अमृतानुभव एवं चांगदेव पासष्टी (सन्त ज्ञानेश्वर - चिद्विलासवाद एवं अद्वैत अनुभूति सटीक)
Amritanubhava and Changdev Pasashti of Sant Jnanadev
सन्त ज्ञानेश्वर / ज्ञानदेव महाराज द्वारा
पृष्ठ 115, कुल 138 में से
संदर्भ में पढ़ें११४ सार्थ अमृतानुभव
तैसे भलतें करितां । येथें पाविजे कांहीं आतां ॥ ऐसें नाहीं
न करितां । ठाकिजेना ॥ ३१ ॥ आठवू आणि विसरू ॥ तयांतेंही
घेऊं नेदी पसरु ॥ दशेचा व्यवहारु । असाधारणु ॥ ३२ ॥ जाली
स्वेच्छाची विधि । स्वैर जाली समाधी ॥ दशे इये मोक्षऋद्धि ।
बैसों घापे ॥ ३३ ॥ जाला देवोचि भक्तु । ठावोचि जाला
पंथु ॥ होऊनि ठेला येकांतु । विश्वाचि हें ॥ ३४ ॥ भलतेउंतेन
देवें । भलतेन भक्त होआवें ॥ बैसला तेथें राणिवे । अकर्मी हो
॥ ३५ ॥ देवाचिया दाटणी । देऊळा जाली आटणी ॥ देश-
कालादि वाहणी । येईचिना ॥ ३६ ॥ देवीं देवोचि न माये ।
मा देवी के अन्वयो आहे ॥ तेथें परिवारु बहुये । ऊघडता कीं
॥ ३७ ॥ ऐसाही स्वामीभृत्यसंबंधा । लागीं उठली श्रद्धा ॥ ते
देवोचि नुसधा । कामविजे ॥ ३८ ॥
असें पाहा कीं, घरांत पावलें टाकीत असतां मार्गही घरच, अथवा बसला
तरी प्राप्यस्थानहि घरच, दोन्ही एकच. ३१. याप्रमाणें ज्ञानवान् वाटेल तें
करीत असतां त्यास नवीन कांहीं मिळवायचें नसतें किंवा करीत नसता
तरी सर्व कांहीं त्यानें मिळविलेलें असतेंच. ३२. आत्मस्वरूपाची आठवण
अथवा विसर या दोघांचाहि विस्तार ह्या स्थितीत नसतो. ३३. जे करावेंसें
वाटेल तोच विधि, जें आचरण घडेल तीच समाधि, मोक्षाचें ऐश्वर्य या
दशेची बैठक आहे. ३४. अशा ऐक्य स्थितीत देवच भक्त झाला, प्राप्त
स्थितीत मार्ग झाला, विश्वच एकांत होतो. ३५. वाटेल त्यानें देव व्हावें
व वाटेल त्यानें भक्त व्हावें, अशा रीतीनें हा नैष्कर्म्य झालेला पुरुष जेथें
बसेल तेथें ऐश्वर्यांच्या राज्यावरच राज्य करतो. ३६. देवाच्या विस्तारानें
देऊळ झाकून गेलें. चिन्मात्र वस्तूला देशकालादि व्यवहार नाहीं. ३७.
देवतांच देव मानत नाहीं, मग तेथें देवीचा प्रवेश कोठून होणार ? तेथें
कोणताहि विचित्र परिवार जुळत नाहीं. ३८.