळ दुःख । आंनंदू
सांडूनियां शोक । कैसा घ्यावा ॥ १७ ॥ ऐसें हें प्रगट दिसे । जनामध्यें उदंड
भासे । प्राणिमात्र वर्ततसे । उभययोगें ॥ १८ ॥ एका योगें सकळ योग ।
एका योगें सकळ वियोग । विवेकयोगें सकळ प्रयोग । करीत जावे ॥ १९ ॥
अवचितें सांकडींत पडिलें । तरी तेथून पाहिजे निघालें । निघोन जातां
झालें । परम समाधान ॥ २० ॥ नाना दुर्जनांचा संग । क्षणक्षणा मनो-
भंग । या कारणें कांहीं रंग । राखोन जावें ॥ २१ ॥ शाहाणा यत्नी त्याच्या
गुणें । पाहों जातां काय उणें । सुख संतोष भोगणें । नाना श्लाघ्यता १ ॥ २२ ॥
आतां लोकीं ऐसें आहे । सृष्टीमध्यें वर्तताहे । जो कोणी समजोन पाहे ।
त्यास घडे ॥ २३ ॥ बहुरत्ना वसुंधरा । जाणजाणों विचार करा । सम-
जतां प्रत्यय अंतरा-। माजी येतो ॥ २४ ॥ दुर्बळ आणि संपन्न । वेडें आणि
व्युत्पन्न । हें अखंडदंडायमान । असतचि असे ॥ २५ ॥ एक भाग्यपुरुष
मोडती । एक नवे भाग्यवंत होती । तैशीच विद्या व्युत्पत्ती । होत जाते
॥ २६ ॥ एक भरे एक रितें । रितें मागुतें भरतें । भरतें तेंहि रितें होतें ।
कालांतरीं ॥ २७ ॥ ऐशी हे सृष्टि चालिली । संपत्ति दुपारची साउली ।
वयसों तरी निघोन गेली । हळूहळू ॥ २८ ॥ बाळ तारुण्य आपलें । वृद्ध-
पणीं प्रचीतीस आलें । ऐसें जाणोन सार्थक केलें । पाहिजे कोणीं ऐकें ॥ २९॥
देह जैसें केलें तैसें होतें । यत्न केल्या कार्य साधतें । तरी मग कष्टावें तें ।
काय निमित्त ॥ ३० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सप्तदशदशके जग-
ज्जीवननिरूपणं नाम सप्तमः समासः ॥ ७ ॥
८. तत्त्वविवरण.
.श्रीगणेशाय नमः ॥ नाभीपासून उन्मेषवृत्ती ३ । तेचि परा जाणिजे
श्रोतीं । ध्वनिरूप पश्यंती । हृदयीं वसे ॥ १ ॥ कंठापासून नाद झाला ।
१. कीर्ति. २. अखंड दंड (काठी) असावा तसें, अस्खलित. ३. अंतःस्फुरण.