सामग्री पर जाएँ
सर्वकोश
अमृतानुभव एवं चांगदेव पासष्टी (सन्त ज्ञानेश्वर - चिद्विलासवाद एवं अद्वैत अनुभूति सटीक)

अमृतानुभव एवं चांगदेव पासष्टी (सन्त ज्ञानेश्वर - चिद्विलासवाद एवं अद्वैत अनुभूति सटीक)

Amritanubhava and Changdev Pasashti of Sant Jnanadev

सन्त ज्ञानेश्वर / ज्ञानदेव महाराज द्वारा

DevanagariHindipublished138 पृष्ठ

पृष्ठ 127, कुल 138 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 127

श्रीज्ञानेश्वरमहाराजकृत
श्रीचांगदेवपासष्टी
स्वस्ति श्रीवटेशु । जो लपोनि जगदाभासु । दावी मग ग्रासु ।
प्रगटला करी ॥ १ ॥ प्रगटे तंव न दिसे । लपे तंव तंव आभासे ।
प्रगट ना लपाला असे । न खोमता जो ॥ २ ॥ बहु जंव जंव
होये । तंव तंव कांहींच न होये । कांहीं नहोनि आहे । अव-
घाचि जो ॥ ३ ॥ सोनें सोनेंपणा उणें । न येतांचि झालें लेणें ।
तेंवि न वेंचतां जग होणें । अंगें जया ॥ ४ ॥ कल्लोळ कंचुक । न
फेडितां उघडें उदक । तेंवी जगेंसीं सम्यक् । स्वरूप जो ॥ ५ ॥
हे श्रीवटेश चांगदेवा ! तुझें कल्याण असो. स्वतः परमात्मा गुप्त राहून
या जगताचा आभास दाखवितो. तो प्रकट होतो तेव्हां जगाचा भास
नाहींसा करतो. १. परमात्म्याचें स्वरूप जेव्हां दिसत नाहीं तेव्हां जग-
ताची जाणीव होते. तो जेव्हां प्रकटतो तेव्हां दिसतोच असें नाहीं. विचा-
रान्तीं असें दिसेल कीं, परमेश्वर दिसतहि नाहीं किंवा गुप्तहि होत नाहीं. हें
दोन्ही गुणधर्म त्याला स्पर्श करतात असें मुळींच नाहीं. २. स्वरूपानें
परमात्मा विशाल होत असतां भासमान् जगत् नाहींसें होत जातें. वास्त-
विक परमात्म्यानें कांहीं जगाचें रूप घेतलेलें नसून सगळीकडे तोच पूर्ण-
पणें व्यापलेला आहे. ३. सुवर्णाचे दागिने घडवितात, परंतु त्यामुळे त्याच्या
सोनेपणांत मुळींच उणीव निर्माण होत नाहीं. हें जसें आहे, त्याप्रमाणें
स्वतः परमात्मा विविध आकारांनीं, रूपांनीं नटला तरी त्याच्या मूळ
परमात्मस्वरूपांत कांहींहि कमीपणा येत नाहीं. ४ पाण्यावर अनेक लाटा
उठत असतात. त्यामुळें तें पाणी लाटांच्या आवरणानें झाकलें आहे असें
वाटतें. तरीहि तें संपूर्णतया पाणीच असतें; तसेंच परमात्मा आणि जगत्
यांच्या बाबतीत आहे. परब्रह्म व विश्व यांत कांहींहि फरक नाहीं. ५.