दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 161, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें१२६ श्रीदासबोध. [ दशक
या नांव साधक ॥ २२ ॥ परती सारूनि उपाधी । असाध्य वस्तु साधनें
साधी । स्वरूपीं करी दृढ बुद्धी । या नांव साधक ॥ २३ ॥ देवभक्तांचें मूळ ।
शोधूनि पाहे सकळ । साध्यचि होय तत्काळ । या नांव साधक ॥ २४ ॥
विवेकबळें गुप्त झाला । आपेंआप मावळला । दिसतो परी देखिला३ । नाहींच
कोणीं ॥ २५ ॥ मीपण मागें सांडिलें । स्वयें आपणासि धुंडिलें । तुर्येसहित
ओलांडिलें । या नांव साधक ॥ २६ ॥ पुढें उन्मनींच्या४ शेवटीं । आपली
आपणास अखंड भेटी । अखंड अनुभवीं ज्याची दृष्टी । या नांव साधक
॥ २७ ॥ द्वैताचा तडका तोडिला । भासाचा भासें मोडिला । देहीं असोनि
विदेही झाला । या नांव साधक ॥ २८ ॥ जयास अखंड स्वरूपस्थिती ।
नाहीं देहाची अहंकृती । सकळ संदेह निवृत्ती । या नांव साधक ॥ २९ ॥
पंचभूतांचा विस्तार । जयास वाटे स्वप्नाकार । निर्गुणीं जयाचा निर्धार ।
या नांव साधक ॥ ३० ॥ स्वप्नीं भय जें वाटलें । तें जागृतीस नाहीं आलें ।
सकळ मिथ्या निर्धारिलें । या नांव साधक ॥ ३१ ॥ मायेचें जें प्रत्यक्षपण
जनास वाटे हें प्रमाण । स्वानुभवें अप्रमाण । साधकें केलें ॥ ३२ ॥ निद्रा
सांडूनि चेईंरा६ झाला । तो स्वप्नभयापासोनि सुटला । माया सांडूनि तैसा
गेला । साधक स्वरूपीं ॥ ३३ ॥ ऐसी अंतरस्थिति बाणली । बाह्य निस्पृह-
ता अवलंबिली । संसारउपाधी त्यागिली । या नांव साधक ॥ ३४ ॥
कामापासोनि सुटला । क्रोधापासोनि पळाला । मदमत्सर सांडिला । एकी-
कडे ॥ ३५ ॥ कुळाभिमानासि सांडिलें । लोकलाजेसी लाजविलें । परमा-
र्थासी माजविलें । विवेकबळें ॥ ३६ ॥ अविद्येपासुनि फडकला । प्रपंचा-
पासोनि निसटला । लोभाचे हातींचा गेला । अकस्मात ॥ ३७ ॥ थोरपणा-
सि पाडिलें । वैभवासि लिथाडिलें । महत्त्वासि झिंजाडिलें । विरक्तिबळें
॥ ३८ ॥ मेदाचा मडघां९ मोडिला । अहंकार झोडूनी पाडिला । पायीं ध-
रूनि आपटिला । संदेहशत्रू ॥ ३९ ॥ विकल्पाचा केला वधू । थोपै मारिला
भवसिंधू । सकळ भूतांचा विरोधू । तोडूनि टाकिला ॥ ४० ॥ भवभयासि
१. मायेचा संबंध. २. देह दिसतो. ३. तो स्वतः दिसत नाहीं. ४. निर्विकल्प
समाधि; एथें मनाचा लय होतो. ५. कल्पना. ६. जागृत. ७. लाथ मारिली
८. शिडकारिलें. ९. बिऱ्हाड. १०. चापट, थापड.