दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 153, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें११८ श्रीदासबोध. [ दशक
यथान्वयें १ । प्रकृतिपुरुषें २ जियें । तेहि ब्रह्म होती ॥ ४७ ॥ दृश्य पदार्थ आ-
टैतां ३ । आपणहि नुरे तत्वतां । ऐक्यरूपें ऐक्यता । मुळींच आहे ॥ ४८ ॥
सृष्टीची नाहीं वार्ता । तेथें सर्वहि ऐक्यता । पिंडब्रह्मांड ४ पाहों जातां । दिसेल
कोठें ॥ ४९ ॥ ज्ञानवन्हि प्रगटे ५ । तेणें दृश्य केर आटे । तदाकारें मूळ तुटे । भिन्न-
त्वाचें ॥ ५० ॥ मिथ्यात्वें वृत्ति फिरे ६ । तों दृश्य असतांच वोसरे । सहजचि
येणें प्रकारें । झालें आत्मनिवेदन ७ ॥ ५१ ॥ ऐसी सद्गुरूचे ठायीं अनन्यता ८ ।
तरी तुज कायसी रे चिंता । वेगळेपणें अभक्तां । उरोंचि नेदी ॥ ५२ ॥
आतां हेंचि दृढीकरण । व्हावया करीं सद्गुरुभजन । सद्गुरुभजनें समा-
धान । नेमस्त पावसी ॥ ५३ ॥ या नांव शिष्या आत्मज्ञान । येणें पाविजे
समाधान । भवभयाचें बंधन । समूळ मिथ्या ॥ ५४ ॥ देह मी वाटे ज्या
नरा । तो जाणावा आत्महंत्यारा ९ । देहाभिमानें येरझारा । भोगिल्याच
भोगी ॥ ५५ ॥ असे चहूं १० देहींवेगळा । जन्मकर्मा निराळा । सकळ ॲबळ ११
गौबॅळा ११ । सैबाह्य १२ तूं ॥ ५६ ॥ कोणासीच नाहीं बंधन । आंतीस्तव भुलले
जन । दृढ घेतला देहाभिमान । म्हणोनियां ॥ ५७ ॥ शिष्या एकांतीं बै-
सावें । स्वरूपीं विश्रांतीस जावें १३ । तेणें गुणें दृढ व्हावे । परमार्था सदा
॥ ५८ ॥ अखंड घडे श्रवण मनन । तरीच पाविजे समाधान । पूर्ण झा-
लिया ब्रह्मज्ञान । वैराग्य भरे अंगीं ॥ ५९ ॥ शिष्या मुक्तपणें १४ अनर्गल १५ ।
करिसी इंद्रियें बैरळ १६ । तेणें तुझी तळमळ । जाणार नाहीं ॥ ६० ॥ विषयीं
वैराग्य उपजलें । तयासीच पूर्ण ज्ञान झालें । मणी टाकितां लाधलें । राज्य
जेवीं ॥ ६१ ॥ ऐक शिष्या सावधान । आतां भविष्य मी सांगेन । जया
पुरुषास जें ध्यान । तयासि तेंचि प्राप्त ॥ ६२ ॥ म्हणोनि जे अविद्या ।
सांडूनि धरावी सुविद्या । तेणें गुणें जगद्वंद्या । पाविजे शीघ्र ॥ ६३ ॥
१. यथानुक्रमानें. २. दृश्य माया व तिचा भोक्ता जीव हीं दोन्ही. ३. लयास
जातां. ४. देह आणि जग. ५. ज्ञानरूपी अग्नि. ६. दृश्य मिथ्या असल्यामुळे
त्याचा विचार संपतो. ७. आत्मरूपाचें ज्ञान. ८. एकनिष्ठा. ९. आत्मघातकी. १०.
स्थूळ, सूक्ष्म, कारण व महाकारण असे चार देह एकांत एक आहेत, त्यांहून भिन्न.
११. दृश्य पसारा. १२. भिन्न. १३. स्वरूप जाणून स्वस्थ राहावें. १४. स्वतःला
मुक्त समजून. १५. स्वैर. १६. चंचल.