अमृतानुभव एवं चांगदेव पासष्टी (सन्त ज्ञानेश्वर - चिद्विलासवाद एवं अद्वैत अनुभूति सटीक)
Amritanubhava and Changdev Pasashti of Sant Jnanadev
सन्त ज्ञानेश्वर / ज्ञानदेव महाराज द्वारा
प्रकरण नववें ११३
तैसा उदैलियानि विषयें । ज्ञानी विषयी हों लाहे ॥ तंव
दोन्ही न होनी होये । काय नेणों ॥ २४ ॥ चंद्र वेंचूं गेला
चांदिणें । तंव वेंचिलें काय कोणें ॥ विऊनि वांझे स्मरणें । होती
जैसीं ॥ २५ ॥ प्रत्याहारादि आंगीं । योगें आंग टेकिलें योगीं ॥
तों जाला ये मार्गीं । दिहाचा चांदु ॥ २६ ॥ येथें प्रवृत्ति बहुडे
जिणें । अप्रवृत्तिसी वाधावणें ॥ आतां प्रत्यङ्मुखपणें । प्रचारु
दिसे ॥ २७ ॥ द्वैतदशेचें आंगण । अद्वैत वोळगे आपण ॥ भेदू
तंव तंव दुण । अभेदासी ॥ २८ ॥ कैवल्याही चढावा । करित
विषयसेवा ॥ जाला भृत्यु भज्य कालोवा । भक्तीच्या घरीं ॥२९॥
घरामाजी पायें । चालतां मार्गूही तोचि होये ॥ ना बैसे तन्ही
आहे । पावणेंची ॥ ३० ॥
स्वप्नांतील स्त्रीला भेटण्याच्या इच्छेनें पुरुष जागा झाला तोच तो जसा
आपला आपणच असतो. २४. त्याप्रमाणें निर्विषय आत्मभाव उपजल्यावर
तत्त्ववेत्ता विषयी होतो काय ? भावातीत असा ज्ञानी कोणत्या स्थितींत
असतो हें सांगतां येण्यापलीकडचें आहे. अरे ! चांदणें वेंचण्यास चंद्र गेला
असतां तेथें कोणीं काय वेंचले ? केवळ मनोरथ वायां जातात. २५-२६.
प्रत्याहार वगैरे अष्टांगयोग सहजस्थितीनें ब्रह्म जाणणारापुढे नसले त्यांनीं
हात टेकले. अष्टांगादि योग या ब्रह्मवेत्त्यापुढे दिवसाच्या चंद्राप्रमाणें फिका
पडतो. २७. या सहजस्थितीनें प्रवृत्तीचें जगणें संपतें, अप्रवृत्तीला शोभा
येते, अशा स्थितींत ब्रह्मवेत्त्याचें सर्व आचरण अंतर्मुख असतें. २८. हें
अद्वैत, द्वैताच्या अंगणांत स्वतःचाकरी करतें, म्हणजे त्याची अद्वैतस्थिति
कायम असते. म्हणून जों जों भेद जास्त तों तों अभेदाचीच वाढ
होते. २९. या अद्वैतस्थितींत असणाऱ्या पुरुषाचें विषयसेवन मोक्षाच्या-
वरहि चढाई करितें, अभेद भक्तीच्या मंदिरांत देव व भक्त यांचें ऐक्य
होतें. ३०.
सा. अ.... ८
११४ सार्थ अमृतानुभव
तैसे भलतें करितां । येथें पाविजे कांहीं आतां ॥ ऐसें नाहीं
न करितां । ठाकिजेना ॥ ३१ ॥ आठवू आणि विसरू ॥ तयांतेंही
घेऊं नेदी पसरु ॥ दशेचा व्यवहारु । असाधारणु ॥ ३२ ॥ जाली
स्वेच्छाची विधि । स्वैर जाली समाधी ॥ दशे इये मोक्षऋद्धि ।
बैसों घापे ॥ ३३ ॥ जाला देवोचि भक्तु । ठावोचि जाला
पंथु ॥ होऊनि ठेला येकांतु । विश्वाचि हें ॥ ३४ ॥ भलतेउंतेन
देवें । भलतेन भक्त होआवें ॥ बैसला तेथें राणिवे । अकर्मी हो
॥ ३५ ॥ देवाचिया दाटणी । देऊळा जाली आटणी ॥ देश-
कालादि वाहणी । येईचिना ॥ ३६ ॥ देवीं देवोचि न माये ।
मा देवी के अन्वयो आहे ॥ तेथें परिवारु बहुये । ऊघडता कीं
॥ ३७ ॥ ऐसाही स्वामीभृत्यसंबंधा । लागीं उठली श्रद्धा ॥ ते
देवोचि नुसधा । कामविजे ॥ ३८ ॥
असें पाहा कीं, घरांत पावलें टाकीत असतां मार्गही घरच, अथवा बसला
तरी प्राप्यस्थानहि घरच, दोन्ही एकच. ३१. याप्रमाणें ज्ञानवान् वाटेल तें
करीत असतां त्यास नवीन कांहीं मिळवायचें नसतें किंवा करीत नसता
तरी सर्व कांहीं त्यानें मिळविलेलें असतेंच. ३२. आत्मस्वरूपाची आठवण
अथवा विसर या दोघांचाहि विस्तार ह्या स्थितीत नसतो. ३३. जे करावेंसें
वाटेल तोच विधि, जें आचरण घडेल तीच समाधि, मोक्षाचें ऐश्वर्य या
दशेची बैठक आहे. ३४. अशा ऐक्य स्थितीत देवच भक्त झाला, प्राप्त
स्थितीत मार्ग झाला, विश्वच एकांत होतो. ३५. वाटेल त्यानें देव व्हावें
व वाटेल त्यानें भक्त व्हावें, अशा रीतीनें हा नैष्कर्म्य झालेला पुरुष जेथें
बसेल तेथें ऐश्वर्यांच्या राज्यावरच राज्य करतो. ३६. देवाच्या विस्तारानें
देऊळ झाकून गेलें. चिन्मात्र वस्तूला देशकालादि व्यवहार नाहीं. ३७.
देवतांच देव मानत नाहीं, मग तेथें देवीचा प्रवेश कोठून होणार ? तेथें
कोणताहि विचित्र परिवार जुळत नाहीं. ३८.
