दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 159, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें१२४ श्रीदासबोध. [ दशक
३२ ॥ म्हणे मी कांहींच नेणें । म्हणे मी सकळांहूनि उणें । आपलीं वर्णी
कुलक्षणें । या नांव मुमुक्षु ॥ ३३ ॥ म्हणे मी कुश्चिळ¹ अघोरी । म्हणे मी
नीच नानापरी । म्हणे मी अनधिकारी । या नांव मुमुक्षु ॥ ३४ ॥ म्हणे
मी काय आपस्वार्थी । म्हणे मी काय अनर्थी । म्हणे मी नव्हे परमार्थी ।
या नांव मुमुक्षु ॥ ३५ ॥ म्हणे मी अवगुणांची राशी । म्हणे मी कुकर्मी
आळशी । म्हणे मी भार झालों भूमीशीं । या नांव मुमुक्षु ॥ ३६ ॥ आप-
णास निंदी सावकाश । पोटीं संसाराचा त्रास । धरीं सत्संगाचा हव्यास ।
या नांव मुमुक्षु ॥ ३७ ॥ नाना तीर्थे धुंडाळिलीं । शमदमादि² साधनें
केलीं । नाना ग्रंथांतरें पाहिलीं । शोधूनियां ॥ ३८ ॥ तेणें नव्हे समाधान ।
वाटे अवघाच अनुमान । म्हणे रिघूं संतांस शरण । या नांव मुमुक्षु ॥ ३९ ॥
देहाभिमान कुलाभिमान । द्रव्याभिमान मानाभिमान । सांडूनि संतचर-
णीं ³अनन्य । या नांव मुमुक्षु ॥ ४० ॥ अहंता सांडूनि दुरी । आपणासी
निंदी नानापरी । मोक्षाची अपेक्षा करी । या नांव मुमुक्षु ॥ ४१ ॥ ज्याचें
मन थोरपणा लाजे । जो परमार्थाकारणें झिजे । संतपायीं विश्वास उपजे ।
या नांव मुमुक्षु ॥ ४२ ॥ स्वार्थ सांडूनि प्रपंचाचा । हव्यास धरिला
परमार्थाचा । अंकितें⁴ होईन सज्जनांचा । या नांव मुमुक्षु ॥ ४३ ॥ ऐसा
मुमुक्षु जाणिजे । संकेतचिन्हें⁵ ओळिखिजे । पुढें श्रोतीं अवधान दीजे ।
साधकलक्षणीं ॥ ४४ ॥ इतिश्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे पंचमदशके मुमु-
क्षुलक्षणनिरूपणं नाम अष्टमः समासः ॥ ८ ॥
९. साधकलक्षण.
श्रीगणेशाय नमः ॥ मागां मुमुक्षूचें लक्षण । संकेतें केलें कथन । आतां
परिसा सावधान । साधक तो कैसा ॥ १ ॥ अवगुणांचा करूनि त्याग ।
जेणें धरिला संतसंग । तयासि बोलिजे मग । साधक ऐसा ॥ २ ॥ जो
संतांसी शरण गेला । संतजनीं आश्वासिला । मग तो साधक बोलिला ।
ग्रंथांतरीं ॥ ३ ॥ उपदेशिलें आत्मज्ञान । तुटलें संसारबंधन । दृढतेकारणें
१. अमंगळ. २. मन व इंद्रियें यांस जिंकणें. ३. एकनिष्ठ. ४. दास.
५. संक्षेपतः.