दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
११६ श्रीदासबोध. [ दशक
९ ॥ ऐसें शुद्ध ज्ञानाचें लक्षण । शुद्ध स्वरूपींच आपण । या नांव स्वरूप-
ज्ञान । जाणिजे श्रोतीं ॥ १० ॥ महावाक्य उपदेश भला । परी त्याचा जप
नाहीं बोलिला । तेथींचा तो विचार केला । पाहिजे साधकें ॥ ११ ॥ महा-
वाक्य उपदेशसार । परी घेतला पाहिजे विचार । त्याच्या जपें अंधकार ।
न फिटे भ्रांतीचा ॥ १२ ॥ महावाक्याचा अर्थ घेतां । आपण वस्तुचि
तत्वतां । त्याचा जप करितां । वृथा शिण होय ॥ १३ ॥ महावाक्याचें
विवरण । हें मुख्य ज्ञानाचें लक्षण । शुद्ध लक्ष्यांशें आपण । वस्तुचि आहे ॥
१४ ॥ आपला आपणासि लाभ । हें ज्ञान परम दुर्लभ । जें आदि अंतीं
स्वयंभ । स्वरूपचि स्वयें ॥ १५ ॥ जेथूनि हें सर्वहि प्रगटे । आणि सक-
ळहि जेथें आँटे । तें ज्ञान झालिया फिटे । भ्रांतिबंधन ॥ १६ ॥ मतें आणि
मतांतरें । जेथें होतीं निर्विकारें । अति सूक्ष्म विचारें । पाहतां ऐक्य ॥
१७ ॥ जें या चराचराचें मूळ । शुद्ध स्वरूप निर्मळ । या नांव ज्ञान केवळ ।
वेदांत मतें ॥ १८ ॥ शोधितां आपुलें मूळस्थान । सहजचि उडे अज्ञान ।
या नांव म्हणिजे ब्रह्मज्ञान । मोक्षदायक ॥ १९ ॥ आपणासि ओळखों
जातां । अंगीं बाणे सर्वज्ञता । तेणें एकदेशी वार्ता । निःशेष उडे ॥ २० ॥
मी कोण ऐसा हेत । धरूनि पाहतां देहाँतीत । अवलोकितां नेमस्त । स्वरू-
पचि होय ॥ २१ ॥ ऐसे पूर्वी थोर थोर । जेणें ज्ञानें पैलपार । पावले ते
साचार । ऐक आतां ॥ २२ ॥ व्यास वसिष्ठ महामुनी । शुक नारद समा-
धानी । जनकादिक महाज्ञानी । येणेंचि ज्ञानें ॥ २३ ॥ वामदेवाद्यिकयोगी-
श्वर । वाल्मीक अत्रि ऋषीश्वर । शौनकादि अध्यात्मसार । वेदांत मतें ॥ २४ ॥
सनकादिक मुख्य करूनी । आदिनाथ मीन गोरक्षमुनी । आणिक बोलतां
वचनीं । अगाध असती ॥ २५ ॥ सिद्ध मुनि महानुभाव । सकळांचा जो
अंतर्भाव । जेणें सुखें महादेव । डुलतो सदा ॥ २६ ॥ जें वेदशास्त्राचें सार ।
सिद्धांत धादांत विचार । ज्याची प्राप्ती भावानुसार । भाविकांसि होय ॥
१. ब्रह्म. २. ज्या संबंधानें कांहीं बोलतां येतें तो पदार्थ वाच्यांश होय, व
जो त्या पदार्थासंबंधीं कांहीं बोलतो पण ज्याचेसंबंधीं कांहीं बोलण्याला त्याहून
अन्य कोणी नाहीं, तो लक्ष्यांश, -या विचाराच्या योगें. ३. स्वतःसिद्ध. ४. लय पावतें.
५. निर्द्वंद्व. ६. जीव व जड पदार्थ या दोहोंचें. ७. देहाहून भिन्न. ८. मत्स्येंद्रनाथ.
५ वा.] शुद्धज्ञानलक्षण. ११७
२७ ॥ साधु संत आणि सज्जन । भूत भविष्य वर्तमान । सर्वत्रांचें गुह्य-
ज्ञान । सांगिजेल आतां ॥ २८ ॥ तीर्थे व्रतें तपें दानें । जें न जोडे धूम्र-
पानें । पंचाग्नि गोरांजनें १ । जें प्राप्त नव्हे ॥ २९ ॥ सकळ साधनांचें फळ ।
ज्ञानचि सांगें केवळ । जेणें संशयाचें मूळ । निःशेष तुटे ॥ ३० ॥ छप्पन्न
भाषा तितुके ग्रंथ । आदिकरुनि वेदांत । या इतुक्यांचा गहनार्थ । एकचि
असे ॥ ३१ ॥ जें नेणवे पुराणीं । जेथें शिणल्या वेदवाणी । तेंचि आतां
येच क्षणीं । बोधीन गुरुकृपें ॥ ३२ ॥ पाहिलें नसतां संस्कृतीं । रीग नाहीं
महाराष्ट्र ग्रंथीं । हृदयीं वसिल्या कृपामूर्ती । सद्गुरु स्वामी ॥ ३३ ॥ आतां
नलगे संस्कृत । अथवा ग्रंथ प्राकृत । माझा स्वामी कृपेसहित । हृदयीं
वसे ॥ ३४ ॥ न करितां वेदाभ्यास । अथवा श्रवणसायास । प्रयत्नेविण
सुरस । सद्गुरुकृपा ॥ ३५ ॥ ग्रंथमात्र महाराष्ट्र । त्याहून संस्कृत श्रेष्ठ । त्या
संस्कृतामध्यें श्रेष्ठ । थोर तो वेदान्त ॥ ३६ ॥ त्या वेदान्तापारतें कांहीं ।
सर्वथा श्रेष्ठ नाहीं । जेथें वेदगर्भ ३ सर्वही । प्रगट जाहला ॥ ३७ ॥ असो
ऐसा जो वेदान्त । त्याचाचि मथितार्थैं २ । अति गहन जो परमार्थ । तो तूं
ऐक आतां ॥ ३८ ॥ अरे गहनाचेंहि गहन । तें तूं जाण सद्गुरुवचन ।
सद्गुरुवचनें समाधान । नेमैस्त ५ आहे ॥ ३९ ॥ सद्गुरुवचन तोचि
वेदान्त । सद्गुरुवचन तोचि सिद्धांत । सद्गुरुवचन तोचि धादांत ४ ।
सप्रचीत आतां ॥ ४० ॥ जें अत्यंत गहन । माझे स्वामीचें वचन । जेणें
माझें समाधान । अत्यंत जाहलें ॥ ४१ ॥ तें हें माझे जीवींचें गुज । मीं
सांगेन म्हणतों तुज । जरी अवधान देशी मज । तरी आतां येच क्षणीं ॥
४२ ॥ तंव शिष्य म्लानवदनें बोले । धरिलीं सद्दढ पाऊलें । मग बोलों
आरंभिलें । गुरुदेवें ॥ ४३ ॥ अहंब्रह्मास्मि ६ महावाक्यें । तेथींचा अर्थ अतर्क्य ।
तोहि सांगतों ऐक्यें ७ । गुरुशिष्यें जेथें ॥ ४४ ॥ ऐक शिष्या येथींचें वर्म ।
स्वयें तूंचि आहेसि ब्रह्म । येविषयीं संदेह भ्रम । धरूंच नको ॥ ४५ ॥
नवविधा प्रकारें भजन । त्यांत मुख्य आत्मनिवेदन । तें समग्र प्रकारें क-
थन । कीजेल आतां ॥ ४६ ॥ निर्माण पंचभूतें इंद्रियें । कल्पांतीं नासती
१. स्वतःला जाळून घेणें. २. सार. ३. वेदांचा सारांश. ४. निर्णय. ५.
खचित. ६. मी ब्रह्म आहें. (हें यजुर्वेदांत आहे.) ७. गुरुशिष्यांच्या मनांचें ऐक्य.
