दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 404, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें१७ वा. ] श्रवणोपदेश. ३६९
वासनेसी परी । मुळींहून पाहावी ॥ २२ ॥ वासना मुळींच अभेद । देहसंबंधें
झाला भेद । तुटतां देहाचा संबंध । भेद गेला ॥ २३ ॥ नरनारीचें बीज
कारण । शिवशक्तीमध्यें जाण । देह धरितां प्रमाण । कळों आलें ॥ २४ ॥
नाना प्रचीतींच्या वासना । एकाचें एकास कळेना । तीक्ष्ण दृष्टीनें अनुमाना ।
कांहींसें येतें ॥ २५ ॥ बाळकास वाढवी जननी । हें तों नव्हे पुरुषाचेनी ।
उपाधि वाढे जयाचेनी । ते हे वनिता ॥ २६ ॥ वीट नाहीं कंटाळा नाहीं ।
आलस्य नाहीं त्रास नाहीं । इतुकी माया कोठेंचि नाहीं । माते वेग-
ळी ॥ २७ ॥ नाना उपाधि वाढवूं जाणे । नाना मायेनें गोवूं जाणे । नाना
प्रीति लावूं जाणे । नाना प्रपंचाची ॥ २८ ॥ पुरुषास स्त्रीचा विश्वास ।
स्त्रीस पुरुषाचा संतोष । परस्परें वासनेस । बांधोन टाकिलें ॥ २९ ॥ ईंश्वरें
मोठें सूत्र केलें । मनुष्यमात्र गुंतोन राहिलें । लोभाचें गुंडाळें केलें । उग-
वेना ऐसें ॥ ३० ॥ ऐसी परस्परें आवडी । स्त्रीपुरुषांची महा गोडी । हे मु-
ळींहून चालली रोकडी । विवेकें पाहावी ॥ ३१ ॥ मुळीं सूक्ष्म निर्माण
झालें । पुढें स्पष्ट दिसोन आलें । उत्पत्तीचें कार्य चाले । उभयतांकरितां ॥ ३२ ॥
मुळीं शिवशक्ती हें तों खरें । पुढें झालीं वधुवरें । चौऱ्याशीं लक्ष विस्तारें ।
विस्तारली जे ॥ ३३ ॥ येथें शिवशक्तीचें रूप केलें । श्रोतीं मनास पाहिजे
आणिलें । विवरल्याविण बोलिलें । तें व्यर्थ जाणावें ॥ ३४ ॥ इति श्रीदा-
सबोधे गुरुशिष्यसंवादे सप्तदशदशके शिवशक्तिनिरूपणं नाम द्वितीयः
समासः ॥ २ ॥
३. श्रवणोपदेश.
श्रीगणेशाय नमः ॥ थांबा थांबा ऐका ऐका । आधींच ग्रंथ सोडूं नका ।
सांगीतलें तें ऐका । सावधपणें ॥ १ ॥ श्रवणामध्यें सार श्रवण । तें हें अ-
ध्यात्मनिरूपण । सुचित्त करूनि अंतःकरण । ग्रंथामध्यें विवरावें ॥ २ ॥
श्रवण मननाचा विचार । निजध्यासें साक्षात्कार । रोकडा मोक्षाचा उधार ।
बोलोंच नये ॥ ३ ॥ नाना रत्नें परीक्षितां । अथवा वजनें करितां । उत्तम
सोनें पुटीं घालितां । सावधान असावें ॥ ४ ॥ नाना नाणीं मोजून घेणें ।
१. सूक्ष्म विचारानें. २. बायको. ३. पाहावें. ४. मुशींत.