सामग्री पर जाएँ
सर्वकोश
दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

पृष्ठ 158, कुल 467 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 158

॥ १३ ॥ पूर्वपाप वोढवलें । मज पुण्य नाहीं घडलें । मन अन्होटीं¹ पडिलें ।
सर्वकाळ ॥ १४ ॥ भक्तिमाता हे बुडविली । शांतिविश्रांति मोडिली । मूर्ख-
पणें म्यां बिघडिली । सद्बुद्धि सद्वासना ॥ १५ ॥ आतां कैसेनि घडेल
सार्थक । दोष केले निरर्थक । पाहों जातां विवेक । उरला नाहीं ॥ १६ ॥
कोण उपाय करावा । कैसा परलोक पाहावा । कोणत्या गुणें देवाधिदेवा ।
पाविजेल ॥ १७ ॥ नाहीं सद्भाव उपजला । अवघा लौकिक संपादिला । दंभ
वरपंगें केला । खटाटोप कर्माचा ॥ १८ ॥ कीर्तन केलें पोटासाठीं । देव
मांडिले हाटवटीं² । आहा देवा बुद्धि खोटी । माझी मीच जाणें ॥ १९ ॥
पोटीं धरूनि अभिमान । शाब्दिक बोलिलों निरभिमान । अंतरीं वांछून्-
यां धन । ध्यानस्थ जाहलों ॥ २० ॥ ³व्युत्पत्तीनें लोक भोंदले । पोटासाठीं
संत निंदिले । माझे पोटीं दोष भरले । नाना प्रकारों ॥ २१ ॥ सत्य तेंचि
उच्छेदिलें । मिथ्या तेंचि प्रतिपादिलें । ऐसें नाना कर्म केलें । उदर भरा-
वया कारणें ॥ २२ ॥ ऐसा पोटीं प्रस्तावला । निरूपणें पालटला । तोचि
मुमुक्षु बोलिला । ग्रंथांतरीं ॥ २३ ॥ सन्मार्ग पोटीं धरी । सत्संगाची वां-
छा करी । विरक्त झाला संसारीं । या नांव मुमुक्षु ॥ २४ ॥ गेले राजे
चक्रवर्ती । माझें वैभव तें किती । म्हणे धरू सत्संगाची गती । या नांव
मुमुक्षु ॥ २५ ॥ आपले अवगुण देखे । विरक्तिबळें वोळखे । आपणासि
निंदी दुःखें । या नांव मुमुक्षु ॥ २६ ॥ म्हणे मी काय दंभधारी⁴ । म्हणे
मी काय अनाचारी । म्हणे मी काय अनुपकारी । या नांव मुमुक्षु ॥ २७॥
म्हणे मी पतित चांडाळ । म्हणे मी दुराचारी खळ । म्हणे मी पापी केवळ ।
या नांव मुमुक्षु ॥ २८ ॥ म्हणे मी अभक्त दुर्जन । म्हणे मी हीनाहूनी
हीन । म्हणे मी जन्मलों पाषाण । या नांव मुमुक्षु ॥ २९ ॥ म्हणे मी दुर-
भिमानी । म्हणे मी तपिष्ठ⁶ जनीं । म्हणे मी नानाव्यसनीं । या नांव मु-
मुक्षु ॥ ३० ॥ म्हणे मी आळशी अंगचोर । म्हणे मी कपटी कांतरें⁷ । म्हणे
मी मूर्ख अविचार । या नांव मुमुक्षु ॥ ३१ ॥ म्हणे मी निकामी⁵ वाचाळ ।
म्हणे मी पाषांडी तोंडाळ । म्हणे मी कुबुद्धि कुटिल । या नांव मुमुक्षु ॥
१. आडवाटेंत. कुमार्गांत. २. बाजारांत. ३. विद्वत्तेनें. ४. ढोंगी. ५. निरू-
पयोगी. ६. तामसी. ७. भितरा.