सामग्री पर जाएँ
सर्वकोश
अमृतानुभव एवं चांगदेव पासष्टी (सन्त ज्ञानेश्वर - चिद्विलासवाद एवं अद्वैत अनुभूति सटीक)

अमृतानुभव एवं चांगदेव पासष्टी (सन्त ज्ञानेश्वर - चिद्विलासवाद एवं अद्वैत अनुभूति सटीक)

Amritanubhava and Changdev Pasashti of Sant Jnanadev

सन्त ज्ञानेश्वर / ज्ञानदेव महाराज द्वारा

DevanagariHindipublished138 पृष्ठ

पृष्ठ 128, कुल 138 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 128

सार्थ श्रीचांगदेव पासष्टी १२७
परमाणूंचिया मांदिया । पृथ्वीपणें न वचेचि वायां । तेंवि
विश्वस्फूर्ति इयां । झांकवेना जो ॥ ६॥ कळांचेनि पांघुरणें । चंद्रमा
हरपों नेणें । का वन्ही दीपपणें । आन नोहे ॥ ७॥ म्हणोनि
अविद्यानिमित्तें । दृश्य द्रष्टत्व वर्ते । तें मी नेणें आइतें । ऐसेंचि
असे ॥ ८॥ जेंवि नाममात्र लुगडें । येन्हवी सूतचि तें उघडें ।
कां मातीं मृद्भांडें । जयापरी ॥ ९॥ तेंवि द्रष्टा दृश्य दशे । अतीत
दृङ्मात्र जें असे । तेंचि द्रष्टादृश्यमिसें । केवळ होय ॥ १० ॥
अलंकार येणें नामें । असिजे निखिल हेमें । नाना अवयवसंभ्रमें ।
अवयविया जेंवि ॥ ११ ॥ तेंवि शिवोनि पृथ्वीवरी ।
भासती पदार्थांचिया परी । प्रकाशे तें एकसरी । संवित्ति हे ॥१२॥
पृथ्वीवर अनेक लहान लहान कण-अणुपरमाणु आहेत. परमाणु हे
पृथ्वीच्या रूपानें आहेत म्हणून कांहीं पृथ्वीचा पृथ्वीपणा नाहींसा होत
नाहीं. त्याच अर्थानें विश्वाच्या आविष्कारामुळे परमात्मा मुळींच झाकला
जात नाहीं ६. कल्पना केली कीं चंद्रावर त्याच्या सोळा कळांचें आच्छादन
घातलें आहे तरीहि, चंद्राचा निश्चित लोप होत नाहीं. दिव्याच्या रूपानें
अग्नि दिसला तरी तो अग्निच असतो. ७. (म्हणून म्हणतों चांगदेवा !
तुला ) अज्ञानामुळे (अविद्येनें) ज्ञानरूपी आत्मा हा वेगळेपणानें दृश्य आहे.
आणि मी द्रष्टा वेगळा आहे असें भासतें. परंतु मला मात्र वेगळेपणाची जाणीव
नाहीं. ८. वस्त्रांपैकीं एखाद्या वस्त्राला लोक लुगडें म्हणतात. तरीहि लुगडें ज्या
सुताचें विणलेलें असतें त्याचें सूत्ररूप कायमच असतें. माती आणि
मातीचें भांडें यांच्या बाबतींत असेंच सांगता येईल. ९. (म्हणून म्हणतो )
द्रष्टा म्हणजे पाहणारा आणि दृश्य म्हणजे जें पाहावयाचें तें अशा दोन्हीं-
च्याहि पलीकडे परमात्मतत्त्व ज्ञानस्वरूप असें आहे. हेच द्रष्टा आणि दृश्य
या प्रकारांनीं अनुभवाला येतें. १०. अलंकाररूपानें जसें केवळ सुवर्णच
असतें किंवा अनेक अवयवांच्या रूपानें अवयवीच असतो. ११. ईश्वरापासून
पाषाणापर्यंत नाना प्रकारें पदार्थांची प्रतीति करून देणारें एक ज्ञानच
असतें, म्हणजे त्या त्या आकारानें ज्ञानच परिणाम पावलेलें असतें. १२.