प्रकरण नववें ११५
अवघियाचि उपचारा । जपध्यान निर्धारा ॥ नाहीं आन
संसारा । देवेवांचुनी ॥ ३९ ॥ आतां देवातेचि देवें । देववरी
भजावें ॥ अर्पणाचेनि नांवें । भलतिया ॥ ४० ॥ देव देऊळ
परिवारु । कीजे कोरूनि डोंगरु ॥ तैसा भक्तीचा वेव्हारु । कां
न व्हावा ॥ ४१ ॥ पाहे पा अवघेया । रूखा रूखचि यया ॥
परी दुसरा नाहीं तया । विस्तारु जेवीं ॥ ४२ ॥ अहो मुगी
मुग जैसें । घेतां न घेतां नवल नसें ॥ केलें देवपण तैसें ।
दोहींपरी ॥ ४३ ॥ अखताचि देवता । अखतीचि असे न
पूजितां ॥ मा अखती काय आतां । पूजों जावों ॥ ४४ ॥
दीप्तीची लुगडीं । दीपकळिके तूं वेढीं ॥ हें न म्हणतां ते उघडी ।
ठाके काई ॥ ४५ ॥
अशा वेळीं देव आणि भक्त संबंधाची श्रद्धा उपजल्यावर, तो देवच
एकटा एक आहे असें समजावें. ३९. मग जप, ध्यान, निर्धार यासारखे
सर्व उपचार हे या संसारांत परमात्म्याशिवाय दुसरे तिसरे कांहीं नाहींत.
४०. अशा स्थितींत मग देव हा देव, भक्त हा देव, पूजासाहित्य हें देव.
असें झाल्यावर अर्पणाच्या वेळीं देवानें देव पूजला असें विचित्र होतें.
४१. देव, देऊळ आणि देवाचा सर्व परिवार हें जसें डोंगरांत कोरून
काढावें, त्याप्रमाणें एका भक्तीमुळे वरील ओवींन सर्व प्रकार कां घडू
नयेत ? ४२. वृक्ष हा सर्वांगीं एकच असतांना तो मूळ, बुंधा, शाखा,
पानें, फळें या प्रकारांनीं वाढतो. ४३. मुक्यानें मुकेपणाचें नाटक वठविलें
आणि न वठविलें यांत आश्चर्य कसलें ? त्याप्रमाणें या ठिकाणीं पूजा केली
आणि न केली तरी फरक होत नाहीं. सर्व एकच. ४४. कुंकुवानें लाल
केलेल्या अक्षतांवर देवांना ठेवतात. पुनः त्याच अक्षता देवांना वाहतात.
अशा वेळीं कोण कशाची पूजा करतो बरें ? ४५.
११६ सार्थ अमृतानुभव
कां चंद्रातें चंद्रिका । न म्हणिजे तूं ले का ॥ तन्ही तो
असिका । तयाचि कीं ना ॥४६॥ आगीपणें आगी । असतचि
असे आंगीं । मा कासयालागीं । देणें न देणें ॥ ४७॥ म्हणौनी
भजतां भजावें । मा न भजतां काय नव्हे ॥ ऐसें नाहीं स्वभावें ।
श्रीशिवूचि असे ॥ ४८ ॥ आतां भक्ति अभक्ति । जालें ताट
एकी पांती । कर्माकर्माचिया वाती । माल्हवूनियां ॥ ४९ ॥
म्हणवूनि उपनिषदें । दशे येती निंदे ॥ निंदाचि विशदें । स्तोत्रें
होती ॥ ५० ॥ नातरी निंदास्तुति । दोन्ही मौनासाठीं जाती ॥
मौनीं मौन आथी । बोलतां बोली ॥५१॥ घालितां अव्हासव्हा
पाये । शिवयात्रा होत जाये ॥ शिवा गेलियाही नोहे । केही
जाणें ॥ ५२ ॥
ज्योतीला जर सांगितलें कीं, 'बाई, तूं उघडी आहेस तर ही प्रकाशरूपी
लुगडी नेस !' आणि असें तिला म्हटलें नाहीं तरी ती तशीच राहील
काय ? ४६. 'तूं मला घे' असें चांदण्यानें चंद्राला सांगितलें नाहीं; तरी
त्या चंद्रांत तें असतेच कीं नाहीं ? ४७. अग्नींत उष्णता हा नैसर्गिक धर्म
आहे. तो कांहीं द्यावा घ्यावा लागतो ? ४८. म्हणून भक्ताने भजन करावें,
भजन न केलें तर कांहीं नाहीं; तो परमात्मरूप असतोच. ४९. विहित
कर्मे यांच्या वाती मालवून भक्ति आणि अभक्ति या एकाच पंक्तीला एकाच
ताटांत बसतात. ५०. सर्वांना ठाऊक असलेलाच परमात्मा उपनिषदांनीं
सांगितला असल्यानें निंदा होते; पण परमात्म्याचें तें सत्य स्वरूप सांगित-
ल्यानें तीं स्तोत्रे बनलीं आहेत. ५१. आत्मा मौनरूप असून निंदा आणि
स्तुति या दोन्ही स्तब्ध राहिल्या, दोन्ही कांहीं बोलल्या किंवा न बोलल्या
तरी परमात्मा मौनरूपच आहे. ५२.
प्रकरण नववें ११७
चालणें आणि बैसक । दोन्ही मिळोनि एक ॥ नोहे ऐसें
कौतुक । इये ठाईं ॥ ५३ ॥ येन्हवीं अडोळिलिया डोळा ।
शिवदर्शनाचा सोहळा ॥ भोगिजे भलते व्हेळा । भलतेणें ॥ ५४॥
ना समोर दिसे शिव ही । परी देखिलें कांहीं नाहीं ॥ देवा
भक्ता दोही । एकाचि पाडू ॥ ५५ ॥ आपणचि चेंडू सुटे । मग
आपणया उपटे ॥ तेणें उंदळला दाटे । आपणपांचि ॥ ५६ ॥
ऐशी जरी चेंडूफळी । देखिजे कां केव्हेळी ॥ तरी बोलिजे
सरळी । प्रबुद्धाची ॥ ५७ ॥ कर्माचा हातु न लगे । ज्ञानाचें
कांहीं न रिगे ॥ ऐसीच होतसे आंगें । उपास्ती हे ॥ ५८ ॥
निपजे ना निमे । आंगीं आंग घुमे ॥ सुखा सुख उपमे ।
देववेल इया ॥ ५९ ॥ कोन्ही एक अकृत्रिम । भक्तीचें हें वर्म ॥
योगज्ञानादिविश्राम-। भूमिका हे ॥ ६० ॥
कोठेंहि पायधूळ झाडली तरी शिवयात्रा घडते खरी; पण यात्रेला गेला.
तरी त्याचें जाणें न जाण्यासारखें हो. ५३. हें त्याचें गमन किंवा ठायींच
‘बैसोनि निवांत’ या दोन्ही आपणांपुरत्या वेगवेगळ्या क्रिया असल्या
तरी त्याच्यापुरत्या त्या एकच असतात; हें आश्चर्य होय. ५४. आपल्या
चर्मचक्षूंनीं देवदर्शनाचा आनंद केव्हांहि माणसाला आटापिटा न करितां
घेतां येतो. तो प्रत्यक्ष पुढें उभा राहून देवदर्शन घेत असला तरी, त्यानें
कांहीं पाहिलें नाहीं, कारण तो देव आणि भक्त हे एकच असतात. आपण
भिंतीवर आपटण्यासाठीं चेंडू टाकला कीं, जणू काय तो स्वतःच उसळी
मारतो, आपणच आदळतो आणि आपला आपणच परत पूर्वस्थळी येतो.