११८ श्रीदासबोध. [ दशक
यथान्वयें १ । प्रकृतिपुरुषें २ जियें । तेहि ब्रह्म होती ॥ ४७ ॥ दृश्य पदार्थ आ-
टैतां ३ । आपणहि नुरे तत्वतां । ऐक्यरूपें ऐक्यता । मुळींच आहे ॥ ४८ ॥
सृष्टीची नाहीं वार्ता । तेथें सर्वहि ऐक्यता । पिंडब्रह्मांड ४ पाहों जातां । दिसेल
कोठें ॥ ४९ ॥ ज्ञानवन्हि प्रगटे ५ । तेणें दृश्य केर आटे । तदाकारें मूळ तुटे । भिन्न-
त्वाचें ॥ ५० ॥ मिथ्यात्वें वृत्ति फिरे ६ । तों दृश्य असतांच वोसरे । सहजचि
येणें प्रकारें । झालें आत्मनिवेदन ७ ॥ ५१ ॥ ऐसी सद्गुरूचे ठायीं अनन्यता ८ ।
तरी तुज कायसी रे चिंता । वेगळेपणें अभक्तां । उरोंचि नेदी ॥ ५२ ॥
आतां हेंचि दृढीकरण । व्हावया करीं सद्गुरुभजन । सद्गुरुभजनें समा-
धान । नेमस्त पावसी ॥ ५३ ॥ या नांव शिष्या आत्मज्ञान । येणें पाविजे
समाधान । भवभयाचें बंधन । समूळ मिथ्या ॥ ५४ ॥ देह मी वाटे ज्या
नरा । तो जाणावा आत्महंत्यारा ९ । देहाभिमानें येरझारा । भोगिल्याच
भोगी ॥ ५५ ॥ असे चहूं १० देहींवेगळा । जन्मकर्मा निराळा । सकळ ॲबळ ११
गौबॅळा ११ । सैबाह्य १२ तूं ॥ ५६ ॥ कोणासीच नाहीं बंधन । आंतीस्तव भुलले
जन । दृढ घेतला देहाभिमान । म्हणोनियां ॥ ५७ ॥ शिष्या एकांतीं बै-
सावें । स्वरूपीं विश्रांतीस जावें १३ । तेणें गुणें दृढ व्हावे । परमार्था सदा
॥ ५८ ॥ अखंड घडे श्रवण मनन । तरीच पाविजे समाधान । पूर्ण झा-
लिया ब्रह्मज्ञान । वैराग्य भरे अंगीं ॥ ५९ ॥ शिष्या मुक्तपणें १४ अनर्गल १५ ।
करिसी इंद्रियें बैरळ १६ । तेणें तुझी तळमळ । जाणार नाहीं ॥ ६० ॥ विषयीं
वैराग्य उपजलें । तयासीच पूर्ण ज्ञान झालें । मणी टाकितां लाधलें । राज्य
जेवीं ॥ ६१ ॥ ऐक शिष्या सावधान । आतां भविष्य मी सांगेन । जया
पुरुषास जें ध्यान । तयासि तेंचि प्राप्त ॥ ६२ ॥ म्हणोनि जे अविद्या ।
सांडूनि धरावी सुविद्या । तेणें गुणें जगद्वंद्या । पाविजे शीघ्र ॥ ६३ ॥
१. यथानुक्रमानें. २. दृश्य माया व तिचा भोक्ता जीव हीं दोन्ही. ३. लयास
जातां. ४. देह आणि जग. ५. ज्ञानरूपी अग्नि. ६. दृश्य मिथ्या असल्यामुळे
त्याचा विचार संपतो. ७. आत्मरूपाचें ज्ञान. ८. एकनिष्ठा. ९. आत्मघातकी. १०.
स्थूळ, सूक्ष्म, कारण व महाकारण असे चार देह एकांत एक आहेत, त्यांहून भिन्न.
११. दृश्य पसारा. १२. भिन्न. १३. स्वरूप जाणून स्वस्थ राहावें. १४. स्वतःला
मुक्त समजून. १५. स्वैर. १६. चंचल.
५ वा.] बद्धलक्षण. ११५
सन्निपाताचेनि दुःखें । भयानक दृष्टीस देखे । औषध घेतांचि सुखें । आनंद
पावे ॥ ६४ ॥ तैसें अज्ञानसन्निपातें । मिथ्या दृष्टीस दिसतें । ज्ञान औषध
घेतां चित्तें । जें मुळींच नाहीं ॥ ६५ ॥ मिथ्या स्वप्नें बोसेण झाला । तो
जागृतीस आणिला । तेणें पूर्वदशा पावला । निर्भय जे ॥ ६६ ॥ मिथ्याच
परी सत्य वाटलें । तेणें गुणें दुःख झालें । मिथ्यात्वें सत्य निरसलें । हें तों
घडेना ॥ ६७ ॥ मिथ्या आहे जागृतासी । परी वेड लाविलें निद्रितासी ।
जागा झालिया तयासी । भयचि नाहीं ॥ ६८ ॥ परी अविद्याझोंप येते भरें ।
भरे सर्वांगीं कांपिरें । पूर्ण जागृति श्रवणद्वारें । मननें करावीं ॥ ६९ ॥
जागृतीची वोळखण । ऐक तयाचें लक्षण । जो विषयीं विरक्त पूर्ण । अंत-
रापासुनी ॥ ७० ॥ जेणें विरक्तीस न यावें । तो साधक ऐसें जाणावें ।
तेणें साधन करावें । थोरीव सांडूनी ॥ ७१ ॥ साधन न माने जयाला ।
तो सिद्धपणें बद्ध झाला । त्याहुनि मुमुक्षु भला । ज्ञानाधिकारी ॥ ७२ ॥
तंव शिष्यें केला प्रश्न । कैसें बद्धमुमुक्षूंचें लक्षण । साधक सिद्ध ओळखण ।
कैसी जाणावी ॥ ७३ ॥ याचें उत्तर श्रोत्यांसी । दीधलें पुढिले समासीं ।
सावध श्रोतीं कथेसी । अवधान द्यावें ॥ ७४ ॥ इति श्रीदासबोधे गुरु-
शिष्यसंवादे पंचमदशके शुद्धज्ञाननिरूपणं नाम षष्ठः समासः ॥ ६ ॥
७. बद्धलक्षण.
श्रीगणेशाय नमः ॥ सृष्टी जे कां चराचर । जीव दाटले अपार । परी ते
अवघे चार । बोलिजती ॥ १ ॥ ऐक तयांचें लक्षण । चार ते कोण कोण ।
बद्ध मुमुक्षु साधक जाण । चौथा तो सिद्ध ॥ २ ॥ या चौघां विरहित
कांहीं । चराचरीं पांचवा नाहीं । आतां असो हीं सर्वंही । विशद
करूं ॥ ३ ॥ बद्ध म्हणिजे तो कोण । कैसें मुमुक्षूचें लक्षण । साधक सिद्ध
वोळखण । कैसी जाणावी ॥ ४ ॥ श्रोतीं व्हावें सावध । प्रस्तुत ऐका बद्ध ।
मुमुक्षु साधक आणि सिद्ध । पुढें निरूपिजेल ॥ ५ ॥ आतां बद्ध तो जा-
णिजे ऐसा । अंधारींचा अंध जैसा । चक्षूविण दाही दिशा । शून्याकार
१. ज्वराच्या. २. भयभीत. ३. वेड. ४. संसारांत गढलेला. ५. संसारांतून सुटूं
इच्छिणारा ६. सुटण्याचा मार्ग चालणारा. ७. मुक्त. ८. डोळ्यांवांचून.
॥ ६॥ भक्त ज्ञाता तापसी । योगी वीतरागी संन्यासी । पुढें देखतां
दृष्टीसी । येणार नाहीं ॥ ७॥ न दिसे नेणे कर्माकर्म । न दिसे नेणे धर्मा-
धर्म । न दिसे नेणे सुगम । परमार्थपंथ ॥ ८ ॥ तयास न दिसे सच्छास्त्र ।
सत्संगति सत्पात्र । सन्मार्ग जो कां पवित्र । तोहि न दिसे ॥ ९ ॥ न कळे
सारासार विचार । न कळे स्वधर्म आचार । न कळे कैसा परोपकार । दान
पुण्य ॥ १० ॥ नाहीं पोटीं भूतदया । नाहीं शुचिष्मंत² काया । नाहींच
जनांसि निववावया । वचन मृदु ॥ ११ ॥ न कळे भक्ती न
कळे ज्ञान । न कळे वैराग्य न कळे ध्यान । न कळे मोक्ष न कळे
साधन । या नांव बद्ध ॥ १२ ॥ न कळे देव निश्चयात्मक । न
कळे संतांचा विवेक । न कळे मायेचें कौतुक । या नांव बद्ध ॥ १३ ॥
न कळे परमार्थाची खुण । न कळे अध्यात्मनिरूपण । न कळे आप-
णासि आपण । या नांव बद्ध ॥ १४ ॥ न कळे जीवाचें जन्ममूळ ।
न कळे साधनांचें फळ । न कळे तत्व केवळ । या नांव बद्ध ॥१५॥ न कळे
कैसें तें बंधन । न कळे मुक्तीचें लक्षण । न कळे वस्तु³ विलक्षण । या नांव
बद्ध ॥१६॥ न कळे शास्त्रार्थ बोलिला । न कळे निजस्वार्थ आपुला । न
कळे संकल्पें⁴ बांधिला । या नांव बद्ध ॥ १७ ॥ जयास नाहीं आत्मज्ञान ।
हें मुख्य बद्धाचें लक्षण । तीर्थे व्रतें दान पुण्य । कांहींच नाहीं ॥१८॥ दया
नाहीं करुणा नाहीं । आर्जव नाहीं मैत्री नाहीं । शांति नाहीं क्षमा नाहीं ।
या नांव बद्ध ॥ १९ ॥ जें ज्ञानाविषयीं उणें । तेथें कैंचीं ज्ञानाचीं लक्षणें ।
बहुसाल कुलक्षणें । या नांव बद्ध ॥ २० ॥ नानाप्रकारचे दोष । करितां
वाटे परम संतोष । बाष्कळपणाचा हव्यास । या नांव बद्ध ॥ २१ ॥ बहु
काम बहु क्रोध । बहु गर्व बहु मद । बहु द्वंद्वे⁵ बहु खेद । या नांव बद्ध ॥२२॥
बहु दर्प बहु दंभ । बहु विषय बहु लोभ । बहु कर्कश बहु अशुभ । या
नांव बद्ध ॥ २३ ॥ बहु ग्रामणी⁶ बहु मत्सर । बहु असूया⁷ तिरस्कार । बहु
पापी बहु विकार । या नांव बद्ध ॥ २४ ॥ बहु अभिमान बहु ताठा । बहु
अहंकार बहु फांटा⁸ । बहु कुकर्मांचा सांठा । या नांव बद्ध ॥ २५ ॥ बहु
१. वैराग्यशील. २. शुद्ध. ३. जिचें लक्षण करितां येत नाहीं अशी वस्तु; ब्रह्म.
