सामग्री पर जाएँ
सर्वकोश
अमृतानुभव एवं चांगदेव पासष्टी (सन्त ज्ञानेश्वर - चिद्विलासवाद एवं अद्वैत अनुभूति सटीक)

अमृतानुभव एवं चांगदेव पासष्टी (सन्त ज्ञानेश्वर - चिद्विलासवाद एवं अद्वैत अनुभूति सटीक)

Amritanubhava and Changdev Pasashti of Sant Jnanadev

सन्त ज्ञानेश्वर / ज्ञानदेव महाराज द्वारा

DevanagariHindipublished138 पृष्ठ

पृष्ठ 133, कुल 138 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 133

१३२ सार्थ श्रीचांगदेव पासष्टी
तया पुत्र तूं वटेश्वराचा । रवा जैसा कापुराचा । चांगया
मज तुज आपणाचा । बोल ऐके ॥३७॥ ज्ञानदेव म्हणे । तुज
माझा बोल ऐकणें । तें तळहाता तळीं मिठी देणें । जयापरि
॥ ३८ ॥ बोलेंचि बोल ऐकिजे । स्वादेंचि स्वाद चाखिजे । कां
उजिवडें देखिजे । उजिडा जेंविं ॥ ३९ ॥ सोनिया वरकल सोनें
जैसा । कां मुख मुखा हो आरिसा । मज तुज संवाद तैसा ।
चक्रपाणि ॥४०॥ गोडिये आपुली गोडी । घेता काय न माये
तोंडीं ? । आम्हां परस्परें आवडी । तो पाडु असे ॥ ४१ ॥
सख्या तुझेनि उद्देशें । भेटावया जीव उल्हासे । कीं सिद्धभेटी
विसकुसे । ऐशिया बिहे ॥ ४२ ॥
चांगदेवा ! ज्या परमात्म्याला वटेश्वर इत्यादि अनेक नामें आहेत
त्याचाच पुत्र तूं आहेस. अरे कापराचा कण हा कापूररूपच असतो ना !
तसा तूं परमात्मस्वरूप आहेस. ! आत्म्यांत आणि परमात्म्यांत ऐक्य असतें.
तुझ्या-माझ्यांत तसा ऐक्यभाव कोणत्या रीतीनें आहे तें तूं आतां ऐक.
३७. तूं परमात्मस्वरूप आहेस, मीहि तसाच परमात्मस्वरूप आहे. म्हणूनच
तुझ्यांत व माझ्यांत अभेद आहे. (म्हणूनच म्हणतों) माझा उपदेश तूं
ऐकायचा म्हणजे तुझा स्वतःचाच उपदेश ऐकण्यासारखें नाहीं का ? अरें
(एखाद्याच्या) उजव्या हातानें त्याच्याच डाव्या हाताला मिठी घालावी
तसें हें आहे. ३८. किंवा शब्दानें स्वतःचा शब्द ऐकावा, गोडीनें स्वतःची
गोडी स्वतःच चाखावी, उजेडानें आपल्या स्वतःचा उजेड बघावा, तसें हें
आहे ३९. अथवा सोन्याची कसोटी असावी; मुख हेंच आरसा म्हणून
पाहण्यासाठीं उपयोगी आणावें, तसें चांगदेवा ! तुझ्या आणि माझ्या
संवादाचें आहे. ४०. गोडीनें स्वतःचा गोडवा स्वतः अनुभवायचा म्हटलें
तर तें अशक्य नाहीं ना ? अगदीं नेमका हाच प्रकार तुझ्या आणि माझ्या
आनंदाबद्दल आहे. ४१. चांगदेवा ! मोठ्या उल्हासानें तुझी भेट घ्यायला
माझा जीव उत्सुक झाला आहे हें तर खरेंच, पण आत्मतत्त्वाच्या दृष्टीनें
स्वतःसिद्ध ही भेट उपाधिदृष्टीनें बिघडून जाईल कीं काय या भीतीनें
मी शंकाकुल झालों आहे. ४२.