५६-५७. पोरांचा हा खेळ थोरांच्या चष्म्यांतून पाहिल्यावर सरळ दिसतो.
५८. अशा पूर्णावस्थेप्रत कर्माचा हात पोंचत नाहीं. ज्ञान तेथें प्रवेश करूं
शकत नाहीं, आणि उपासना ही आपली आपणच होत असते. ५९. त्याच्या
ठिकाणीं ही उत्पन्न होत नाहीं किंवा नष्ट होत नाहीं. ती आपल्याच ठिकाणीं
दंग असते. अशा प्रकारच्या सुखाला सुखाची उपमा दिली आहे. ६०.
११८ सार्थ अमृतानुभव
आंगें कीर एक जाहले । परी नामरूपाचे मासले ॥ होते
ते ही आटले । हरि हर येथें ॥ ६१ ॥ अहो अर्धनारीनटेश्वरें ।
गिळित गिळित परस्परें । ग्रहण जालें एकसरें । सर्वग्रासें
॥ ६२ ॥ वाच्यजात खाउनी । वाचकत्वही गिळोनि ॥ ठाकिली
निदैजौनी । परा येथें ॥ ६३ ॥ शिवशिवा समर्था स्वामी ।
येवढीये आनंदभूमि ॥ घेपे दीजे एकें आम्ही । ऐसें केलें ॥६४॥
चेतचि मा चेवविले । निदैलोंचि मा निदविलें ॥ आम्हींच आम्हां
आणिलें । नवल जी तुझें ॥६५॥ आम्ही निखळ मा तुझे । वरी
लोमें म्हणसी माझे ॥ हें पुनरुक्त साजे । तूंचि म्हणोनी ॥६६॥
कोणाचें कांहीं नेघसी । आपुलेंही तैसाचि नेदिसी ॥ कोण
जाणे भोगसी । गौरव कैसें ॥ ६७ ॥
असें हें भक्तीचें स्वाभाविक मर्म आहे. योग, आदिंचें विश्राम स्थळ ही
आत्मस्थितीच आहे. ६१. शंकर आणि विष्णु यांचे आत्मस्वरूप मूळ एक
पण नांवें, रूप भिन्न होत. पण तेहि येथें नाहींसे होतात. ६२. अर्धनारी-
नटेश्वरांनीं परस्परांना गिळलें आहे आणि अशा रीतीनें गिळीत असतांना
शेवटच्या वेळीं उभयतांचें ग्रहण झाले. ६३. शब्दांनीं जें उल्लेखिले जाते
व शब्दविश्व यांना खाऊनपिऊन टाकून परा हा वाचेचा प्रकार स्तब्ध
राहिला. ६४. हे सद्गुरुनाथा ! तुम्ही परमश्रेष्ठ कल्याण आहांत. एवढ्या
या आनंदभूमीवर व्यवहारासाठीं योग्य, असे आम्हांला आपण तयार
केलेत. ६५ जणूं काय जागृतींत आपण जागे केलेंत किंवा झोपणाऱ्यांना
झोपविलेत. याप्रमाणें आपण आम्हांला घडविले, अशी आपली किमया
आहे. ६६. आम्ही तर तुझेच आहोंत आणि वरतीं तूं पुन्हा आपल्या
लोभामुळे ' हे आमचे आहेत' असे म्हणतोस ही पुनरुक्ति तुझी लखलाभ
असो. ६७.
प्रकरण नववें ११९
गुरुत्वें जेवढा चांगू । तेव्हढाचि तारुनि लघू । गुरुलघु जाणे
जो पांगू । तुझा करी ॥ ६८ ॥ शिष्या देतां वाटे । अद्वैताचा
समो फुटे ॥ तरी काह्या होती भाटें । शास्त्रे तुझीं ॥ ६९ ॥
किंबहु ये दातारा । मी तूं याचा संसारा ॥ वेंचूनि होसी
सोयरा । तेणेंचि तोषें ॥ ७० ॥
इति श्रीसिद्धानुवादे श्रीमदनुभवामृते जीवन्मुक्तदशा-
कथनं नाम नवमप्रकरणं संपूर्णम् ।
तूं कोणाचे कांहीं घेत नाहींस, कोणाला कांहीं देत नाहींस. मात्र तुझा
जो गौरव होत आहे, तो तूं कसा भोगतोस हें समजत नाहीं. ६८. गुरु-
पणामुळें जसे श्रेष्ठ आहांत, तेवढेच आपण तरून नेण्यास हलकेहि आहांत.
आपल्याबद्दलचा हा भेद समजावून देणे हेंहि आपल्याच हातीं आहे. ६९.
या शिष्याला अद्वैताचे ज्ञान दिल्यानें, आपल्या स्वरूपाच्या एकत्वांत कांहीं
उणें पडेल, असे कां वाटतें ? नाहीं तर शास्त्रांनीं तुझी भाटगिरी कां
पत्करली असती ? ७०. फार काय सांगूं ? हे सद्गुरु निवृत्तिराया ! संसार
आणि माझेतुझेपणा नाहींसा केला असल्यानें तूं माझा सोयरा झाला आहेस
आणि त्यामुळें मी आनंदच झालों आहें. ७१. याप्रमाणे श्रीअनुभवामृत-
ग्रंथांतील जीवन्मुक्तदशाकथन नांवाचे नववें प्रकरण संपूर्ण झाले.
प्रकरण नववे समाप्त
प्रकरण दहावें
परी गा निवृत्तिराया । हातांतळीं सुखविलें तुया ॥ परी
निवांतचि मियां । भोगावें कीं तें ॥ १ ॥ परी महेशें सूर्या-
हातीं । दिधली तेजाची सूती ॥ तया भासा अंतर्वर्ती । जगचि
केलें ॥ २ ॥ चंद्रासी अमृत घातलें । तें तयाचि काई येतुलें ॥
कीं सिंधु मेघा दिधलें । मेघाचि भागू ॥ ३ ॥ दिवा जो
उजिडावडु । तो घराचाचि सुरवाडु ॥ गगनीं आथी पवाडु । तो
चाचि कीं ॥ ४ ॥ अगाधे ही उँचंबळती । ते चंद्रींची
ना शक्ति ॥ वसंत करी तैं होती । झाडाचे दानीं ॥५॥ म्हणोनी
हें असंवेर्य । हें दैवीकीचें औदार्य ॥ वांचूनि स्वातंत्र्य । माझें
नाहीं ॥ ६ ॥
माझ्या मस्तकावर हात ठेवून, अहो निवृत्तिराया ! आपण मला सुखी
केलें आणि तें सुख मी निवांत भोगावें; १. परंतु ईश्वराने सूर्याच्या हातांत
तेजाचे सूत्र दिलें त्याच्या प्रकाशाने सर्व जगाला प्रकाश मिळाला. २.