४. चित्तेनें. ५. कलह. ६. हरामखोरी. ७. मत्सर. ८. निरर्थक कल्पना.
५ वा. ] बद्धलक्षण. १२१
कापट्य वादविवाद । बहु कुतर्क भेदाभेद । बहु क्रूर कृपामंद । या नांव
बद्ध ॥ २६ ॥ बहु निंदा बहु द्वेष । बहु अधर्म बहु अभिलाष । बहु प्रका-
रींचे दोष । या नांव बद्ध ॥२७॥ बहु भ्रष्ट अनाचार । बहु नष्ट ऐकाकार ।
बहु अनीति अविचार । या नांव बद्ध ॥ २८ ॥ बहु निष्ठुर बहु घातकी ।
बहु हत्यारा बहु पातकी । बहु तपिल्लें कुविद्या अनेकीं । या नांव बद्ध ॥२९॥
बहु दुराशा बहु स्वार्थी । बहु कळह बहु अनअर्थी । बहु डॉईक दुर्मती । या
नांव बद्ध ॥ ३० ॥ बहु कल्पना बहु कामना । बहु तृष्णा बहु वासना ।
बहु ममता बहु भावना । या नांव बद्ध ॥३१॥ बहु विकल्पी बहु विषादी ।
बहु प्रपंची बहु उपाधी । बहु कुविद्येची बुद्धी । या नांव बद्ध ॥ ३२ ॥ बहु
वाचाळ बहु पाषांडी । बहु दुर्जन बहु थोतांडी । बहु पैशून्य बहु खोडी ।
या नांव बद्ध ॥ ३३ ॥ बहु अभाव बहु भ्रम । बहु भ्रांति बहु तम । बहु
विक्षेप बहु विराम । या नांव बद्ध ॥ ३४ ॥ बहु कृपण बहु खंदेस्ती । बहु
अदेखेणा बहु मस्ती । बहु असत्क्रिय अव्यवस्थी । या नांव बद्ध ॥ ३५ ॥
परमार्थविषयीं अज्ञान । प्रपंचाचें उदंड ज्ञान । नेणे स्वयें समाधान । या
नांव बद्ध ॥ ३६ ॥ परमार्थाचा अनादर । प्रपंचाचा अत्यादर । संसारभार
जोजार । या नांव बद्ध ॥ ३७ ॥ सत्संगाची नाहीं गोडी । संतनिंदेची
आवडी । देहबुद्धीची घातली बेडी । या नांव बद्ध ॥३८॥ हातीं द्रव्याची
जपमाळ । कांताध्यान सर्वकाळ । सत्संगाचा दुष्काळ । या नांव बद्ध ॥३९॥
नेत्रीं द्रव्य दारा पाहावी । श्रवणीं द्रव्य दारा ऐकावी । चिंतनीं द्रव्य दारा
चिंतावी । या नांव बद्ध ॥ ४० ॥ काया वाचा आणि मन । चित्त वित्त
जीव प्राण । द्रव्य दारेचें करी भजन । या नांव बद्ध ॥४१॥ इंद्रियें करूनि
निश्चळ । चंचळ होऊं नेदी पळ । द्रव्य दारेसि लावी सकळ । या नांव
बद्ध ॥ ४२ ॥ द्रव्य दारा तेंचि तीर्थ । द्रव्य दारा तोचि परमार्थ । द्रव्य
दारा सकळ स्वार्थ । या नांव बद्ध ॥४३॥ व्यर्थ जाऊं नेदी काळ । संसार-
चिंता सर्वकाळ । कथा वार्ता तेचि सकळ । या नांव बद्ध ॥ ४४ ॥ नाना
१. ऐकेखोर. २. घातकी. ३. तापट. ४. अनर्थ करणारा. ५. दावा धरणारा.
६. उठाठेवी. ७. चहाडी करणें. ८. अविश्वास. ९. अज्ञान. १०. चांचल्य. ११.
सुस्तपणा. १२. दांडगाई. १३. मत्सरी. १४. स्थूल देह म्हणजे मी, अशा भावनेची.
१२२ श्रीदासबोध. [ दशकं
चिंता नाना उद्वेग । नाना दुःखांचे संसर्ग । करी परमार्थाचा त्याग । या
नांव बद्ध ॥ ४५ ॥ घटिका निमेष पळभरी । दुश्चित नव्हतां अंतरीं । सर्व-
काळ ध्यान धरी । द्रव्य द्वारा प्रपंचाचें ॥ ४६ ॥ तीर्थयात्रा दान पुण्य ।
हरिकथानिरूपण । मंत्र पूजा जप ध्यान । सर्वहि द्रव्य द्वारा ॥ ४७ ॥
जागृतीं स्वप्नीं रात्रंदिवस । ऐसा लागला विषयीं ध्यास । नाहीं क्षणाचा
अवकाश । या नांव बद्ध ॥ ४८ ॥ ऐसें बद्धाचें लक्षण । मुमुक्षुपणीं पालटे
जाण । ऐक तेहि वोळखण । पुढिले समासीं ॥ ४९ ॥ इति श्रीदासबोधे
गुरुशिष्यसंवादे पंचमदशके बद्धलक्षणनिरूपणं नाम सप्तमः समासः ॥ ७ ॥
८. मुमुक्षुलक्षण.
श्रीगणेशाय नमः ॥ संसारमदाचेनि गुणें । नाना हीनें कुलक्षणें ।
जयाचें मुखावलोकनें । दोषचि लागे ॥ १ ॥ ऐसा प्राणी जो कां बद्ध ।
संसारीं वर्ततां अबद्ध १ । तयास प्राप्त झाला खेद । काळांतरीं ॥ २ ॥ संसार-
दुःखें दुखवला । त्रिविध तापें पोळला । निरूपणें २ पालटला । अंतर्यामीं
॥ ३ ॥ झाला प्रपंचीं उदास । मनें घेतला विषयत्रास । ह्मणे आतां पुरे
सोस । संसाराचा ॥ ४ ॥ प्रपंच जाईल सकळ । एथील श्रम तो निष्फळ ।
आतां कांहीं आपुला काळ । सार्थक करूं ॥ ५ ॥ ऐसी बुद्धि प्रस्तावली ।
पोटीं अवस्था ३ लागली । ह्मणे माझी वयसा ४ गेली । व्यर्थच अवघी ॥ ६ ॥
पूर्वी नाना दोष केले । ते अवघेच आठवले । पुढें येउनि उभे ठेले । अंत-
र्यामीं ॥ ७ ॥ आठवे यमाची यातना । तेणें भयचि वाटे मना । नाहीं
पापाची गणना । म्हणोनियां ॥ ८ ॥ नाहीं पुण्याचा विचार । झाले पापाचे
डोंगर । आतां दुस्तर हा संसार । कैसा तरूं ॥ ९ ॥ आपले दोष आच्छा-
दिले । भल्यांस गुणदोष लाविले । देवा म्यां व्यर्थची निंदिले । संत साधु
सज्जन ॥ १० ॥ निंदे ऐसे नाहीं दोष । ते मज घडले विशेष । माझे
अवगुणीं आकाश । बुडों पाहे ॥ ११ ॥ नाहीं वोळखिले संत । नाहीं
अर्चिला ५ भगवंत । नाहीं अतीत अभ्यागत । संतुष्ट केले ॥ १२ ॥ नाहीं
कष्टविलें शरीर । नाहीं केला परोपकार । नाहीं राखिला आचार । काममदें
१. स्वैर. २. उपदेशानें. ३. आस्था. ४. वय. ५. पूजिला.
