सामग्री पर जाएँ
सर्वकोश
दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

पृष्ठ 407, कुल 467 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 407

३७२ श्रीदासबोध. [ दशक
आणून सोडी ॥ १० ॥ घडी एक विमळब्रह्म । घडी एक सर्व ब्रह्म ।
द्रष्टा साक्षी सत्ता ब्रह्म । क्षण एक ॥ ११ ॥ निश्चळ तेंचि झालें चंचळ ।
चंचळ तेंचि ब्रह्म केवळ । नाना प्रसंगीं खळखळ । निवाडा नाहीं ॥ १२ ॥
चळतें आणि निश्चळ । अवघें चैतन्याचि केवळ । रूपें वेगळालीं प्रबळ ।
बोलवेना ॥ १३ ॥ उगीच करी गाथागोवी । तो लोकांस कैसा उगवी ।
नाना निश्चय नाना गोवी । होत जाते ॥ १४ ॥ भ्रमास म्हणे परब्रह्म ।
परब्रह्मास म्हणे भ्रम । ज्ञातेपणाचा संभ्रम । बोलोन दावी ॥ १५ ॥ घाली
शास्त्रांचें दृढपण । प्रचीतीविण निरूपण । पुसों जातां उगाच शीण ।
अत्यंत मानी ॥ १६॥ झाल्यास आणि पडोंर्थेभिडा। तो काय बोलेल बापुडा ।
सारासारांचा निवाडा । झाला पाहिजे ॥ १७ ॥ वैद्य मात्रेची स्तुति करी ।
मात्रा गुण कांहींच न करी । प्रचीतीविण तैसी परी । ज्ञानाची झाली
॥ १८ ॥ जेथें नाहीं सारासार । तेथें अवघा अंधकार । नाना परीक्षांचे
विचार । राहिले तेथें ॥ १९ ॥ पाप पुण्य स्वर्ग नरक । विवेक आणि अवि-
वेक । सर्व ब्रह्मीं काय एक । सांपडलें नाहीं ॥ २० ॥ पावन आणि तें
पतन । दोन्ही मानिलीं तत्समान । निश्चय आणि अनुमान । ब्रह्मरूप ॥ २१॥
ब्रह्मरूप झालें आघवें । तेथें काय निवडावें । अवघी साकराच टाकावें ।
काय कोठें ॥ २२॥(तैसें सार आणि असार । अवघा झाला एकंकार । तेथें
बळावला अविचार । विचार कैंचा ॥ २३ ॥ वंद्य निंद्य एक झालें । तेथें
काय हातास आलें । उन्मत्त द्रव्यें जे भुलले । ते भलतेंच बोलती ॥२४॥
तैसा अज्ञानभ्रमें भुलला । सर्व ब्रह्म म्हणोन बैसला । महापापी आणि
भला । एकचि मानी ॥ २५ ॥ सर्वसंगपरित्याग । अवासवा विषयभोग ।
दोघे एकचि मानितां मग । काय उरलें ॥ २६ ॥ भेद ईश्वर करून गेला ।
तो याच्या बापाचेनि न वचे मोडिला । मुखामध्यें घांस घातला । तो
अपानीं घालावा ॥२७॥ ज्या इंद्रियास जो भोग । तो तो करी यथासांग ।
ईश्वराचें केलें जग । मोडितां उरेना ॥ २८ ॥ अवघी आंतीची ठकाठकी ।
प्रचीतीविण गोष्टी लटकी । वेड लागलें जे बटकी । ते भलतेंच बोले ॥२९॥
-प्रत्ययज्ञाता सावधान । त्याचें ऐकावें निरूपण । आत्मसाक्षात्काराची
१. गोंधळ. २. समजावी. ३. डौल. ४. खोभी. ५. मद्यानें.