दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 414, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें१७ वा.] तनुचतुष्टय. ३७९
ऐसा हा सूक्ष्म देह । पाहतां होइजे निःसंदेह । येथें मन घालूनी पाहे ।
त्यासि हें उमजे ॥ २२ ॥ ऐसें सूक्ष्म देह बोलिलें । पुढें स्थूळ निरूपिलें ।
आकाश पंचगुणे वर्तलें । कैसें स्थूळीं ॥ २३ ॥ काम क्रोध शोक मोह भय ।
पंचविध आकाशाचा अन्वय १ । पुढें पंचविध वायु । निरूपिला ॥ २४ ॥
चळण वळण प्रसरण । निरोध आणि आकुंचन । हें पंचविध लक्षण । प्रभंज-
नाचें २ ॥ २५ ॥ क्षुधा तृषा आलस्य निद्रा मैथुन । हे तेजाचे पंचविध गुण ।
आतां पुढें आपलक्षण । निरूपिलें पाहिजे ॥ २६ ॥ शुक्रं ३ शोणितं ४ लाळ
मूत्र स्वेदें ५ । हा पंचविध आपाचा भेद । पुढें पृथ्वी विशद । केली पाहिजे
॥ २७ ॥ अस्थि मांस त्वचा नाडी रोम । हे पृथ्वीचे पंचविध धर्म । ऐसें
स्थूळ देहाचें वर्म । बोलिलें असे ॥ २८ ॥ पृथ्वी आप तेज वायु आकाश ।
हे पाचांचे पंचवीस । ऐसे मिळोनि स्थूळदेहास । बोलिजेतें ॥ २९ ॥ ति-
सरा देह कारण अज्ञान । चौथा देह महाकारण ज्ञान । हे चारी देह निर-
सितां विज्ञान । परब्रह्म तें ॥ ३० ॥ विचारें चौदेहां वेगळें केलें । मीपण
तत्वासरीसें गेलें । अनन्य आत्मनिवेदन झालें । परब्रह्मीं ॥ ३१ ॥ विवेकें
चुकला जन्ममृत्यु । नरदेहीं साधीलें महत्कृत्य । भक्तियोगें कृतकृत्य ।
सार्थक झालें ॥ ३२ ॥ इति श्रीपंचीकरणं ६ । केलेंचि करावें विवरण । लो-
हाचें होतें सुवर्ण । परिसाचेनि योगें ॥ ३३ ॥ हा हि दृष्टांत घडेना । परिसा-
चेनि परिस करवेना । शरण जातां साधुजना । साधुचि होइजे ॥ ३४ ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सप्तदशदशके तत्त्वविवरणनिरूपणं नाम
अष्टमः समासः ॥ ८ ॥
———
९. तनुचतुष्टय.
श्रीगणेशाय नमः ॥ स्थूळ सूक्ष्म कारण महाकारण । ऐसे हे चार देह
जाण । जागृति स्वप्न सुषुप्ति ७ पूर्ण । तुर्या ८ जाणावी ॥ १ ॥ विश्व तैजस
प्राज्ञ । प्रत्यगात्मा हे अभिमान । नेत्रस्थान कंठस्थान । हृदयस्थान मूर्धा ९ तो
॥ २ ॥ स्थूळ भोग प्रविविक्तें १० भोग । आनंदभोग आनंदावभासें ११ भोग । ऐसे
१. संबंध. २. वायूचें. ३. रेत. ४. रक्त. ५. घाम. ६. पंचभूतांचें मिश्रण. ७. झोंप.
८. समाधि. ९. मस्तक. १०. स्वप्नांतील भोग. ११. समाधींतील महानंद.