॥ १३ ॥ पूर्वपाप वोढवलें । मज पुण्य नाहीं घडलें । मन अन्होटीं¹ पडिलें ।
सर्वकाळ ॥ १४ ॥ भक्तिमाता हे बुडविली । शांतिविश्रांति मोडिली । मूर्ख-
पणें म्यां बिघडिली । सद्बुद्धि सद्वासना ॥ १५ ॥ आतां कैसेनि घडेल
सार्थक । दोष केले निरर्थक । पाहों जातां विवेक । उरला नाहीं ॥ १६ ॥
कोण उपाय करावा । कैसा परलोक पाहावा । कोणत्या गुणें देवाधिदेवा ।
पाविजेल ॥ १७ ॥ नाहीं सद्भाव उपजला । अवघा लौकिक संपादिला । दंभ
वरपंगें केला । खटाटोप कर्माचा ॥ १८ ॥ कीर्तन केलें पोटासाठीं । देव
मांडिले हाटवटीं² । आहा देवा बुद्धि खोटी । माझी मीच जाणें ॥ १९ ॥
पोटीं धरूनि अभिमान । शाब्दिक बोलिलों निरभिमान । अंतरीं वांछून्-
यां धन । ध्यानस्थ जाहलों ॥ २० ॥ ³व्युत्पत्तीनें लोक भोंदले । पोटासाठीं
संत निंदिले । माझे पोटीं दोष भरले । नाना प्रकारों ॥ २१ ॥ सत्य तेंचि
उच्छेदिलें । मिथ्या तेंचि प्रतिपादिलें । ऐसें नाना कर्म केलें । उदर भरा-
वया कारणें ॥ २२ ॥ ऐसा पोटीं प्रस्तावला । निरूपणें पालटला । तोचि
मुमुक्षु बोलिला । ग्रंथांतरीं ॥ २३ ॥ सन्मार्ग पोटीं धरी । सत्संगाची वां-
छा करी । विरक्त झाला संसारीं । या नांव मुमुक्षु ॥ २४ ॥ गेले राजे
चक्रवर्ती । माझें वैभव तें किती । म्हणे धरू सत्संगाची गती । या नांव
मुमुक्षु ॥ २५ ॥ आपले अवगुण देखे । विरक्तिबळें वोळखे । आपणासि
निंदी दुःखें । या नांव मुमुक्षु ॥ २६ ॥ म्हणे मी काय दंभधारी⁴ । म्हणे
मी काय अनाचारी । म्हणे मी काय अनुपकारी । या नांव मुमुक्षु ॥ २७॥
म्हणे मी पतित चांडाळ । म्हणे मी दुराचारी खळ । म्हणे मी पापी केवळ ।
या नांव मुमुक्षु ॥ २८ ॥ म्हणे मी अभक्त दुर्जन । म्हणे मी हीनाहूनी
हीन । म्हणे मी जन्मलों पाषाण । या नांव मुमुक्षु ॥ २९ ॥ म्हणे मी दुर-
भिमानी । म्हणे मी तपिष्ठ⁶ जनीं । म्हणे मी नानाव्यसनीं । या नांव मु-
मुक्षु ॥ ३० ॥ म्हणे मी आळशी अंगचोर । म्हणे मी कपटी कांतरें⁷ । म्हणे
मी मूर्ख अविचार । या नांव मुमुक्षु ॥ ३१ ॥ म्हणे मी निकामी⁵ वाचाळ ।
म्हणे मी पाषांडी तोंडाळ । म्हणे मी कुबुद्धि कुटिल । या नांव मुमुक्षु ॥
१. आडवाटेंत. कुमार्गांत. २. बाजारांत. ३. विद्वत्तेनें. ४. ढोंगी. ५. निरू-
पयोगी. ६. तामसी. ७. भितरा.
१२४ श्रीदासबोध. [ दशक
३२ ॥ म्हणे मी कांहींच नेणें । म्हणे मी सकळांहूनि उणें । आपलीं वर्णी
कुलक्षणें । या नांव मुमुक्षु ॥ ३३ ॥ म्हणे मी कुश्चिळ¹ अघोरी । म्हणे मी
नीच नानापरी । म्हणे मी अनधिकारी । या नांव मुमुक्षु ॥ ३४ ॥ म्हणे
मी काय आपस्वार्थी । म्हणे मी काय अनर्थी । म्हणे मी नव्हे परमार्थी ।
या नांव मुमुक्षु ॥ ३५ ॥ म्हणे मी अवगुणांची राशी । म्हणे मी कुकर्मी
आळशी । म्हणे मी भार झालों भूमीशीं । या नांव मुमुक्षु ॥ ३६ ॥ आप-
णास निंदी सावकाश । पोटीं संसाराचा त्रास । धरीं सत्संगाचा हव्यास ।
या नांव मुमुक्षु ॥ ३७ ॥ नाना तीर्थे धुंडाळिलीं । शमदमादि² साधनें
केलीं । नाना ग्रंथांतरें पाहिलीं । शोधूनियां ॥ ३८ ॥ तेणें नव्हे समाधान ।
वाटे अवघाच अनुमान । म्हणे रिघूं संतांस शरण । या नांव मुमुक्षु ॥ ३९ ॥
देहाभिमान कुलाभिमान । द्रव्याभिमान मानाभिमान । सांडूनि संतचर-
णीं ³अनन्य । या नांव मुमुक्षु ॥ ४० ॥ अहंता सांडूनि दुरी । आपणासी
निंदी नानापरी । मोक्षाची अपेक्षा करी । या नांव मुमुक्षु ॥ ४१ ॥ ज्याचें
मन थोरपणा लाजे । जो परमार्थाकारणें झिजे । संतपायीं विश्वास उपजे ।
या नांव मुमुक्षु ॥ ४२ ॥ स्वार्थ सांडूनि प्रपंचाचा । हव्यास धरिला
परमार्थाचा । अंकितें⁴ होईन सज्जनांचा । या नांव मुमुक्षु ॥ ४३ ॥ ऐसा
मुमुक्षु जाणिजे । संकेतचिन्हें⁵ ओळिखिजे । पुढें श्रोतीं अवधान दीजे ।
साधकलक्षणीं ॥ ४४ ॥ इतिश्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे पंचमदशके मुमु-
क्षुलक्षणनिरूपणं नाम अष्टमः समासः ॥ ८ ॥
९. साधकलक्षण.
श्रीगणेशाय नमः ॥ मागां मुमुक्षूचें लक्षण । संकेतें केलें कथन । आतां
परिसा सावधान । साधक तो कैसा ॥ १ ॥ अवगुणांचा करूनि त्याग ।
जेणें धरिला संतसंग । तयासि बोलिजे मग । साधक ऐसा ॥ २ ॥ जो
संतांसी शरण गेला । संतजनीं आश्वासिला । मग तो साधक बोलिला ।
ग्रंथांतरीं ॥ ३ ॥ उपदेशिलें आत्मज्ञान । तुटलें संसारबंधन । दृढतेकारणें
१. अमंगळ. २. मन व इंद्रियें यांस जिंकणें. ३. एकनिष्ठ. ४. दास.
५. संक्षेपतः.
