दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 154, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें५ वा.] बद्धलक्षण. ११५
सन्निपाताचेनि दुःखें । भयानक दृष्टीस देखे । औषध घेतांचि सुखें । आनंद
पावे ॥ ६४ ॥ तैसें अज्ञानसन्निपातें । मिथ्या दृष्टीस दिसतें । ज्ञान औषध
घेतां चित्तें । जें मुळींच नाहीं ॥ ६५ ॥ मिथ्या स्वप्नें बोसेण झाला । तो
जागृतीस आणिला । तेणें पूर्वदशा पावला । निर्भय जे ॥ ६६ ॥ मिथ्याच
परी सत्य वाटलें । तेणें गुणें दुःख झालें । मिथ्यात्वें सत्य निरसलें । हें तों
घडेना ॥ ६७ ॥ मिथ्या आहे जागृतासी । परी वेड लाविलें निद्रितासी ।
जागा झालिया तयासी । भयचि नाहीं ॥ ६८ ॥ परी अविद्याझोंप येते भरें ।
भरे सर्वांगीं कांपिरें । पूर्ण जागृति श्रवणद्वारें । मननें करावीं ॥ ६९ ॥
जागृतीची वोळखण । ऐक तयाचें लक्षण । जो विषयीं विरक्त पूर्ण । अंत-
रापासुनी ॥ ७० ॥ जेणें विरक्तीस न यावें । तो साधक ऐसें जाणावें ।
तेणें साधन करावें । थोरीव सांडूनी ॥ ७१ ॥ साधन न माने जयाला ।
तो सिद्धपणें बद्ध झाला । त्याहुनि मुमुक्षु भला । ज्ञानाधिकारी ॥ ७२ ॥
तंव शिष्यें केला प्रश्न । कैसें बद्धमुमुक्षूंचें लक्षण । साधक सिद्ध ओळखण ।
कैसी जाणावी ॥ ७३ ॥ याचें उत्तर श्रोत्यांसी । दीधलें पुढिले समासीं ।
सावध श्रोतीं कथेसी । अवधान द्यावें ॥ ७४ ॥ इति श्रीदासबोधे गुरु-
शिष्यसंवादे पंचमदशके शुद्धज्ञाननिरूपणं नाम षष्ठः समासः ॥ ६ ॥
७. बद्धलक्षण.
श्रीगणेशाय नमः ॥ सृष्टी जे कां चराचर । जीव दाटले अपार । परी ते
अवघे चार । बोलिजती ॥ १ ॥ ऐक तयांचें लक्षण । चार ते कोण कोण ।
बद्ध मुमुक्षु साधक जाण । चौथा तो सिद्ध ॥ २ ॥ या चौघां विरहित
कांहीं । चराचरीं पांचवा नाहीं । आतां असो हीं सर्वंही । विशद
करूं ॥ ३ ॥ बद्ध म्हणिजे तो कोण । कैसें मुमुक्षूचें लक्षण । साधक सिद्ध
वोळखण । कैसी जाणावी ॥ ४ ॥ श्रोतीं व्हावें सावध । प्रस्तुत ऐका बद्ध ।
मुमुक्षु साधक आणि सिद्ध । पुढें निरूपिजेल ॥ ५ ॥ आतां बद्ध तो जा-
णिजे ऐसा । अंधारींचा अंध जैसा । चक्षूविण दाही दिशा । शून्याकार
१. ज्वराच्या. २. भयभीत. ३. वेड. ४. संसारांत गढलेला. ५. संसारांतून सुटूं
इच्छिणारा ६. सुटण्याचा मार्ग चालणारा. ७. मुक्त. ८. डोळ्यांवांचून.