चंद्राला अमृत दिलें तें त्याच्या एकट्या पुरतें आहे काय ? किंवा समुद्राने
मेघांना पाणी दिलें तें त्याच्याच पुरतें काय ? ३. दिव्याचा प्रकाश दिव्या-
पुरताच नसून, तो सर्व घराला प्रकाश देतो; आकाशाचा अवकाश
त्याच्यापुरता नसून सर्व जगाला त्याचा उपयोग होतो. ४. अफाट अस-
णाऱ्या समुद्रास भरती येते. ही शक्ति चंद्राची नव्हे काय ? वसंतऋतूच्या
सामर्थ्यानें झाडें हीं पुष्पफलादि दानसमर्थ होतात. ५. म्हणून अहो
गुरुराया ! हें आपल्या दैवी संपत्तीचे अफाट औदार्य आहे. यावांचून हें
प्रतिपादन करण्याचे माझे स्वतंत्र सामर्थ्य नाहीं. ६.
प्रकरण दहावें १२१
आणि हा येवढा ऐसा । परिहार देऊं कायसा ॥ प्रभुप्रभाव-
विन्यासा । आड ठाउनी ॥ ७ ॥ आम्ही बोलिलों जें कांहीं ।
तें प्रगटचि असे ठाईं ॥ मा स्वयंप्रकाशा काई । प्रकाशावें बोलें
॥ ८॥ नाना विपायें आम्हीं हन । कीजे तें पां मौन ॥ तरी काय
जनीं जन । दिसतेना ॥ ९ ॥ जनातें जनें देखतां । द्रष्टेचि दृश्य
तत्त्वतां । कोन्ही नहोनी आइता । सिद्धांतचि हा ॥ १० ॥ यया
परौतें कांहीं । संवित रहस्य नाहीं । आणि हें तया आधींही ।
असतचि असे ॥ ११ ॥ तन्ही ग्रंथ प्रस्तावो । न घडे हें म्हणे
वावो ॥ तरी सिद्धानुवाद लाहो । आवडी करूं ॥ १२ ॥ पढि-
यंते सदा तेचि । परी भोगी नवी नवी रुची ॥ म्हणोनी हा
उचीतचि अनुवाद सिद्ध ॥ १३ ॥
एवढा हा परिहार मी कशाला करूं ? कारण या म्हणण्यांतच गुरूंच्या
सामर्थ्यास कमीपणा येतो. ७. आम्ही ज्याचें प्रतिपादन केलें तो आत्मा
आपल्या ठिकाणीं प्रकट आहेच. मग स्वयंप्रकाशाला शब्दानें प्रकाशित
करावें लागतें काय ? ८. किंवा आम्ही कदाचित् मौन धरलें असतें तर
जनानें जनाला काय पाहिलें नसतें ? ९. जनांनीं जनाला पाहिलें असतां
वास्तविक ज्ञानरूप परमात्माच दृश्य बनलेला आहे. परमात्मा कांहीं एक न
होऊन आयता स्वयंसिद्धच आहे. १०. आतांपर्यंत प्रतिपादन केलेल्या ज्ञान-
रूप आत्म्याचें या पलीकडे रहस्य नाहीं व तें रहस्य या माझ्या वर्णनानें
सिद्ध झालें असेंहि नाहीं. कारण प्रतिपादन करण्याचें पूर्वी तें आहे तसेंच
आहे. ११. तर मग आतां ग्रंथारंभ घडत नाहीं असें कदाचित कोणी
म्हणेल तर, जें सिद्ध आहे त्याचाच अनुवाद, आवडीच्या भरांत आम्हीं
केला हेंच त्याचें उत्तर. १२. आवडती वस्तु तीच असली तरी तिचा भोग
घेण्यांत नवी नवी रुचि उत्पन्न होते, हें लोकानुभवावरून सिद्ध आहे.
याच न्यायानें, शुद्ध परमात्मस्वरूपविषयक अनुवाद आम्हीं केला हे
योग्यच आहे. १३.
१२२ सार्थ अमृतानुभव
याकारणें मिवा । गोप्य दाविलें बोलोनियां ॥ ऐसें नाहीं
अपैसा । प्रकाशूचि ॥ १४ ॥ आणि पूर्ण अहंता वेठलों ।
सैंध आम्हीच दाटलों ॥ मा लोपलों ना प्रगटलों । कोन्हा
होऊनी ॥ १५ ॥ आपणया आपणपें । निरूपण काय वोपे ॥
मा उगेपणें हारपे । ऐसें आहे ॥ १६ ॥ म्हणोनी माझी वैखरी ।
मौनाचेही मौन करी ॥ हें पाणियावरी मकरी । रेखिल्या
॥ १७ ॥ एवं दशोपनिषदें । पुढारी न ढळती पदें ॥ देखोनी
बुडी बोधें । येथेंचि दिधली ॥ १८ ॥ ज्ञानदेव म्हणे श्रीमंत ।
हें अनुभवामृत ॥ सेवूनि जीवन्मुक्त । हेंचि होतु ॥ १९ ॥
मुक्ति कीर वेल्हाळ । अनुभवामृत निखिळ ॥ परी अमृताही
उठी लाळ । अमृतें येणें ॥ २० ॥
या कारणास्तव आम्ही पूर्ण स्थितीला गुप्त बोलून दाखविली, पूर्ण
स्थितीला गुप्त वस्तु बोलून दाखविली असें नाहीं, ती सहज उघडीच आहे.
१४. आणि आम्हीं पूर्ण स्थितीला प्राप्त झालों सर्वत्र आमचीच व्याप्ति
झाली म्हणून कोणाच्याहि अपेक्षेनें आम्ही लोपलों नाहीं, वा प्रकटलोंहि
नाहीं. १५. आपलें निरूपण आपल्याला अर्पण करण्यात विशेष काय
आहे ? म्हणून स्वस्थ बसल्यानें हानी होते असें आहे काय ? १६. म्हणून
माझ्या वैखरीवाणीनें मौनाचेंहि मौन केलें. करणें म्हणजे पाण्यावर माशाचें
चित्र काढण्याप्रमाणें आहे. १७. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात-आम्ही
सांगितल्यापेक्षां दशोपनिषदांत जास्त कांहीं सांगितलें नाहीं असें पाहून
आत्मबोधानें येथेंच बुडी मारली. १८. या श्रीमंत अनुभवामृत पानानें
जीवन्मुख अमृतरूपच होवोत ! १९. मुक्ति चांगली खरी, पण अनुभवामृत
अत्यत शुद्ध आहे, यास्तव अनुभवामृताला पाहून या मुक्तिरूप अमृतालाहि
लाळ घोटावी लागते. २०.