५ वा. ] सार्थकलक्षण. १२५
करी साधन । या नांव साधन ॥ ४ ॥ धरी श्रवणाची आवडी । अद्वैत-
निरूपणाची गोडी । मननें अर्थांतर¹ काढी । या नांव साधक ॥ ५ ॥ होतां
सारासार विचार । ऐके होऊनि तत्पर । संदेह छेदूनि दृढोत्तर² । आत्मज्ञान
पाहे ॥ ६ ॥ नानासंदेहनिवृत्ती³ । व्हावया धरी सत्संगती । आत्मशास्त्रगुरु-
प्रतीती । ऐक्यतेसि आणि ॥ ७ ॥ देहबुद्धी विवेकें वारी । आत्मबुद्धी दृढ
धरी । श्रवण मनन केलेंच करी । या नांव साधक ॥ ८ ॥ विवंचूनि⁴ दृश्य-
भान । दृढ धरी आत्मज्ञान । विचारें राखे समाधान । या नांव साधक
॥ ९ ॥ तोडूनि द्वैताची उपाधी⁵ । अद्वैतवस्तु⁶ साधनें साधी । लावी ऐक्य-
तेची समाधी । या नांव साधक ॥ १० ॥ आत्मज्ञान जीर्ण जर्जर । त्याचा
करी जीर्णोद्धार । विवेकें पावे पैलपार । या नांव साधक ॥ ११ ॥ उत्तम
साधूचीं लक्षणें । अंगिकारी निरूपणें । बळेंचि स्वरूपाकार होणें । या नांव
साधक ॥ १२ ॥ असत्क्रिया ते सोडिली । आणि सत्क्रिया ते वाढविली ।
स्वरूपस्थिति⁷ बळावली । या नांव साधक ॥ १३ ॥ अवगुण त्यागी दिवसें-
दिवस । करी उत्तम गुणांचा अभ्यास । स्वरूपीं लावी निजध्यास । या
नांव साधक ॥ १४ ॥ दृढनिश्चयाचेनि बळें । दृश्य असतांच नाडले⁸ । सदा
स्वरूपीं मिसळे । या नांव साधक ॥ १५ ॥ प्रत्यक्ष माया अलक्ष करी ।
अलक्ष्य⁹ वस्तु लक्षी अंतरीं । आत्मस्थितीची धारणा धरी । या नांव साधक
॥ १६ ॥ जें या जनास चोरलें । मनासि न वचे अनुमानलें । तेंचि जेणें दृढ
केलें । या नांव साधक ॥ १७ ॥ जें बोलतांच वाचा धेरी¹⁰ । जें पाहतांचि
अंध करी । तेंचि साधी नानापरी । या नांव साधक ॥ १८ ॥ जें साधूं
जातां साधवेना । जें लक्षूं जातां लक्षवेना । तेंचि अनुभवें आणि मना । या
नांव साधक ॥ १९ ॥ जेथें मनचि मावळे । जेथें तर्कचि पांगुळे । तेंचि
अनुभवा आणि बळें । या नांव साधक ॥ २० ॥ स्वानुभवाचेनि योगें ।
वस्तु साधी लाघवेंगे । तेचि वस्तु होय अंगें । या नांव साधक ॥ २१ ॥
अनुभवाचीं अंगें जाणे । योगियांचे खुणे बाणे । कांहींच नसोनि असणें ।
१. अर्थांतील मर्म. २. दृढतर, निश्चयात्मक. ३. शंकांचें निवारण. ४. मनन
करून. ५. संबंध. ६. ब्रह्म. ७. स्वरूपासंबंधीं जागृति. ८. भासत नाहीं. ९.
अचिंत्य ब्रह्म. १०. कुंठित करितें.
१२६ श्रीदासबोध. [ दशक
या नांव साधक ॥ २२ ॥ परती सारूनि उपाधी । असाध्य वस्तु साधनें
साधी । स्वरूपीं करी दृढ बुद्धी । या नांव साधक ॥ २३ ॥ देवभक्तांचें मूळ ।
शोधूनि पाहे सकळ । साध्यचि होय तत्काळ । या नांव साधक ॥ २४ ॥
विवेकबळें गुप्त झाला । आपेंआप मावळला । दिसतो परी देखिला३ । नाहींच
कोणीं ॥ २५ ॥ मीपण मागें सांडिलें । स्वयें आपणासि धुंडिलें । तुर्येसहित
ओलांडिलें । या नांव साधक ॥ २६ ॥ पुढें उन्मनींच्या४ शेवटीं । आपली
आपणास अखंड भेटी । अखंड अनुभवीं ज्याची दृष्टी । या नांव साधक
॥ २७ ॥ द्वैताचा तडका तोडिला । भासाचा भासें मोडिला । देहीं असोनि
विदेही झाला । या नांव साधक ॥ २८ ॥ जयास अखंड स्वरूपस्थिती ।
नाहीं देहाची अहंकृती । सकळ संदेह निवृत्ती । या नांव साधक ॥ २९ ॥
पंचभूतांचा विस्तार । जयास वाटे स्वप्नाकार । निर्गुणीं जयाचा निर्धार ।
या नांव साधक ॥ ३० ॥ स्वप्नीं भय जें वाटलें । तें जागृतीस नाहीं आलें ।
सकळ मिथ्या निर्धारिलें । या नांव साधक ॥ ३१ ॥ मायेचें जें प्रत्यक्षपण
जनास वाटे हें प्रमाण । स्वानुभवें अप्रमाण । साधकें केलें ॥ ३२ ॥ निद्रा
सांडूनि चेईंरा६ झाला । तो स्वप्नभयापासोनि सुटला । माया सांडूनि तैसा
गेला । साधक स्वरूपीं ॥ ३३ ॥ ऐसी अंतरस्थिति बाणली । बाह्य निस्पृह-
ता अवलंबिली । संसारउपाधी त्यागिली । या नांव साधक ॥ ३४ ॥
कामापासोनि सुटला । क्रोधापासोनि पळाला । मदमत्सर सांडिला । एकी-
कडे ॥ ३५ ॥ कुळाभिमानासि सांडिलें । लोकलाजेसी लाजविलें । परमा-
र्थासी माजविलें । विवेकबळें ॥ ३६ ॥ अविद्येपासुनि फडकला । प्रपंचा-
पासोनि निसटला । लोभाचे हातींचा गेला । अकस्मात ॥ ३७ ॥ थोरपणा-
सि पाडिलें । वैभवासि लिथाडिलें । महत्त्वासि झिंजाडिलें । विरक्तिबळें
॥ ३८ ॥ मेदाचा मडघां९ मोडिला । अहंकार झोडूनी पाडिला । पायीं ध-
रूनि आपटिला । संदेहशत्रू ॥ ३९ ॥ विकल्पाचा केला वधू । थोपै मारिला
भवसिंधू । सकळ भूतांचा विरोधू । तोडूनि टाकिला ॥ ४० ॥ भवभयासि
१. मायेचा संबंध. २. देह दिसतो. ३. तो स्वतः दिसत नाहीं. ४. निर्विकल्प
समाधि; एथें मनाचा लय होतो. ५. कल्पना. ६. जागृत. ७. लाथ मारिली
८. शिडकारिलें. ९. बिऱ्हाड. १०. चापट, थापड.
५ वा.] साधकलक्षण. १२७
भडकाविलें । काळाचें टांगें¹ मोडिलें । मस्तक हाणोनि पाडिलें । जन्म-
मृत्यूचें ॥ ४१ ॥ देहसंबंधावरी लोटला । संकल्पावरी उठावला । कल्पनेचा
घात केला । अकस्मात ॥ ४२ ॥ अपघातासि ताडिलें । लिंगदेहासि विभां-
डिलें । पाषांडासि पछाडिलें । विवेकबळें ॥ ४३ ॥ गर्वांवरी गर्व केला ।
स्वार्थ अनर्थां घातला । अनर्थ तोहि निर्दाळिला । नीतिन्यायें ॥ ४४ ॥
मोहासि मध्येंच तोडिलें । दुःखासि दुधडाँचि³ केलें । शोकासि खंडूनि सां-
डिलें । एकीकडे ॥ ४५ ॥ द्वेष केला देशधडी । अभावाची चेंपिली नरडी ।
धाकें उदर तडाडी । कुतर्काचें ॥ ४६ ॥ ज्ञानें विवेक माजला । तेणें निश्चय
बळावला । अवगुणांचा संहार केला । वैराग्यबळें ॥ ४७ ॥ अधर्मास स्व-
धर्मैं टाकिलें । कुकर्मास सत्कर्मैं झुगारिलें । लोटूनि वाटा लाविलें । विचारें
अविचारांसी ॥ ४८ ॥ तिरस्कार तो चिराडिला । द्वेष खिरडून सांडिला ।
विषाँद अविश्वाँदें घातला । पायांतळीं ॥ ४९ ॥ कोपावरी घालणें घातलें ।
कापट्य अंतरीं कुटिलें । सख्य आपुलें मानिलें । विश्वजनीं ॥ ५० ॥ प्रवृ-
त्तीचाँ केला त्याग । सुहृदांचा सोडिला संग । निवृत्तिमंथें ज्ञानयोग । सा-
धिता झाला ॥ ५१ ॥ विष॑यमँदासि सितेंरिलें । कुविद्येसि वेडाविलें । आ-
पणासि सोडविलें । आप्ततस्करापासूनी ॥ ५२ ॥ पराधीनतेवरी कोपला ।
ममतेवरी संतापला । दुराशेचा त्याग केला । एकाएकीं ॥ ५३ ॥ स्वरूपीं
घातलें मना । यातनेसि केली यातना । साधन आणि प्रयत्ना । प्रतिष्ठिलें
॥ ५४ ॥ अभ्यासाचा संग धरिला । साक्षेपारिसा निघाला । प्रयत्न सां-
गातीं घेतला । साधनपंथें ॥ ५५ ॥ सावध दक्ष तो साधक । पाहे नित्या-
नित्यविवेक । संग त्यागूनि एक । सत्संग धरी ॥ ५६ ॥ बळेंच सारिला
संसार । विवेकें टाकिला जोजार । शुद्धाचारें अनाचार । अष्टाविला ॥ ५७ ॥
विसरास विसरला । आळसाचा आळस केला । सावध नाहीं दुश्चित झाला ।
दुश्चितपणासी ॥ ५८ ॥ आतां असो हैं बोलणें । अवगुण सांडी निरूपणें ।
तो साधक ऐसा येणें । प्रमाणें बुँझावा ॥ ५९॥ बळेंचचि अवघा त्याग कीजे ।
१. तंगडी. २. फोडिलें. ३. दुभंग. ४. चुरडून. ५. खेद. ६. समाधानानें.
