दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 405, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ेंनाना परीक्षा करणें । विवेकी मनुष्यास बोलणें । सावधानें असावें ॥ ५ ॥
जैसें लाखोलीचें धान्य । निवडोन वेंचिंतां होतें मान्य । सगट मोजितां अ-
मान्य । देव क्षोभे ॥ ६ ॥ एकांतीं नाजुक कारभार । तेथें असावें अति त-
त्पर । त्याच्या कोटिगुणें विचार । अध्यात्मग्रंथीं ॥ ७ ॥ काहण्या कथा गोष्टी
पवाडें । नाना अवतारचरित्रें वाड । त्यां समस्तांमध्यें जाड । अध्यात्मवि-
द्या ॥ ८ ॥ गत गोष्टीस ऐकिलें । तेणें काय हातासि आलें । म्हणती पुण्य
प्राप्त झालें । तरी तें दिसेना कीं ॥ ९ ॥ तैसें नव्हे अध्यात्मसार । हा प्रची-
तीचा विचार । कळतां अनुमानाचा संहार । होत जातो ॥ १० ॥ मोठे
मोठे येऊन गेले । आत्म्याकरितांच वर्तले । त्या आत्म्याचा महिमा बोले ।
ऐसा कवण ॥ ११ ॥ युगानुयुग एकटा एक । चालवितो तिन्ही लोक । त्या
आत्म्याचा विवेक । पाहिलाच पाहावा ॥ १२ ॥ प्राणी आले येऊन गेले ।
ते जैसे जैसे वर्तले । ते वर्तणुकेचें कथन केलें । इच्छेसारिखें ॥ १३ ॥ जेथें
आत्मा नाहीं दाट । तेथें अवघें सरसपाट । आत्म्याविण बापुडें काष्ठे । काय
जाणे ॥ १४ ॥ ऐसें वरिष्ठ आत्मज्ञान । दुसरें नाहीं या समान । सृष्टी-
मध्यें विवेकी जन । तेचि हें जाणती ॥ १५ ॥ पृथ्वी आणि आप तेज ।
यांचा पृथ्वीमध्यें समज । अंतरात्मा तत्वबीज । तें वेगळेंचि राहिलें ॥ १६ ॥
वायूपासून पैलीकडे । जो कोणी विवेकें पवाडे । जवळींच आत्मा सांपडे ।
तया पुरुषासी ॥ १७ ॥ वायुप्रकाशैं गुणमाया । प्रकृतिपुरुष मूळमाया ।
सूक्ष्मरूपें प्रतीत येया । कठिन आहे ॥ १८ ॥ मायादेवीच्या धांदली ।
सूक्ष्मीं कोण मन घाली । समजला त्याची तुटली । संदेहवृत्ती ॥ १९ ॥ मूळ-
माया चौथा देह । झाला पाहिजे निःसंदेह । देहातीत होऊन राहे । धन्य
तो साधु ॥ २० ॥ विचारें ऊर्ध्व चढती । तयासी ऊर्ध्वगती । येरां सकळां
अधोगती । पदार्थज्ञानें ॥ २१ ॥ पदार्थ चांगले दिसती । परी ते सर्वैचि
नासती । अतोभ्रष्टस्ततोभ्रष्ट होती । लोक तेणें ॥ २२ ॥ या कारणें प्रकृति-
ज्ञान । नाना जिनसांचें अनुमान । सर्व सांडूनि निरंजन । धुंडीत जावें
॥ २६ ॥ अष्टांगयोग पिंडज्ञान । त्याहून थोर तत्वज्ञानें । त्याहून थोर आ-
१. पोवाडे. २. लांकडासारखें निर्जीव शरीर. ३. वायूचा उद्भव. ४. सद्गति.
५. याला मुकला व त्यालाही मुकला. ६. महदादि तत्त्वांचें ज्ञान.