प्रकरण दहावें १२३
नित्य चांदू होये । परी पुनवे आनु आहे ।। हें का मी म्हणूं
लाहें । सूर्यदिठी ॥२१॥ प्रिया सावाइले होये । तें आंगीचें
आंगीं न समाये । येन्हवीं तेथेंचि आहे । तारुण्य कीं ॥ २२ ॥
वसंताचा आला । फळीं फुलीं आपुला । गगनाचिया डाळा ।
पेलती झाडें ॥२३॥ ययालागीं हें बोलणें अनुभवामृतपणें ।
स्वानुभूति परगुणें । वोगरिलें ॥ २४ ॥ आणि मुक्त मुमुक्षु बद्ध ।
हे तववरी योग्यताभेद । अनुभवामृत स्वाद । विरुद्ध जंव ॥२५॥
गंगावगहना आलीं । पाणियें गंग जालीं । कां तिमिरें भेटलीं । सूर्या
जैसीं ॥ २६ ॥ नाहीं परिसाची कसबटी । तंववरि वानियाच्या
गोष्टी । मग पंधरावीयाच्या पाठीं । बैसावें कीं ॥ २७ ॥
नित्य चंद्र आहे हें खरें, पण पौर्णिमेच्या चंद्राची गोष्ट कांहीं वेगळीच
आहे हे म्हणणें लोकदृष्टीनें ठीक आहे, पण सूर्यदृष्टी जो मी, त्यानें असें
कां म्हणावें ? २१. स्त्रीच्या अंगांत येरव्हीं तारुण्य साहजिकच असतें, पण
प्रियसमागम होतांच तें अंगांतील तारुण्य अंगांतच मावत नाहीं. २२.
वसंत ऋतु प्राप्त झाला म्हणजे झाडें आपल्या फळांनीं व फुलांनीं गगन-
चुंबित होऊन डोलतात. २३. याकरितां आमच्या अनुभवरूप पक्वान्नाची
मेजवानी, अनुभवामृत बोलण्यानें संतांना केली. २४ आमच्या अनुभवा-
मृताचा स्वाद लाभला नाहीं तोपर्यंत मुक्त मुमुक्षू, बद्ध असा अधिकार-
भेद असतो. २५. गंगेला मिळावयास गेलेलीं उदकें गंगारूपच होतात,
किंवा अंधकार सूर्याला भेटावयास गेला असतां, सूर्यरूपच होतो. २६.
परिसाचा स्पर्श झाला नाहीं तोपर्यंत सोनें उत्तम व कमी कसाचें आहे
असें बोलावें; पण परिसाची कसोटी प्राप्त झाल्यावर सर्व कस पंधराच्या
दराचे म्हणजे उत्तम सोन्याचेंच लागतात. २७.
१२४ सार्थ अमृतानुभव
तैसें जें या अक्षरा । भेटती गाभारा । ते ओघ जैसे सागरा ।
आंतु आले ॥२८॥ जैशा अकारादि अक्षरा । भेटती पन्नासही
मात्रा । तैसें या चराचरा । दुसरें नाहीं ॥ २९ ॥ तैसें तियें
ईश्वरीं । आंगोळी नुभेचि दुसरी । किंबहुना सरोभरी ।
श्रीशिवेंशीचि ॥ ३० ॥ म्हणोनि ज्ञानदेवो म्हणे ॥ अनुभवामृतें
येणें ॥सणु भोगिजे सणे । विश्वाचेनि ॥ ३१ ॥
इति श्रीसिद्धानुवादे श्रीमदनुभवामृते ग्रंथमहिमावर्णनंनाम
दशमप्रकरणं संपूर्णम् ।
श्रीकृष्णार्पणमस्तु । शुभं भवतु ॥
त्याप्रमाणें गुरुकृपेनें या ग्रंथांतील अक्षराचा अनुभव लक्षांत येतो
तेव्हां, ज्याप्रमाणें ओघ समुद्राला मिळाल्यावर समुद्ररूप होतात, त्याप्रमाणें
तो पुरुष अमृतरूप-मोक्षरूपच होतो. २८. किंवा पन्नास वर्ण ओंकाररूप
आहेत म्हणजे त्या सर्व वर्णांत अकार, उकार, मकार, रूपानें ओंकाराचीच
व्याप्ति आहे, तसें सर्व चराचर विश्व ब्रह्मरूप आहे, दुसरें कांहीं नाहीं.
२९. त्याप्रमाणें परमात्मस्वरूपाच्याकडे अंगुलिनिर्देश करून ' एवढा,
तेवढा, असा, तसा ' असें सांगून उपयोग नाहीं. सारें त्रिभुवन केवल
शिवरूपच आहे. ३०. हा अमृतानुभवरूप आनंद सर्व विश्वानें उप-
भोगावा, असें ज्ञानेश्वरमहाराज आग्रहानें प्रतिपादन करतात. ३१.
याप्रमाणें अनुभवामृतग्रंथांतील ग्रंथपरिहारनामक प्रकरण दहावें समाप्त.
प्रकरण दहावें समाप्त.
॥ ॐ तत्सत् ॥
एवं ज्ञानदेव चक्रपाणी ऐसे । दोन्ही डोळस आरिसे ।
परस्पर पाहता कैसें । मुकले भेदा ! ॥
श्रीज्ञानेश्वरमहाराजकृत
श्रीचांगदेवपासष्टी
स्वस्ति श्रीवटेशु । जो लपोनि जगदाभासु । दावी मग ग्रासु ।
प्रगटला करी ॥ १ ॥ प्रगटे तंव न दिसे । लपे तंव तंव आभासे ।
प्रगट ना लपाला असे । न खोमता जो ॥ २ ॥ बहु जंव जंव
होये । तंव तंव कांहींच न होये । कांहीं नहोनि आहे । अव-
घाचि जो ॥ ३ ॥ सोनें सोनेंपणा उणें । न येतांचि झालें लेणें ।
तेंवि न वेंचतां जग होणें । अंगें जया ॥ ४ ॥ कल्लोळ कंचुक । न
फेडितां उघडें उदक । तेंवी जगेंसीं सम्यक् । स्वरूप जो ॥ ५ ॥
हे श्रीवटेश चांगदेवा ! तुझें कल्याण असो. स्वतः परमात्मा गुप्त राहून
या जगताचा आभास दाखवितो. तो प्रकट होतो तेव्हां जगाचा भास
नाहींसा करतो. १. परमात्म्याचें स्वरूप जेव्हां दिसत नाहीं तेव्हां जग-
ताची जाणीव होते. तो जेव्हां प्रकटतो तेव्हां दिसतोच असें नाहीं. विचा-
रान्तीं असें दिसेल कीं, परमेश्वर दिसतहि नाहीं किंवा गुप्तहि होत नाहीं. हें
दोन्ही गुणधर्म त्याला स्पर्श करतात असें मुळींच नाहीं. २. स्वरूपानें
परमात्मा विशाल होत असतां भासमान् जगत् नाहींसें होत जातें. वास्त-
विक परमात्म्यानें कांहीं जगाचें रूप घेतलेलें नसून सगळीकडे तोच पूर्ण-
पणें व्यापलेला आहे. ३. सुवर्णाचे दागिने घडवितात, परंतु त्यामुळे त्याच्या
सोनेपणांत मुळींच उणीव निर्माण होत नाहीं. हें जसें आहे, त्याप्रमाणें
स्वतः परमात्मा विविध आकारांनीं, रूपांनीं नटला तरी त्याच्या मूळ
परमात्मस्वरूपांत कांहींहि कमीपणा येत नाहीं. ४ पाण्यावर अनेक लाटा
उठत असतात. त्यामुळें तें पाणी लाटांच्या आवरणानें झाकलें आहे असें
वाटतें. तरीहि तें संपूर्णतया पाणीच असतें; तसेंच परमात्मा आणि जगत्
यांच्या बाबतीत आहे. परब्रह्म व विश्व यांत कांहींहि फरक नाहीं. ५.
