दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 151, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें११६ श्रीदासबोध. [ दशक
९ ॥ ऐसें शुद्ध ज्ञानाचें लक्षण । शुद्ध स्वरूपींच आपण । या नांव स्वरूप-
ज्ञान । जाणिजे श्रोतीं ॥ १० ॥ महावाक्य उपदेश भला । परी त्याचा जप
नाहीं बोलिला । तेथींचा तो विचार केला । पाहिजे साधकें ॥ ११ ॥ महा-
वाक्य उपदेशसार । परी घेतला पाहिजे विचार । त्याच्या जपें अंधकार ।
न फिटे भ्रांतीचा ॥ १२ ॥ महावाक्याचा अर्थ घेतां । आपण वस्तुचि
तत्वतां । त्याचा जप करितां । वृथा शिण होय ॥ १३ ॥ महावाक्याचें
विवरण । हें मुख्य ज्ञानाचें लक्षण । शुद्ध लक्ष्यांशें आपण । वस्तुचि आहे ॥
१४ ॥ आपला आपणासि लाभ । हें ज्ञान परम दुर्लभ । जें आदि अंतीं
स्वयंभ । स्वरूपचि स्वयें ॥ १५ ॥ जेथूनि हें सर्वहि प्रगटे । आणि सक-
ळहि जेथें आँटे । तें ज्ञान झालिया फिटे । भ्रांतिबंधन ॥ १६ ॥ मतें आणि
मतांतरें । जेथें होतीं निर्विकारें । अति सूक्ष्म विचारें । पाहतां ऐक्य ॥
१७ ॥ जें या चराचराचें मूळ । शुद्ध स्वरूप निर्मळ । या नांव ज्ञान केवळ ।
वेदांत मतें ॥ १८ ॥ शोधितां आपुलें मूळस्थान । सहजचि उडे अज्ञान ।
या नांव म्हणिजे ब्रह्मज्ञान । मोक्षदायक ॥ १९ ॥ आपणासि ओळखों
जातां । अंगीं बाणे सर्वज्ञता । तेणें एकदेशी वार्ता । निःशेष उडे ॥ २० ॥
मी कोण ऐसा हेत । धरूनि पाहतां देहाँतीत । अवलोकितां नेमस्त । स्वरू-
पचि होय ॥ २१ ॥ ऐसे पूर्वी थोर थोर । जेणें ज्ञानें पैलपार । पावले ते
साचार । ऐक आतां ॥ २२ ॥ व्यास वसिष्ठ महामुनी । शुक नारद समा-
धानी । जनकादिक महाज्ञानी । येणेंचि ज्ञानें ॥ २३ ॥ वामदेवाद्यिकयोगी-
श्वर । वाल्मीक अत्रि ऋषीश्वर । शौनकादि अध्यात्मसार । वेदांत मतें ॥ २४ ॥
सनकादिक मुख्य करूनी । आदिनाथ मीन गोरक्षमुनी । आणिक बोलतां
वचनीं । अगाध असती ॥ २५ ॥ सिद्ध मुनि महानुभाव । सकळांचा जो
अंतर्भाव । जेणें सुखें महादेव । डुलतो सदा ॥ २६ ॥ जें वेदशास्त्राचें सार ।
सिद्धांत धादांत विचार । ज्याची प्राप्ती भावानुसार । भाविकांसि होय ॥
१. ब्रह्म. २. ज्या संबंधानें कांहीं बोलतां येतें तो पदार्थ वाच्यांश होय, व
जो त्या पदार्थासंबंधीं कांहीं बोलतो पण ज्याचेसंबंधीं कांहीं बोलण्याला त्याहून
अन्य कोणी नाहीं, तो लक्ष्यांश, -या विचाराच्या योगें. ३. स्वतःसिद्ध. ४. लय पावतें.
५. निर्द्वंद्व. ६. जीव व जड पदार्थ या दोहोंचें. ७. देहाहून भिन्न. ८. मत्स्येंद्रनाथ.