दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 406, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें१७ वा.] अनुमान. ३७१
त्मज्ञान । तें पाहिलें पाहिजे ॥ २४ ॥ मूळमायेचे शेवटीं । हरिसंकल्प मुळीं
उठी । उपासनायोगें मिठी । तेथें घातली पाहिजे ॥ २५ ॥ मग त्या पैली-
कडे जाण । निखळ ब्रह्म निर्गुण । निर्मळ निश्चळ त्याची खूण । गगनासा-
रिखी ॥ २६ ॥ येथून तेथवरी दाटलें । प्राणिमात्रास भेटलें । पदार्थमात्रीं
लिगटलें । व्यापून आहे ॥ २७ ॥ त्याऐसें नाहीं थोर । सूक्ष्माहूनि सूक्ष्मवि-
चार । पिंडब्रह्मांडांचा संहार । होतां कळे ॥ २८ ॥ अथवा पिंडब्रह्मांड अ-
सतां । विवेकप्रलय पाहों जातां । शाश्वत कोण हें तत्त्वतां । उमजों लागे
॥ २९ ॥ करून अवघा तत्त्वझाडा । सारासारांचा निवाडा । सावधपणें ग्रंथ
सोडा । सुखेनैव ॥ ३० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सप्तदशदशके
श्रवणोपदेशनिरूपणं नाम तृतीयः समासः ॥ ३ ॥
४. अनुमान.
श्रीगणेशाय नमः ॥ बहुत जनांसि उपाय । वक्त्यास पुसतां त्रासूं नये ।
बोलतां बोलतां अन्वय । सांडूंच नये ॥ १ ॥ श्रोत्यानें आशंका घेतली ।
ते तात्काळ पाहिजे फेडिली । स्वगोष्टीनें स्वगोष्टी पेंचली । ऐसें न व्हावें
॥ २ ॥ पुढें धरितां मागें पेंचला । मागें धरितां पुढें उडाला । ऐसा सांप-
डतांचि गेला । ठायीं ठायीं ॥ ३ ॥ पोहणारचि गुचक्या खातो । जनांस
कैसा काढूं पाहतो । आशय लोकांचा राहत जातो । ठायीं ठायीं ॥ ४ ॥
आपणाचि बोलिला संहार । आपणचि बोलिजे सर्वसार । दुस्तर मायेचा
पार । दाविला पाहिजे ॥ ५ ॥ जें जें सूक्ष्म नाम द्यावें । त्याचें रूप बिंब-
वूनि द्यावें । तरीच वक्ता म्हणावें । विचारवंत ॥ ६ ॥ ब्रह्म कैसें मूळमाया
कैसी । अष्टधा प्रकृति शिवशक्ति कैसी । षड्गुणैश्वर्याची स्थिती कैसी ।
गुणसाम्याची ॥ ७ ॥ अर्धनारी नटेश्वर । प्रकृतिपुरुषांचा विचार । गुण-
क्षोभिणी तदनंतर । त्रिगुण कैसे ॥ ८ ॥ पूर्वपक्ष कोठून कोठवरी । वाच्यां-
श लक्ष्यांशाची परी । सूक्ष्म नाना विचार करी । धन्य तो साधु ॥ ९ ॥
नाना पाल्हाळीं पडेना । बोलिलांचि बोलवेना । मौनगर्भे अनुमाना ।
१. 'एकोऽहं बहु स्याम्' (मी एक आहें तो पुष्कळ होईन.) असा ईश-
संकल्प. २. ज्याचा गर्भ (स्वरूप) सांगण्यास शब्द नाहींत तें मौनगर्भ; ब्रह्म.