दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 162, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें५ वा.] साधकलक्षण. १२७
भडकाविलें । काळाचें टांगें¹ मोडिलें । मस्तक हाणोनि पाडिलें । जन्म-
मृत्यूचें ॥ ४१ ॥ देहसंबंधावरी लोटला । संकल्पावरी उठावला । कल्पनेचा
घात केला । अकस्मात ॥ ४२ ॥ अपघातासि ताडिलें । लिंगदेहासि विभां-
डिलें । पाषांडासि पछाडिलें । विवेकबळें ॥ ४३ ॥ गर्वांवरी गर्व केला ।
स्वार्थ अनर्थां घातला । अनर्थ तोहि निर्दाळिला । नीतिन्यायें ॥ ४४ ॥
मोहासि मध्येंच तोडिलें । दुःखासि दुधडाँचि³ केलें । शोकासि खंडूनि सां-
डिलें । एकीकडे ॥ ४५ ॥ द्वेष केला देशधडी । अभावाची चेंपिली नरडी ।
धाकें उदर तडाडी । कुतर्काचें ॥ ४६ ॥ ज्ञानें विवेक माजला । तेणें निश्चय
बळावला । अवगुणांचा संहार केला । वैराग्यबळें ॥ ४७ ॥ अधर्मास स्व-
धर्मैं टाकिलें । कुकर्मास सत्कर्मैं झुगारिलें । लोटूनि वाटा लाविलें । विचारें
अविचारांसी ॥ ४८ ॥ तिरस्कार तो चिराडिला । द्वेष खिरडून सांडिला ।
विषाँद अविश्वाँदें घातला । पायांतळीं ॥ ४९ ॥ कोपावरी घालणें घातलें ।
कापट्य अंतरीं कुटिलें । सख्य आपुलें मानिलें । विश्वजनीं ॥ ५० ॥ प्रवृ-
त्तीचाँ केला त्याग । सुहृदांचा सोडिला संग । निवृत्तिमंथें ज्ञानयोग । सा-
धिता झाला ॥ ५१ ॥ विष॑यमँदासि सितेंरिलें । कुविद्येसि वेडाविलें । आ-
पणासि सोडविलें । आप्ततस्करापासूनी ॥ ५२ ॥ पराधीनतेवरी कोपला ।
ममतेवरी संतापला । दुराशेचा त्याग केला । एकाएकीं ॥ ५३ ॥ स्वरूपीं
घातलें मना । यातनेसि केली यातना । साधन आणि प्रयत्ना । प्रतिष्ठिलें
॥ ५४ ॥ अभ्यासाचा संग धरिला । साक्षेपारिसा निघाला । प्रयत्न सां-
गातीं घेतला । साधनपंथें ॥ ५५ ॥ सावध दक्ष तो साधक । पाहे नित्या-
नित्यविवेक । संग त्यागूनि एक । सत्संग धरी ॥ ५६ ॥ बळेंच सारिला
संसार । विवेकें टाकिला जोजार । शुद्धाचारें अनाचार । अष्टाविला ॥ ५७ ॥
विसरास विसरला । आळसाचा आळस केला । सावध नाहीं दुश्चित झाला ।
दुश्चितपणासी ॥ ५८ ॥ आतां असो हैं बोलणें । अवगुण सांडी निरूपणें ।
तो साधक ऐसा येणें । प्रमाणें बुँझावा ॥ ५९॥ बळेंचचि अवघा त्याग कीजे ।
१. तंगडी. २. फोडिलें. ३. दुभंग. ४. चुरडून. ५. खेद. ६. समाधानानें.
७. कर्मे करण्याच्या इच्छेचा. ८. जिवलगांचा. ९. चित्ताला अंतर्मुख करण्याच्या
मार्गानें. १०. विषयरूप फांसेगारास. ११. चुकविलें. १२. जाणावा.