७. कर्मे करण्याच्या इच्छेचा. ८. जिवलगांचा. ९. चित्ताला अंतर्मुख करण्याच्या
मार्गानें. १०. विषयरूप फांसेगारास. ११. चुकविलें. १२. जाणावा.
१२८ श्रीदासबोध. [ दशक
म्हणोनि साधक बोलिजे । आतां सिद्ध तोचि जाणिजे । पुढिले समासीं
॥ ६० ॥ येथें संशय उठिला । निस्पृह तोचि साधक झाला । त्याग न घडे
संसारिकाला । तरी तो साधक नव्हे कीं ॥ ६१ ॥ ऐसें श्रोत्यांचें उत्तर ।
त्याचें कैसें प्रत्युत्तर । पुढिले समासीं तत्पर । होऊनि ऐका ॥ ६२ ॥ इति
श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे पंचमदशके साधकलक्षणनिरूपणं नाम नवमः
समासः ॥ ९ ॥
१०. सिद्धलक्षण.
श्रीगणेशाय नमः ॥ मागें बोलिला संसारिक । त्यागेंविण नव्हे कीं सा-
धक । ऐका याचा विवेक । ऐसा असे ॥ १ ॥ सन्मार्ग तोचि जीवीं धरणें ।
असन्मार्गाचा त्याग करणें । संसारिका त्याग येणें । प्रकारें ऐसा ॥ २ ॥
कुबुद्धित्यागाविणें कांहीं । सुबुद्धि लागणार नाहीं । सांसारिका त्याग पाहीं ।
ऐसा असे ॥ ३ ॥ प्रपंचीं वीट मानिला । मनें विषयत्याग केला । तरीच
पुढें अवलंबिला । परमार्थमार्ग ॥ ४ ॥ त्याग घडे अभावाचा^१ । त्याग घडे
संशयाचा । त्याग घडे अज्ञानाचा । शनैःशनैः^२ ॥ ५ ॥ ऐसा सूक्ष्म अंतर-
त्याग^३ । उभयतांस घडे सांगें^४ । निस्पृहास बाह्यत्याग^५ । विशेष घडे ॥ ६ ॥
संसारिका ठायीं ठायीं । बाह्यत्याग घडे कांहीं । नित्यनेम श्रवण नाहीं ।
त्यागेंविण ॥ ७ ॥ फिटली आशंका स्वभावें । त्यागेंविण साधक नव्हे ।
पुढें कथेच्या अन्वयैं । सावध ऐका ॥ ८ ॥ मागां झालें निरूपण । साध-
काची वोळखण । आतां सांगिजेल खूण । सिद्ध लक्षणाची ॥ ९ ॥ साधु
वस्तु^६ होऊनि ठेला । संशय ब्रह्मांडाबाहेर गेला । निश्चय चळैना ऐसा झाला ।
या नांव सिद्ध ॥ १० ॥ बद्धपणाचे अवगुण । मुमुक्षुपणीं नाहीं जाण ।
मुमुक्षुपणाचें लक्षण । साधकपणीं नाहीं ॥ ११ ॥ साधकास संदेहवृत्ती ।
पुढें होतसे निवृत्ती^७ । याकारणें निःसंदेह श्रोतीं । साधु वोळखावा ॥ १२ ॥
संशयरहित जें ज्ञान । तेंचि साधूचें लक्षण । सिद्धाअंगीं संशय जाण । ला-
गेल कैसा ॥ १३ ॥ कर्ममार्ग संशयैं भरला । साधनें संशय कालवला ।
१. अश्रद्धेचा. २. हळूहळू. ३. आसक्तीचा त्याग. ४. समग्र. ५. विषयांचा
प्रत्यक्ष त्याग. ६. ब्रह्म. ७. संशयाचें निवारण.
५ वा.] सिद्धलक्षण. १२९
सर्वांमध्यें संशय भरला । साधु तो निःसंदेह ॥ १४ ॥ संशयाचें ज्ञान
खोटें । संशयाचें वैराग्य पोरटें । संशयाचें भजन खोटें । निष्फळ होय ॥ १५ ॥
व्यर्थ संशयाचा देव । व्यर्थ संशयाचा भाव । व्यर्थ संशयाचा स्वभाव ।
निश्चयेंविण ॥ १६ ॥ व्यर्थ संशयाचें व्रत । व्यर्थ संशयाचें तीर्थ । व्यर्थ
संशयाचा परमार्थ । निश्चयेंविण ॥ १७ ॥ व्यर्थ संशयाची भक्ती । व्यर्थ
संशयाची प्रीती । व्यर्थ संशयाची संगती । संशय वाढवी ॥ १८ ॥ व्यर्थ
संशयाचें जिणें । व्यर्थ संशयाचें धरणें । व्यर्थ संशयाचें करणें । सर्व कांहीं
॥ १९ ॥ व्यर्थ संशयाची पोथी । व्यर्थ संशयाची व्युत्पत्ती । व्यर्थ संश-
याची गती । निश्चयेंविण ॥ २० ॥ व्यर्थ संशयाचा दक्ष । व्यर्थ
संशयाचा पक्ष । व्यर्थ संशयाचा मोक्ष । होणार नाहीं ॥ २१ ॥ व्यर्थ
संशयाचा संत । व्यर्थ संशयाचा पंडित । व्यर्थ संशयाचा बहुश्रुत । निश्चयेंविण
॥ २२॥ व्यर्थ संशयाची श्रेष्ठता । व्यर्थ संशयाची व्युत्पन्नता १। व्यर्थ संशयाचा
ज्ञाता । निश्चयेंविण ॥ २३॥ निश्चयेंविण सर्व कांहीं । अणुमात्र तें प्रमाण नाहीं ।
व्यर्थचि पडिले प्रवाही । संदेहाचे ॥ २४ ॥ निश्चयेंविण जें बोलणें । तें
अवघेंचि कंटाळवाणें । बाष्कळ बोलिजे वाचालपणें । निरर्थक ॥ २५ ॥ असो
निश्चयेंविण जे वलगना । ते अवघी विटंबना । संशयैं कांहीं समाधाना ।
उरी नाहीं ॥ २६ ॥ म्हणोनि संदेहरहित ज्ञान । निश्चयाचें समाधान ।
तेंचि सिद्धांचें लक्षण । निश्चयेंेंसी ५॥ २७ ॥ तंव श्रोता करी प्रश्न । निश्चय
करावा कवण । मुख्य निश्चयाचें लक्षण । मज निरूपावें ॥ २८ ॥ ऐक
निश्चय तो ऐसा । मुख्य देव आहे कैसा । नाना देवांचा वेळसा । करूं चि
नये ॥ २९ ॥ जेणें निर्मिलें चराचर । त्याचा करावा विचार । शुद्ध विवेकें
परमेश्वर । वोळखावा ॥ ३० ॥ मुख्य देव तो कोण । भक्ताचें कैसें लक्षण ।
असत्य सांडून वोळखण । सत्याची धरावी ॥ ३१ ॥ आपल्या देवास वोळ-
खावें । मग मी कोण हें पाहावें । संग त्यागून राहावें । वस्तुरूप ॥ ३२ ॥
तोडावा बंधनाचा संशय । करावा मोक्षाचा निश्चय । पहावा भूतांचा अ-
न्वय । व्यतिरेक ॥ ३३ ॥ पूर्वपक्षेंसीं सिद्धांत । पहावा प्रकृतीचा अंत ।
मग पावावा निवांत । निश्चय देवाचा ॥ ३४ ॥ देहाचेनि योगें संशय ।
१. विद्वत्ता. २. घोटाळा.
१३० श्रीदासबोध. [ दशक
करी समाधानाचा क्षय । तरी चळों न द्यावा निश्चय । आत्मत्वाचा ॥ ३५॥
सिद्ध असतां आत्मज्ञान । संदेह वाढवी देहाभिमान । याकारणें समाधान ।
आत्मनिश्चयें राखावें ॥ ३६ ॥ आठवतां देहबुद्धी । उडे विवेकाची शुद्धी ।
या कारणें आत्मबुद्धी । सदृढ धरावी ॥ ३७॥ आत्मबुद्धि निश्चयाची । तेचि
दशा मोक्षश्रीची । अहमात्मा १ हें कधींचि । विसरूं नये ॥ ३८ ॥ निरू-
पिलें निश्चयाचें लक्षण । परी हें न कळे सत्संगेंविण । संतांसि गेलिया शरण ।
संशय तुटती ॥ ३९ ॥ आतां असो हें बोलणें । ऐका सिद्धाचीं लक्षणें ।
मुख्य निःसंदेहपणें । सिद्ध बोलिजे ॥ ४० ॥ सिद्धस्वरूपीं नाहीं देहो । तेथें
कैंचा हो संदेहो । याकारणें सिद्ध पाहा हो । निःसंदेही ॥ ४१ ॥ देहसंबं-
धाचेनि गुणें । लक्षणांसि काय उणें । देहातीतांचीं २ लक्षणें । काय म्हणोनि
सांगावीं ॥ ४२ ॥ जें लक्षवेना चक्षूंसी । त्याचीं लक्षणें सांगावीं कैसीं ।
निर्मळ वस्तु सिद्ध त्यासी । लक्षणें कैंचीं ॥ ४३ ॥ लक्षणें म्हणिजे केवळ
गुण । वस्तु ठायींच निर्गुण । तेंचि सिद्धाचें लक्षण । वस्तुरूपें ॥ ४४ ॥
तथापि ज्ञानदशकीं ३ बोलिलें । म्हणोनि वक्तृत्व आटोपिलें । न्यूनपूर्ण क्षमा
केलें । पाहिजे श्रोतीं ॥ ४५ ॥ इतिश्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे पंचमद-
शके सिद्धलक्षणनिरूपणं नाम दशमः समासः ॥ १० ॥ ओंवी ५७२.