सार्थ श्रीचांगदेव पासष्टी १२७
परमाणूंचिया मांदिया । पृथ्वीपणें न वचेचि वायां । तेंवि
विश्वस्फूर्ति इयां । झांकवेना जो ॥ ६॥ कळांचेनि पांघुरणें । चंद्रमा
हरपों नेणें । का वन्ही दीपपणें । आन नोहे ॥ ७॥ म्हणोनि
अविद्यानिमित्तें । दृश्य द्रष्टत्व वर्ते । तें मी नेणें आइतें । ऐसेंचि
असे ॥ ८॥ जेंवि नाममात्र लुगडें । येन्हवी सूतचि तें उघडें ।
कां मातीं मृद्भांडें । जयापरी ॥ ९॥ तेंवि द्रष्टा दृश्य दशे । अतीत
दृङ्मात्र जें असे । तेंचि द्रष्टादृश्यमिसें । केवळ होय ॥ १० ॥
अलंकार येणें नामें । असिजे निखिल हेमें । नाना अवयवसंभ्रमें ।
अवयविया जेंवि ॥ ११ ॥ तेंवि शिवोनि पृथ्वीवरी ।
भासती पदार्थांचिया परी । प्रकाशे तें एकसरी । संवित्ति हे ॥१२॥
पृथ्वीवर अनेक लहान लहान कण-अणुपरमाणु आहेत. परमाणु हे
पृथ्वीच्या रूपानें आहेत म्हणून कांहीं पृथ्वीचा पृथ्वीपणा नाहींसा होत
नाहीं. त्याच अर्थानें विश्वाच्या आविष्कारामुळे परमात्मा मुळींच झाकला
जात नाहीं ६. कल्पना केली कीं चंद्रावर त्याच्या सोळा कळांचें आच्छादन
घातलें आहे तरीहि, चंद्राचा निश्चित लोप होत नाहीं. दिव्याच्या रूपानें
अग्नि दिसला तरी तो अग्निच असतो. ७. (म्हणून म्हणतों चांगदेवा !
तुला ) अज्ञानामुळे (अविद्येनें) ज्ञानरूपी आत्मा हा वेगळेपणानें दृश्य आहे.
आणि मी द्रष्टा वेगळा आहे असें भासतें. परंतु मला मात्र वेगळेपणाची जाणीव
नाहीं. ८. वस्त्रांपैकीं एखाद्या वस्त्राला लोक लुगडें म्हणतात. तरीहि लुगडें ज्या
सुताचें विणलेलें असतें त्याचें सूत्ररूप कायमच असतें. माती आणि
मातीचें भांडें यांच्या बाबतींत असेंच सांगता येईल. ९. (म्हणून म्हणतो )
द्रष्टा म्हणजे पाहणारा आणि दृश्य म्हणजे जें पाहावयाचें तें अशा दोन्हीं-
च्याहि पलीकडे परमात्मतत्त्व ज्ञानस्वरूप असें आहे. हेच द्रष्टा आणि दृश्य
या प्रकारांनीं अनुभवाला येतें. १०. अलंकाररूपानें जसें केवळ सुवर्णच
असतें किंवा अनेक अवयवांच्या रूपानें अवयवीच असतो. ११. ईश्वरापासून
पाषाणापर्यंत नाना प्रकारें पदार्थांची प्रतीति करून देणारें एक ज्ञानच
असतें, म्हणजे त्या त्या आकारानें ज्ञानच परिणाम पावलेलें असतें. १२.
१२८ सार्थ श्रीचांगदेव पासष्टी
नाहीं तें चित्र दाविती । परी असे केवळ भिंती । प्रकाशे
ते संवित्ति । जगदाकारें ॥ १३ ॥ बांधियाचिया मोडी ।
बांधा नहोनि गुळाची गोडी । तयापरी जगपरवडी । संवित्ति
जाण । ॥ १४ ॥ घडियेचेनि आकारें । प्रकाशिजे जेविं अंबरें
तेविं विश्वस्फूर्ति स्फुरे । स्फूर्तिचि हे ॥ १५॥ न लिंपतां सुखदुःख ।
येणें आकारें क्षोभोनि नावेक । होय आपणिया सन्मुख ।
आपणचि जो ॥ १६ ॥ तया नांव दृश्याचें होणें । संवित्ति
दृष्टृत्वा आणिजे तेणें । बिंबा बिंबत्व जालेपणें । प्रतिबिंबाचेनि॥ १७॥
तेंवि आपणचि आपुला पोटीं । आपणया दृश्य दावित उठी ।
द्रष्टादृश्यदर्शनत्रिपुटी । मांडे तें हे ॥ १८ ॥
भिंतीवर चित्रे दिसलीं तरी त्या चित्ररूपानें वास्तविक भिंतीचीच
प्रतीति असते, त्याप्रमाणें जगदाकारानें ज्ञानाची म्हणजे परमात्म्याचीच
प्रतीति असते. १३. गुळाची ढेप केल्यानें गोडीला ढेपेचा आकार येत
नाहीं, अगर ढेप मोडल्यानें गोडी मोडतहि नाहीं, त्याप्रमाणें जगतांत अनंत
प्रकारें द्वैतप्रतीति झाली तरी ती परमात्म्याचीच प्रतीति आहे; द्वैत नाहींच.
