अमृतानुभव एवं चांगदेव पासष्टी (सन्त ज्ञानेश्वर - चिद्विलासवाद एवं अद्वैत अनुभूति सटीक)
Amritanubhava and Changdev Pasashti of Sant Jnanadev
सन्त ज्ञानेश्वर / ज्ञानदेव महाराज द्वारा
पृष्ठ 131, कुल 138 में से
संदर्भ में पढ़ें१३० सार्थ श्रीचांगदेव पासष्टी
एवं एकाचि झाली ती होती । तिन्ही गेलिया एकाचि व्यक्ति ।
तरी तिन्ही भ्रांति । एकपण साच ॥ २५ ॥ दर्पणाच्या आधि
शेखीं । मुख असतचि असे मुखीं । माजी दर्पण अवलोकीं ।
आन कांहीं होये ? ॥ २६ ॥ पुढें देखिजे तेणें बनें । देखतें ऐसें
गमो लागे । परी दृष्टींते वाउगें । झकावित असे ॥२७॥ म्हणोनि
दृश्याचिये वेळे । दृश्यद्रष्टत्वावेगळें । वस्तुमात्र निहाळे । आपणा-
पाशीं ॥ २८ ॥ वाद्यजातेंविण ध्वनी । काष्ठजातेंविण वन्ही ।
तैसें विशेष ग्रासुनी । स्वयेंचि असे ॥ २९ ॥ जें म्हणतां नये
कांहीं । जाणों नये कैसेंही । असतचि असे पाहीं । असणें
जया ॥३०॥
याप्रमाणें अविद्येच्या निमित्तानें एकाच परमात्म्याचीं द्रष्टादर्शनादि तीन
रूपें होतात. विचारजागृतींनें त्या तिघांचाहि नाश होतो व एक परमात्माच
राहतो. २५. आरसा आणण्याच्या पूर्वी किंवा आरसा नेल्यावरहि, मुख
जागेवर मुखपणानेंच असतें, पण त्यावेळों आरशांत पाहतांना त्याचा कांहीं
निराळेपणा होतो काय ? २६. आरशांत आपलें मुख आपणच पाहतों.
दृष्टीनें मूळ मुखाला द्रष्टेपणा आला असे वाटतें, पण असें वाटणें म्हणजे
ज्ञानाची फसवणूकच होय. २७. म्हणून दृश्याच्या कालांतहि दृश्यत्व,
द्रष्टृत्व, या धर्माहून भिन्न असणारी परमात्मवस्तु आपणच आहों असा
निश्चय कर. २८. चांगदेवा ! वाद्यांतून निघणाऱ्या ध्वनीच्या आधीं सामान्य
ध्वनि हा असतोच, किंवा लाकडांत अनुभवायला मिळणाऱ्या स्पष्ट
अग्नीच्या पूर्वी सामान्य अग्नि असतोच, त्याप्रमाणें दृश्यादि विशेष भाव
नष्ट झाले तरी त्यांना आश्रयभूत ब्रह्मवस्तु असतेच. २९. ज्या वस्तूचे अशी
तशी, येवढी तेवढी, इत्यादि शब्दानें वर्णन करतां येत नाहीं, ती ज्ञानाचा
विषय होत नाहीं. अशी ती परमात्मवस्तु आहे. ३०.