दशक सहावा.
१. देवशोधन.
श्रीगणेशाय नमः ॥ चित्त सूचित करावें । बोलिलें तें जीवीं धरावें ।
सावध होऊन बैसावें । निमेष एक ॥ १ ॥ कोणी एके ग्रामीं अथवा देशीं ।
राहणें आहे आपणाशीं । न भेटतां तेथिल्या प्रभूशीं । सौख्य कैंचें ॥ २ ॥
म्हणोन ज्यास जेथें राहणें । तेणें त्या प्रभूची भेटी घेणें । म्हणिजे होय
श्लाघ्यवाणें ४ । सर्व कांहीं ॥ ३ ॥ प्रभूची भेटी न घेतां । तेथें कैंची मान्यता ।
आपुलें महत्व जातां । वेळ नाहीं ॥ ४ ॥ म्हणोन रायापासून रंक । कोणी
एक तरी नायक । त्यास भेटणें हा विवेक । विवेकी जाणती ॥ ५ ॥ त्यास
१. मी आत्मा आहें, देह नव्हे. २. देहाहंभाव गळलेल्या साधूंचीं. ३. आठव्या
दशकांत. ४. चांगलें.
६ वा.] देवशोधन. १३९
न भेटतां त्याचे नगरीं । राहतां धरितील बेगारी । तेथें न करितां चोरी ।
अंगीं लागे ॥ ६ ॥ या कारणें जो शाहणा । तेणें प्रभूस भेटावें जाणा । ऐसें
न करितां दैन्यवाणा । संसार त्याचा ॥ ७ ॥ ग्रामीं थोर ग्रामाधिपती । त्या-
हून थोर देशाधिपती । देशाधिपतीहून नृपती । थोर जाणावा ॥ ८ ॥ राष्ट्रा-
चा प्रभु तो राजा । बहुराष्ट्र तो महाराजा । महाराजाचाही राजा । तो
चक्रवर्ती ॥ ९ ॥ एक नरपति एक गजपति । एक हयपति एक भूपती ।
सकळांमध्ये चक्रवर्ती । थोर राजु ॥ १० ॥ असो ऐसिया समस्तां । एक
ब्रह्मा निर्माणकर्ता । त्या ब्रह्म्यासहि निर्मिता । कोण आहे ॥ ११ ॥ ब्रह्मा
विष्णु आणि हर । त्यांसि निर्मिता तोचि थोर । तो वोळखावा परमेश्वर ।
नाना यत्नें ॥ १२ ॥ तो देव ठायीं पडेना । तरी यमयातना चुकेना । ब्रह्मां-
डनायक चोजवेना । हें बरें नव्हे ॥ १३ ॥ जेणें संसारीं घातलें । अवघें
ब्रह्मांड निर्माण केलें । त्यासि नाहीं वोळखिलें । तोचि पतित ॥ १४ ॥
म्हणोनि देव वोळखावा । जन्म सार्थकचि करावा । न कळे तरी सत्संग
धरावा । म्हणजे कळे ॥ १५ ॥ जो जाणेल भगवंत । तया नांव बोलिजे
संत । जो शाश्वत आणि अशाश्वत । निवाडा करी ॥ १६ ॥ चलेना डलेना
देव । ऐसा ज्याचा अंतर्भाव । तोचि जाणिजे महानुभाव । तोचि साधु
॥ १७ ॥ जो जनांमध्ये वागे । परी जनावेगळी गोष्टी सांगे । ज्याचे अंतरीं
ज्ञान जागे । तोचि साधु ॥ १८ ॥ जाणिजे परमात्मा निर्गुण । त्यासीच म्हणावें
ज्ञान । त्यावेगळें तें अज्ञान । सर्व कांहीं ॥ १९ ॥ पोट भरावयाकारणें । ना-
ना विद्या अभ्यास करणें । त्यास ज्ञान म्हणती परी तेणें । सार्थक नव्हे
॥ २० ॥ देव वोळखावा एक । तेंचि ज्ञान तेंचि सार्थक । येर अवघेंचि
निरर्थक । पोटविद्या ॥ २१ ॥ जन्मवरी पोट भरिलें । देहाचें संरक्षण केलें ।
पुढें अवघेंचि व्यर्थ गेलें । अंतकाळीं ॥ २२ ॥ एवं पोट भरायाची विद्या ।
तयेसि म्हणों नये सद्विद्या । सर्वव्यापक वस्तु सद्या । पाविजे तें ज्ञान
॥ २३ ॥ ऐसें जयापाशीं ज्ञान । तोचि जाणावा सज्ञान । तयापाशीं समा-
धान । पुसिलें पाहिजे ॥ २४ ॥ अज्ञानास भेटतां अज्ञान । तेथें कैंचें सांप-
१. वेठीस. २. सार्वभौम. ३. हातीं येईना. ४. जाणवेना. ५. थोर पुरुष.
६. याप्रकारें. ७. प्रत्यक्ष.
१३२ श्रीदासबोध. [ दशक
देल ज्ञान । करंट्यास करंट्याचे दर्शन । होतां भाग्य कैचें ॥ २५ ॥
रोग्यापाशीं रोगी गेला । तेथें कैचें आरोग्य त्याला । निर्बळापाशीं निर्ब-
ळाला । पाठीं कैची ॥ २६ ॥ पिशाच्चापाशीं पिशाच्च गेलें । तेथें कोण
सार्थक झालें । उन्मत्तास उन्मत्त भेटलें । त्यास उमजवी कवण ॥ २७ ॥
भिकाऱ्यापाशीं मागतां भिक्षा । दीक्षाहीनापाशीं दीक्षा । उजेड पाहतां
कृष्णपक्षा । पाविजे कैचा ॥ २८ ॥ अबुद्धापाशीं गेला अबुद्ध । तो कैसेनि
होईल सुबुद्ध । बद्धास भेटतां बद्ध । सिद्ध नव्हे ॥ २९ ॥ देह्यापाशीं गेला
देही । तो कैसेनि होईल विदेही⁶ । म्हणोनि ज्ञात्यावांचूनि नाहीं । ज्ञान-
मार्ग ॥ ३० ॥ या कारणें ज्ञाता पहावा । त्याचा अनुग्रह घ्यावा । सारासार-
विचारें जीवा । मोक्ष प्राप्त ॥ ३१ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
षष्ठदशके देवशोधननिरूपणं नाम प्रथमः समासः ॥ १ ॥
२. ब्रह्मप्रतिपादन.
श्रीगणेशाय नमः ॥ ऐका उपदेशाचीं लक्षणें । सायुज्यप्राप्ति होय जेणें ।
नानामतांचें पेखणें । कामा नये सर्वथा ॥ १ ॥ ब्रह्मज्ञानाविण उपदेश ।
तो म्हणों नये विशेष । धान्याविण जैसें भूस । खातां नये ॥ २ ॥ नाना
काबांड बडविलें । ना तरी तकचि घुसळिलें । अथवा धुवणचि सेविलें ।
सावकाश ॥ ३ ॥ नाना साली भक्षिल्या । अथवा चोइट्या चोखिल्या ।
खोबरें सांडून खादल्या । नरोट्या जैसा ॥ ४ ॥ तैसें ब्रह्मज्ञानाविण । नाना
उपदेशांचा शिण । सार सांडून असार कोण । शाहणा सेवी ॥ ५ ॥ आतां
ब्रह्म जें कां निर्गुण । तेंचि केलें निरूपण । सुचित करावें अंतःकरण ।
श्रोतेजनीं ॥ ६ ॥ सकळ सृष्टीची रचना । तें हें पांचभौतिकें जाणा । परंतु
हें तगेना । सर्वकाळ ॥ ७ ॥ आदि अंतीं ब्रह्म निर्गुण । तेचि शाश्वताची
खूण । येर पांचभौतिक सगुण । नाशवंत ॥ ८ ॥ येरवीं हीं पाहतां भूतें ।
देव कैसें म्हणावें त्यांतें । भूत म्हणतां मनुष्यातें । विषाद वाटे ॥ ९ ॥ मौं
तों जगन्नायक परमात्मा । त्यासि आणि भूत उपमा । ज्याची कळेना महिमा ।
१. आधार. २. वेड्यास. ३. काळोख्याचे दिवसांत. ४. अज्ञानी. ५. संसारी.