१४. घडीच्या आकारांत ज्याप्रमाणें वस्त्र स्पष्ट व्हावें, त्याप्रमाणें परमात्माच
(स्फूर्ति) विश्वादिरूपानें स्फुरत असतो. १५. अविद्येच्या निमित्तानें अविद्या
काली क्षणमात्र दृष्टि किंवा दृश्य आकारांत अनुभवाला येणारा परमात्मा
त्या आकाराच्या सुखदुःखानें सुखी किंवा दुःखी होत नाहीं. तो स्वतःच
द्रष्टा किंवा दृश्य रूपांत असतो. १६. आरशांतील प्रतिबिंबामुळे बघणाऱ्या
तोंडाला बिंबत्व भाव येतो, या प्रकारचें अविद्या ज्ञानरूप परमात्म्यास
द्रष्टृत्व भावाला आणते ! १७. असें असलें तरी द्रष्टा, दृश्य इत्यादि भावांचा
अनुभव परमात्म्यावरच येतो. याचाच अर्थ असा कीं स्वतः परमात्माच
द्रष्टा, दृश्य आणि दर्शन या त्रिपुटींच्या रूपानें व्यवहार करतो. १८.
सार्थ श्रीचांगदेव पासष्टी १२९
सुताचिये गुंजे । आंतबाहेर नाहीं दुजें । तेवीं तिनपणेंविण
जाणिजे । त्रिपुटी हे ॥ १९ ॥ नुसधें मुख जैसें । देखिजतसें
दर्पणमिसें । बायांचि देखणें ऐसें । गमों लागे ॥ २०॥ तैसें न
वचतां भेदा । संवित्ति गमे त्रिधा । हेंचि जाणे प्रसिद्धा ।
उपपत्ति इया ॥ २१ ॥ दृश्याचा जो उभारा । तेंचि दृष्टत्व होय
संसारा । या दोहीं माजिला अंतरा । दृष्टि पंगु होय ॥ २२ ॥
दृश्य जेधवां नाहीं । तेधवां दृष्टि घेऊनि असे काई ? आणि
दृश्येंविण कांहीं । द्रष्टत्व असें ? ॥ २३ ॥ म्हणोनि दृश्याचे
जालेपणें । दृष्टि द्रष्टत्व होणें । पुढती तें गेलिया जाणें । तैसेंचि
दोन्ही ॥ २४ ॥
सुताच्या गुंजेमध्यें सुतावांचून दुसरें कांहीं नाहीं, त्याप्रमाणें परमात्म-
स्वरूपावर द्रष्टा, दृश्य, दर्शन अशा त्रिपुटीचा व्यवहार झाला तरी, एका
परमात्म्याच्या ठिकाणीं भिन्न भाव उत्पन्न न होतां, तीनपणांवांचून त्रिपुटी
असते. १९. केवळ मानेवरचें तोंड आरशाच्या उपाधीनें स्वतः आपल्यासच
पाहतें, त्याप्रमाणें अविद्योपाधीनें दृश्यद्रष्टादि भावाची प्रतीति येते असें वाटतें.
२०. वरील उदाहरणांत संवित्ति (परमात्मा) त्याच्या स्वरूपात भेद न होतां
अविद्योपाधीनें द्रष्टा, दृश्य, दर्शन असा भेद झालासा दिसतो. तत्त्वतः तो
भेद नसतोच. चांगदेवा, हीच अखंड अमेदाविषयीं उपपत्ति, समज. २१.
अविद्येच्या योगानें दृश्याचा होणारा अविर्भाव द्रष्ट्वाच्या व्यवहाराला हेतु
होतो. पारमार्थिक दृष्टीनें द्रष्टा व दृश्यातील भेद पाहिल्यास विचार (ज्ञान)
पांगळा होतो; म्हणजे नाहींसा होतो. २२. जेव्हां दृश्य नाहींच असें
ठरतें तेव्हां त्याला प्रकाशित करणारें ज्ञान कोणाला प्रकाशित करील ?
दृश्यावांचून द्रष्टत्व कोठें तरी असतें का ? तात्पर्य, अध्यात्मज्ञानाच्या उदय-
कालीं द्रष्टा व दृश्य व दर्शन ही त्रिपुटी मावळते. २३. दृश्य तयार
झालें म्हणजे, दर्शन आणि द्रष्टृत्व हीं असतात. जर विचारानें दृश्यत्वच
नष्ट झालें, तर द्रष्टा व दृष्टि या दोहोंचाहि अभाव होतो. २४.
सा. अ. ...९
१३० सार्थ श्रीचांगदेव पासष्टी
एवं एकाचि झाली ती होती । तिन्ही गेलिया एकाचि व्यक्ति ।
तरी तिन्ही भ्रांति । एकपण साच ॥ २५ ॥ दर्पणाच्या आधि
शेखीं । मुख असतचि असे मुखीं । माजी दर्पण अवलोकीं ।
आन कांहीं होये ? ॥ २६ ॥ पुढें देखिजे तेणें बनें । देखतें ऐसें
गमो लागे । परी दृष्टींते वाउगें । झकावित असे ॥२७॥ म्हणोनि
दृश्याचिये वेळे । दृश्यद्रष्टत्वावेगळें । वस्तुमात्र निहाळे । आपणा-
पाशीं ॥ २८ ॥ वाद्यजातेंविण ध्वनी । काष्ठजातेंविण वन्ही ।
तैसें विशेष ग्रासुनी । स्वयेंचि असे ॥ २९ ॥ जें म्हणतां नये
कांहीं । जाणों नये कैसेंही । असतचि असे पाहीं । असणें
जया ॥३०॥
याप्रमाणें अविद्येच्या निमित्तानें एकाच परमात्म्याचीं द्रष्टादर्शनादि तीन
रूपें होतात. विचारजागृतींनें त्या तिघांचाहि नाश होतो व एक परमात्माच
राहतो. २५. आरसा आणण्याच्या पूर्वी किंवा आरसा नेल्यावरहि, मुख
जागेवर मुखपणानेंच असतें, पण त्यावेळों आरशांत पाहतांना त्याचा कांहीं
निराळेपणा होतो काय ? २६. आरशांत आपलें मुख आपणच पाहतों.
दृष्टीनें मूळ मुखाला द्रष्टेपणा आला असे वाटतें, पण असें वाटणें म्हणजे
ज्ञानाची फसवणूकच होय. २७. म्हणून दृश्याच्या कालांतहि दृश्यत्व,
द्रष्टृत्व, या धर्माहून भिन्न असणारी परमात्मवस्तु आपणच आहों असा
निश्चय कर. २८. चांगदेवा ! वाद्यांतून निघणाऱ्या ध्वनीच्या आधीं सामान्य
ध्वनि हा असतोच, किंवा लाकडांत अनुभवायला मिळणाऱ्या स्पष्ट
अग्नीच्या पूर्वी सामान्य अग्नि असतोच, त्याप्रमाणें दृश्यादि विशेष भाव
नष्ट झाले तरी त्यांना आश्रयभूत ब्रह्मवस्तु असतेच. २९. ज्या वस्तूचे अशी
तशी, येवढी तेवढी, इत्यादि शब्दानें वर्णन करतां येत नाहीं, ती ज्ञानाचा
विषय होत नाहीं. अशी ती परमात्मवस्तु आहे. ३०.
