सामग्री पर जाएँ
सर्वकोश
दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

पृष्ठ 420, कुल 467 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 420

१८ वा. ] निस्पृह. ३८५
जाणत्याची सहिष्णुता । जाणत्याची उदारता । समजोन घ्यावी ॥ १७ ॥
जाणत्याची नाना कल्पना । जाणत्याची दीर्घसूचना । जाणत्याची विवंच-
ना समजोन घ्यावी ॥ १८ ॥ जाणत्याचा काळ सार्थक । जाणत्याचा अ-
ध्यात्मविवेक । जाणत्याचे गुण अनेक । अवघेच घ्यावे ॥ १९ ॥ जाणत्याचा
भक्तिमार्ग । जाणत्याचा वैराग्ययोग । जाणत्याचा अवघा प्रसंग । समजोन
घ्यावा ॥ २० ॥ जाणत्याचें पाहावें ज्ञान । जाणत्याचें शिकावें ध्यान । जा-
णत्याचें सूक्ष्म चिन्ह । समजोन घ्यावें ॥ २१ ॥ जाणत्याचें अलिप्तपण ।
जाणत्याचें विदेहलक्षण । जाणत्याचें ब्रह्मविवरण । समजोन घ्यावें ॥ २२ ॥
जाणता एक अंतरात्मा । त्याचा काय सांगावा महिमा । विद्या कळा गुण-
सीमा । कोणें करावी ॥ २३ ॥ परमेश्वराचे गुणानुवाद । अखंड करावा
गुणसंवाद । तेणें करितां आनंद । उदंड होतो ॥ २४ ॥ परमेश्वरें निर्मिलें
तें । अखंड दृष्टीस पडतें । विवरविवरों समजावें तें । विवेकी जनीं ॥२५॥
जितुकें कांहीं निर्माण झालें । तितुकें जगदीश्वरें निर्मिलें । निर्माण वेगळें स-
मजलें । पाहिजे आधीं ॥ २६ ॥ तो निर्माण करितो जनां । परी पाहों
जातां दिसेना । विवेकबळें अनुमाना । आणिंत जावें ॥ २७ ॥ त्याचें अ-
खंड लागतां ध्यान । कृपाळूपणें देतो दर्शन । सर्वकाळ संभाषण । तेंदांशेंचि
करावें ॥ २८ ॥ ध्यान धरीना तो अभक्त । ध्यान धरील तो भक्त । सं-
सारापासून तो मुक्त । भक्तांस करी ॥ २९ ॥ उपासनेचे शेवटीं । देवां
भक्तां अखंड भेटी । अनुभवी जाणेल गोष्टी । प्रत्ययाची ॥ ३० ॥ इति
श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे अष्टादशदशके सर्वज्ञसंगनिरूपणं नाम द्वितीयः
समासः ॥ २ ॥
३. निस्पृह.
श्रीगणेशाय नमः ॥ दुर्लभ शरीरीं दुर्लभ आयुष्य । याचा करूं नये
नाश । दास म्हणे सावकाश । विवेक पाहावा ॥ १ ॥ न पाहतां उत्तम
विवेक । अवघा होतो अविवेक । अविवेकें प्राणी रंक । ऐसा दिसे ॥ २ ॥
हें आपलें आपण केलें । आळसें उदास नागविलें । वाईट संगतीनें बुड-
१. सहनशीलता. २. दूरदृष्टि. ३. देहाभिमान नसणें. ४. त्यासंबंधांच.