६. मुक्त. ७. उपदेश. ८. पाहणें. ९. पाचोळा. १०. जड सृष्टि. ११. मग.
ब्रह्मादिकांसी ॥ १० ॥ भूतांऐसा जगदीश । म्हणतां उत्पन्न होतो दोष
या कारणें महापुरुष । सर्व जाणती ॥११॥ पृथ्वी आप तेज वायु आकाश । १
यां सबाह्यें जगदीश । पंचभूतांस आहे नाश । आत्मा अविनाशरूपी
॥ १२ ॥ जें जें रूप आणि नाम । तो तो अवघाच भ्रम । नामरूपातीत
वर्म । अनुभवें जाणावें ॥१३॥ पंचभूतें आणि त्रिगुण । ऐसी अष्टधा प्रकृति
जाण । अष्टधा प्रकृतीस नामाभिधान । दृश्य ऐसें ॥१४॥ तें हें दृश्य नाश-
वंत । ऐसें वेदश्रुती बोलत । निर्गुण ब्रह्म शाश्वत । जाणती ज्ञानी ॥१५॥
जें शस्त्रें तोडितां तुटेना । जें पावकें २ जाळितां जळेना । जें कालवितां काल-
वेना । आपैंकरूनी ३ ॥ १६ ॥ जें वायूचेनि उडेना । जें पडेना ना ४ झडेना ।
जें घडेना ना दडेना । परब्रह्म तें ॥१७॥ ज्यासि वर्णचि नसे । जें सर्वां-
हूनि ॲनारिसें ५ । परंतु असतचि असे । सर्वकाळ ॥ १८ ॥ दिसेना तरी
काय झालें । परंतु सर्वत्र संचलें । सूक्ष्मचि कोंदाटलें । जेथें तेथें ॥ १९ ॥
दृष्टीस लागली सवे । जें दिसेल तेंचि पाहावें । परंतु गुज तें जाणावें ।
गौप्य आहे ॥२०॥ प्रगट तें जाणावें असार । आणि गुप्त तें जाणावें सार ।
गुरुमुखें हा विचार । उमजों लागे ॥२१॥ उमजेना तें उमजवावें । दिसेना
तें पाहावें । जें कळेना तें जाणावें । विवेकबळें ॥२२॥ गुप्त तेंचि प्रगटवावें ।
असाध्य तेंचि साधावें । कॉनडेंचि ६ अभ्यासावें । सावकाश ॥ २३ ॥ वेद
विरंची ७ आणि शेष । जेथें शिणले निःशेष । तेंचि साधावें विशेष । परब्रह्म
॥ २४ ॥ तरी तें कोण परिसावें । तेंचि बोलिलें स्वभावें । अध्यात्मश्रवणें
पावावें । परब्रह्म तें ॥२५॥ पृथ्वी नव्हे आप नव्हे । तेज नव्हे वायु नव्हे ।
वर्णव्यक्ति ऐसें नव्हे । अव्यक्त ८ तें ॥ २६ ॥ तयास म्हणावें देव । वरकड
लोकांचा स्वभाव । जितुके गांव तितुके देव । जनाकारणें ॥ २७ ॥ ऐसा
देवाचा निश्चय झाला । देव निर्गुण प्रत्यया आला । आतां आपणाचि
आपला । शोध घ्यावा ॥ २८ ॥ माझें शरीर ऐसें म्हणतो । तरी तो जाण
देहावेगळाचि होतो । मन माझें ऐसें जाणतो । तरी तो मनहि नव्हे ॥२९॥
पाहतां देहाचा विचार । अवघा तत्त्वांचा विस्तार । तत्त्वें तत्व झाडितां सार ।
१. अंतर्बाह्य. २. अग्नीनें. ३. उदकानें. ४. अथवा. ५. निराळें. ६. अवघड तेंच. ७. ब्रह्मदेव. ८. अदृश्य.
१३४ श्रीदासबोध. [ दशक
आत्माचि उरे ॥३०॥ आपणासि ठावचि नाहीं । तेथे पहाणें नलगे कांहीं ।
तत्वें ठायींच्या ठायीं । विभागुनि गेलीं ॥३१॥ बांधली आहे ती गांठोडी ।
जो कोणी विचारें सोडी । विचार पाहतां गांठोडी । आढळना ॥ ३२ ॥
तत्वांचें गांठोडें शरीर । याचा पाहतां विचार । एक आत्मा निरंतर । आपण
नाहीं ॥ ३३ ॥ आपणासि ठावचि नाहीं । जन्ममृत्यु कैंचे काई । पाहतां
वस्तूच्या ठायीं । पाप पुण्य नसे ॥ ३४ ॥ पाप पुण्य यमयातना । हैं
निर्गुणीं तों असेना । आपण तोचि तरी जन्ममरणा । ठाव कैंचा ॥ ३५ ॥
देहबुद्धीनें बांधला । तो विवेकें मोकळा केला । देहातीत होतां पावला ।
मोक्षपद ॥ ३६ ॥ झालें जन्माचें सार्थक । निर्गुण आत्मा आपण एक । परंतु हा
विवेक । पाहिलाचि पाहावा ॥ ३७ ॥ जागें होतां स्वप्न सरे । विवेक पाहतां
दृश्य वोसरे । स्वरूपानुसंधानें तरे । प्राणिमात्र ॥ ३८ ॥ आपणास निवे-
दावें । आपण विवेकें जुरावें । आत्मनिवेदन जाणावें । यांचें नांव ॥ ३९॥
आधीं अध्यात्मश्रवण । मग सद्गुरुपादसेवन । पुढें आत्मनिवेदन । सद्गुरु-
प्रसादें ॥ ४० ॥ आत्मनिवेदनाउपरी । निखेळ १ वस्तु निरंतरी । आपण
आत्मा हा अंतरीं । बोध जाहला ॥ ४१ ॥ त्या ब्रह्मबोधें ब्रह्मचि झाला ।
संसारखेद तो उडाला । देह प्रारब्धीं ठाकिला २ । सावकाश ॥ ४२ ॥ यासि
म्हणिजे आत्मज्ञान । येणें पाविजे समाधान । परब्रह्मीं अभिन्न ३ । भक्तचि
जाहला ॥ ४३ आतां होणार तें होइना कां । आणि जाणार तें जाइना कां ।
तुटली मनांतील आशंका । जन्ममृत्यूची ॥ ४४ ॥ संसारीं बुडावें चुकलें ।
देवां भक्तां ऐक्य झालें । मुख्य देवास वोळखिलें । सत्संगेंकरुनी ॥ ४५ ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे षष्ठदशके ब्रह्मप्रतिपादननिरूपणं नाम
द्वितीयः समासः ॥ २ ॥
३. मायोद्भव.
श्रीगणेशाय नमः ॥ निर्गुण आत्मा तो निर्मळ । जैसें आकाश अंतराळ ।
घनदाट निर्मळ निश्चळ । सदोदित ॥ १ ॥ जे खंडलेंचि नाहीं अखंड । जें
उदंडाहूनि उदंड । जें गगनाहूनि वाँड ४ । अति सूक्ष्म ॥ २ ॥ जें दिसेना न-
१. शुद्ध. २. देहसुखाचा प्रयत्न सोडिला, हा अर्थ. ३. एकरूप. ४. मोठें.
? No, it is:
लाभे with a dot?
Wait, look at footnote 5:
There is a '५' somewhere in line 23-24!
Could the mark above "लाभे" be a superscript '५'???
YES!! A superscript 5!
Look at that mark above "लाभे":
It is a tiny digit '५'!!
Wow! Look at that: above "लाभे" is a tiny '५', which is footnote 5!
And look at footnote 5 at the bottom:
"५. आत्मरूपाचें ज्ञान झालें."
That's why! The word is simply "लाभे", and the tiny glyph above it is the superscript footnote number ५!
That makes total sense!
And let's look for the other footnote numbers:
Footnote 1: "१. सगुणनिर्गुणाच्या मिश्रणाचा."
Look above "कर्दमोचा" in line 6/7:
At the end of line 6, "कर्द-": is there a tiny '१'?
Footnote 2: "२. दूध."
Look above "क्षीरें" in line 7: there's a tiny '२' above "क्षीरें"!
Footnote 3: "३. उदक."
Look above "नीरें" in line 7: there's a tiny '३' above "नीरें"!
Footnote 4: "४. चिपाड."
Look above "बाकस