सामग्री पर जाएँ
सर्वकोश
दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

पृष्ठ 413, कुल 467 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 413

१७८ श्रीदासबोध. [ दशक
मध्यमा वाचा बोलिजे त्याला । उच्चार होतां अक्षराला । वैखरी बोलिजे ॥२॥
नाभिस्यानीं परा वाचा । तोचि ठाव अंतःकरणाचा । अंतःकरणपंचकाचा ।
निवाडा ऐसा ॥ ३ ॥ निर्विकल्पीं जें स्फुरण । उगँच असतां आठवण । तें
जाणावें अंतःकरण । जाणती कळा ॥ ४ ॥ अंतःकरणीं आठवलें । पुढें होय
नव्हेसें गमलें । करूं न करूं ऐसें वाटलें । तेंचि मन ॥ ५ ॥ संकल्प विक-
ल्प तेंचि मन । तेणें करितां अनुमान । पुढें निश्चय तोचि जाण । रूप
बुद्धीचें ॥ ६ ॥ करीनचि अथवा न करीं । ऐसा निश्चय करी । तेचि बुद्धि
आहे अंतरीं । विवेकें जाणावी ॥ ७ ॥ जे वस्तूचा निश्चय केला । पुढें तेचि
चिंतूं लागला । तें चित्त बोलिल्या बोला । यथार्थ मानावें ॥ ८ ॥ पुढें
कार्यांचा अभिमान धरणें । हें कार्य तों अगत्य करणें । अशा कार्यास प्रवर्त्त-
णें । तोचि अहंकारु ॥ ९ ॥ ऐसें हें अंतःकरणपंचक । पंच वृत्ति मिळोन
एक । कार्यभागें प्रकारपंचक । वेगळालें ॥ १० ॥ जैसे पांचही प्राण ।
कार्यभागें वेगळाले जाण । नाहीं तरी वायूचें लक्षण । एकचि असे ॥ ११ ॥
सर्वांगीं व्यान नाभीं समान । कंठीं उदान गुदीं अपान । मुखीं नासिकीं
प्राण । नेमस्त जाणावा ॥ १२ ॥ बोलिलें हें प्राणपंचक । आतां ज्ञानेंद्रिय-
पंचक । श्रोत्र त्वचा चक्षु जिव्हा नासिक । ऐशीं हीं ज्ञानेंद्रियें ॥ १३ ॥
वाचा पाणी पाद् शिश्न गुद । हीं कर्मेंद्रियें प्रसिद्ध । शब्द स्पर्श रूप रस
गंध । ऐसें हें विषयपंचक ॥ १४ ॥ अंतःकरण प्राणपंचक । ज्ञानेंद्रिय
कर्मेंद्रियपंचक । पांचवें विषयपंचक । ऐशीं हीं पांच पंचकें ॥ १५ ॥ ऐसे
हे पंचवीस गुण । मिळोन सूक्ष्म देह जाण । यांचा कर्दभ बोलिला श्रवण ।
केलें पाहिजे ॥ १६ ॥ अंतःकरण व्यान श्रवण वाचा । शब्द विषय आका-
शाचा । पुढें विस्तार वायूचा । बोलिला असे ॥ १७ ॥ मन समान त्वचा
पाणी । स्पर्श विषय हा पवनीं । ऐसे हे अंदाखे साधूनी । कोठा करावा
॥ १८ ॥ बुद्धि उदान नयन चरण । रूप विषयाचें दर्शन । संकेतें बोलिलें
मन । घालूनि पाहिजे ॥ १९ ॥ चित्त अपान जिव्हा शिश्न । रस विषय
आप जाण । पुढें ऐका सावधान । पृथ्बीचें रूप ॥ २० ॥ अहंकार प्राण
घ्राण । गुद गंध विषय जाण । ऐसें केलें निरूपण । शास्त्रमतें ॥ २१ ॥
.. १. ठाव. २. मिश्रण. ३. पडताळे. ४. कोष्टक.