सार्थ श्रीचांगदेव पासष्टी १३१
आपुलिया बुबुळा । दृष्टि असोनि अखम डोळा । तैसा
आत्मज्ञानीं दुबळा । ज्ञानरूप जो ॥ ३१ ॥ जें जाणणेंचि कीं
ठाईं । नेणणें कीर नाहीं । परी जाणणें म्हणोनियांही । जाणणें
कैंचें ! ॥ ३२ ॥ यालागीं मौनेंचि बोलिजे । कांहीं नहोनि सर्व
होइजे । नव्हतां लाहिजे । कांहींच नाहीं ॥ ३३ ॥ नाना बोधाचिये
सोयरिके । साचपण जेणे एकें । नाना कल्लोळमाळिके । पाणी
जेवीं ॥ ३४ ॥ जे देखिजतोविणे । एकलें देखतेपण । हें असो
आपणिया आपण । आपणचि जें ॥ ३५ ॥ जें कोणाचें नव्हतोनि
असणें । जे कोणाचें नव्हतां दिसणें । कोणाचें नव्हतां भोगणें ।
केवळ जो ॥ ३६ ॥
सर्व दृश्य वस्तु पाहण्याची दृष्टि डोळ्याच्या ठिकाणीं आहे. पण तो
स्वतःला बघण्याच्या बाबतींत अंधळाच ठरतो. कारण तो पाहणेंरूपच आहे.
त्याच्या ठिकाणीं पाहणेंपणाचा व्यवहार होत नाहीं. त्याप्रमाणें परमात्मा हा
ज्ञानरूप आहे म्हणून तो आपल्या ज्ञानाचा विषय होणें शक्य नाहीं. ३१.
ज्या ज्ञानस्वरूप परमात्म्याच्या जवळ अज्ञान कालत्रयी नाहीं, तो स्वतः
ज्ञानरूप असल्यामुळे त्याच्या ठिकाणीं जाणण्याचा व्यवहार कसा होणार ?
३२. म्हणून केवळ मौन हेंच ज्याचें बोलणें, सर्व अनात्मवस्तूंचा परित्याग
हीच ज्याची प्राप्ति, सर्व धर्मशून्य अशी परमात्मवस्तु ती जीव जेव्हां कोणत्याहि
धर्माने मुक्त नसेल तेव्हा प्राप्त होईल. ३३. किंवा अनंत ज्ञानाचे व्यवहार
झाले तरी त्या सर्व व्यवहारसंबंधाला सत्यत्व देणारें जें एक ज्ञान असतें; जसें
लाटांच्या अनंत मालिकेमध्यें पाणी एकरूपानें असतें. ३४. जें कोणाला दृश्य न
होतां, स्वरूपानें द्रष्टेपणाने एकटें असतें त्या ज्ञानाच्या शब्दानें कितीसें वर्णन
करावें ? तें अद्वितीय आहे, म्हणजे आपले नातेवाईक आपणच. ३५. परमात्म-
वस्तु अस्तित्वरूपच असल्यामुळे तिचें अन्य दुसऱ्या कोणाच्या अस्तित्वावर
नसतें; कोणाला विषय न होतां स्वतःच प्रकाशमान आहे आणि अन्य
दुसऱ्या कोणत्याहि भोग्य पदार्थावांचून स्वरूपानें आनंदरूप आहे. ३६
१३२ सार्थ श्रीचांगदेव पासष्टी
तया पुत्र तूं वटेश्वराचा । रवा जैसा कापुराचा । चांगया
मज तुज आपणाचा । बोल ऐके ॥३७॥ ज्ञानदेव म्हणे । तुज
माझा बोल ऐकणें । तें तळहाता तळीं मिठी देणें । जयापरि
॥ ३८ ॥ बोलेंचि बोल ऐकिजे । स्वादेंचि स्वाद चाखिजे । कां
उजिवडें देखिजे । उजिडा जेंविं ॥ ३९ ॥ सोनिया वरकल सोनें
जैसा । कां मुख मुखा हो आरिसा । मज तुज संवाद तैसा ।
चक्रपाणि ॥४०॥ गोडिये आपुली गोडी । घेता काय न माये
तोंडीं ? । आम्हां परस्परें आवडी । तो पाडु असे ॥ ४१ ॥
सख्या तुझेनि उद्देशें । भेटावया जीव उल्हासे । कीं सिद्धभेटी
विसकुसे । ऐशिया बिहे ॥ ४२ ॥
चांगदेवा ! ज्या परमात्म्याला वटेश्वर इत्यादि अनेक नामें आहेत
त्याचाच पुत्र तूं आहेस. अरे कापराचा कण हा कापूररूपच असतो ना !
तसा तूं परमात्मस्वरूप आहेस. ! आत्म्यांत आणि परमात्म्यांत ऐक्य असतें.
तुझ्या-माझ्यांत तसा ऐक्यभाव कोणत्या रीतीनें आहे तें तूं आतां ऐक.
३७. तूं परमात्मस्वरूप आहेस, मीहि तसाच परमात्मस्वरूप आहे. म्हणूनच
तुझ्यांत व माझ्यांत अभेद आहे. (म्हणूनच म्हणतों) माझा उपदेश तूं
ऐकायचा म्हणजे तुझा स्वतःचाच उपदेश ऐकण्यासारखें नाहीं का ? अरें
(एखाद्याच्या) उजव्या हातानें त्याच्याच डाव्या हाताला मिठी घालावी
तसें हें आहे. ३८. किंवा शब्दानें स्वतःचा शब्द ऐकावा, गोडीनें स्वतःची
गोडी स्वतःच चाखावी, उजेडानें आपल्या स्वतःचा उजेड बघावा, तसें हें
आहे ३९. अथवा सोन्याची कसोटी असावी; मुख हेंच आरसा म्हणून
पाहण्यासाठीं उपयोगी आणावें, तसें चांगदेवा ! तुझ्या आणि माझ्या
संवादाचें आहे. ४०. गोडीनें स्वतःचा गोडवा स्वतः अनुभवायचा म्हटलें
तर तें अशक्य नाहीं ना ? अगदीं नेमका हाच प्रकार तुझ्या आणि माझ्या
आनंदाबद्दल आहे. ४१. चांगदेवा ! मोठ्या उल्हासानें तुझी भेट घ्यायला
माझा जीव उत्सुक झाला आहे हें तर खरेंच, पण आत्मतत्त्वाच्या दृष्टीनें
स्वतःसिद्ध ही भेट उपाधिदृष्टीनें बिघडून जाईल कीं काय या भीतीनें
मी शंकाकुल झालों आहे. ४२.