सामग्री पर जाएँ
सर्वकोश
दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

पृष्ठ 415, कुल 467 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 415

३८० श्रीदासबोध. [ दशक
चारी भोग । चौदेहाचे ॥३॥ अकार उकार मकार । अर्ध मात्रा तो ईश्वर ।
ऐशा मात्रा चार । चौ देहांच्या ॥ ४ ॥ तमोगुण रजोगुण । सत्वगुण शुद्ध
सत्वगुण । ऐसे हे चार गुण । चौदेहांचे ॥ ५ ॥ क्रियाशक्ति द्रव्यशक्ति ।
इच्छाशक्ति ज्ञानशक्ती । ऐशा ह्या चार शक्ती । चौदेहांच्या ॥ ६ ॥ ऐशीं
हीं बत्तीस तत्वें । दोहींचीं पन्नास तत्वें । अवघीं मिळोन ब्यायसीं तत्वें । अ-
ज्ञान आणि ज्ञान ॥७॥ ऐशीं हीं तत्वें जाणावीं । जाणोन मायिक ओळखावीं ।
आपण साक्षी निरसावी । येणें रीतीं ॥ ८ ॥ साक्षी म्हणिजे तें ज्ञान । ज्ञानें
ओळखावें अज्ञान । ज्ञानाज्ञानांचें निरसन । देहासरिसें ॥ ९ ॥ ब्रह्मांडीं
देह कल्पिले । विराट हिरण्यगर्भ बोलिले । ते हे विवेकें निरासिले । आत्म-
ज्ञानें ॥ १० ॥ आत्मानात्मविवेक पाहतां । सारासारविचार करितां । पंच-
भूतांची मायिक वार्ता । प्रतीत आली ॥ ११ ॥ अस्थि मांस त्वचा नाडी
रोम । हे पांचहि पृथ्वीचे गुणधर्म । प्रत्यक्ष शरीरीं हें वर्म । शोधून पाहावें
॥ १२ ॥ शुक्र शोणित लाळ मूळ स्वेद । हे आपाचे पंच भेद । तत्वें सम-
जोन विशद । करून घ्यावी ॥ १३ ॥ क्षुधा तृषा आलस्य निद्रा मैथुन ।
हे पांचहि तेजाचे गुण । या तत्त्वांचें निरूपण । केलेंचि करावें ॥ १४ ॥
चळण वळण प्रसरण । निरोधन आणि आकुंचन । हे पांचहि वायूचे गुण ।
श्रोतीं जाणावे ॥ १५ ॥ काम क्रोध शोक मोह भय । हा आकाशांचा प-
र्याय । हे विचारिल्याविणें काय । उमजों जाणे ॥ १६ ॥ असो ऐसें हें स्थूळ
शरीर । पंचवीस तत्त्वांचा विस्तार । आतां सूक्ष्म देहाचा विचार । बोलि-
जेल ॥ १७ ॥ अंतःकरण मन बुद्धि चित्त अहंकार । आकाश पंचकाचा वि-
चार । पुढें वायु निरुत्तर । होऊन ऐका ॥ १८ ॥ व्यान समान उदान ।
अपान आणि प्राण । ऐसे हे पांचहि गुण । वायुतत्त्वाचे ॥ १९ ॥ श्रोत्र
त्वचा चक्षु जिव्हा घ्राण । हे पांचहि तेजाचे गुण । आतां आप सावधान ।
होऊन ऐका ॥२०॥ वाचा पाणि पाद शिक्ष गुद । हे आपाचे गुण प्रसिद्ध ।
आतां पृथ्वी विशद । निरूपिली ॥ २१ ॥ शब्द स्पर्श रूप रस गंध । हे
पृथ्वीचे गुण विशद । ऐसे हे पंचवीस तत्त्वभेद । सूक्ष्म देहाचे ॥ २२ ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सप्तदशदशके तनुचतुष्टयनिरूपणं नाम
नवमः समासः ॥ ९ ॥